खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे. आणि हो, दोघा मित्रांची आगाउ माफी मागतो. ;-)
म्यानेजर ब्रेक घेणार | आम्ही मिपामिपा खेळणार||
कोरम फुल्ल जमणार| मज्जा येणार निश्चित||
गल्लीत आमचा नार्या जाणार | मोशणी त्याला हात करणार||
सिद्धहस्त लेखक बनणार | अर्धा साबण संपणार निश्चीत||
हॅकिंग पॅपीलॉन शिकवणार | क्रिप्टीकगुर्जींचा आधार||
सग'ळे शिकवणी लावणार | संगणक क्रॅश निश्चीत||
दिवसामागुन दिवस जाणार| ऋतुचक्र नियमीत बदलणार||
काका आवाहन करणार | जालीय अंक निश्चित||
शिशुवर्ग धागे काढणार | निष्कारण चर्चा पसरणार||
परत ते काढून घेणार| फेड अप होणार निश्चित||
रात्रभर पेंगत बसणार| झोपेचे खोबरे होणार|
पहाटे गुगल करणार | फिफापान अप्डेट निश्चित||
क्रिप्टीकचे गुगली पडणार | पब्लीक झाडावर चढणार||
प्रभुचा उद्धार होणार| फांदी तुटणार निश्चित||
तू तू मैं मैं जोरदार | मस्करीची कुस्करी होणार|
संपादक कार्यान्वित होणार | धागा उडणार निश्चित||
प्रतिक्रिया
17 Jun 2010 - 3:05 pm | गणपा
साला आमचा सहजशेठ पण एकदम छुपा रुस्तम आहे.
भल्या भल्यांच्या दांड्या उडवतो.
17 Jun 2010 - 5:49 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो.
सहजराव : मिपाभारताचे संजय, नारद , इत्यादि इत्यादि. ;-)
17 Jun 2010 - 6:08 pm | मेघवेडा
>> मिपाभारताचे संजय, नारद , इत्यादि इत्यादि
किंवा गरीबांचे संजय, नारद इ. ;)
17 Jun 2010 - 11:41 pm | नंदन
गणपाभौंशी सहमत :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Jun 2010 - 2:18 am | धनंजय
छुप्या रुस्तुमाची रदिफावर छबी
20 Jun 2010 - 3:35 pm | Nile
बाडिसच! :-)
-Nile
17 Jun 2010 - 3:06 pm | प्रमोद देव
जबरी. सहजराव लै फार्मात हाईत हल्ली. :)
17 Jun 2010 - 3:07 pm | विसोबा खेचर
छान.. :)
17 Jun 2010 - 3:07 pm | योगी९००
मस्त मस्त मस्त..
आवडली..
खादाडमाऊ
17 Jun 2010 - 3:07 pm | टारझन
rofl,... best luck sahajrao....
17 Jun 2010 - 8:07 pm | पंगा
बिल्कुल सही फ़रमाया आप ने! ;)
=))
- पंडित गागाभट्ट.
17 Jun 2010 - 3:12 pm | जागु
लय भारी बुवा.
17 Jun 2010 - 3:12 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
=))
=)) =))
ज ह ब र्या !!
'शिशुवर्ग' आणि 'फेडअप' हे शब्द हृदयाला भिडले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 Jun 2010 - 3:14 pm | छोटा डॉन
एक नंबर सहजराव ...
लै भारी काव्य प्रतिभा .
आता हा घ्या आमचा नजणारा
"कधीतरी राडा होणार । धडाधड प्रतिसाद उडणार ॥
गॉसिप खच्चुन होणार । 'व्यनी' येणार निश्चित ॥
------
(रात्री-अपरात्री गुगलणारा) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
17 Jun 2010 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार
कधीतरी राडा होणार । धडाधड प्रतिसाद उडणार ॥
गॉसिप खच्चुन होणार । ब्लॉग अपडेट होणार निश्चित ॥
हे कसे वाटते हो फुटबॉलप्रेमी ??
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
18 Jun 2010 - 1:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगाई गं, असं कसं हो लिहीता तुम्ही ... ब्लास्फेमस कुठले?
अ. जोशी!
17 Jun 2010 - 3:15 pm | प्रकाश घाटपांडे
मिपावर आनीबानी येनार आन जानार
पन हा धागा तरनार निश्चित||
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
17 Jun 2010 - 3:15 pm | यशोधरा
मस्त!
17 Jun 2010 - 3:15 pm | बिपिन कार्यकर्ते
छान...
बिपिन कार्यकर्ते
17 Jun 2010 - 3:27 pm | पांथस्थ
धाग्यावर कात्री चालणार | संपादकांची सारवा सारव होणार |
मी नाही मी नाही असे म्हणणार | पुन्हा सगळे तसेच चालणार निश्चित ||
संपादकांची + भक्तगणांची आगाऊ माफी :) आणि धागा उडवु नये (प्रतिसाद तर त्याहुन नाही) अशी कळकळीची विनंती ...असे बोलुन माझे महावाक्य मी संपवतो!
पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
17 Jun 2010 - 3:26 pm | इनोबा म्हणे
"कार्यकर्ता पाहणार । सहजा'सहजी कळवणार ॥
इकडे तिकडे पसरणार । 'केसू' बिंग फोडणार निश्चित ॥
बाकी चालू द्या!
17 Jun 2010 - 3:34 pm | मस्त कलंदर
सहजकाका.. लै भारी!!!!
सहजकाका फॉर्मात येणार । मिपावर विडंबन लिहिणार॥
स्वतः झाडावर जाऊन बसणार। मजा बघणार निश्चित॥
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
17 Jun 2010 - 3:35 pm | स्मिता_१३
हा हा हा!
जबरा !
स्मिता
17 Jun 2010 - 3:43 pm | भडकमकर मास्तर
:)
हॅहॅहॅ. मस्त
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
17 Jun 2010 - 4:00 pm | शानबा५१२
काय लेख आहे!!
चांगला आहे का???
17 Jun 2010 - 4:02 pm | jaypal
पाषाण भेद चमचमित मागणार | जागु त्याला फदफद देणार|
सोम्या गोम्या डेटला जाणार | ओकांची नाडी निश्चित ||
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
17 Jun 2010 - 4:11 pm | अवलिया
छान !
--अवलिया
17 Jun 2010 - 4:51 pm | मृगनयनी
माझ्या अनिरुद्धाच्या महावाक्याचं निर्मळ विडंबन पाहून डोळे पाणावले!
;)
इतर 'काही' आगाऊ आणि उद्धट मिपाकरांप्रमाणे माझ्या अनिरुद्ध-बापूंबद्दल कटू शब्द न वापरल्याबद्दल आभार!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
17 Jun 2010 - 5:46 pm | वेताळ
बाकी मिभोची प्रतिक्रिया एकदम उत्तम आहे.
वेताळ
17 Jun 2010 - 5:48 pm | प्रियाली
:)
17 Jun 2010 - 5:49 pm | अवलिया
अरे या सहजला संपादक करुन टाका रे..
हल्ली फार लेखन प्रतिसाद येत आहेत
संपादक झाला म्हणजे कसा मुकाट बसेल कोप-यात
--अवलिया
17 Jun 2010 - 5:49 pm | शुचि
मस्त सुरुवात झाली सकाळची ...
मिभोकाका लेख लिहीणार| केसुरंगा थयथयाट करणार|
अर्वाच्यपणा केल्यानंतर| गुडूप होणार हे निश्चित|
17 Jun 2010 - 5:56 pm | सुनील
सहजराव फॉर्मात!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Jun 2010 - 6:00 pm | केशवसुमार
उसहजशेठ,
त्तम चालू आहे ..चालु दे..
(निप्चित)केशवसुमार
17 Jun 2010 - 6:22 pm | मुक्तसुनीत
केसुचा प्रतिसाद "न्हाव्याच्यादु कानात ऊ तमगॉसिपचाल्ते" च्या चालीवर आहे ;-)
17 Jun 2010 - 6:24 pm | सहज
सहजशेठ चालू आहे असे म्हणायचे होते केसुगुर्जींना. त्यांनी ते म्हणले. मॅटर खतम! :-)
17 Jun 2010 - 6:10 pm | मीनल
हसू आले वाचून . मस्त लिहिले आहे .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
17 Jun 2010 - 7:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त लगे रहो....! :)
-दिलीप बिरुटे
17 Jun 2010 - 8:07 pm | प्रभो
हॅहॅहॅ...चालू द्या सहजराव....
लेखणीला धार अशीच राहूदे म्हटलं...
17 Jun 2010 - 11:24 pm | विनायक प्रभू
सहज उद्धार केलाय हो सह्स्राव.
17 Jun 2010 - 11:35 pm | पिंगू
च्यामारी हसुन हसुन पोट दुखले......
- (हसुन हसुन पोट दुखलेला) पिंगू
17 Jun 2010 - 11:45 pm | शिल्पा ब
आमचा हि एक प्रयत्न...
रिकाम्या वेळी धागे काढणार l दणादण सगळेच उडणार ll
सहज कोणीतरी खव वाचणार l विडंबन होणार निश्चित ll
बाकि विडंबन मस्तच...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
18 Jun 2010 - 12:18 am | राजेश घासकडवी
लय भारी.
गणपा, मुक्तसुनीत आणि खरं तर इतर बहुतेक सगळ्यांशीच सहमत.
18 Jun 2010 - 6:56 am | पाषाणभेद
मस्त कविता उडायची भिती का बाळगता. आक्षेपार्ह काहीच नाही त्यात!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
18 Jun 2010 - 8:26 am | भय्या
माफी मागताय ती आगाउ (इन अॅड्व्हान्स) की आगाउपणे?
ह.घ्या.
18 Jun 2010 - 9:06 am | नीलकांत
झकास कविता , लगे रहो सहजभाई !
- नीलकांत
18 Jun 2010 - 9:13 am | राघव
मस्त! आवडले!! :)
राघव
18 Jun 2010 - 9:46 am | ऋषिकेश
काका मंडली फार्मात हायती!.. मस्त लिवलंय
चालु द्या!
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
20 Jun 2010 - 3:06 pm | स्वाती दिनेश
मस्त...
स्वाती