आतापर्यंतः
"मॅम, कॅन यू टेल अस अबाऊट दॅट बॅग नाऊ? इज इट युअर्स?"
थकलेल्या डोळ्यांनी म्हातारीने स्मिथ कडे बघितलं "व्हॉट टाईम इज इट नाऊ?" त्याने तिला वेळ सांगितली.
"सो इट हॅज बीन अॅन अवर अॅंड अ हॅफ सिन्स आय केम अक्रॉस द वॉक वे?"
"अबाऊट दॅट."
"दॅट शुड बी इनफ!" म्हातारी म्हणाली.
"इनफ फॉर व्हॉट, मॅम?" एकदम अस्वस्थ होत स्मिथ म्हणाला.
*****************
"लेट मी अॅन्सर युअर फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट," म्हातारी म्हणाली, "नो, दिस इज नॉट माय बॅग."
"नॉट युअर बॅग? देन.." स्मिथ पुढे काही बोलायच्या आत त्याने काही वेळापूर्वी बी टर्मिनल च्या आत पाठवलेल्या
दोन एअरपोर्ट पोलिसांपैकी एक जण परत येऊन लगबगीने त्याच्याशी बोलता झाला, "सॉरी टू इंटरप्ट, मिस्टर स्मिथ,"
"बट यू हॅव गॉट टू सी दिस!" त्याने काही प्रिंट-आउट्स स्मिथ च्या पुढे सरकवले, आणि इतरांपासून थोडं दूर जात
हळू आवाजात बरीच मिनिटे ते दोघे काही तरी बोलत राहिले. स्मिथने खूण करून डॉ. अलावींना जवळ बोलावले.
"इज दॅट हिम?"
"येस, दॅट्स द मॅन".
स्मिथ आता म्हातारीकडे वळला आणि म्हणाला, "लेट मी सी इफ आय कॅन अॅन्सर माय सेकन्ड क्वेश्चन मायसेल्फ,"
"द टाईम दॅट वी स्पेन्ट हिअर वॉज टू बी इनफ फॉर दिस मिस्टर जॉन ख्रिस्टी टू अॅचीव्ह समथिंग इन टर्मिनल बी, राईट?"
म्हातारीने स्मिथने दाखवलेल्या प्रिंट-आउट्स वर नजर टाकीत मान हलवली. "यू एव्हर हर्ड ऑफ रेड हेर्रिंग्ज?"
म्हातारी म्हणाली, "आय वॉज हिज रेड हेर्रिंग."
स्मिथ ने संताप काबूत ठेवत तिला सांगितलं, "दॅट सीम्स टू टॅली विथ व्हॉट आय हिअर, विच इस दिस..."
मग त्याने तिला आणि इतरांना सांगितलं ते असं -
जॉन ख्रिस्टी म्हातारीला मागे टाकून बी टर्मिनल मध्ये शिरला, स्वत:च्या फ्लाईट च्या गेट वर बी १६ पाशी जाऊन थोडा
वेळ बसला, आणि मग गेट एजंटशी बोलून सिअॅटलला जाणार्या त्याच्या विमानाच्या बोर्डींग ला अद्याप अर्धा तास
असल्याची असल्याची खात्री करून रेस्ट रूम मध्ये गेला. तिथे जातांना तो त्याच्या दोन कॅरी-ऑन बॅगा बरोबर घेऊन गेला.
जॉन काही वेळानंतर आपल्या गेटपाशी येऊन बसला, आणि फ्लाईटचं शेवटच्या झोनचं बोर्डींग सुरू झाल्यावर गेट
एजंटला म्हणाला, "एक्सक्यूज मी, आय अॅम अफ्रेड आय फरगॉट माय बॅग्ज इन द रेस्ट रूम, लेट मी गेट देम क्विकली."
"सर, यू हॅव टू हरी अप, वी आर रेडी टू लीव्ह इन अ फ्यू मिनिट्स!" गेट एजंट म्हणाला.
जॉनने पाचच मिनिटांत धापा टाकत परत येत गेट एजंटला सांगितलं की त्याच्या बॅग्ज जागेवर नाहीत. अस्वस्थ
जॉनला बसायला सांगून एजंटने बॅगांचं वर्णन विचारून घेतलं. समोरून जाणार्या एका एअरपोर्ट रेस्ट रूम कस्टोडियनला
बोलावून त्या एजंटने बी टर्मिनलच्या मध्यभागी असलेल्या बी ४ गेट जवळच्या रेस्ट रूम मधून त्या बॅगा नाहीश्या झाल्याचं
सांगितलं.
तो कस्टोडियन बी ४ च्या दिशेने जात असतांनाच बी १६ च्या गेट एजंटने बी टर्मिनलच्या इतर सर्व फ्लाईट एजंट्सना इंटरकॉम
फोन वरून नाहिश्या झालेल्या बॅग्जची घटना आणि वर्णनं कळवली आणि संशयास्पद बॅगा आढळल्यास सावध राहण्यास
सांगितलं.
त्याच सुमाराला बी १२ च्या दुसर्या एका गेट एजंटला बी टर्मिनल बाहेर असलेल्या यू एस एअरवेजच्या महिला एजंटचा
फोन आला. तिने म्हातारीचं नाव आणि वॉशिंग्टन च्या तिच्या विमानाचा सीट नंबर सांगून तिच्या बरोबर त्याच नावाचा कोणी
वयस्कर सहप्रवासी आहे काय ते विचारलं. त्याने त्याच्या स्क्रीन वर बघून असा कोणी सहप्रवासी नसल्याचं सांगितलं. तिने
त्याला थोड्क्यात बाहेर घडत असलेल्या नाट्याचीही कल्पना दिली. बी १२ च्या गेट एजंटनेही तिला आताच कळलेल्या बी १६ गेट
वरच्या प्रवाश्याच्या नाहीश्या झालेल्या बॅग्ज ची माहिती दिली, आणि ताबडतोब एअरपोर्ट पोलिस पाठवण्याची सूचना दिली.
यानंतर स्मिथ ने पाठवलेले दोन पोलीस बी टर्मिनल मध्ये पोहोचून त्यांनी चौकशी सुरू केली. कस्टोडियन च्या मदतीने त्यांनी
बी टर्मिनल च्या रेस्ट रूम मधील आणि इतर ठिकाणांच्या सर्व्हेलन्स व्हिडिओ कॅमेर्यांनी टिपलेली छायाचित्रे तपासायला सुरूवात
केली.
खबरदारी म्हणून त्यांनी संपूर्ण बी टर्मिनलवरून सुटणार्या फ्लाईट्स रोखण्याची सूचना दिली. (हीच ती थांबलेली विमानं
मुंबईकर प्रवाश्याने बी टर्मिनल बाहेरून बघितली होती.)
दोघा एअरपोर्ट पोलीसांपै़की एक छायाचित्रे पहात असतांना दुसर्याने त्यांतील सुरूवातीची काही छायाचित्राचे प्रिंट-आउट्स
उचलले, बी १६ पाशी बसलेल्या जॉन ला नाव, आय डी वगैरे प्राथमिक माहिती विचारून तिथेच बसायला सांगितलं आणि
आणखी पोलिसांचा बॅक-अप वॉकीटॉकीवरून मागवला. गेट एजंटला हळू आवाजात त्या म्हातार्याला जागेवरून हलू न देण्याचं
सांगून तो बी टर्मिनल च्या बाहेर आला, आणि त्याने ती जॉन ख्रिस्टीच्या चेहेर्याची छायाचित्रे स्मिथ च्या हातात दिली.
"आय अॅम गोईंग टू गो इन देअर नाऊ, मॅम, हिअर इज युअर लास्ट चॅन्स टू रिडीम युअरसेल्फ; कॅन यू व्हेरी क्विकली
टेल मी व्हॉट शूड वी एक्स्पेक्ट इन दोज बॅग्स? बिकॉझ फाईंड देम आय विल."
मान हलवत म्हातारी म्हणाली "ही नेव्हर टोल्ड मी दॅट. बट ही इज अ गूड मॅन, दॅट मच आय कॅन टेल यू."
आतापर्यंत तिथे आलेल्या ज्यादा पोलीस पथकातील एकाला म्हातारी आणि भारतीय प्रवाश्यापाशी सोडून स्मिथ बी टर्मिनल
च्या आत जाण्यास निघाला. जातांना त्याने डॉ. अलावींकडे वळून म्हंटलं, "सर, आय अॅप्रिशिएट ऑल युअर हेल्प सो फार,
बट आय अॅम अफ्रेड आय हॅव टू अॅस्क यू टू स्टे विथ अस अनटिल वी क्लोज दिस, आय होप यू विल अंडरस्टँड."
डॉ. अलावींनी खांदे उडवीत बी टर्मिनल कडे डावा हात करत म्हंटले "वेल, आय अॅम नॉट गोइंग एनी व्हेअर एनी वे विथ
व्हॉट यू हॅव गोइंग इन देअर, सो शुअर, आय विल वेट."
"अँड द सेम गोज फॉर यू, सर", भारतीय प्रवाश्याकडे पाहून स्मिथ म्हणाला. त्याने हो म्हंटले आणि जवळच असलेल्या
एअरपोर्टच्या भिंतीला टेकून तो खाली बसला. शॅरलट्च्या फ्री ईंटरनेट चा अशा वेळी वापर करावा लागेल अशी त्याने कधी
स्वप्नातही कल्पना केली नसती. पण 'आलिया भोगासी असावे सादर' असा विचार करून त्याने लॅपटॉप उघडला.
इकडे स्मिथ त्याच्या बरोबरच्या पोलीस आधिकार्यांना घेऊन बी टर्मिनल मध्ये शिरला. टर्मिनलच्या तोंडाशीच असलेल्या
'क्वीन सिटी न्यूज अॅंड गिफ्ट्स' च्या दुकानावरून जातांना त्याला दर्शन झालं ते काचेतल्या आर्थर हेलेच्या पुन्हा विक्रीला
आलेल्या 'एअरपोर्ट' या गाजलेल्या पु्स्तकाचं. त्या पुस्तकातला टी डब्ल्यू ए च्या विमानात कॅरी-ऑन बॅगेत बाँब घेऊन जाणारा
गेरेरो आठवला "जीझस, नॉट ऑन माय वॉच!" स्वतःशी पुटपुटत तो आत शिरला.
क्रमशः
प्रतिक्रिया
21 Jun 2009 - 12:26 am | बहुगुणी
क्षमस्व!
मला वाटलं होतं की हा अंतिम भाग असेल म्हणून, पण मला आणखी एकदा 'क्रमशः' टाकणं वेळेअभावी भाग पडतंय.
लवकरच शेवटचा भाग पूर्ण करायचा प्रयत्न करतो. जमल्यास उद्याच्या आतच.
- बहुगुणी
21 Jun 2009 - 5:50 am | Nile
आता स्मिथने सगळ्यांनाच थांबायला सांगितलं आहे तर आम्ही तरी काय करणार.
वाट बघतो! :)
21 Jun 2009 - 1:03 am | मस्त कलंदर
मलाही वाट्लं होतं की हा अंतिम भाग असेल... :(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
21 Jun 2009 - 1:12 am | स्वप्निल..
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..!
स्वप्निल
21 Jun 2009 - 1:49 am | चतुरंग
(ताटकळणार)चतुरंग
21 Jun 2009 - 2:34 am | रेवती
आलाच तो क्रमशः!
शेवटच्या भागाची वाट बघतीये.
रेवती
21 Jun 2009 - 3:03 am | भाग्यश्री
मला तेच एअरपोर्ट पुस्तक आठवले होते आधी! :)
सही झालाय हा पण भाग !
http://www.bhagyashree.co.cc/