लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल.
या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले.
'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'? या प्रश्नाच्या उत्सुकतेमुळे बाहुबलीच्या दुसऱ्या भागाने राजामौलीला न भुतो न भविष्यती असा बिझनेस मिळवून दिला.
अगदी याच उत्सुकतेपोटी परवा १५ आॅगस्टला सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन पाहिला. पहिला सिझन अनपेक्षितपणे सुपर डुपर हिट ठरलेल्या या सिरिजने २५ दिवसांत काय होणार आहे? गणेश गायतोंडे, सरताज सिंग, बंटी, कांताबाई, भोसले, पारुळकर, त्रिवेदी या पात्रांचं पुढे काय होतं? सरताज मुंबईला वाचवू शकेल का? हे आणि असे अनेक अनुत्तरीत प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात निर्माण केले आणि त्या सर्वांच्या उत्तरांची या दुसऱ्या सिझनपर्यंत उत्सुकता अबाधित ठेवली हे या मालिकेचे खरे यश!
जुलै २०१८ ला सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन रिलिज झाला होता. सुरूवातीला फार प्रतिसाद नसलेल्या या सिरिजने भारतीय प्रेक्षकांची हळू हळू चांगली पकड घेतली. २०१८ च्या आॅगस्ट महिन्यात, एका रात्री दहा वाजता सहज उत्सुकता म्हणून पहिला भाग पाहिला आणि झपाटल्यागत नंतरचे सगळे भाग सलग सकाळी सहा वाजेपर्यंत पाहुन काढले होते. प्रचंड आवडला होता पहिला सिझन!
त्या भागात सगळ्याच पात्रांचा अभिनय अतिशय दमदार झाला होता. मुख्य पात्रांच्या बरोबरीने कुक्कू, सुभद्रा, बदरीया, त्रिवेदी, अशी दुय्यम फूटेज असणारी पात्रही प्रेक्षकांच्या चांगली लक्षात राहिली होती. 'भगवानको मानते हो?', 'अपुनही अश्वत्थामा है' त्यातल्या या आणि अनेक शिवराळ संवादांनी अक्षरशः धुमाकुळ घातला होता. विक्रमादित्य मोटवाने आणि अनुराग कश्यपचं दिग्दर्शन अगदी अफलातून होतं.
पहिल्या सिझनला या अत्यंत वेगवान कथानकाने वाढवलेली उत्सुकता, दुसऱ्या सिझनच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत टिकून ठेवली असं म्हणायला हरकत नाही. मध्ये काही ठिकाणी स्लो डाऊन झालेले कथानक, क्लायमॅक्सला अर्धवट ठेवून प्रेक्षकांनी ते आपापल्या दृष्टीने पूर्ण करावे हा दिग्दर्शकांना सुचलेला भारी प्रकार आहे.
वेब सिरिज म्हणून सेक्रेड गेम्सचा जो काही कंटेट होता, तो पहिल्यांदाच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि त्याने इथल्या प्रेक्षकांची वेब कंटेंट प्रकारामध्ये विशेष रुची निर्माण केली. नाही म्हणायला, त्यापूर्वी इनसाईड एज, ब्रिद अशा अनेक चांगल्या मालिका आल्या होत्या, पण सेक्रेड गेम्सच्या वाट्याला जी लोकप्रियता आली तशी इतर मालिंकाच्या वाटेला कमीच आली. नेटफ्लिक्सने अतिशय चतुराईने सेक्रेड गेम्सच्या माध्यमातून भारतात दमदार पाऊल ठेवले. त्यापूर्वीही नेटफ्लिक्स भारतात प्रक्षेपित होत होते, पण सेक्रेड गेम्सच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकाला वेब सिरिजच्या बाबतीत चोखंदळ बनवत, त्यांचे महागडे सबस्क्रिप्शन घ्यायला भाग पाडले हे नाकारता येण्यासारखे मुळीच नाही.!!
प्रतिक्रिया
18 Aug 2019 - 7:45 pm | जॉनविक्क
त्याने आख्या सीजन 2 चे अपयश व्यवस्थित झाकले गेले, आणि लोकांना डोकेफोड करायला आयते कोलीत मिळवुन दिले अन्यथा या सिजन चा प्रेक्षकांनी जो बाजार उठवला असता त्याची कल्पनाही करवत नाही.
हा शेवट ऐनवेळी ठरला असावा असे मानायला प्रचंड जागा आहे.
बाकी ही नाहीतर दुसरी कोणतीतरी सिरीज येऊन तिने लोकांवर गारुड केलेच असते. करण पर्सनालाईज एंटरटेंमेंट इज हिर टू स्टे. एका डेस्कटॉप वा लॅपटॉप वर 4 जणांनी एकत्र चित्रपट बघायचे दिवस कधिच हवेत विरून गेलेत :)
19 Aug 2019 - 6:30 am | मारवा
जितका पहीला सीझन कथानकाच्या बाबतीत आखीव रेखीव होता त्या तुलनेने दुसरा सीझन फारच विस्कळीत वाटला म्हणजे इरीटेट होण्याइतपत याला हा धागा त्याला तो धागा जोडा फारच थकायला झालं.
दुसरं म्हणजे अनावश्यक प्रक्षोभक संवाद वारंवार टाकुन जे कथानकालाही कुठे आवश्यक वाटत नाही असे जागोजाग का पेरलेले आहेत ते कळालं नाही,
बाकी ओव्हरऑल एकवेळ नक्की बघण्यासारखा आहे व त्यातील काही तुकडे विलक्षण आहेत म्हणजे तुकड्या तुकड्या त छान आहे.
तसेच अनुराग कश्यप इ. च्या थीम्स शैली फारच रीपीट होतायेत म्हणजे जरी कथानक नाही तरी पात्रांच्या संवाद शैली अतीपरीचीत होतायेत त्याने ही ताजं असं काही बघायला मिळत नाही,
अनुराग ला आता क्रिएटीव्ह चॅलेंज म्हणुन एक पारीवारीक मुल्यांचा सिनेमा आणि नवाजउद्दीन ला एक जगातला कुठलाही रोल ज्यात तो गँगस्टर नाही त्याच्या ऐवजी काय वाट्टेल ते म्हणुन दाखवलं तर बर होइल
काही तरी नविन बाहेर येइल इतकं सगळ रीपीट होतय,
कल्ट चे चित्रीकरण त्याची थीम भारी आहे हे कुठल्या ठिकाणी चित्रीत झालेलं आहे कोणास माहीती आहे का ? त्यातील कल्ट मेंबर एकमेकाला अहं ब्रह्मासी म्हणतात ते ही रोचक आहे मात्र गांड मे ब्रह्मांड हे विनाकारण च अनावश्यक वाटलं.
22 Aug 2019 - 8:42 am | कानडाऊ योगेशु
https://www.esakal.com/manoranjan/sacred-games-2-do-you-know-where-guruj...
19 Aug 2019 - 3:38 pm | हस्तर
बर्यच गोश्ति अर्ध वट होत्या
सरताज सस्पेंड असून इन्वेस्टीगेट करतो
मंत्री अचानक मालकॉम कडे मग अचानक नजर कैदेत ,मग अचानक ड्युटीवर
20 Aug 2019 - 5:03 pm | प्रचेतस
सेक्रेड गेम्स पाहिली नाही अजून पण तुझ्या परिक्षणामुळे कदाचित पाहिनही :)
20 Aug 2019 - 5:31 pm | जॉनविक्क
बट यु कॅन्ट इग्नोर इट
20 Aug 2019 - 5:50 pm | पद्मावति
हि मालिका अजून बघितली नाही पण तुमच्या परीक्षणामुळे बघायची उत्सुकता वाटतेय.
21 Aug 2019 - 12:46 pm | जॉनविक्क
की मुक्तक ?
20 Aug 2019 - 7:41 pm | उपेक्षित
पहिला सीजन सैफ आणि फ़क़्त सैफ साठी पाहिला आणि त्याने निराश नाही केले, नवाजुद्दिन आवडता कलाकार आहे पण त्याला वासेपूर छाप भूमिका देऊन वाया घालवले आहे.
पहिल्या सीजन मध्ये काही ठिकाणी बळच शिव्या आणि न्यूड प्रसंग दाखवले गेले असे स्पष्टपणे वाटते (विशेषतःअनुराग ने जो भाग डिरेक्ट केला आहे तो)
दुसरा सीजन पहायची अजून इच्छा नाही झाली बघू कधी मुहूर्त लागतोय.
20 Aug 2019 - 9:00 pm | मित्रहो
खूप ऐकले आहे पण दोन्ही सिझन बघितले नाही.
21 Aug 2019 - 4:55 am | सोन्या बागलाणकर
दुसरा सीजन = बलिदान
कथाबीजाचं बलिदान
पहिल्या सीजनमध्ये मारलेल्या कॅरेक्टर्सचं बलिदान
लॉजिकचं बलिदान
अकलेचं बलिदान
चांगल्या कलाकारांचं बलिदान
प्रेक्षकांचा वेळ आणि पैशाचं बलिदान
21 Aug 2019 - 1:09 pm | बेकार तरुण
महा रटाळ प्रकार (सीझन २ हा)
उगाच ओढुन ताणुन आई बहीणींची आठवण आणी पार्श्वभागाची उजळणी... अनेक प्रश्न पडले आहेत मला, पण येथे आत्ता विचारणे योग्य होणार नाही (न पाहीलेल्यांसाठी)....
शेवटी सैफ काकाच भारी दाखवायचे म्हणुन कुठुनही कसलाही संबध नसलेले प्लॉट्स... लॉजिकचा एवढा बट्ट्याबोळ सेमी पोर्न चित्रपटातही नसतो :)
ह्यापेक्षा गुंडा ३,००,००० पट उत्तम आहे, लवकर संपतो अन खूप हसवतो....