सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.
अगत्यार जीव नाडी भाग ५ वा
कहाणी एका पूर्वजन्मातील भावाबहिणीची.
’कोण तुम्ही? कुठला अगस्त्य मुनी? कसले ताडपट्ट्यातील भविष्य? मी ओळखत नाही कोणाला. पुन्हा या घरात पाऊल ठेवाल तर याद राखा.’
या पुढे मी अगत्यारांच्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही. आत्तापर्यंत घडलेल्या गोष्टी या तुमच्या भविष्यकथनाच्या युक्त्या आहेत असे मी जगाला ओरडून सांगेन.’
अरे ही एक परीक्षा होती तुझ्या सहनशक्तीची. जरा मनासारखे झाले नाही की तुम्ही लोक आम्हाला दोष देतात. वेडेवाकडे बोलता. आम्हाला अपमानकारक बोलून आपला छोटेपण सिद्ध करतात. कालपर्यंत तूच माझी अतिस्तुती करत होतास आणि आज आता मला शिव्याशाप द्यायला लागलास.
एकदा श्री. हनुमत दासन यांच्याकडे एक एन. आर. आय. व्यक्ती सिंगापूरहून आला. नाव होते - राजमोहन. प्रत्येकाच्या नाडीभविष्य पाहायच्या गरजा निरनिराळ्या असतात. तरुण वयाचा राजमोहनला उत्सुकता होती ती आपल्या पूर्वजन्माची कहाणी ऐकण्याची. त्या जन्मातील कोणी व्यक्ती भेटेल का? याची तीव्र लालसा त्याला लागून राहिली होती. त्याची स्वतःची कहाणी ही मोठी रंजक. राजमोहनचे वडील कॅन्सरने वारले त्या नंतर आईही काही वर्षींनी निवर्तली होती. नातलग कोणी राहिले नव्हते. गडगंज संपत्तीचा तो एकटा वारसदार झाल्याने काही दूरस्थ नातलगांचा जळफळाट झाला. या भारतभेटीत त्याची गाठ अगत्यार जीव नाडीच्या हनुमत दासन यांच्याशी पडली. भेटून राजमोहन म्हणाला, ‘माझी खूप इच्छा आहे जाणून घेण्याची की माझा पूर्वजन्म कुठे, कसा व कधी झाला?. त्या वेळच्या नातलगांना मला कधी भेटता येईल का? सध्याच्या माझ्या एकटेपणामुळे माझी जिज्ञासा तीव्र झाली आहे.’
हनुमत दासन म्हणाले, ‘पाहतो महर्षींना विचारून. त्यांची आज्ञा असेल तर ते सांगतील ते मी सांगेन.’ वाचन सुरू झाले. महर्षी म्हणाले, ‘सांगेन पण इथे नाही. जेथे गुडघाभर वाहते पाणी असेल अशा ठिकाणी जाऊन ब्राह्ममुहूर्तावरच त्याचे कथन होईल.’
झाले ती जागा शोधली गेली व एके दिवशी कावेरी नदीच्या तिरावर भल्या पहाटे वाचन सुरू झाले. महर्षी अगत्यार म्हणाले, ‘याचे पूर्वजन्मीचे नाव होते सुंदरम. त्रिची श्रीरंगम येथे याचा जन्म झाला. याच्या वडिलांचे नाव होते वेंकटावन. आईचे अमृतवल्ली तर बहिणीचे नाव होते पद्मजा. हे कुटुंब मंदिराच्या आसऱ्याने जीवन व्यतीत करत होते. बहिणीचे एका विधुराशी लग्न झाले. सासूच्या छळाने व कॉलऱ्याच्या साथीत ती गदगावली. अविवाहित सुंदरम वैतागून आर्मीत भरती झाला. त्यानंतर तो घरच्यांना विसरला. आईवडीलांचे कालांतराने निधन जाले. त्यांचा तळतळाट म्हणून त्याला या जन्मातही मातापिता सुख नाही.’
‘निवृत्तीनंतर खूप वर्षांनी परतला तेव्हा घर विकलेले होते. काहीच नसल्याची भावना होऊन दर दर भटकत श्रीरंगम येथे तो आला असता वारला.’ ऐकताना न राहवून राजमोहनला रडू आले. हनुमत दासन पुढे वाचत म्हणाले, ‘त्याची मृत्यूची नक्की तिथी काय असावी? यावर भाष्य करताना महर्षी म्हणाले, ‘विशाखा नक्षत्रातील ती ११ तिथी होती.’ त्यावर राजमोहनने काही विचारांती आपला जन्म त्यानंतर १० महिन्यांनी नेमक्या त्याच नक्षत्रावर सिंगापूरला झाल्याचे सांगताच महर्षी म्हणाले, ‘ तो म्हणतोय ते बरोबर आहे. अर्थात हे सर्व तू ऑफिसमधील बायोडेटाशी पुन्हा ताडून पाहू शकशील. तुझी बहीण पद्मजा या जम्नीही त्याच नावाने जन्मली असून सध्या १९ वर्षांची आहे. ती या-या पत्त्यावर राहते.’ झाले. राजमोहनला राहवेना. त्याला बहिणीला पाहायला जायची घाई झाली. पत्त्याच्या अनुरोजाने ते दोघे निघाले.
मात्र झाले विपरीत. त्यांना अतिकटू अनुभव आला. त्या पत्त्यावर राजमोहन व हनुमत दासन बरोबर पोहोचले, पण त्या पत्त्यावरच्या माणसाने त्यांची फटकळ शब्दात संभावना केली.
’कोण तुम्ही? कुठला अगस्त्य मुनी? कसले ताडपट्ट्यातील भविष्य? मी ओळखत नाही कोणाला. पुन्हा या घरात पाऊल ठेवाल तर याद राखा.’
त्या खरडपट्टीमुळे राजमोहन वैतागला. फुकट पाणउतारा झाला असे म्हणत हनुमत दासन यांच्याशी त्याची झकाझकी सुरू झाली. ‘हे तुमचे अगत्यार महर्षी असा माझा अपमान करवतील याची कल्पना मला नव्हती. आत्तापर्यंत कोणाचा उणाशब्द ऐकून न घेणाऱ्या मला हे अपशब्द ऐकायला का भाग पाडले गेले याचे मला आश्चर्य वाटते आहे. आता तुम्ही ताबडतोब इथल्या इथे नाडीपट्टी वाचा.’ असे म्हणून तो वाद घालायला लागला.
हनुमत दासन ही हट्टाला पेटले म्हणाले, ‘तू म्हणतोस म्हणून मी रस्त्यात बसून नाडी पट्ट्या मुळीच वाचणार नाही.’
‘काहीही करून मला माझ्या बहिणीला -पद्मजाला- भेटायचे आहे. मग आपण येथून निघू.’ काकुळतीला येऊन राजमोहन म्हणाला.
‘नाही वाचली तर?’ दासननी स्वर वाढवला. राजमोहन म्हणू लागला, ‘तर मग या पुढे मी अगत्यारांच्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही. आत्तापर्यंत घडलेल्या गोष्टी या तुमच्या भविष्यकथनाच्या युक्त्या आहेत असे मी जगाला ओरडून सांगेन.’
दासन म्हणाले, ‘ठीक आहे तुझी तशीच धारणा झाली असेल तर मी तुला थांबवू शकणार नाही. मी काही अगत्यारांचा एजंट नाही की नाडीवाचन हा माझा पोटापाण्याचा व्यवसाय नाही. मला माझ्या गोदीच्या नोकरीतून जीवनयापन करता येते. आता मला तुझ्या कडून काहीही ऐकायचे नाही. बास झाले.’ असे म्हणून ते बाजूला झाले.
राजमोहनला अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. तो ओशाळून म्हणाला, ‘मी असे म्हणायला नको होते. झाल्या प्रकारामुळे माझे मन वैतागून निराश झाले होते. मला क्षमा करा.’
त्यावर दासन त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, ‘हे पाहा राजमोहन, ही जीव नाडी मला मिळालेला अगत्यार महर्षींचा प्रसाद आहे. ती माझ्या उपयोगासाठी आहे. मी महर्षींना विनंती करतो की याचा लाभ अन्य लोकांना व्हावा. म्हणून अगस्त्य महर्षी इतरांचे कल्याण व्हावे या करिता मार्गदर्शन करतात. ज्यांच्यावर त्यांची कृपा होते त्यांनाच या वाचनाचा लाभ होतो. तसा तुला झाला हे तुला माहिती आहे.’
या संभाषणाने राजमोहनच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून हनुमत दासननी ना़डी पट्टीबाहेर काढायला सुरवात केली. तोवर ते श्रीरंगम मंदिराच्या आवारात आले होते.
वाचनात अगत्यार म्हणाले, ‘तुम्ही एका अनोळख्या ठिकाणी फसला आहात. राजमोहन, अरे ही एक परीक्षा होती तुझ्या सहनशक्तीची. जरा मनासारखे झाले नाही की तुम्ही लोक आम्हाला दोष देतात. वेडेवाकडे बोलतात. आम्हाला अपमानकारक बोलून आपला छोटेपण सिद्ध करतात. कालपर्यंत तूच माझी अतिस्तुती करत होतास आणि आज आता मला शिव्याशाप द्यायला लागलास. ही लोक रीत पाहून आम्ही लोकांनी तरी कल्याणाचे हे काम का हाती घेतले असे कधी कधी वाटते.’ असो.
‘तो जे बोलला ते नकळत वैतागाच्या भरात बोलला असे मी जाणतो. म्हणून त्याने केलेली क्षमायाचना मी स्वीकारली आहे. त्याची इच्छा आहेत ना की त्याची बहीण पद्मजा त्याला भेटावी म्हणून मग पाहा आत्ताच्या आत्ता काय होते ते’ ....
हे संभाषण मंदिराच्या प्रांगणांत होत असताना काहीतरी नवलाचे चालले आहे असे वाटून छोटी गर्दी तेथे जमली लोकांना कुतूहल होते की कोण हे लोक ताडपट्ट्यांचे बंडल उघडून काय वाचत आहेत? त्या लोकातून एक बाई पुढे आली व म्हणाली, 'काहो तुम्ही ते तर नव्हे जे सकाळी आमच्या घरी आला होतात? कारण आम्ही घरी नसताना एकांना माझ्या पतीने अगत्यार महर्षींच्या ताडपट्ट्या घेऊन आलेल्यांना हाकलून दिले होते. ते माझे पती होते'.
हनुमत दासननी हो म्हणताच ती म्हणाली, ‘झाल्या प्रकाराबद्दल क्षमा करा.’ तोवर एक मुलगी त्याबाईंच्या शेजारी येऊन उभी राहिली. तिला पाहून दासन म्हणाले, ‘ही तुमची मुलगी पद्मजा का?'
त्या हो म्हणताच राजमोहनला तिला पाहून आनंद झाला. तुम्ही आमच्या घरी चलता का? असे विचारताच ते आनंदाने निघाले. पण जरा साशंक होते आधीच्या प्रकाराने. पण या वेळी सीन पूर्णपणे बदललेला होता. ते गृहस्थ एकदम दासनांच्या पायावर लोळले. म्हणाले, ‘सकाळच्या माझ्या वर्तनाबद्दल मला माफ करा.’ चकीत होऊन दासन म्हणाले, ‘असा काय चमत्कार झाला? पद्मजाचे वडील म्हणाले, ‘अहो तुम्ही गेलात आणि एक तेजस्वी रूप माझ्या समोर तरळले. स्वतःची ओळख त्यांनी ‘मी अगत्यार आहे’. तुला भावाबहिणीची ताटातूट करण्याचा काही एक अधिकार नाही असे म्हणून माझ्या खांद्यावर एक धक्का देत ते अंतर्धान पावले. त्यापासून माझी मनस्थिती अगतिक झाली आहे. मी आपल्याशी व अगत्यार महर्षींशी केलेल्या वागणुकीने ओशाळलो आहे. मला फार अपराधी वाटते आहे.’
त्यानंतर सर्वांच्या रीतसर भेटीगाठी झाल्या.बोलण्यातून खुलासा झाला व अगत्यार महर्षींनी कसे भावाबहिणीला एकत्र आणले याचा आनंद सर्वांना झाला. पद्मजाला राजमोहनने आपल्याबरोबर सिंगापूरला राहायला आणले. त्याने आपल्या संपत्तीतील काही वाटा तिला दिला ..... पुढे चालू...
प्रतिक्रिया
25 Mar 2010 - 12:03 am | चतुरंग
(इंद्रजाल)चतुरंग
25 Mar 2010 - 11:33 am | प्रमोद देव
चांदोबा किंवा इंद्रजाल कॉमिक्समधील कथा वाटतेय.
ओकसाहेब...खरंच सांगतो...सिनेमा काढा ह्या कथांवर...’कोट्या’धीश व्हाल. :)
त्या सिनेमात ’दूर्वासांचा’ काही रोल असेल तर मला द्या....गेला बाजार अगस्तिही चालतील....नुसतं रागवायचंच असतं ना! मस्त जमेल मला. ;)
25 Mar 2010 - 2:35 am | खादाड_बोका
ह्याला म्हणतात "सौ सुनार की तो एक लुहार की".
तुमच्या हया शिणेमाचा येण्ड भयाणक आहे हो.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
मला तर स्वप्नातही नाडी दिसते....
25 Mar 2010 - 2:53 am | इंटरनेटस्नेही
हा प्रश्न मी अगदी गांभीर्याने विचारतोय.... मला या जन्मी तरी कोणी सख्खी बहीण व भाऊ नाही (ज्याचे मला अतीव दुख आहे ) पण निदान या नाहीतर पुढल्या जन्मीतरी आपल्याला कोणी भाऊ / बहीण असेल की नाही? ते या नाडी वरून (या जन्मात) कळू शकते का?
--
(आशावादी) इंटरनेट प्रेमी
25 Mar 2010 - 10:20 am | नंदू
छान. कथा आवडली, हिंदी सिनेमा साठी चांगलं मटेरियल आहे.
नंदू
25 Mar 2010 - 10:48 am | चक्रमकैलास
ही कथा वाचून...आधी चक्रम होतो,आता चक्रमादित्य झालोय...!!!
आणखी एक....,माझ्या चड्डी ची नाडि कालपासून मिळत नाहीये...सापडेल का..??
(नाडीरहित)..चक्रम कैलास...
25 Mar 2010 - 10:55 am | ज्ञानेश...
मस्त आहे कविता.
वरूण सातवा फोटू आवडला.
-विर जण.
25 Mar 2010 - 11:30 am | चक्रमकैलास
फोटू...?? ज्ञानीयांच्या राजा..नाडी तपासून घे एकदा तुझी... =))
25 Mar 2010 - 12:10 pm | पाषाणभेद
मस्त भयकथा आहे. पण शेवटी राजा विक्रमने आपला हट्ट पुढे चालूच ठेवला का?
पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे. चांदोबाच्या इतरही कथा येथे द्याव्यात जेणे करून आम्हा बालकांच्या पालकांचे पैसे वाचतील.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
25 Mar 2010 - 11:06 am | विजुभाऊ
अती झाले अन अजीर्ण झाले....्याच्याही पार पुढे पोचलीय ही नाडीची केस
मेहेरबानी करून आता या विषयावर लिहिणे थांबवावे
25 Mar 2010 - 11:28 am | कवटी
जपान लाईफ(८)
एक स्वप्न प्रवास (११)
एप्रील फळ (१०)
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६)
असा पराक्रम गाठीशी असणार्या विजुभौनी ५व्या भागात हाय खावी हे काही बरोबर नाही.
कवटी
25 Mar 2010 - 11:15 am | चिरोटा
कथा आवडली.विश्वास ठेवणे जड जातेय.
(अनाडी)भेंडी
P = NP
25 Mar 2010 - 11:56 am | अर्चिस
महेश भट्ट, हिमेश रेशमिया, सांस बहु, सुनील शेट्टी; लालू यादव ..............................................आणि unlimited नाडी पुरण
Non-stop Non -sense
25 Mar 2010 - 1:23 pm | चित्रगुप्त
हे घ्या आणखी काही दुवे :
http://www.manirajan.com/
http://www.findyourfate.com/indianastro/nadi.jsp
http://wilfglobal.com/index.php?p=0
http://www.indianetzone.com/2/nadi_shastra.htm
http://www.kagabujandar.org/english_Sre_Bhaaskharamaharishi.html
http://www.premasagarlight.com/english.htm
http://www.telegraphindia.com/1080906/jsp/jharkhand/story_9795578.jsp
25 Mar 2010 - 2:11 pm | संजा
माननीय शशीकांत ओक साहेब,
आपला लेख वाचला आणि खरच भारावुन गेलो. तत्परतेने तुमचे आधीचे लेख आधाश्यासारखे वाचून काढले. आपल्या अभ्यासाला तोड नाही. ईतक्या अभ्यासू आणि ज्ञानात भर टाकणार्या लेखांवर हलक्या दर्जाचे, टींगल टवाळी करणारे प्रतीसाद देणार्यांची कीव आली.
आपणास प्रार्थना आहे की कोणत्याही टीके कडे दुर्लक्श करून लीहीत रहा.
पूढील लेखासाठी शुभेच्छा.
संजा
25 Mar 2010 - 5:34 pm | नावातकायआहे
>>त्याने आपल्या संपत्तीतील काही वाटा तिला दिला ..... पुढे चालू...
8}
:''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''(
नको 'तात्या देवा' अंत आता पाहु.....
जळी स्थळी काष्ठी 'नाडी' दिसे
25 Mar 2010 - 5:59 pm | कवटी
उद्या कोणी असल्या नाडीचा संदर्भ देउन तात्याबरोबरच्या मागच्या जन्मातले नाते सिद्ध केले तर तात्याभौ मिपाचे मालकी हक्क शेअर करतील काय?
कवटी
25 Mar 2010 - 7:01 pm | चित्रगुप्त
पुष्कळ वर्षांपूर्वी आमची पण नाडी काढली गेली होती....अर्थात त्यावेळी तिथे आम्ही खुद्द तिथे हजर नव्हतो.... त्यामुळे कितपत माहिती दिली गेली होती, हे ठाऊक नाही.
नाडीत काय लिहून आले होते, ते आता स्मरत नाही, पण ती वही आणि क्यासेट हुडकून लवकरच लिहू.
25 Mar 2010 - 8:04 pm | चतुरंग
सगळ्यांच्या नाड्यांचा हिशोब ठेवणार्या साक्षात 'चित्रगुप्ताचीही' नाडी असावी हा चमत्काराचा परमोच्चबिंदूच म्हणायला हवा! ;)
(नाडीलुप्त)चतुरंग
25 Mar 2010 - 8:19 pm | वेताळ
अजुनही अश्याच चमत्कारीक कथा येवु द्या.
ह्या कथेमुळे नाडीला नावे ठेवणार्याना सद् बुध्दी मिळेल.
वेताळ
25 Mar 2010 - 10:07 pm | चित्रगुप्त
अहो, आमची गेल्या हजारो वर्षांची अजब, अनोखी, दिलकश दास्तान सर्वांना सांगायला आम्ही आतुर आहोत, पण कामापायी (खरंतर आळसापायी) सर्व एकदम लिहुन काढणं जमेना झालंय....तरी प्रयत्न करत आहोत....