आज काल मिपाचा दर्जा खुप खालवलाय म्हणे.. सारखे कैच्या कैच फुटकळ धागे येत असतात!!!!
मग अशा फुटकळ धाग्यात आम्हीही एक भर घालावीच म्हणतो. संपादक मंडळाला आमचा धागा उडवायचा पुर्ण अधिकार आहे याचे भान आम्हाला आहेच. पण मिपाच्या लेखनप्रकारात आम्हाला सद्भावना, शुभेच्छा आणि अभिनंदन असे लेखनप्रकार दिसले आणि आम्ही हा लेख लिहायची हिम्मत केली. (आता तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला कळलंय की संपादक मंडळाला असे अभिनंदनाचे धागे आवडत नाहीत. कोण म्हणे रे तो आम्हाला कसे कळले??? अरे संपादक मंडळात राहुन अशा बातम्या कळत नाहीत रे भौ. त्यासाठी खास उपक्रमावर जाऊन रिकामटेकड्या लोकांचा खरडवह्या चाळ्यावा लागतात Wink. हो तिथे सध्या मिसळपाव उर्फ बालवाडी याच 'उपक्रमावर' चर्चा चालु असतात. कोणता आयडी खरा, कोणता खोटा यांची इत्यंभुत माहिती उपक्रमावर मिळते म्हणे :-) ) असो. आता नमनाला घडाभर तेल झालेच.
या लेखाचा उद्देश मिसळपाव वरच्या एका महान साहित्यिकाचे :P अभिनंदन करण्याचा आहे. ते महान साहित्यिक म्हणजेच सर्वांचे लाडके, मिपाचे भुषण असलेले रा.रा. धमाल मुलगा उर्फ बाबासाहेब देशमुख बारामतीकर. एssssss कोण ओरडलाय रे तिकडुन की धम्या ने एक पण कथा पुर्ण केली नाही? अहो, हा कथा वगैरे प्रकार बाबा देशमुखांचा नाहीच. त्यांचा सगळ्यात लाडका साहित्य प्रकार म्हणजे खरड. क्कॉय? तुम्हाला खरड हा साहित्य प्रकार माहित नाही? वाटलंच. मिपावर नवीन आहात. त्वरित परिकथेतिल राजकुमार यांना संपर्क साधा आणि "खरडवही-उचकपाचकः एक अभ्यास" या क्रॅशकोर्स ला अॅडमिशन घ्या!!
तर मंडळी आज आपण इथे जमलो आहोत धमाल मुलगा यांचा अभिनंदन करायला. अभिनंदन करायचे कारण काय??? सोप्पंय. त्यांचा खरडवहीत खरडींची संख्या आता २०००० च्या पार गेली आहे. आज जर एखाद्याने या खरडवहीचा अभ्यास केरुन पियेचडी करायची ठरवली तर नेमाड्यांचा खंडेराव पेक्षा नक्कीच जास्त वेळ लागंल. आणि त्या जोरावर तुम्ही चार काय? चाळीस भागाची एक कादंबरी नक्कीच लिहून काढाल.
काय काय नसते या खरडवहीत?? ऊन सावली प्रमाणे सुखदु:खाचा खेळ सुरु असतो, एकमेकांची चौकशी, विचारपुस असते, खुप दिवसांनी ऑनलाईन आलेला एखादा सदस्य वळवाच्या पावसासारखा बरसतो... कोटीकेसरी नंदन सारखा एखादा सदस्य ज्याने गेला दिवाळी अंक ते या दिवाळी अंक(?) एकही लेख लिहिला नसला तरी 'दिसामाजी काहितरी' म्हणत एखादीतरी कोटी करुनच जातात. प्रभु मास्तर येऊन एखादा दुसरा क्रिप्टिक टाकून सगळ्यांची दांडी उडवतात. टिंग्या हॅ हॅ हॅ करत सगळ्यांच्याच खवमधे उंडारत असतो. आक्रस्ताळी अदिती आपला विक्षिप्त पणा सगळ्यांचा खवमधे दाखवत असते. एवढेच काय, पण खरडवही मधुन वितंडवाद सुद्धा चालू असतात. अहो खंडेराव, तुमच्या उत्खननात तुम्हाला झेंड्यांची चड्डी सापडली नाही काय??? छ्या!!! झेंड्यांची चड्डी हा एतिहासिक वाद तुम्ही खव मधे वाचायलाच पाहिजे होता. असो. आता खंडेरावच्या जीवनावरच्या "खरडवही : एक समृद्ध अडगळीची" वाट पहा.
बरं, आता परत बाबा देशमुखांकडे वळूयात. तुम्ही जर मिपावर नवीन आहात आणि तुम्हाला वाटते की तुमच्या सहज २०००० खरडी होऊ शकतात तर तो तुमचा गैरसमज आहे. त्यासाठी आमच्या धम्यासारखा जनसंपर्क लागतो. अहो मिपावरच्या थोरामोठ्यांपासुन सगळ्यांचीच या खवमध्ये येजा दिसतेच. त्यासाटनं लै म्हेनत घ्याया लागतीया.. Smile गावपातळीवरचे खोटे नाटे राजकारण खेळाया लागतं, कोणाचीतरी ठरवुन टर उडवावी लागती... असे बरेच काही केल्यावर तुम्हाला २०००० चा टप्पा आपॉप गाठला जातो. पण कधी कधी कीव वाटते काही लोकांची जे या खरडवहीसारख्या महान ऐतिहासिक वारशाला पुसून टाकतात. असो तर आता आपण टॉप फाईव्ह खरडवाल्यांचे स्टॅटिस्टिक बघूयात म्हणजे एवढ्या खरडी टाकायला किती माकडं लागतील हे मिभोकाका सांगू शकतील.
धमाल मुलगा
20002 entries
आनंदयात्री
14046 entries
छोटा डॉन
12642 entries
बिपिन कार्यकर्ते
10918 entries
परिकथेतील राजकुमार
10307 entries
टवाळक्या संपवून शेवटी नेहमी सिरियस लिहित जावे असे म्हणतात म्हणुन आता उगाचच हा सिरियसपणा. एवढ्या खरडी लिहिण्यासाठी जेवढा वेळ या लोकांनी घालवलाय त्यात धम्याची शिकार आणि पोकळवाडी पुर्ण नक्कीच झाली असती. वायदेआझम डॉनरावांना ही पदवी द्यावीच लागली नसती. किंबहुना त्यांनी कबुल केलेले किमान ३० लेख पुर्ण झाले असते. आंद्या सारखा मस्त हळवा लिहु शकणारा माणुस आपल्याला अजुन हरवलेले सुख वाचायला देऊ शकला असता. बिकांनी मातीची माती न करता पुर्ण केली असती, तसेच आफ्रिकेतले अनुभव पण लिहून काढले असते. परा ने त्याच्या सगळ्या कथा पुर्ण केल्या असत्या. असो या झाल्या जर तर च्या गोष्टी. पण तुर्तास सगळ्यांनी धमाल रावांच्या खव मधे जाऊन त्यांचे अभिनंदन करायला विसरु नका हो...
प्रतिक्रिया
27 Aug 2010 - 2:14 am | मस्त कलंदर
येऊन येऊन येणार कोण???
धम्याशिवाय हैच कोण!!!!
बाकी.. विवक्षित लोकांनी विवक्षित लोकांसाठी काढलेला फुटकळ धागा म्हणून त्याला योग्य ठिकाणी मारण्यात आलेले आहे.
असो.. चालूंद्यात तुमचे!!!
27 Aug 2010 - 3:06 pm | शेलार मामा मालुसरे
प्रेमाचा धम्मकलाडु भेट.
असे आणखी दिवस ध मु च्या जीवनात येवोत.
27 Aug 2010 - 2:24 am | प्रभो
धमालपंतांची ही दुसरी गोड बातमी ;)
(२०००० मधल्या २०० अर्थात १% खरडीतरी असतील आमच्या)
आमचे ही दोन पैसे. ही टॉप २० खरडवह्यांची लिस्ट..
धमाल मुलगा
20004 entries
आनंदयात्री
14046 entries
छोटा डॉन
12642 entries
बिपिन कार्यकर्ते
10918 entries
परिकथेतील राजकुमार
10307 entries
टारझन
9917 entries
निखिल देशपांडे
7270 entries
विजुभाऊ
5201 entries
II राजे II
4443 entries
शितल
4411 entries
मृगनयनी
4352 entries
विसोबा खेचर
3936 entries
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
3738 entries
विनायक प्रभू
3577 entries
सोनम
3536 entries
कुंदन
3388 entries
प्रभो
3291 entries
३_१४ विक्षिप्त अदिती
3051 entries
मस्त कलन्दर
3007 entries
मेघना भुस्कुटे
2787 entries
सर्वांचे अभिनंदन.. धागालेखकाचे सातव्या नंबरवर आल्याबद्दल वाढदिवसाचे अभिनंदन...
तसेच कधी काळी आपल्या खरडवह्या चाटून पुसून साफ करणार्या अवलिया, सहजराव, रंगाशेठ व इतरांचेही अभिनंदन... :)
27 Aug 2010 - 2:23 am | शिल्पा ब
रिकामटेकड्या लोकांचे उद्योग दुसरे काही नाही...
अवांतर: आम्हीही बालवाडीत काय "उपक्रम "चालला आहे हे शोधून येऊ...टिपेबद्दल धन्यवाद.
27 Aug 2010 - 2:23 am | शुचि
सुखानी हापीसात काम करू द्या रे .... नका इतके विनोदी छान धागे काढू. =)) हसून हसून मरायची वेळ आलीये.
क्रॅश कोर्स काय =)) .... ऐतिहासीक ठेवा काय =))
लाडका साहीत्य प्रकार काय ....
27 Aug 2010 - 2:26 am | राजेश घासकडवी
धमु - तेंडुलकर
आंद्या - पॉंटिंग
चोता - लारा
बिका - द्रविड
परा - बॉर्डर
यादीतल्या इतरांनी आपण कोण हे या दुव्यावर पहावे.
27 Aug 2010 - 2:33 pm | मेघवेडा
चोता लारा!
=)) =))
धमालबाप्पांचे पुनरेकवार दणक्यात हाबिणंदण!
बाकी यादीत हळुच पाहून आम्ही सर लेन हटन असल्याचे कळले!
27 Aug 2010 - 2:27 am | कुंदन
अभिनंदन धमाल शेठ....
अवांतर :
>>बिकांनी मातीची माती न करता पुर्ण केली असती
अरे माती पुर्ण न केल्यामुळेच त्याला इकडुन डिपोर्ट केलाय , तरी काय सुधरत नाय तो.
27 Aug 2010 - 2:29 am | निखिल देशपांडे
एकदम भिक्कार लेख.
हे असले फालतु धागे काढणे सगळ्यात आधी बंद करा , यामुळेच मिपाचा दर्जा खालवतोय.
हे मिसळपाव वरच्या लोकांबद्दल लिहुन प्रतिसाद कमवायचे फुकटचे धंदे बंद करा.
एवढ्या वेळात बरेच काही चांगले लिहुन झाले असते.
असो झोपा आता.
27 Aug 2010 - 10:32 am | सहज
स्कीझोफ्रेनीकसाहेबांशी सहमत!
27 Aug 2010 - 11:58 am | आळश्यांचा राजा
कार्तिक प्रतिसादिंग कार्तिक!
बाकी देशपांडे साहेबांनी याच विषयावर (म्हणजे खरडींचे साहित्यमूल्य, किंवा समाज नावाच्या गुंत्याला सोडवण्याचा अभ्यास करण्याची कच्ची सामग्री अशा विषयावर) अभ्यासपूर्ण गंभीर लेख लिहिला असता तरी आवडले असते!
(अव्वल खेळाडूंचा खेळ टीव्हीवर पहात बसणारा प्रेक्षक)
27 Aug 2010 - 2:38 am | रेवती
अभिनंदन हो धमालराव!
प्रभोने दिलेले इतर आकडेही बापरे! असं वाटायला लावणारे.
धमालाचे अभिनंदन काही दिवसांपूर्वीच केल्यावर पुढचा अभिनंदनपर धागा कसला बरं? ;) असे वाटल्याशिवाय राहिले नाही.
जास्त प्रतिसादखेचक धागा आम्हाला काढता आला नाहीच पण जास्त खरडीही करता आल्या नाहीत. प्रभोने दिलेल्या टॉपर्सच्या नावांमध्ये आमचं नाव नाही हे पाहून मेरिटलिस्टमध्ये नाव आलं नसल्यामुळे जितकं वाईट वाटतं तितकं वाईट वाटलं;) (म्हणजे किंचित).
अवांतर पण महत्वाचे: निखिलच्या धाग्याला प्रतिसाद दिल्यामुळे त्याने माझ्या आगामी धाग्याला (फुटकळ असला तरी) प्रतिसाद द्यायला हवा. तसेच धमालनेही त्याचे कौतुक केल्याबद्दल माझ्या धाग्याला प्रतिसाद द्यायला हवा.
27 Aug 2010 - 3:22 am | बेसनलाडू
अनावश्यक धागा वाटला. आणि त्याला अनुल्लेखाने मारले गेले नाही; प्रतिसाद आले, याचे सखेद आश्चर्य वाटले. असो.
(परखड)बेसनलाडू
27 Aug 2010 - 6:13 am | विश्वनाथ मेहेंदळे
मला तर हा धागा माहितीपूर्ण आणि उद्बोधक वाटला.
थोडे गणित करूया. श्री श्री धमू यांचा सभासद कालावधी आहे २ वर्षे आणि ३३ आठवडे. म्हणजे एकूण १३७ आठवडे = ९५९ दिवस. एकूण खरडी २००००. म्हणजे दिवसाला सरासरी २०.८५ खरडी.
दुसरा हिशोब :- एक खरड लिहायला सरासरी अर्धा मिनिट लागते असे गृहीत धरले तर धमू यांना खरडी लिहिण्यात आजवर सगळ्यांनी मिळून २०००० * (१/२) = १००००० मिनिटे अर्थात १६७ तास घालवले आहेत. एक खरड लिहायला २० सेकंद धरले तरी हिशोब ११० तासांचा होतो.
आता या माहितीचा मला व्यक्तिश काय उपयोग झाला असे विचाराल तर तसे नाही सांगता येणार पण करमणूक नक्की झाली. तसेही पाहता इथे होणाऱ्या अनेक बाबी अनावश्यक असतात हो. जुने प्रसिद्ध धागे काढा. अनेकदा निम्मे प्रतिसाद धाग्यांशी संबंध नसलेले किंवा नाममात्र संबंध असलेले. असो, यावर वेगळा धागा काढता येईल.
या निमित्ताने खरडी लिहिण्यात सगळ्यात पुढे कोण असेल बरे असे कुतूहल वाटते. काय निखील साहेब, हा विदा पण बाहेर काढा एकदा :-)
27 Aug 2010 - 4:13 am | पुष्करिणी
बोर्डात आलेल्या सर्व हुशार लोकांचे हार्दिक अभिनंदन ...बोर्डात पहिला नंबर आल्याबद्दल श्रीमान धमाल मुलगा यांचे विशेष अभिनंदन.
27 Aug 2010 - 7:31 am | डॉ.श्रीराम दिवटे
अभिनंदन सर्व खव खव करणारांचे. बाकी माझ्या खव मध्ये एकूण शून्य खरडी आहेत, त्यामुळे माझा निषेध असो.?
27 Aug 2010 - 10:09 am | आनंदयात्री
आम्ही जरा मागच्या वर्षभरापासुन लोकसभेत लक्ष घालायला सुरुवात केल्याने ही कालची पोर शीयम बनुन विधानसभेत उतमात घालतायेत ! नायतर ही विधानसभाssssss आश्शी हालायची आमच्या हाकेसरशी !!
आता हायकमांडचा आदेशच तसा असल्याने आम्हाला ई़कडे जास्त लक्ष देता येत नाही .. तरी आमचा विक्रम मोडायला वर्ष लागलं. हायकमांडने मोकळीक द्यावी महिनाभरात पन्नास हजार खरडी पाडुन दाखवतो !!
आंद्याला पाच पन्नास हजार खरडी काय जड नाहीत ..
(हे वाक्य 'तात्याच्या लेखाला पाच पन्नास प्रतिसाद काही जड नाहीत' या चालीवर वाचावे ;) )
तर आसो .. या खरडइक्रमाबद्दल माननीय राज्यमहसुल मंत्री आणि शेळीविकास महामंडळाचे शेक्रेटरी श्री धमालरावजीसाहेब देशमुखांचे हार्दिक अभिणंदण. (इथे आमचा एक ५० फुटी फ्लेक्स गृहित धरावा)
आणि त्यांना आमचा नेहमीप्रमाणे हार्दिक पाठिंबा !!
-
अवजड उद्योग मंत्री
आंद्या लातुरकर
27 Aug 2010 - 10:09 am | बिपिन कार्यकर्ते
ते आता हायकमांडलाच विचारा. ;)
27 Aug 2010 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
परवानगीची गरज सध्यातरी नाही. बेरकेवाडी म्हैला मंडळास फक्त सुपारी द्या आणि पहा तुम्ही निवडून येता का नाही ते!
असो. धमालरावांचे हार्दिक अभिनंदन!
27 Aug 2010 - 10:36 am | आनंदयात्री
ठ्ठोss ठ्ठोss ठ्ठोss !!!
एक्काहुन एक दण्णका फ्लेक्स !!
राखीकांड तर भारीच ;)
खुदकेसाथ बांता : चला मिपावर फ्लेक्सची फ्याशन निदेंनी आणली, आता कॉर्पोरेशनचे उच्चभ्रु अधिकारी जसे शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली फ्लेक्सला परवानग्या देत नाहीत तसे उद्या आपले संपादक मंडळ सुद्धा या ऑनलाईन फ्लेक्सांना आक्षेप घेईल !
(द्रष्टा) आंद्या
27 Aug 2010 - 10:53 am | सहज
राखीकांड लै भारी शब्दप्रयोग!
मी ** हाय का ! मग मला बांधा मला राखी!
मी ** हाय का ! मग मला घाला मला खरडी!
असेही कॅप्शन फ्लेक्सवर येउ द्या!
27 Aug 2010 - 10:55 am | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ!
27 Aug 2010 - 10:14 am | आनंदयात्री
बाकी व्यनींची आशी लिष्ट काल्डी तर कोण येईन हो पहिले ;)
27 Aug 2010 - 10:19 am | छोटा डॉन
नक्की कुठली लिश्ट काढावी ?
व्यनी आल्याची की व्यनी केल्याची ?
व्यनी केल्याची असेल तर .... सहजराव !
(सहजरावांनी केलेला )व्यनी आल्याची असेल तर .... आस्मादिक !
त्यापेक्षा तुम्ही हा पुरस्कार 'सामायिकरित्या' आम्हाच का देत नाही ?
काय १००-१२५ व्यनी कमी पडत असतील तर सहजराव आत्ता १० मिंटात करतील ;)
- छोटा डॉन
27 Aug 2010 - 10:22 am | ऋषिकेश
हॅ हॅ हॅ
असं सगळ्यांनाच वाटतं :P
व्यनीमनीच्या गोष्टींमधे सहजराव पटाईत आहेत ;)
27 Aug 2010 - 10:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ते ठीक आहे रे ऋ, पण सहजराव आणि डॉन्याच्या व्यनीमनीच्या गोष्टी! ये बात कुछ हजम नहीं हुई!!
27 Aug 2010 - 10:32 am | निखिल देशपांडे
सहजरावांनी आज काल व्यनी पाठवणे कमी केले आहे असे डॉन्या आंद्याला म्हणाल्याचे मी धम्याचा खरडवहीत वाचले.
27 Aug 2010 - 10:39 am | आनंदयात्री
खिक खिक !!
आता या प्रमादासाठी मिपाव्यनीसम्राट आपल्या सगळ्यांची व्यनीतुन खरडपट्टी काढतील !!
बाकी बास करा रे पोरांनो .. सहजरावांनी वैयक्तिक टिका म्हणुन तक्रार केली तर वांजळे होईल तुमचा ;)
-
आंद्या कदम
27 Aug 2010 - 10:41 am | अर्धवट
तुम्हाला व्यक्तिगत टीका म्हणायचय का?
27 Aug 2010 - 10:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
छे छे!
विरोधी पक्षनेते चुकीचं कसं बोलतील? चान्सच नाही!
27 Aug 2010 - 10:47 am | आनंदयात्री
आंग आक्षी !!
याला म्हणत्यात सपोर्टर !! वैयक्तिकच टिका हाय ती ..
(चामारी आंतरजालिय राजकारणाची गणितं बदलायला लागली की !! चायला पाठीला एक चिलखत बनवुनशान घ्यायला पाहिजे ;) )
27 Aug 2010 - 10:47 am | प्रकाश घाटपांडे
धम्याला माहित आहे व्यनीमनीच्या गोष्टींची व्युत्पत्ती, उगम व प्रसार. आमी लांबुनच पघत अस्तो असल्या गोष्टी. आपल्याला काय करायचय आपुन बर नी आपल काम बरं!
27 Aug 2010 - 8:39 pm | धमाल मुलगा
खॅ खॅ खॅ!!!
पकाकाका, मेलो =)) =)) =)) =))
27 Aug 2010 - 10:21 am | ऋषिकेश
निदे म्हंजे कहर आहे.. कधी कसा धागा टाकेल नेम नाही :)
धमालपंत बारामतीकरांचे अभिनंदन!
आम्चा शुभेच्छुकांमधे फोटो नसल्याबद्दल सौम्य निसेद!
27 Aug 2010 - 10:49 am | स्मिता_१३
मिपाभुषण रा.रा. धमाल मुलगा उर्फ बाबासाहेब देशमुख बारामतीकर यांचे २०००० खरडी साठी अभिनंदन !
चला मिपाकरांनो, प्रतिसाद देण्यात वेळ वाया घालवु नका. पटापट धमाल पंताच्या खव मध्ये जाउन खरडी लिहा ! जेणेकरुन लवकरच ३०००० खरडीं चा विक्रम रचला जाओ ! ;-)
27 Aug 2010 - 10:59 am | दिपक
27 Aug 2010 - 2:27 pm | नितिन थत्ते
धमालरावांना अजगराचा विळखा पडल्यासारखे वाटले.
27 Aug 2010 - 11:22 am | ब्रिटिश टिंग्या
धमालबाप्पुंचे अभिनंदन!
27 Aug 2010 - 11:28 am | सहज
हा सर्वद्वेष्टा टिंग्यादेखील धमुचे अभिनंदन करतो यातच धमुच्या अफाट लोकप्रियतेची जर कोणाला शंका असेलच तर आता फिटावी.
27 Aug 2010 - 11:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
शंकाच काय आमच्या डोळ्याचं पारणंही फिटलं!
27 Aug 2010 - 11:37 am | ब्रिटिश टिंग्या
ड्वाले पानावले का?
27 Aug 2010 - 1:39 pm | सूड
व्हय जी, आमास्नी वाटलं का धम्माजी बारामतीकरांकडं कायतरी ग्वाड बातमी हाय !!
27 Aug 2010 - 11:40 am | नंदन
आंतरजालीय विष्णू केशकामत [पहा: (पुलंचे) रावसाहेब] अर्थात खरडसम्राट धमुबाबा यांचे मनःपूर्वक अभिनंदन! लवकरच त्यांची खरडवहीट्विटरला मागे टाकणार यात शंकाच नाही :)
27 Aug 2010 - 2:11 pm | भीडस्त
हाबीणंदण करित आह्ये.
सकाळ-सकाळ ह्ये वाचाया भ्याट्लं.लै आणंद झाला.
पर हितं नईन आस्ल्यानं मनामदी शेणखा आल्यात पगा. म्हंजी काह्यी डौवूट हेत.
त्ये फ्येल्क्सातल्या फोटुमदी समदं बबंच दिसत्येत. बाया कंत्याच दिस्ती नायीत
आपल्याकं बायान्ला फ्लेक्सावं फोटु लावाया फर्मिश्शेण आगर शीश्टिम नस्ति का?
का इथाल्ल्या बाया बब्यांचं हाबीणंदण करन्यामदी विण्ट्रेस्स दाख्विती नाय?
आझुक येक शेणखा हे
म्होर्ल्या बारिला ह्या टूर्लामेण्ट्मदी इनर व्हायाला कस्काय येवस्ता कर्ता येईण.
येक्मेकासंगं खर्डी एक्शेन(म्हंजी आद्लाबाद्ली) क्येलिलं चालातं का?
का त्येच्यापरास
आपुण सवताच सव्ताला रोच्यारोच पाच्पल्लास खर्डी लिव्ह्ल्या तं कस्काय व्हईण ब्वॉ.
का म्या हाम्पर्कुन पकाल्डा जावुण त्ये फाव्वुल फाव्वुल म्हणत निस्तंच आर्डत बसंन?
क्व्होनापं आथ्णेटिक नालीज आसंण तं सांगा कनी टपाटपा!
माय्ला दोफार्च्याला हे समदं उजूक वाच्तानि आझुक नईनच फ्येल्क्स दिसाय लाग्लाय हितं .
पर त्ये फ्येल्क्सातल्या बाया काय्तरी वायल्याच दिस्त्यात. निर्ही पौतींच्या वर्ल्हाक्ली बायी वळ्खाया जम्ली.
बाकीच्या बाया बी त्याच ल्येवल्च्या हेत का आशी वाय्लीच शेणखा उजुक सत्व्याय लाग्ली पघा.
दॊफार्च्याला त्ये फ्येल्क्स पघात्ल्यापुन मोर्हं र्काय्बी उज्रत नाय ब्वॉ.
डोस्क्याच्या निस्ताच गोयंदा झालाय.
27 Aug 2010 - 2:12 pm | पाषाणभेद
धमाल मुलगा यांचे अभिनंदन. असेच यश त्यांना वेळोवेळी मिळो या सदिच्छा!
27 Aug 2010 - 2:48 pm | असुर
जगन्मित्र खरडसम्राट श्री. रा. रा. धमालपंतरावजीचंद्रसाहेब बारामतीकर द्येस्मुख यान्चा ५९५८ खरडींनी दणदणीत विजय झाल्याबद्दल ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळातर्फे जाहीर अभिनंदन!!
(इथे 'ट्राफेलगार स्क्वेअर' वर लावलेला १०० फुटी फ्लेक्स गृहीत धरावा!)
-- (सचिव, ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळ) असुर
27 Aug 2010 - 4:00 pm | बिपिन कार्यकर्ते
म्याच अब्बी चालू हय मेरे दोस्त!!!
27 Aug 2010 - 4:07 pm | मेघवेडा
बिका द्रवीड यांचा हौसला पाहून गदगदून आले! आगे बढो बिका, आप्पुन हय सपोर्ट को!
27 Aug 2010 - 4:11 pm | बिपिन कार्यकर्ते
यु बेटर बी... येता काळ आपलाच्च है... कोण हे धम्मालबाप्पु... ह्यॅ:
27 Aug 2010 - 5:21 pm | असुर
त्याचं काय हाये बिकाशेठ, राजकारन म्हटलं कोनीतरी जिंकनारच की वो!
आनि निस्तं आमी म्हटलं म्हनून कोनी जिंकत नाय किंवा हारत बी नाय.
तुमी काळजी करु नकासा, त्या बेरकेवाडी म्हैलामंडळाला सुपारी द्येवा, आनि निश्चिंत र्हावा!
--असुर
27 Aug 2010 - 3:28 pm | llपुण्याचे पेशवेll
चालुद्या चालुद्या.
उदंड जाहले कंपू। खरडाखरडी करावया॥
एका अस्सल कंपूबाजाने एका अस्सल कंपूबाजासाठी काढलेला धागा.
:)
(कंपूतीर्थ)
27 Aug 2010 - 3:50 pm | घाटावरचे भट
चांगलंय... चालू द्या.
27 Aug 2010 - 4:10 pm | श्रावण मोडक
अनावश्यक, कंपूबाजांनी कंपूसाठी कंपूकराकरवीच काढलेला धागा. ;)
27 Aug 2010 - 4:12 pm | बिपिन कार्यकर्ते
मग तुम्ही कशाला देताय प्रतिसाद?
27 Aug 2010 - 4:14 pm | निखिल देशपांडे
ओ बिका ते पण त्या कंपुबाजातच मोडतात ;)
27 Aug 2010 - 4:25 pm | बिपिन कार्यकर्ते
मग हे 'मी नाही त्यातला...' असलं वागणं कशाला?
- (संतप्त)
27 Aug 2010 - 4:59 pm | llपुण्याचे पेशवेll
ओ जालावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हो (म्हणजे असं ऐकलं आहे). यवढं काय चिडायचं त्यात. ;)
(थंडगार) पेशवे
27 Aug 2010 - 5:34 pm | श्रावण मोडक
तुम्हाला अशी संधी मिळावी म्हणून!
27 Aug 2010 - 8:40 pm | धमाल मुलगा
क्काय च्यायला डोकी चालतात!धन्य आहात सगळे. :)
बाकी एव्हढ्या प्रेमाबद्दल मंडळ काच्चकन आभारी आहे. ;) असाच लोभ ठेवा मंडळी!
(आता फकस्त, मिपा जिवनगौरव पुरस्कार देऊन आमची समाधी बांधायला घेऊ नका म्हणजे झालं. :D )
अवांतरः च्यायला, निख्यानं लै भारी रेवड्या उडिवल्यात की. ;)
27 Aug 2010 - 8:46 pm | असुर
धमालपंत,
बर झालं समाधीवरुन आठवलं, त्ये समाधीचं कांट्रेक्ट आपल्याला मिळवून द्या की! जवा पायजेल तवा बांधूण देनार बगा. येकदम आतून कडाप्पा आनि वरुन संगमरवर लावनार टकाटक. पायजे तर डीझाईनबी धाडून द्येतो धा-पाच, तुमी तुमाला आवडेल त्ये शिलेक्ट करा. पन त्ये कांट्रेक्टचं बगा बरं..
बाकी तुमचं अभिनंदन हायेच की!
-- असुर (कांट्रेक्टर)
27 Aug 2010 - 8:50 pm | मेघवेडा
आमी फुलां बी हवीत जाल्या धाडतो हां.. होलशेल नि ब्येश कालिटी..
27 Aug 2010 - 8:52 pm | प्रभो
उदबत्या अन मेणबत्या आमच्याकडे लागल्या...
चादरीही... ;)
27 Aug 2010 - 8:53 pm | यशोधरा
अल्लाsssss जीव गेला! ( की घेतलास? )
27 Aug 2010 - 8:56 pm | मेघवेडा
चला चला.. "यान्तु देवगणा:" म्हणायला बोलवा कुणाला तरी.. विसर्जन करून टाकू च्याम्मारी! :P
27 Aug 2010 - 9:02 pm | असुर
ओ सायेब, इसर्जन केलं तर समाधी कुटं बांधायची, नदीपात्रात का राव?
27 Aug 2010 - 9:03 pm | मेघवेडा
म्हणजे विसर्जनाच्या अक्षता वो फक्त! ;)
27 Aug 2010 - 9:04 pm | प्रभो
च्यायचा, हा मेव्या लेकाचा सुधरणार नाही...साला फोडलं ट्रेड सिक्रेट साल्याने... :(
27 Aug 2010 - 9:45 pm | असुर
तुमी कांट्रेक्ट च्या रेस मदी हाये का? तसं आसंल तर काय उपेग नाय, आमालाच हाये कांट्रेक्ट. आनि रेस मदी नसाल तर मंग आपल्याआपल्यात कसली ट्रेडची शिक्रेटं ठेवता राव???
27 Aug 2010 - 9:47 pm | प्रभो
तुला नाय समजायचं ते एवढ्यात.... ;)
27 Aug 2010 - 9:49 pm | असुर
बास... हल्ली कोनकोन कोनाकोनाला कायकाय शिकवून र्हायलंय म्हने. ;-)
तुमी पन शिकवून टाका आमाला! शिकवाच त्येव्हढं.
27 Aug 2010 - 9:58 pm | प्रभो
लेका समाधी तुला, फुलं मेव्याला, चादर आणी उदबत्ती-मेणबत्तीचं मला असं कॉन्ट्रॅक्ट आहे ते..वाच की नीट... ;)
27 Aug 2010 - 9:59 pm | असुर
बास! फुल्ल शेटल्मेंट झाली!
आता फकस्त धमालरावांना श्यांपल पाठवा! :-)
27 Aug 2010 - 9:09 pm | अर्धवट
आता एवढ्या लोकप्रिय माणसासाठी येवढी मान्सं येनार .. इवेंट मॅनेजमेंट लागनारच की वो..
आमी करू समदं.. तुमी नुस्ती ब्वाडी द्यायची.. बाकी समदं आमच्यावर सोपवा..