आमचे तंत्रज्ञान प्रेम - सॉफ्टवेअर विभाग

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
18 Oct 2010 - 1:06 am

नमस्कार्,नमस्कार......

तंत्रज्ञान म्हणजे एक मित्र जो आपल्याकडुन कसलीच अपेक्षा न ठेवता आपल्याला आनंद देत राहतो.आपण दु:खी असु ,नाराज असु तरी तो स्वःता आपले कार्य अविरतपणे पार पाडतो,आपल्या निराश मनाला दीलासा देत,थंड फुंकर मारत.(बस,बस झाल!!)

असो, तर आज आम्ही(?) आमचे तंत्रज्ञानावर असणारे प्रेम 'सॉफ्टवेअर' ह्या त्याच तंत्रज्ञानाचा भाग असणा-या संकल्पनेतुन दाखवु ईच्छीत आहोत.'सॉफ्टवेअर्स' जी आमच्या मनावर राज्य करतात्,त्यांची महीमा(?) गाणार आहोत.

नोंद :१) आमचे संगणक्,हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्याबाबतचे ज्ञान म्हणजे बालवाडीतल्या पोराला जेवढे 'न्युटन्स थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी' मधले समजते,तेवढेच असल्याने खालील लिखाण जास्त गंभीरतेने घेउ नये(१००% खरे असले तरी).
२)ही माझी स्वःताची मते आहेत्,त्यांना माझ्याशिवाय कोणाचाच आधार नसल्याने एखादे मत बनवण्यामागचे कारण वगैरे देउ शकत नाही.
-------------------------------------------------------------------------

१ ) गाणी ऐकण्यासाठी .
windows media player 11

आहह्हा...........अप्रतीम बनवाटीचे व गाणी ऐकण्याचा अभुतपुर्व आनंद देण्यास सक्षम असे सॉफ्टवेअर!!!
XP व MS-Office ह्यांच्या रांगेत बसण्यालायक Microsoft चे एकमेव सॉफ्टवेअर!
IE 6,7,8 बनवणारे हेच का? हा प्रश्न सारखा सतावतो.

Equalizer एवढे छान असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते,हो हे वाक्य शब्दन शब्द खरे आहे.Equalizer
काय कमी होत त्यात SRS WOW Effect हे म्हणजे सोने पे सुहागा........आणि हे काय कमी होत त्यात Quite mode ह्याला आता बोलाव तरी काय!!!!!

भन्न्न्नाट्ट्ट्ट्ट्ट्ट सॉफ्टवेअर!!!

ह्याआगोदर आम्ही मन मोठं करुन 'spider player'ला पसंदी दर्शवली होती,ह्याच्या अनेक स्पर्धकांना डावलुन.पण ह्या कमीन्या सॉफ्टवेअरने क्रॅश होउन होउन ईतके छळले की आमचा राग ज्या 'enter' नावाच्या बटणाला सहन करावा लागायचा त्याने कंटाळुन जीव सोडला.असे हे सॉफ्टवेअर @#$@#$@$@!!!!!!!

२) संगणक सुरक्षेसाठी.
Smitfraudfix Tool व Malwarebytes' Anti Malware
हे म्हणजे कस माहीतेय का,आपण बोलतो ना अमका त्रास होतोय का?
मग 'हे' खा त्यावर 'ते' पिया.
तस ह्या दोघांच आहे.पहील Smitfraudfix Tool चालवायच safe mode मधे व नंतर restart मारुन Malwarebytes' Anti Malware चालवायच्,बस्स!!
काम तमाम!!
होत्याचे नव्हते होतात साले ते ट्रोजन व ईतर सर्व लेकाचे!!
म्हणुन हे दोघे आमची पहीली पसंद्,त्यांनंतर ते ईतर मेमरी खाणारे,नावानेच नकोसे वाटणारे अ‍ॅन्टीव्हायरस.
त्यात ते 'कास्पीरस्की' कीकायतं नावाच तर खुपच डोकंखाउ,त्यांना फुटबॉलसारखे उडवणारे हे दोघे म्हणजे 'मुश्कील मे हमदर्द का साथी!!' (म्हणजे काय?)
ना मेमरी खात्,ना सुरु व्हायला वेळ घेत्,म्हणुन आम्ही ५१२ रॅमवाले ह्यांनाच प्राधान्य देतो.

वेळ नसल्याने व आम्हाला कशाचा तरी झटका आल्याने ईथेच थांबत आहोत.
जमल्यास पुन्हा बोलु.

मुक्तकतंत्रविज्ञानरेखाटनप्रकटनविचारलेखमाध्यमवेधमाहितीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

18 Oct 2010 - 7:46 am | विंजिनेर

संगणक सुरक्षा आणि विंडोज हे कॉम्बिनेशन अंमळ विनोदी आहे.

लिनक्स वापरा... निवांत राहा....

अवलिया's picture

18 Oct 2010 - 11:23 am | अवलिया

सहमत आहे.

>>>लिनक्स वापरा... निवांत राहा....
च्यामारी लिनक्सच्या जागी कुठल्याही कंडोमचे नाव टाकले तर चांगली जाहिरात होईल.

शानबा५१२'s picture

18 Oct 2010 - 4:13 pm | शानबा५१२

धन्यवाद.

३) Revo uninstaller
Un-installation ह्या सॉफ्टवेअरशिवाय म्हणजे संगणकावर जुलुम!!

Add- remove programचा आजा व faulty registry entries चा कर्दनकाळ असे हे सॉफ्टवेअर,अगदी ह्याचीच गरज असते निरोगी संगणकाला!!!
फक्त registry entries च नाहीत तर program files मधील folders जी आपण सहसा स्वःताहुन डीलीट करत नाही,तीही हे सॉफ्ट्वेअर काढुन टाकते.

ह्यात लाखची भर असे Hunter mode ह्याबाबत म्हणावे समजत नाही,एकदम जब्राट सॉफ्टवेअर्,प्रत्येकाकडे असावेच असे.

कोण पेक्षा काय याची जाण असेल तर भलत्या रोगांची लागण होत नाही.

बट्ट्याबोळ's picture

18 Oct 2010 - 10:01 am | बट्ट्याबोळ

तु. मा. सा.
१. computer hardware चांगलं असेल तर i-tunes वापरा. library management options, voice clarity, eq. options खूप चांगले आहेत त्यात. (core-2 duo, 4 gig ram with win7)
२. AVG Antivirus खूप ligheweight आहे. वापरून बघा. नियमीत update केला तर virus येणारच नाही.

शानबा५१२'s picture

18 Oct 2010 - 1:16 pm | शानबा५१२

अतिशय बकवास व बोरींग लेख आहे

परिकथेतील राजकुमार's picture

18 Oct 2010 - 1:36 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. शानबा,
तसेही आम्ही तुमच्या लेखावर प्रतिक्रीया द्यायचे टाळतोच. मात्र ह्या लेखातील काही चुकीच्या माहितीमुळे वाचकांचे नुकसान होउ नये म्हणुन प्रतिक्रीया देत आहे. प्रतिक्रीया नको असल्यास संपादकांशी संपर्क साधावा. ह्या प्रतिक्रीयेवरुन आमच्याही विनाकारण वाद घालण्यास येउ नये.

२) संगणक सुरक्षेसाठी.
Smitfraudfix Tool व Malwarebytes' Anti Malware
हे म्हणजे कस माहीतेय का,आपण बोलतो ना अमका त्रास होतोय का?
मग 'हे' खा त्यावर 'ते' पिया.
तस ह्या दोघांच आहे.पहील Smitfraudfix Tool चालवायच safe mode मधे व नंतर restart मारुन Malwarebytes' Anti Malware चालवायच्,बस्स!!
काम तमाम!!
होत्याचे नव्हते होतात साले ते ट्रोजन व ईतर सर्व लेकाचे!!

Smitfraudfix Tool हे ट्रोजन वगैरेसाठी नाही तर विशेषतः आपल्या संगणकावर जे काही फेक अँटिव्हायरस अथवा मालवेअर्स लोड होतात आणि आपल्याला संगणक बाधित झाल्याच्या वारंवार खोट्या सूचना देतात त्या प्रोग्राम्सला पुर्णपणे काढुन टाकण्यासाठी वापरले जाते.

हे सॉफ्टवेअर वापरताना त्यासंबंधित सूचना पुर्ण वाचुनच ते वापरावे. बर्‍याचदा क्लिनिंग नंतर आपल्याला काही रजिस्ट्री चेंजेस देखील करावे लागतात अथवा ते आपल्या परवानगीने आपोआप केले जातात. अशावेळी आधी रजिस्ट्रीचा बॅकअप घेउन ठेवण्यास विसरु नये. हि सुविधा रजिस्ट्री चेंजेस करण्याआधी आपोआप आपल्याला उपलब्ध होते.

सर्वात महत्वाचे :- Smitfraudfix Tool वापरण्याऐवजी Malwarebytes' Anti Malware + SpyBot हे जय-विरु चे काँबीनेशन सर्वात उत्तम, सुरक्षीत आणि प्रभावी आहे.

योगी९००'s picture

18 Oct 2010 - 2:01 pm | योगी९००

परा यांच्याशी सहमत..

(चांगले antivirus वापरले तर वरचे Smitfraudfix Tool वापरावे लागत नाही. मी Quick Heal total security वापरतो.. आणि तसल्या websites वर जात नाही..म्हणून माझा संगणक या सर्वांपासून सुरक्षित आहे.)

शानबा५१२'s picture

18 Oct 2010 - 3:13 pm | शानबा५१२

Quick Heal total security

माझ्या रजीस्ट्रीची आधीच वाट लागल्याने असे सॉफ्टवेअर्स टाळतो.

ह्यात Avira चांगले आहे असे वाटते.virus definition (?) वारंवार अपडेटही होत असते.

शानबा५१२'s picture

18 Oct 2010 - 3:09 pm | शानबा५१२

विवीध खुलाश्यांबद्दल धन्यवाद.

मी एकदा खाली प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे Quick heal वापरले होते.तेव्हा 'ट्रोजन'च होता हे नक्की,पण ह्या सॉफ्टवेअरने ते काढल नाही,म्हणुन Smitfraudfix वापरले ,नंतर Malwarebytes' Anti Malware वापरले,नक्की कोणी ट्रोजन काढला माहीती नाही,पण सर्व ठीक झाले होते.पण ट्रोजन दोघांपैकी एक वापरुनही निष्क्रीय करता येतात असा अनुभव आहे.

Malwarebytes' Anti Malware + SpyBot

सहमत दोन्ही प्रभावी आहेत.

पण जेव्हा काही व्हायरस कोणतीच drive access करु देत नाही,तेव्हा desktop वर ठेवलेले हे सॉफ्टवेअर कामाला येते.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Oct 2010 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार

पण जेव्हा काही व्हायरस कोणतीच drive access करु देत नाही,तेव्हा desktop वर ठेवलेले हे सॉफ्टवेअर कामाला येते.


तेंव्हा मग Start - Run - Your CMD वापरायचे.

शानबा५१२'s picture

18 Oct 2010 - 3:59 pm | शानबा५१२

आपल्याला WinBlue ला तोंड द्यावे लागलेय का?

तेव्हा तुम्ही काहीच वापरु शकत नाही.फक्त आर्धी स्क्रीन वापरु शकता.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Oct 2010 - 4:15 pm | परिकथेतील राजकुमार

काय सांगता काय ?
फारच भयंकर आहे हो हे सगळे.

असो..

तुमचे चालु द्या. आमची आता ह्या धाग्यावरुन रजा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 7:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचे चालु द्या. आमची आता ह्या धाग्यावरुन रजा.

तुम्ही आंतरजालावारून रजा कधी घेणार?

असो. तुमच्यासाठी खास लिनक्सची सीडी जाळून ठेवली आहे, ती नाही नेलीत तरी चालेल! ;-)

सद्दाम हुसैन's picture

18 Oct 2010 - 8:21 pm | सद्दाम हुसैन

खुप छान छान लिहिले आहेस शानबा. नकारात्मक प्रतिक्रियामुळे निराश होउ नकोस .. त्या येतच रहातात.
आपण आपले लिहावे. तु छान लिहितोस .. निर्विवाद!!

गणपा's picture

18 Oct 2010 - 8:42 pm | गणपा

चक्क ० (शुन्य)

आपली बॉरोव्ड प्रतिभा जपणे काही सोपे नाही गणपा, पटत नसेल तर पहा बरे प्रयत्न करुन एकदा. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 10:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा ... तुलापण गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचा राग आहे का काय रे? ;-)