दहीभात..!
इथे शब्द संपातात!
हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!
कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!
पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..
थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :)
दहीभात कधीही खावा..
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात.. रासायनिक प्रक्रियेचा इतका चांगला आउटपुट जगात इतरत्र पाहायला मिळणार नाही.. :)
एखाद्या लाहनग्याच्या निरागस हास्यात जो गोडवा, तोच गोडवा दहीभाताचा!
'दहीभाताचा अमृतकाला' असं गदिमांनी (चूभूदेघे) कुठेसं म्हटलंय ते खरंच आहे..
मंडळी, आज गोपाळकाला. म्हणूनच या छोटेखानी लेखांच्या मालिकेची सुरवात दहीभाताच्या या अमृतकाल्याचा नैवेद्य दाखवून करत आहे..
वाचकांनीही दहीभाताबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्या व या अमृतकाल्याचे अंशत: ऋण फेडावे, ही विनंती..
तात्या.
प्रतिक्रिया
2 Sep 2010 - 12:25 pm | डावखुरा
तात्या..हे बोवा झकास झाले तुमची परत एंट्री....
तसा मला नाही आवडत दही भात पण ते छायाचित्र आणि तुमचे ते खुमास्दार वर्णन वाचुन चव तरी घ्यावीच लागेल..."दहीभाताचा अमृतकाला"
2 Sep 2010 - 1:33 pm | चिंतामणी
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात.. रासायनिक प्रक्रियेचा इतका चांगला आउटपुट जगात इतरत्र पाहायला मिळणार नाही..
मी एका कंपनीत काम करीत असताना माझ्या डब्यात न चुकता वरिल प्रमाणे भात असायचा. त्यामुळे माझ्या डब्यावर अनेकांच्या उड्या असायच्या.
2 Sep 2010 - 1:37 pm | अवलिया
मस्त रे तात्या !!
2 Sep 2010 - 2:22 pm | हेम
माझा ट्रेकसाठीचा हा सगळ्यात फेवरेट डबा.... बरोबर सांडगी मिरची किंवा खारातली मिरची. .परवा रविवारच्या ट्रेकला तात्यांची आठवण काढत डबा खाणार! त्यांना त्यादिवशी उचक्यांचा त्रास झाल्यास आमची जबाबदारी नाही.
2 Sep 2010 - 2:55 pm | दाद
दहिभात खाउनच लिहितोय. दहिभात सुंदर आहेच पण त्याउन सुंदर, पुढच्या ओळी!
2 Sep 2010 - 3:48 pm | सुप्रिया
मस्त आठवण करून दिलीत. आजच दहिभात करून खाणार.
2 Sep 2010 - 4:25 pm | टुकुल
मस्त मस्त लेख तात्या.
--टुकुल
2 Sep 2010 - 4:31 pm | प्रचेतस
सुरेख लेख तात्या, मी पण आज दहीभात खाणारच.
2 Sep 2010 - 5:13 pm | अब् क
वॉव!!!!!!!!!!
तोन्डाला पानी सुटल!!!!!!!!!!!!!
2 Sep 2010 - 5:28 pm | सुनील
छोटेखानी लेख छान आणि समयोचित!
बाकी मला स्वतःला (खायला दुसरे काही नसले आणि करत बसायला वेळ नसला की) नुसत्या भातात दही आणि हिरव्या मिरचीचे लोणचे घालून केलेला झटपट दहीभात आवडतो!
2 Sep 2010 - 11:51 pm | हर्षद आनंदी
डिश बघुनच तोंडाला पाणी सुटलं.. उद्या दहि-भात चापणारच
3 Sep 2010 - 12:21 am | बेसनलाडू
खायची इच्छा झाली आहे. आज अनायसे गोकुळाष्टमी असल्याने निमित्तही आयतेच मिळाले आहे.
(नैमित्तिक)बेसनलाडू
3 Sep 2010 - 2:35 am | इंटरनेटस्नेही
आम्ही दहिभात हँगओअव्हर झालेल्या दिवशी खातो!
अध्यक्ष,
महाराष्ट्र मद्यपान प्रचारक महामंडळ,
(मुख्यालय: स. दा. डोलकर मार्ग, मु. पो. तहानलेले गाव)
3 Sep 2010 - 2:43 am | चतुरंग
हिरवी मिर्ची आणि हिरवागार कडिपत्ता असा तुपातला तडका मारके दहीभात म्हणजे ...म्हणजे..जाऊ दे नुसत्या वर्णनानेच झोप यायला लागली! :)
(पेंद्या)चतुरंग
3 Sep 2010 - 12:48 pm | विसोबा खेचर
प्रतिसाद देणार्या सर्व रसिकांचे व वाचनमात्र मान्यवरांचे आभार..
तात्या.
3 Sep 2010 - 12:53 pm | अवलिया
म्हणजे? प्रतिसाद देणारे रसिक मान्यवर नाहीत काय?