मध्यंतरी कलात्म हा विशेषांक वाचल्यानंतर लिहिलेले काही ...
कला हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच, कलेच्या विविध अंगावर सातत्याने चर्चा होत आलेली आहे. त्याशिवाय, वेगवेगळया perspective ने त्याचा अभ्यासही झाला आहे, होत आहे. मात्र कलेचा सामाजिक अंगाने फारसा अभ्यास झालेला दिसत नाही, निदान मोठ्या प्रमाणात झालेला नाही असे मला वाटते . म्हणूनच या विषयाला वाहिलेला "कलात्म" विशेषांक हे एक युनिक प्रॉडक्ट आहे. तसे पहायला गेले तर कलेवर सामाजिक अंगाने १० वर्षापूर्वीच काही व्हायला हवे होते , नाही का? पण, ते आत्ता होतयं!! असो , देर हे लेकिन दुरूस्त है ! आणि, म्हणूनच या धाडसी पावलासाठी संजय आवटे आणि टिम कलात्म यांचे आधी अभिनंदन करायला हवे.
संजय आवटे ! त्यांच्याबद्द्ल आता एक अनामिक कुतुहल निर्माण झालेले आहे . तरूणाईला भावणारी पत्रकारिता, बराक ओबामा या पुस्तकाचे यश ही त्याची कारणे आहेतच, पण लोकांना समजून घ्यायचा सतत प्रयत्न करणारे, विविध माध्यमाद्वारे समाजाच्या विविध क्रॉस सेक्शनचे निरिक्षण करणारे जे फार कमी लेखक आहेत. त्यात त्यांचा समावेश होतो. साहजिकच, या सगळया जाणिवांचा इफेक्ट त्यांचा 'कला कल्पतरूंचे आरव' या कलात्म च्या प्रस्तावना पुस्तिके देखील पडतो. आपण किंवा आम्ही तरूण म्हणा हवं तर.. आज खर्या आनंदाला पारखे झालो आहोत, हे खरे आहे . याचे कारण म्हणजे, आमचे आयुष्याचे बेसिकच चुकत आहेत. आमच्यात Preferences चा घोळ आहे. आणि, आवटे त्यांच्या प्रस्तावनेतुन याच मुद्द्यावर बोट ठेवतात , आत्म परीक्षण करायला लावतात . सुखी माणसाचा सदरा प्रत्येकजण शोधत असतो आणि, कला ही तो सदरा सापडण्यासाठी वापरायचा मार्ग आहे , असे आवटेंना वाटते व असे का ? हे ते या प्रस्तावनेतुन एक्स्प्लेन करतात. त्याहून महत्वाची बाब म्हणजे त्यांना माहित असलेली तरूणाईची नस... त्यामुळे, आमची आजची सिच्युएशन व सुप्त ताकद ते जाणतात आणि त्याला योग्य डायरेक्शन द्यावे लागेल हे अधोरेखित करतात !! म्हणूनच तसे बघायला गेले तर यातले मुद्दे असे प्रचंड वेगळे नसुनही प्रस्तावना ,त्यासोबत जोडलेले लेख पुन: पुन्हा विचार करायला लावतात, हे नक्की !
आणि म्हणूनच मग, धारणा, धोरणे आणि धुरिणांचा विचार करणारे कलात्मचे दोन अंक आपल्या समोर येतात. अक्षांश, कक्षा, ऐलपैल अशा विविध भागात विभागलेलं हे अंक अवाढव्य आहेत. Literally अवाढव्य...! एवढया 80 जणांना लिहिते करणे काय सोपी गोष्ट आहे का?ब्राव्हो , ब्राव्हो ..
एक फेमस quote आहे, कुणाचा आहे ते आठवत नाही... पण त्याचा अर्थ असा आहे. ''इतिहासाचे ओझे होऊ देऊ नका, उज्वल भविष्यासाठी ती पायवाट बनु द्या.'' कदाचित याच quote ला अनुसरून विविध दिगज्जांनी अगदी पहिल्याच भागात कलेचा इतिहास सांगितलेला आहे. Frankly speking मला किंवा आमच्या पीढीला एवढा इतिहास माहितच नव्हता. म्हणुनच माझ्यासारख्यांसाठी हे अत्यंत उपयोगाचे आहे. चैतन्य कुंटे आणि इतरांचे लेख म्हणजे, उत्तमच ! ऐलपैल मधुन इतिहास आणि ''इटस अवर टाईम'' मधून कलेचा वर्तमान समजतो. थोडक्यात कलाविश्वाबाबत आपली जाण , माहिती वाढते .
राहून राहून एक गोष्ट मात्र बरी वाटते , कि साला या विषयावर पीएच.डी. चा एक प्रबंध झाला असता... ''मराठी कलेची स्थिती - एक अभ्यास'' असाच काही , रूक्ष आणि शब्दबंबाळ ...! पण, ''कलात्म'' मध्ये विविध कलाकारांनी आपले अनुभव आपल्याच भाषेत शेअर केल्याने सुदैवाने अशा बोजडपणाची पुटे कलात्मवर चढलेली नाहीत.
याहून महत्वाचा म्हणजे आपल्या कलेचा आवाका...! फार मोठा आहे हो तो .. मला असे वाटते की, तुम्ही, मी ,आपण एका कोषात असतो याबाबतीत . म्हणजे कोल्हापूरात राहणार्या माझ्यासारख्या मुलाला आदिवासींच्या कलेबद्दल फारशी माहिती नाही , नसणारच.... पण ती एक कला आहे, अशा अनेक कला महाराष्ट्रभर, भारतभर आहेत. आणि, प्रत्येकाला स्वत:ची अशी आयडेन्टीटी आहे. या सगळ्यांबद्दल सगळे जाणायला बर्याच मर्यादा आहेत . पण, आपल्या कोषातून बाहेर पडायला, या सगळया कलांची तोंडदेखली का होईना ओळख करुन घ्यायला ''कलात्म'' हा एक उत्तम सोर्स आहे.
जरा विचार केला ,की अरे मला स्वत:ला यातले किती लेखक माहित होते? 50 टक्के फक्त... थोडीफार अशीच प्रत्येकाची परिस्थिती असणार आहे. अंतरे, भौतिकता, कला सर्वदूर पोहोचविण्यासाठी येणारे अडथळे... यामुळे ही एवढी चांगली लोकच मला /आपल्याला माहित नसतात. मी वरती कोषाचा संदर्भ दिला तो त्या अंगाने ...! पण, कलात्म नवीन लोक, त्यांचे विचार सगळ्यांकडे पोहोचवत आहे . कमलेश देवरूखकरसारखा एक नवा मित्र, मला या ''कलात्म'' नेच दिला...! नीरजा पटवर्धन ज्या वेशसंकल्पक या एका वेगळया कलेशी संबंधीत आहे, त्या कितीजणांना माहित आहेत? सुदैवाने मला त्या माहित आहेत, पण या कलेबद्दल लोकांना कसे कळणार? या सांस्कृतिक मध्यस्थाची भूमिका कलात्म खुप छान बजावत आहे. थोडक्यात आत्ताच्या घडीला ''कलात्म'' हा कलेचा Enclyopedia झाला आहे. ज्यात, माहितीसोबत विचारांचा, भावनांचा बोनसदेखील आहे.
अर्थात, कला क्षेत्रातील एखाद्या दर्दी माणसाला किंवा खर्या रसिकाला हया सर्व गोष्टी माहित असणार आहेत. त्यामुळे त्यांना यात काही नवं सापडणार नाही , किंवा त्यात भविष्यासाठी फारसा ठोस आराखडाही मांडलेला नाही. पण, हा अंक आहे तो सामान्य कलासक्त माणसासाठी .... ज्याला हे सगळं समजून घ्यायचयं...हे सारं अशा लोकांसाठी आहे ज्यांना मळवाटेपेक्षा चाकोरीबाहेरची वाट जास्त रुचते ...आणि हे त्यांच्यासाठीच असले पाहिजे, कारण उद्याच्या जगाच्या चाव्या त्यांच्याकडेच आहेत. बरोबर ना ?
डॉ. श्रीराम लागूंचे विचार, आवटेंची उत्तम लेखक निवड, प्रत्येकाने आतुन लिहिलेले लेख आणि उत्तम निर्मितीमुल्य यामुळे अवघ्या ५० दिवसात तयार झालेला हा विशेषांक महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिम्मित हे विविध उपक्रम सुरु आहेत त्यातील एक महत्वाचा उपक्रम तर आहेच. पण, कलेचा आवाका समजून घेण्यासाठी, काही वेगळ वाचण्यासाठी, कलासक्त होण्यासाठी संग्राह्यदेखील आहे.
कलात्म
अतिथी संपादक - डॉ .श्रीराम लागु
संपादक - संजय आवटे
लेखक - विविध कलाक्षेत्रातील नामांकीत ७० एक व्यक्ती ....
प्रतिक्रिया
24 Aug 2010 - 10:59 pm | विलासराव
मस्त ओळख करुन दिलीत विनायकराव.
धन्यवाद.
24 Aug 2010 - 11:01 pm | निखिल देशपांडे
विनायकराव
छान ओळख
24 Aug 2010 - 11:12 pm | पारुबाई
चांगल्या गोष्टीची चांगली ओळख करून दिलीत.
मनापासून आभार.
एक फेमस quote आहे, कुणाचा आहे ते आठवत नाही... पण त्याचा अर्थ असा आहे. ''इतिहासाचे ओझे होऊ देऊ नका, उज्वल भविष्यासाठी ती पायवाट बनु द्या.''
इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेवून ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढून त्यावर भविष्य वाचा
24 Aug 2010 - 11:21 pm | दाद
मस्त ओळख करुन दिलीत ! पुस्तक वाचायला उद्दत्क केलय!
25 Aug 2010 - 7:23 pm | विनायक पाचलग
सर्वांचे मनापासुन आभार ..