भाग १:
आतापर्यंतः शॅरलटच्या विमानतळावरचा स्टॉप-ओव्हर हल्ली त्याला आवडायला लागला होता.
डावीकडे टर्मिनल ए आणि बी, उजवीकडे सी आणि पुढे डी व ई, यांच्या मधल्या जागेतल्या
फूड कोर्ट समोर, मूव्हींग वॉक वे ला लागून जवळ जवळ शंभर तरी पांढर्या-स्वच्छ रॉकिंग चेअर्स होत्या.
आज तो शॅरलटला उतरला होता शिकागोच्या मीटींगनंतर. फरक फक्त इतकाच, की या वेळी तो शॅरलटहून
जायचा होता नूअर्कला आणि तिथून मग सरळ मुंबई! चक्क मे मध्ये महिनाभराची सुट्टी काढली होती,
आणि पत्नी आणि मुलगा महिनाभर पुढे गेलेले. शिकागोपासून बॅगा थ्रू चेक इन केल्या मुंबईपर्यंत, त्यामुळे
हातात फक्त लॅपटॉपची बॅग आणि एक हलकीशी ओव्हरनाईटर बॅग इतकंच. शॅरलटला ई टर्मिनलला उतरून
बी टर्मिनलकडे जाताना तासभर वेळ होता म्हणून तो सवयीने पियानोवालीसमोर झुलत्या खुर्चीत बसला.
पंधरा एक मिनिटांनंतर, 'आता शिस्तीत वेळेवारी आपल्या गेट पाशी जाऊन बसावं' असा विचार करून तो उठला,
आणि खुर्च्यांना वळसा घालून वॉक वे कडे निघाला. त्याच्या पुढच्या आजी बाई पट्ट्यावर चढतांना जन्मजात
भारतीय अदबीने तो पाय रोखून थांबला.. "यू गो अहेड, मॅम! अॅफ्टर यू" म्हणाला. मंद हसून आ़जीबाईंनी हातातली
रोलर बॅग पट्ट्यावर ओढायचा प्रयत्न केला, पण त्या कृश हातांना ते झेपेना. तो म्हणाला "लेट मी गेट दॅट फॉर यू,
आय अॅम ट्रॅव्हलिंग लाईट एनी वे."....
पुढे:
*******
आजीबाईंच्या पाठोपाठ वॉक वे वर पाय ठेवतांना त्याने मागे पहात रोलिंग डफेल बॅग पुल-आऊट हॅंडलला धरून
पट्ट्यावर ओढली. पुढे पाहून चालायला सुरूवात करणार तोच त्याच्या लक्षात आलं, आजीबाई हात पसरून,
सरकणार्या बाजूंना दोन्हीकडे घट्ट धरून उभ्या होत्या. त्यांच्या पुढे पाहिलं तर पट्ट्यावर कोणीच नव्हतं. आजोबा गायब!
बहुतेक ते उतरून एव्हाना बी टर्मिनल च्या दिशेने काटकोनात वळले होते. 'कुठे शोधणार आजीबाई,
कसली घाईये म्हातार्याला?' "Hope you don't have an immediate connection" आजीबाईंना उद्देशून
तो म्हणाला. त्या उत्तरल्या "No, we are OK for another hour".
मागच्या प्रवाश्यांचा खोळंबा होईल म्हणून आजीबाईंना "Stand to the right, walk to left" नियमाची
आठवण करून द्यावी असं त्याला वाटलं, त्याने मागे वळून पाहिलं, ३-४ पट्ट्यावर येऊ पहाणारे प्रवासी एव्हाना
वेगात बाजूने चालत पुढे निघून चालले होते. 'जाऊ देत, फारसं अंतर नाहीच आहे, जातील चालत, कशाला बिचार्या
आजीबाईंना घाई करायची, समोरच तर आहे बी टर्मिनल' असा विचार करून तोही म्हातारीच्या मागे शांत उभा राहिला.
'अजून अर्धा तास आहे मलाही बोर्डिंगला, पोचेन आरामात' म्हणत त्याने काचेतून बाहेर एअरपोर्ट कडे बघितलं,
शु्क्रवारची संध्याकाळ, विमानांची आणि प्रवाशांचीही लगबग वाढायला लागली होती. अजून अर्ध्या-पाऊण तासात हा विमानतळ
धोपटलेल्या पोळ्याभोवतीच्या मधमाश्यांसारखा विमानांनी भरून जाईल हे त्याला अनुभवाने माहित होतं. त्याने वॉक वे च्या पुढे
पाहिलं, बी टर्मिनल च्या तोंडाशी असलेलं ब्रूकस्टोनचं दुकान आता नजरेच्या टप्प्यात आलं होतं. पाचच मिनिटं वेळ काढून
एखादी under $25 गिफ्ट भारतात नेण्यासाठी बघावी असा त्याला मोह झाला, पण बायकोने निघताना दिलेला दम आठवला
"उगाचच काही १५-२० डॉलर्स चं कचकडं आणू नका, काही मिळत नाही असं नाहीये भारतात हल्ली, जे काही घ्यायचंय ते
इथे येऊन घ्या, जाऊन चिन्यांच्याच घश्यात जाणार तो पैसा, निदान भारतातल्या लोकाना तरी मिळु देत चार पैसे."
खरंच होतं तिचं, त्याने ब्रूकस्टोनचा विचार झटकून टाकला.
एव्हाना ते वॉक वे च्या टोकाशी पोहोचले होते. आजीबाईंनी जपून पुढे पाऊल टाकून वॉक वे चा हॅंडलबार सोडला आणि
त्या चालत चालत बी टर्मिनल च्या दिशेने काट्कोनात वळल्या. पाठोपाठ तोही त्यांची रोलर डफेल बॅग घेऊन मागे वळला.
आजीबाई थांबण्याचं चिन्ह दिसेना, तेंव्हा तो म्हणाला "आय होप यू डोंट वाँट टू फरगेट युवर बॅग, मॅम". बाजूने जाणार्या
एक-दोघा प्रवाशांनी त्या दोघांकडे वळून पाहिलं. आजीबाईंनी थबकून त्याच्याकडे बघितलं, त्या म्हणाल्या "माय बॅग? व्हॉट बॅग?"
"दिस वन" रोलर बॅग सरळ चाकांवर उभी करत तो म्हणाला. "दॅट्स नॉट माय बॅग!" आजीबाई म्हणाल्या.
'आयचा घो! म्हातारीला अल्झाय्मर तर झालेला नाहीये?' "मॅम, आय कॅरीड युवर बॅग ओव्हर द वॉक वे फॉर यू. आय नीड टू
गेट टू माय ओन टर्मिनल नाऊ, प्लीज टेक इट!" एव्हाना आसपासचे ६-७ प्रवासी थांबून हा मजेशीर प्रकार बघायला लागली होती.
"आय डोंट नो व्हॉट यू आर टॉकिंग अबाऊट, आय टोल्ड यू यंग मॅन, दॅट इज नॉट माय बॅग. नाऊ, आय मस्ट गो."
एवढं बोलून म्हातारी पुढे चालायला लागली. आता चकित व्हायची पाळी त्याची होती. त्याने आसपासच्या लोकांकडे हताशपणे पाहिलं.
एक यू एस एअरवेजची कर्मचारी चढलेले आवाज ऐकून त्या दिशेने येउ लागली होती. "डू वी हॅव अ प्रॉब्लेम हिअर?
मे आय हेल्प यू सर?"
"वेल, आय कॅरीड दिस बॅग अक्रॉस द वॉक वे फॉर दिस लेडी हिअर, अँड नाऊ शी सीम्स टू हॅव फरगॉटन दॅट.
आय नीड टू गेट टू माय ओन टर्मिनल नाऊ, कॅन यू प्लीज मेक शुअर शी गेट्स दिस अॅंड जॉईन्स हर हजबंड फॉर देअर फ्लाईट?"
आता म्हातारी वळली, आणि जवळजवळ किंचाळत म्हणाली "माय हजबंड? ही हॅज बीन डेड फॉर अ डेकेड!! आर यू क्रेझी
ऑर जस्ट प्लेन हॅल्युसिनेटिंग?" तो गोंधळून दोन पावलं मागे सरकला आणि म्हणाला "वॉज ही नॉट विथ यू व्हेन वी स्टार्टेड?
आय सॉ हिम क्रॉसिंग दॅट कॉर्नर!"
यू एस एअरवेजच्या त्या एजंट कडे पाहून म्हातारी म्हणाली "लेडी, यू बेटर कॉल द पुलिस नाऊ. आय डोंट नो व्हॉट ही इज टॉकिंग
अबाउट, अँड आय कॅनॉट स्टँड हिअर अॅड मिस माय फ्लाईट लिसनिंग टू हिम ट्राईंग टू फोर्स दिस बॅग ऑन मी. गॉड नोज
व्हॉट ही हॅज इन देअर!!" तिचं ते बोलणं ऐकून लोक चटकन बाजूला सरकले. यू एस एअरवेजच्या एजंटने आता आपला
कॉमलिंक वॉकीटॉकी बाहेर काढला आणि एअरपोर्ट पोलिसांना बोलावलं. "आय हॅव अ सिच्युएशन हिअर अबाऊट
अॅन अन्क्लेम्ड बॅग, नीड समवन टू कम हिअर राईट अवे."
*********
क्रमशः
[पुढील भाग]
प्रतिक्रिया
14 Jun 2009 - 10:06 am | यन्ना _रास्कला
श्वाक बसला. ज्याच कराव भल तो म्हने माझ्च खर.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
14 Jun 2009 - 11:07 am | पर्नल नेने मराठे
बघ ना :-? काय दुनिया आहे
चुचु
14 Jun 2009 - 10:27 am | सहज
जबरी वळण..
पुढचा भाग लवकर येउ दे :-)
14 Jun 2009 - 2:39 pm | Nile
हा हा! धमाल! लवकर टाका पुढचे भाग प्लीज! :)
14 Jun 2009 - 10:52 am | अवलिया
वाचतो आहे .......
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
14 Jun 2009 - 11:12 am | स्वाती दिनेश
एकदम भन्नाट टर्न , पुढे काय झालं ते लवकर लिहा बुवा..
स्वाती
14 Jun 2009 - 11:25 am | मस्त कलंदर
पुढे काय झालं???
लवकर टंका पुढचा भाग!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
14 Jun 2009 - 12:51 pm | मदनबाण
पुढचा भाग टंका लवकर...
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
14 Jun 2009 - 6:22 pm | अनामिक
भन्नाट टर्न घेतला राव कथेने... लवकर टाका पुढचा भाग.
कथा खरी आहे का?
-अनामिक
14 Jun 2009 - 7:05 pm | चतुरंग
इंटरेस्टिंग केस डॉ.वॉटसन!
(शेरलॉक)चतुरंग
14 Jun 2009 - 8:25 pm | रेवती
प्लीज पुढचा भाग लवकर टाका!
रेवती
15 Jun 2009 - 2:17 pm | श्रावण मोडक
पुढे?
15 Jun 2009 - 2:23 pm | श्रावण मोडक
दोनदा आल्याने प्रकाटाआ.
15 Jun 2009 - 2:27 pm | श्रावण मोडक
तोच प्रतिसाद तिसऱ्यांदा आलाय. काही तरी गडबड होतेय.
15 Jun 2009 - 2:30 pm | बिपिन कार्यकर्ते
शॉकिंग... भन्नाट वळण. पुढे?
बिपिन कार्यकर्ते
15 Jun 2009 - 5:15 pm | विसोबा खेचर
शॉकिंग... भन्नाट वळण. पुढे?
हेच बोल्तो..
तात्या.
15 Jun 2009 - 2:50 pm | कपिल काळे
पुढे काय झालं?
15 Jun 2009 - 3:25 pm | ब्रिटिश टिंग्या
लै डेंजर असतात बॉस....
- (अनुभवी) टिंग्या
15 Jun 2009 - 3:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे काय रे टिंग्या?
पुढे काय होतं, लवकर टाका भाग.
15 Jun 2009 - 4:07 pm | ब्रिटिश टिंग्या
विमानतळावरच्या म्हातार्या बैकांबद्दल म्हणत होतो....संस्थळावरच्या नै कै!
15 Jun 2009 - 4:19 pm | धमाल मुलगा
ह्याला म्हणतात... "झक मारली आन मुंबई पाहिली" :(
साहेब, भल्याची दुनियाच राहिलेली नाही बघा!
आता सांगा लवकर त्या म्हातारीनं पुढं अजुन काय काय रामायण घडवलं.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
15 Jun 2009 - 6:32 pm | घाशीराम कोतवाल १.२
पुढे नक्कि काय झाल टेररिस्ट म्हणुन घेतला का
तुम्हाला खोपच्यात गोर्या कातडीवाल्याणी !!!
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
16 Jun 2009 - 1:40 am | प्राजु
सॉल्लिड थ्रिलिंग!!!
पुढे काय झालं??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Jun 2009 - 5:11 am | विंजिनेर
वाचतो आहे.
उत्सुकता ताणली गेली आहे.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही