श्री. श्री धमाल मुलगा यांचे अभिनंदन
आज काल मिपाचा दर्जा खुप खालवलाय म्हणे.. सारखे कैच्या कैच फुटकळ धागे येत असतात!!!!
मग अशा फुटकळ धाग्यात आम्हीही एक भर घालावीच म्हणतो. संपादक मंडळाला आमचा धागा उडवायचा पुर्ण अधिकार आहे याचे भान आम्हाला आहेच. पण मिपाच्या लेखनप्रकारात आम्हाला सद्भावना, शुभेच्छा आणि अभिनंदन असे लेखनप्रकार दिसले आणि आम्ही हा लेख लिहायची हिम्मत केली. (आता तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला कळलंय की संपादक मंडळाला असे अभिनंदनाचे धागे आवडत नाहीत. कोण म्हणे रे तो आम्हाला कसे कळले??? अरे संपादक मंडळात राहुन अशा बातम्या कळत नाहीत रे भौ. त्यासाठी खास उपक्रमावर जाऊन रिकामटेकड्या लोकांचा खरडवह्या चाळ्यावा लागतात Wink. हो तिथे सध्या मिसळपाव उर्फ बालवाडी याच 'उपक्रमावर' चर्चा चालु असतात. कोणता आयडी खरा, कोणता खोटा यांची इत्यंभुत माहिती उपक्रमावर मिळते म्हणे :-) ) असो. आता नमनाला घडाभर तेल झालेच.
या लेखाचा उद्देश मिसळपाव वरच्या एका महान साहित्यिकाचे :P अभिनंदन करण्याचा आहे. ते महान साहित्यिक म्हणजेच सर्वांचे लाडके, मिपाचे भुषण असलेले रा.रा. धमाल मुलगा उर्फ बाबासाहेब देशमुख बारामतीकर. एssssss कोण ओरडलाय रे तिकडुन की धम्या ने एक पण कथा पुर्ण केली नाही? अहो, हा कथा वगैरे प्रकार बाबा देशमुखांचा नाहीच. त्यांचा सगळ्यात लाडका साहित्य प्रकार म्हणजे खरड. क्कॉय? तुम्हाला खरड हा साहित्य प्रकार माहित नाही? वाटलंच. मिपावर नवीन आहात. त्वरित परिकथेतिल राजकुमार यांना संपर्क साधा आणि "खरडवही-उचकपाचकः एक अभ्यास" या क्रॅशकोर्स ला अॅडमिशन घ्या!!
तर मंडळी आज आपण इथे जमलो आहोत धमाल मुलगा यांचा अभिनंदन करायला. अभिनंदन करायचे कारण काय??? सोप्पंय. त्यांचा खरडवहीत खरडींची संख्या आता २०००० च्या पार गेली आहे. आज जर एखाद्याने या खरडवहीचा अभ्यास केरुन पियेचडी करायची ठरवली तर नेमाड्यांचा खंडेराव पेक्षा नक्कीच जास्त वेळ लागंल. आणि त्या जोरावर तुम्ही चार काय? चाळीस भागाची एक कादंबरी नक्कीच लिहून काढाल.
काय काय नसते या खरडवहीत?? ऊन सावली प्रमाणे सुखदु:खाचा खेळ सुरु असतो, एकमेकांची चौकशी, विचारपुस असते, खुप दिवसांनी ऑनलाईन आलेला एखादा सदस्य वळवाच्या पावसासारखा बरसतो... कोटीकेसरी नंदन सारखा एखादा सदस्य ज्याने गेला दिवाळी अंक ते या दिवाळी अंक(?) एकही लेख लिहिला नसला तरी 'दिसामाजी काहितरी' म्हणत एखादीतरी कोटी करुनच जातात. प्रभु मास्तर येऊन एखादा दुसरा क्रिप्टिक टाकून सगळ्यांची दांडी उडवतात. टिंग्या हॅ हॅ हॅ करत सगळ्यांच्याच खवमधे उंडारत असतो. आक्रस्ताळी अदिती आपला विक्षिप्त पणा सगळ्यांचा खवमधे दाखवत असते. एवढेच काय, पण खरडवही मधुन वितंडवाद सुद्धा चालू असतात. अहो खंडेराव, तुमच्या उत्खननात तुम्हाला झेंड्यांची चड्डी सापडली नाही काय??? छ्या!!! झेंड्यांची चड्डी हा एतिहासिक वाद तुम्ही खव मधे वाचायलाच पाहिजे होता. असो. आता खंडेरावच्या जीवनावरच्या "खरडवही : एक समृद्ध अडगळीची" वाट पहा.
बरं, आता परत बाबा देशमुखांकडे वळूयात. तुम्ही जर मिपावर नवीन आहात आणि तुम्हाला वाटते की तुमच्या सहज २०००० खरडी होऊ शकतात तर तो तुमचा गैरसमज आहे. त्यासाठी आमच्या धम्यासारखा जनसंपर्क लागतो. अहो मिपावरच्या थोरामोठ्यांपासुन सगळ्यांचीच या खवमध्ये येजा दिसतेच. त्यासाटनं लै म्हेनत घ्याया लागतीया.. Smile गावपातळीवरचे खोटे नाटे राजकारण खेळाया लागतं, कोणाचीतरी ठरवुन टर उडवावी लागती... असे बरेच काही केल्यावर तुम्हाला २०००० चा टप्पा आपॉप गाठला जातो. पण कधी कधी कीव वाटते काही लोकांची जे या खरडवहीसारख्या महान ऐतिहासिक वारशाला पुसून टाकतात. असो तर आता आपण टॉप फाईव्ह खरडवाल्यांचे स्टॅटिस्टिक बघूयात म्हणजे एवढ्या खरडी टाकायला किती माकडं लागतील हे मिभोकाका सांगू शकतील.
टवाळक्या संपवून शेवटी नेहमी सिरियस लिहित जावे असे म्हणतात म्हणुन आता उगाचच हा सिरियसपणा. एवढ्या खरडी लिहिण्यासाठी जेवढा वेळ या लोकांनी घालवलाय त्यात धम्याची शिकार आणि पोकळवाडी पुर्ण नक्कीच झाली असती. वायदेआझम डॉनरावांना ही पदवी द्यावीच लागली नसती. किंबहुना त्यांनी कबुल केलेले किमान ३० लेख पुर्ण झाले असते. आंद्या सारखा मस्त हळवा लिहु शकणारा माणुस आपल्याला अजुन हरवलेले सुख वाचायला देऊ शकला असता. बिकांनी मातीची माती न करता पुर्ण केली असती, तसेच आफ्रिकेतले अनुभव पण लिहून काढले असते. परा ने त्याच्या सगळ्या कथा पुर्ण केल्या असत्या. असो या झाल्या जर तर च्या गोष्टी. पण तुर्तास सगळ्यांनी धमाल रावांच्या खव मधे जाऊन त्यांचे अभिनंदन करायला विसरु नका हो...
| धमाल मुलगा | 20002 entries |
| आनंदयात्री | 14046 entries |
| छोटा डॉन | 12642 entries |
| बिपिन कार्यकर्ते | 10918 entries |
| परिकथेतील राजकुमार | 10307 entries |
प्रतिक्रिया
अभिनंदन
ध मु ला माझ्या कडून
धमालपंतांची ही दुसरी गोड
रिकामटेकड्या लोकांचे उद्योग
सुखानी हापीसात काम करू द्या
धमु - तेंडुलकर आंद्या -
चोता लारा! =)) =))
अभिनंदन ...
एकदम भिक्कार लेख. हे असले
+१
+२
अभिनंदन हो धमालराव!प्रभोने
हा धागा नको होता
मला तर हा धागा माहितीपूर्ण
बोर्डात आलेल्या सर्व हुशार
अभिनंदन सर्व खव खव करणारांचे.
आमची व्यग्रता
हायकमांडने मोकळीक द्यावी
परवानगीची हरकत नाही.
ठ्ठोss ठ्ठोss ठ्ठोss
हा हा हा
हॅहॅहॅ
बाकी
आल्याचे का केल्याचे ?
(सहजरावांनी केलेला )व्यनी
ते ठीक आहे रे ऋ, पण सहजराव
सहजरावांनी आज काल व्यनी
खिक खिक
तुम्हाला व्यक्तिगत टीका
छे छे!
आंग आक्षी
हॅहॅहॅ
खॅ खॅ खॅ!!! पकाकाका, मेलो =))
=))
अभिनंदन !
अभिनंदन
धमालरावांना अजगराचा विळखा
धमालबाप्पुंचे अभिनंदन!
हा
शंकाच काय आमच्या डोळ्याचं
:)
व्हय जी, आमास्नी वाटलं का
वा, वा, वा
मंडळ श्री. धमाल मुलगा यांचे मन:पूर्वक सहर्ष हार्दिक
धमाल मुलगा यांचे अभिनंदन.
जगन्मित्र खरडसम्राट श्री. रा.
दणदणीत विजय झाल्याबद्दल म्याच
बिका द्रवीड यांचा हौसला पाहून
यु बेटर बी... येता काळ
त्याचं काय हाये बिकाशेठ
Pagination