श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in जनातलं, मनातलं
19 May 2019 - 8:03 pm

लोकहो,

श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे.

मूळ लेख : http://time.com/5586415/india-election-narendra-modi-2019/

मराठी अनुवाद : https://www.aksharnama.com/client/article_detail/3277

अनुवादाबद्दल अक्षरनामा चमूस धन्यवाद.

या लेखावर प्रतिसाद द्यायचं मनात होतं. विचार करण्यात बराच वेळ गेला. पण प्रतिसाद तयार झाला एकदाचा. तो वाचून कृपया आपली मते कळवणे. याचा इंग्रजी तर्जुमा याच लेखाखाली प्रतिक्रियांत लिहिला आहे.

धन्यवाद! :-)

आपला नम्र,
-गामा पैलवान

-------------- प्रतिसाद सुरू -----------------------------

नमस्कार आतिश,

तुमचं नाव चुकीचं लिहिलं असेल तर सर्वप्रथम क्षमा मागतो. तुमचा टाईम मासिकातला मोदी मुख्य भेदजनक असल्याचा इंग्रजी लेख वाचला. जालनिर्देश असा आहे : http://time.com/5586415/india-election-narendra-modi-2019/

तुमच्या लेखावर भाष्य करू इच्छितो.

१.

.... हिंदू राष्ट्रवादी भाजपचे नेते ....

भाजप कधीच हिंदू पक्ष नव्हता. हिंदू हा शब्द त्याच्या नावात नाही.

२.

.... मोदींचा उदय ही एकाच वेळी भारतासाठी अपरिहार्यता आणि आपत्ती कशी होती हे समजून घेता ....

मोदी ही भारतासाठी आपत्ती नाही. ती ल्युटनच्या दिल्लीवर कोसळलेली आपत्ती आहे.

३.

या देशात लोकानुनयी नेत्यांच्या वैधतेची आणि फँटसीची झलक पाहायला मिळते.

भारतीय मतदार अतिशय व्यवहारी आहे. त्याला राजकीय कल्पनाविश्वांत रमायला आवडंत नाही. कल्पनासृष्टीचा ( = फँटसी) प्रांत बॉलीवूड साठी राखीव आहे.

४.

यामुळेच भारताबरोबरच इंग्लंड-अमेरिकेसह तुर्कस्तान, ब्राझीलमध्ये या काहीशा दूरवरच्या देशातही लोकानुनयी नेत्यांमुळे बहुसंख्याकांच्या तक्रारींना कसा आवाज मिळाला हे पाहायला मिळतं. हे इतकं पसरलेलं आहे की, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्याच वेळी तुम्ही अधिक चांगलं किंवा अधिक आकर्षक नसलेल्या जगात ढकलले जाता.

या विधानास काहीही आधार नाही. राष्ट्रीय आविष्काराची मागणी असणे म्हणजे लोकानुनय नव्हे. इंदिरा गांधींची 'गरिबी हटाव' म्हणजे लोकानुयय आहे. त्यांनी बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं. तो लोकानुनय आहे. मोदींनी कधीच भरमसाट आश्वासनं दिली नाहीत. मोदींनी प्रभावकारी बदल घडवला. त्यास लोकानुनय म्हणंत नाहीत.

५.

.... पं. नेहरूंनी नव्या स्वतंत्र भारतासाठी धर्मनिरपेक्षता स्वीकारली.

मात्र हा स्वीकार अधिकृत नाही. आंबेडकरांनी घटना लिहिली/संकलित केली. तिच्यात धर्मनिरपेक्ष वा धर्मनिरपेक्षता हे शब्द कुठेही आढळून येत नाहीत.

६.

.... याचा अर्थ जॉर्ज ऑर्वेलच्या उक्तीप्रमाणे ‘काही लोक अधिक समान असणार’ असा लावत असले ....

तुमचं बरोबर आहे. सेक्युलर ही संज्ञा व्याख्याबद्ध नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांचं लांगूलचालन केलं जातं. प्रत्यक्षात मुस्लिमांनी समान पातळीवर हिंदूंशी मिळून मिसळून राहावे असे हिंदूंना अभिप्रेत आहे.

७.

स्वातंत्र्योत्तर भारतात प्रदीर्घ काळ नेहरूंच्या राजकीय वारसदारांनी लोकशाही तत्त्वं आणि कार्यप्रणाली यांचा दिखावा करत एका वंशपरंपरागत सरंजामशाहीचीच राजवट प्रस्थापित केली.

खरंच अगदी बरोबर आहे.

८.

.... पण मोदींच्या निवडीमुळे सांस्कृतिक दरीही अधोरेखित झाली.

दरी ? कसली दरी ? माझ्या मते मोदींच्या निवडीने कसलीही दरी पाडली नाहीये. किंबहुना मोदी पार ऐक्यकरी आहेत.

९.

धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद, माध्यमस्वातंत्र्य यांसारख्या स्वतंत्र भारताच्या कौतुकास्पद कामगिरीकडे व्यापक कटकारस्थानाचा भाग म्हणून पाहिलं जाऊ लागलं. त्याचबरोबर ख्रिश्चन, इस्लाम यांसारख्या अल्पसंख्याकांपासून एकेश्वरवाद्यांशी हिंदू उच्चभ्रूंची असलेली भागीदारी आणि त्यांचं भारतातील बहुसंख्य हिंदूंवरील प्रभुत्व याकडेही.

या काही कौतुकास्पद कामगिऱ्या नव्हेत, हे कृपया ध्यानी घेणे. धर्मनिरपेक्षता म्हणजे मुस्लिमांचे लांगूलचालन आहे. उदारमतवाद म्हणजे हिंदूंना झोडपणे आहे. आणि माध्यमस्वातंत्र्य उपभोगणारी माध्यमे मुळातून स्वतंत्र नाहीत. ती त्यांच्या मालकांची गुलाम आहेत.

केवळ हिंदू अभिजनच नाही तर सगळेच घाऊक अभिजन मुळं गमावून बसलेले ( = deracinated) आहेत.

१०.

त्यांनी अतुलनीय अशा राष्ट्रनिर्मात्यांवर हल्ला केला. नेहरू, नेहरूप्रणीत धर्मनिरपेक्षता, समाजवाद या वंदनीय गोष्टींना त्यांनी लक्ष्य केलं.

धर्मनिरपेक्षता कधीच नेहरूंशी निगडीत नव्हती. याची समानार्थी संज्ञा ऐकिवात नाही. मात्र नेहृनिर्मित समाजवाद नामक काहीतरी बाब अस्तित्वात आहे. पण मोदींनी त्यास लक्ष्य केलं नाही. कारण की १९९० सालीच नेहरूंच्या समाजवादाची विल्हेवाट लागली होती. भारताने अर्थव्यवस्था खुली केल्यावर.

११.

त्यांनी ‘काँग्रेस-मुक्त भारता’ची घोषणा केली.

ही मोदींची कल्पना नव्हे. ही सर्वप्रथम मो.क.गांधींनी १९४६ साली प्रस्तावित केली.

१२.

हिंदू-मुस्लीम यांच्यात बंधुभाव निर्माण होण्याची मात्र इच्छा दाखवली नाही.

ठार चूक ! मोदींनी गोसेवेसाठी शब्बीर सय्यद या मुस्लिमास पद्म पुरस्कार दिला. (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Shabbir_Sayyad )

१३.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे उच्चभ्रू ज्या उदार समन्वयवादी संस्कृतीवर विश्वास दा‌खवत होते, प्रत्यक्षात त्याखाली धार्मिक राष्ट्रवाद, मुस्लिमविरोधी भावना आणि खोलवर रुतलेली जातीय कट्टरता होती, हे मोदींच्या विजयामुळे पाहायला मिळालं.

अभिजन मूलोत्पाटित म्हणजे मुळं गमावलेले ( = deracinated ) लोकं आहेत. त्यामुळे त्यांना बहुजनमानस कळंत नाही. मग आपल्या चौकटीत बसंत नाहीत म्हणून ते बहुजनांना बोल लावीत बसतात. ही खरी समस्या आहे, बरोबर किनई ?

१४.

भारताला राजकारणप्रणीत दंगलींचा मोठा इतिहास आहे.

पण मोदींनी दंगली थांबवल्या.

१५.

मोदींनी मात्र अलीकडच्या अॅट्रोसिटीजविषयीच्या मौनापासून ते एक हजारापेक्षा जास्त मुस्लिमांचं शिरकाण त्यांच्या मातृभूमी गुजरातमधल्या २००२ सालच्या कत्तलीपर्यंत आपण जमावाचे मित्र आहोत हेच दाखवून दिलं.

हे पूर्णपणे बिनबुडाचे आरोप आहेत. गुजरात दंगलींत न्यायालयाने मोदींना का निर्दोष घोषित केलं नाही यामागचं कारण तुम्हांस माहितीये का ? याचं कारण आहे की मोदींचं नावच नव्हतं आरोपपत्रात. न्यायालयाचं म्हणणं आहे की मोदींवर आरोप दाखल व्हायलाच नकोत मुळातून.

१६.

मोदींनी कुठलेही पर्याय न देता भारताचे जुने आदर्श मोडीत काढले. नैतिक मूल्यमापनला वर्ग आणि संस्कृतीच्या संघर्षयुद्धाची भूमी केली.

या तथाकथित मानकांची उदाहरणं मिळतील काय? धन्यवाद!

१७.

त्यांच्या सत्ताकाळात जुने आदर्श म्हणजे केवळ सत्ताधारी उच्चभ्रूंचे हटवादी नखरे आहेत, असं मानलं जाऊ लागलं.

हे अगदी नेमकं वर्णन आहे. उच्चभ्रूंचे पोकळ नखरे !

१८.

.... त्यांना २०१४चं चैतन्य पुन्हा जागवायचं असतं. क्रांती घडवणारं चैतन्य!

हे तथाकथित क्रांतीचैतन्य म्हणजे खरंतर काँग्रेसच्या अपव्यवस्थापन व भ्रष्टाचाराचे पडसाद आहेत.

१९.

१८५८मध्ये ब्रिटिशांनी भारतावर कब्जा मिळवण्याआधी भारतावर अनेक शतकं मुस्लिमांचं राज्य होतं.

पार चुकीचा दृष्टीकोन ! दिल्लीतल्या इस्लामी राजवटीस उर्वरित भारताने कधीच मान्यता दिली नाही.

२०.

.... Ayodhya, a place where Hindu nationalist mobs in 1992 had destroyed a 16th century mosque, ....

भारतीय अभिजनांची आजूनेक बनवेगिरी. बाबरी नामे कुठलीही मशीद नव्हती. वादग्रस्त वास्तू जुनं राममंदिर होतं. बाबराने कुठलीही मशीद बांधली नाही. कारण की बिगर-इस्लामी प्रार्थनाक्षेत्री मशीद बंधने हा इस्लामचा घोर अवमान आहे. तुम्ही बाबरी मशिदीच्या घपल्याच्या आरपार पाहू शकाल अशी आशा आहे.

२१.

मोदींचा आर्थिक चमत्कार अपयशी ठरला आहे.

मोदींनी कसल्याही चमत्कारांचं आश्वासन दिलं नाही.

२२.

ते भारतात धार्मिक राष्ट्रवादाच्या विद्वेषाची हवा निर्माण करण्यात सहाय्यभूत झाले आहेत.

भारताला इतक्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्वीकृती ( = recognition) मिळाल्याचं यापूर्वी कधी पाहिलंय का तुम्ही ? ही मोदींनी उपसलेल्या कष्टांमुळेच ना? हिंदूंना अविष्कार हवाय आणि मोदी तो देताहेत. पूर्णविराम. तुम्ही ज्याला विष म्हणता ते हिंदूंसाठी खरंतर अमृत आहे.

२३.

.... ‘‘तुम्ही जर मोदींबरोबर असाल तर तुम्ही देशाबरोबर आहात, पण जर तुम्ही मोदींबरोबर नसाल तर तुम्ही देशद्रोही शक्तींचे हात बळकट करत आहात.’’ ....

सुदैवाने अथवा दुर्दैवाने सुमारे ५० कोटी भारतीयांचं हेच मत आहे. यामागील मनोभूमिका काय आहे याचा शोध तुम्ही घ्यावा म्हणून सुचवेन. एव्हढ्या लोकांना एकाच वेळी मूर्ख बनवणं अशक्य आहे, नाहीका?

२४.

हिंदू जमाव गोमातेच्या नावाखाली रस्त्यावर उतरून सार्वजनिक हिंसाचार करत आहे. अनेकदा वाटतं की, हे सगळं सरकारच्या छुप्प्या मदतीनंच होत आहे.

बहुतांश भारतात गोहत्या हा अपराध आहे. गोहत्या हे कायदा तोडणे आहे. गुन्हेगारीत मुस्लिम प्रमाणाबाहेर अधिक संख्येने आढळून येतात. तुम्ही ज्याला जमावी हत्या म्हणता ती खरंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांनी केलेली उत्स्फूर्त मदत आहे.

२५.

देशातील स्मार्टफोनधारकांनी अशी एखादी घटना चवीनं पाहून महिना उलटतो न उलटतो, तोच आणखी एक ख‌वळलेला हिंदू जमाव दुसऱ्या कुणा असुरक्षित मुस्लिमावर तुटून पडतो.

लव्ह जिहाद, जमीन जिहाद, क्षुल्लक कारणावरून मुस्लिमांची हिंदूंना मारहाण याविना एक महिनाही जात नाही. सावन राठोड आठवतोय? अंकित सक्सेना? धृवराज त्यागी? गूगल करून पहा.

२६.

जे लोक मुस्लिमांवर हल्ला करायला उता‌वीळ असतात, तेच मागासवर्गीय हिंदूंवर हल्ला करायलाही तेवढेच उतावीळ असतात.

प्रत्येकावर प्रत्येक ठिकाणी हल्ला करणारी लोकं एकंच आहेत हे कशाच्या आधारे म्हंटलं आहे? तसंही पाहता हे हल्ले अपवाद आहेत. हिंदू आपसांत गुण्यागोविंद्याने राहतात.

२७.

भाजपला मागासवर्गियांची मतं गमावणं परवडणारं नाही.

मित्रवर्य, परत तुमचं चुकतंय. भाजपला दलितांची मतं गमावणं परवडेल. मात्र म्हणून मोदी दलित-विरोधी होत नसतात.

२८.

पण मोदींच्या गुजरातमधली जुलै २०१६ची घटना आहे. गायीचे कातडं काढणाऱ्या चार मागासवर्गीयांना उच्चवर्णीयांनी कपडे काढून, लोखंडी सळयांनी मारत त्यांची धिंड काढली होती.

गाईगुरांची कातडी कमावणं हा चाम्भारांचा पिढीजात व्यवसाय आहे. नेमके त्यामुळेच ते अस्पृश्य झाले (असं मानण्यात येतं). सवर्ण लोकं सार्वजनिक ठिकाणी कातडी काढू देत नव्हते. एका प्रकारे ते अस्पृश्यतेस प्रतिबंध करीत होते. मात्र त्यांनी हे काम अधिक माणुसकीने करायला हवं याबद्दल दुमत नाही.

२९.

स्त्रियांच्या प्रश्नांबाबतही मोदींचा रेकॉर्ड डागाळलेलाच आहे.

आजिबात नाही.

३०.

२०१५मध्ये मोदी बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याबद्दल असं म्हणाले होते की, ‘स्त्री असूनही दहशतवादाबाबतची त्यांची कामगिरी लक्षणीय आहे.’ तेव्हा ते टीकेचे लक्ष्य झाले होते.

भारतीय उपखंडातल्या प्रत्येक पुरुषाला माहितीये भारतीय नारीचा संघर्ष किती कठीण असतो ते. ती काही तिच्या पाश्चात्य सहावर्ती ( = counterpart ) सारखी नाहीये. दिवसभर मरमर काम करून संध्याकाळी परत कुटुंबासाठी राबते. घरकाम कचेरीइतकंच घाम काढणारं ( = demanding ) असतं. मोदींनी शेख हसीनांची केलेली प्रशंसा उत्स्फूर्त आहे. भारतीयांना ती अपमानजनक शेरेबाजी वाटंत नाही.

३१.

पण हेही खरं की, मोदींनी एका स्त्रीची संरक्षणमंत्रीपदीही नियुक्ती केली!

घोर अज्ञ विधान. मोदींना स्त्रियांच्या क्षमतेवर कधीच शंका नव्हती.

३२.

.... मोदी सत्ताकाळात अल्पसंख्याकांवर (उदारमतवादी, निम्नवर्गीय, मुस्लीम, ख्रिश्चन इ.) सातत्यानं हल्ले होत आहेत.

तुम्हांस यावर विश्वास ठेवावासा वाटतोय. पण मोदींनी तिहेरी तलाक संपवला. हा नेमका कोणावर हल्ला आहे असं तुम्हांस वाटतं ? मला मोदींविरुद्ध तक्रार करणारे कोणीही सर्वसामान्य दलित वा ख्रिश्चन आढळले नाहीत. उलट आपल्यावरील लैंगिक अत्याचारांचा पाढा वाचण्यासाठी नन्स आपणहून पुढे येताहेत. यालाच महिलांचं सक्षमीकरण म्हणतात. मोदींनी ते केलंय.

३३.

.... मोदींनी भारत अशा अवस्थेला आणून ठेवला आहे की, भारतीय समाजात आपापसातील भेद दाखवण्याचीच अहमहमिका सुरू झाली आहे.

ही समस्या नव्हे. वैविध्यात ऐक्य हे आमचे ब्रीद आहे. तुम्ही ज्याला भेद म्हणता त्यास आम्ही वैविध्य मानतो.

३४.

पण मोदी २०१४ची असंख्य स्वप्नं आणि आकांक्षा यांचे प्रतिनिधी परत होणार नाहीत.

त्यांना व्हायचंच नाहीये मुळातून !

३५.

त्या वेळी ते डोळे दिपून जावेत अशी स्वप्नं दाकवणारे मसिहा होते.

परत सांगतो, मसीहा ( काहीजण मोशीयाश म्हणतात) ही पाश्चात्य संकल्पना आहे. भारतीयांच्या दृष्टीने ती कवडीमोल आहे.

३६.

आज ते वचनपूर्ती करू न शकलेल्या एका राजकीय नेत्याच्या भूमिकेतून निवडणुकीला समोरे जात आहेत.

चूक. त्यांनी कार्यपूर्ती केली. जरा पायाभूत सुविधांचे प्रकल्प बघा. तसंच तुम्ही 'जनधन' योजनेबद्दल ऐकलेलं दिसंत नाही. आजपावेतो गरिबांच्या नावाने खर्च होत असलेला सरकारी पैसा दलालांच्या घशात जात होता. आता गरिबांच्या थेट खात्यात रक्कम जमा होते. दलाल इल्ले. लोकांना हेच हवंय. कोण्या भुरट्या चोरांनी केलेल्या चोरीबंदीच्या तक्रारी नको आहेत.

३७.

.... मोदींनी आपला मतदारसंघ म्हणून निवडला होता. जेरुसलेम, रोम किंवा मक्का या शहरांसारखाच हिंदू मानसिकतेवर या शहराचा पगडा आहे.

प्रचंड घोडचूक, भावा, प्रचंड घोडचूक केलीस ! वाराणसी काही मक्का नव्हे, रोम नव्हे आणि जेरुसलेमही नव्हे. हिंदूंना आपल्या गावाजवळचं तीर्थक्षेत्र स्थानिक काशी म्हणून लोकांना सांगायला आवडतं. म्हणजे काय ते शोधून काढाच !

३८.

.... मोदी जो भारत घडवू पाहत आहेत, त्यात माझ्यासारख्याला कुठलंही स्थान असणार नाही.

पार चूक. तुमच्यासाठी निश्चितंच जागा आहे. त्या ल्युटेनवाल्यांना धुत्कारून लावा आणि नव्या भारताच्या अवलोकनास सज्ज व्हा. तुम्ही मुस्लिम आहात की आंग्लभाषिक याचा काहीच फरक पडंत नाही.

३९.

.... भारत अधिकाधिक भारतच राहिला तर तो कधीच आधुनिक राष्ट्र म्हणून उभा राहू शकणार नाही.

चुकीचं विधान. हिंदू आधुनिक आहेत. कारण की आधुनिक विज्ञान वैदिक तत्त्वांच्या विरोधात नाही. नेहरूंचं आकलन पार चुकलंय या बाबतीत.

४०.

भारताला पाश्चिमात्यांची, विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारताला वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. आपल्या संस्कृतीत मुरलेला गूढवाद आणि जादूटोणा यांचा त्याग करण्याची गरज होती.

भारताला पश्चिमेची कधीच गरज नव्हती. विज्ञान व तंत्रज्ञान भारतीय जनमानसाचा भाग होतेच आधीपासून. भारतीय पारंपारिक जीवनाच्या अंतरंगात जादूला आजिबात स्थान नाही. ब्रिटीश राज्यात बहुजनवर्ग तंत्रज्ञान व शिक्षणास पारखा झाला.

४१.

.... "आपण गणपतीची पूजा करतो. त्या काळात काही प्लॅस्टिक सर्जन असणार, ज्यांनी हत्तीचं डोक माणसाच्या धडावर लावून प्लॅस्टिक सर्जरीचा पाया घातला!"

अगदी नेमक्या शब्दांत भारतीय जनमानस पकडलंत पहा तुम्ही. आपल्या गौरवास्पद वारशासंबंधी कुतूहलयुक्त जिज्ञासा बाळगून अन्वेषण करणं. अन्वेषणात ( = investigation) जादूला स्थान नाही.

४२.

त्यामुळे भारताची बुद्धिवादाच्या मार्गावरून अधोगती होते आहे.

तुमच्या मते प्रबुद्धिवाद ( pro-intellectualism ) म्हणजे काय? मला नाही वाटंत अशी एखादी काही चीज अस्तित्वात आहे. मात्र तुम्हांस स्पष्टीकरणाची संधी द्यायला हवी.

४३.

कोलंबिया विद्यापीठाचे विख्यात अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती म्हणतात- ‘जर ते (= स्वामीनाथन गुरुमूर्ती) अर्थशास्त्रज्ञ असतील, तर मी भरतनाट्यम नर्तक आहे’.

मनमोहनसिंग एक विख्यात विद्वान आहेत. पण काय दिसतं त्यांच्या कारकिर्दीत ? तेव्हा लाभापेक्षा हानी बरीच जास्त झाली. भारत व भारतीयांना पुस्तकी चमच्यांची गरज नाही.

४४.

.... भाजपने हिंदू राष्ट्रवादाची भगवी वस्त्रं परिधान करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या एका संन्याशाच्या हाती राज्याची सत्ता दिली.

योगी आदित्यनाथ विद्वेष फैलावतात यासंबंधी तुमच्याकडे काही पुरावा आहे का ?

४५.

.... मोदींनी गु‌णवत्तेच्या कल्पनांवरच हल्ला केला.

प्रख्यात विद्वान मनमोहनसिंग प्रत्यक्षात एक मुखस्तंभ होते. मग कोणत्या निकषांवर त्यांना पंतप्रधान केलं गेलं? मोदींनी असल्या निकषावर प्रश्न उपस्थित करायची गरज आहे. पण असं करणं म्हणजे निकष मोडीत काढणं नव्हे.तुम्हांस योगी कदाचित आवडंत नसतील, पण त्यांच्यात निकष जुळणारे इतर गुण आहेत. ते फक्त तुमच्या अपेक्षांशी जुळंत नाहीत. तसंही पाहता, उत्तरप्रदेशाचे लोकं योगींवर खूष आहेत.

४६.

.... ज्ञानकेंद्र पोखरली जात आहेत.

नेहरू विद्यापीठासारखी ती अगोदरंच पोकळ फोलपटं होती.

४७.

प्रशासक आणि प्राध्यापकांची निवड त्यांच्या मूळ क्षमतेऐवजी राजकीय विचारसरणीच्या आधारे होत आहे.

डावे तेच करतात ना? मग मोदींवर दोषारोप कशाला?

४८.

ते म्हणजे मध्ययुगीन अंधश्रद्धा, जादूटोणा टाकून द्यावा लागेल. पण ही गोष्ट मोदी सांगू शकत नाहीत किंवा त्यांची तशी इच्छा नाही.

हा अत्यंत अज्ञानमूलक शेरा आहे. माझा खरोखरंच विरस झालाय. हिंदू साहित्यात थियोक्रसीस प्रतिशब्दच नाही. आणि तरीही तुम्ही भारतीयांवर मध्ययुगीन थियोक्रसीचा आरोप करताय ? काय ही नामुष्की !

जाताजाता, जादू आणि अंधश्रद्धा या सेमिटिक रिलीजनात आढळतात. हिंदू परंपरेत नव्हे.

४९.

श्रीलंकेचे विख्यात इतिहासकार ए. के. कुमारास्वामी म्हणतात – “भारत असो की युरोप, प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचा त्यागच केला पाहिजे. आपण भूतकाळात घडलो आहोत, पण आपल्याला आपलं घर भविष्यकाळात बांधायचं आहे. हे समजून घेणं, दृढनिश्चयानं मान्य करणं आणि मागे सोडलेल्या गोष्टीवर प्रेम करणं हाच सबळ होण्याचा मार्ग आहे.”

खरंच धाडसी विधान आहे. मात्र रक्ताने बरबटलेल्या दोन महायुद्धाचं काय ? एकवेळ समजूया की भारत आपला भूतकाळ विसरला आहे. परिणामी भविष्यात युरोपसारखा रक्तपात होणार नाही याची खात्री काय ?

५०.

भूतकाळाला चिकटून राहणं हेच मोदींच्या भारतात खोलवर दिसणाऱ्या आततायी नैराश्याला कारणीभूत आहे. भारतीयांची आधुनिक जगाचा सामना करण्याची तयारी नाही. प्रखर आत्मविश्वासाऐवजी ते दिखावू देशप्रेम व्यक्त करण्यातच धन्यता मानताना दिसतात!

आधुनिक जगासाठी भारतीय व्यवस्थित रीत्या सुसज्ज आहेत. तुम्हांस इसरोचा यशदर ( = सक्सेस रेट ) माहित नाही काय ? कृपया जागे व्हा !

५१.

आपलं नेमकं काय आणि बाहेरचं काय, याचीच भारतीयांना चिंता लागलेली असते.

शेवटी एकतरी बरोबर विधान आलं. यावर तोडगा म्हणजे बाह्य प्रभावांना प्रथम संगयुक्त ( = customise ) करून नंतर आत्मसात ( = adopt) करणे.

५२.

मागच्याच महिन्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुस्लिमांना ‘वाळवी’ची उपमा दिली. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘बौद्ध, हिंदू आणि शीख वगळता इतरांना देशाबाहेर घालवू’ यासारखी भाषा वापरायला कमी केलं जात नाही.

तुम्ही ज्याला स्थलांतरेच्छुक मुस्लिम ( = इमिग्रंट ) म्हणता ते वस्तुत: घुसखोर आहेत. माझ्या मते युरोपने श्री. अमित शहांपासून शिकायला हवं.

५३.

.... भोपाळ या तब्बल २५ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या शहरात, ....

मी पैज मारून सांगतो की, भोपाळचं संस्थान शिया असल्याचं तुम्हांस माहिती नाही. शियांना सुन्नी घुसखोर आवडंत नाहीत. अमित शहांना आपक काय बोलतोय ते ठाऊक आहे. पण तुमचं मात्रं तसं नाही. जरा डोळे उघडून बघा की ( म्हणजे वस्तुस्थितीचं ग्रहण करा). तुम्हांस सहज शक्य आहे. कारण की तुम्ही बुद्धिवान आहात. मी तुमचा किमान एक लेख वाचलाय, त्यावरनं सांगतोय.

५४.

.... भगव्या कपड्यांतली साध्वी प्रज्ञा सिंग-ठाकूर. एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांच्या मृत्युमुखी पडले. त्या कटाची सूत्रधार असल्याचा आरोप या साध्वीवर आहे.

ठीक. न्यायालय म्हणतं की साध्वी सद्य संशयितही नाहीत. तिच्यावर खटला घाल्याविषयी काय वदावे !

५५.

.... (मोदींच्या भारतात) जुनी व्यवस्था मोडीत काढली गेलीय, पण नवी कुठलीही पर्यायी व्यवस्था निर्माण केली गेलेली नाही.

येऊ घातलेल्या नव्या व्यवस्थेबद्दल कृपया चिंता करू नये. माझ्यासारखे बुद्धिजीवी भारताची दिशा योग्य आहे हे निश्चित करतील.

तुम्ही आमच्यात का सामील होत नाही ? ल्युटेनचा मूर्खपणाचा त्याग करा. बघा, तुमच्याकडे गमावण्यास काहीच नाही आणि मिळवण्यास सर्वकाही आहे.

५६.

प्रियांका गांधी ही बहीण राहुल गांधी या भावाच्या मदतीला देण्यापलीकडे देशातल्या या सर्वांत जुन्या पक्षाकडे दुसरी राजकीय कल्पना नाही.

अगदी बरोबर.

५७.

मोदी हे नशिबवान आहेत की, त्यांना कोणताही सामाईक कार्यक्रम नसलेल्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दुबळ्या विरोधी पक्षांची आघाडी लाभली आहे.

अगदी बरोबर.

५८.

.... त्यांना जाणीव आहे की, २०१४ मध्ये दिलेली आश्वासनं आपण पूर्ण केलेली नाहीत.

त्यांनी वचनपूर्ती केलीये. विरोधी शक्तींपैकी कोणीही भाजपच्या २०१४ च्या जाहीरनाम्याचा उल्लेख करीत नाहीये. त्यांना माहितीये की त्यावर बेतलेल्या आरोपांना मोदी खणखणीत प्रत्युत्तर देतील.

५९.

इतर लोकानुनयी नेत्यासारखंच आपल्या सुरक्षित कोशात बसून ते ‘इतरांच्या’ सुलतानशाहीबद्दलची भडास काढत आहेत.

सुलतानशाही हा मोदींनी लावलेला जावईशोध नसून प्रखर वस्तुस्थिती आहे.

६०.

.... तो आपल्या अपयशाचा राग काढण्यासाठी जगाला कोणती शिक्षा देईल, या विचारानं थरकाप उडतो.

मी असहमत. मोदी जर अपयशी झाले तर मी थरकांपणार नाही. त्याऐवजी मी मोदींना परत घडी बसवण्यास मदत करेन.

तुम्ही आमच्या बाजूस का येत नाही ? मला माहितीये तुम्ही बुद्धिमान आहात. तुमच्या अनुदिनीवरील किमान लेख मी वाचलाय. तुमची मूलोत्पाटित अभिजनांविषयी केलेली निरीक्षणं अतिशय समर्पक आहेत. शैक्षणिक विश्वात संस्कृत भाषेची काळजीपूर्वक पखरण करायला हवी या तुमच्या विचाराशी मी शंभर टक्के सहमत आहे ( https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20141215-aatish-taseer-...). तुमच्याकडे योगदान देण्यासारखं बरंच काही आहे. तुमच्या ज्ञान आणि आंतरिक जाणीवेचा भारताला लाभ झालेला बघायला मला फार आवडेल.

-------------- प्रतिसाद समाप्त -----------------------------

धर्मइतिहाससाहित्यिकराजकारणप्रकटनविचारप्रतिसादलेखमत

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

19 May 2019 - 8:07 pm | गामा पैलवान

Hello Aatish,

I saw your article about India enduring Modi's govt for another 5 yrs. The url is : http://time.com/5586415/india-election-narendra-modi-2019/

Here are my comments :

1.

.... leader of the Hindu nationalist Bharatiya Janata Party (BJP), ....

Sorry to say, but there is no word Hindu in BJP. The BJP was never a Hindu party in a traditional sense.

2.

.... why the advent of Modi is at once an inevitability and a calamity for India.

Modi not a calamity for india. It is a calamity for Lutyen's Delhi.

3.

The country offers a unique glimpse into both the validity and the fantasy of populism.

Indian voter is quite practical. He doesn't like to engage in political fantasies. They are reserved for Bollywood.

4.

It forces us to reckon with how in India, as well as in societies as far apart as Turkey and Brazil, Britain and the U.S., populism has given voice to a sense of grievance among majorities that is too widespread to be ignored, while at the same time bringing into being a world that is neither more just, nor more appealing.

Please split long sentences into short ones.

This statement has no valid ground, therefore is utterly meaningless. A popular demand for national expression is not populism. Indira's slogan 'Garibi Hatao' is populism. She nationalised banks. Both these things made nodifference to ordinary people. That is populism. Modi never makes exorbitant promises. Modi made difference, he created an impact. That's NOT populism.

5.

.... the ideology Nehru bequeathed to the newly independent nation was secularism.

But it is not official. Ambedkar compiled the constitution. The word secular or secularism does not appear anywhere.

6.

.... that could translate into Orwell’s maxim of some being more equal than others.

You are right. The term secular is undefined. Muslims are appeased under the guise of secularism. Whereas a Hindu wants to assimilate with an equal footing.

7.

Nehru’s political heirs (....) established a feudal dynasty, while outwardly proclaiming democratic norms and principles.

Very true indeed!

8.

.... but what Modi’s election revealed was a cultural chasm.

Chasm? Between whom? I don't think Modi's election revealed any chasm. In fact Modi is far more unifying.

9.

The cherished achievements of independent India–secularism, liberalism, a free press–came to be seen in the eyes of many as part of a grand conspiracy in which a deracinated Hindu elite, in cahoots with minorities from the monotheistic faiths, such as Christianity and Islam, maintained its dominion over India’s Hindu majority.

Please understand that these are not achievements. Secularism is muslim's appeasement. Liberalism is Hindu bashing. And free press is no more free. It's sold to its owners.

The indian elite are deracinated en masse. Not just Hindu elite.

10.

He attacked once unassailable founding fathers, such as Nehru, then sacred state ideologies, such as Nehruvian secularism and socialism; ....

Secularism was never nehruvian. Nobody heard of that term. But there is something called as nehruvian socialism. Modi didn't challange it because it was disposed off when India adopted market economy in 1990s.

11.

.... he spoke of a “Congress-free” India; ....

This is not Modi's idea. It was originally proposed by MK Gandhi in 1946.

12.

.... he demonstrated no desire to foster brotherly feeling between Hindus and Muslims.

WRONG! Modi awarded Shabbir Sayyad who is a muslim, for cow nurturing (ref : https://en.wikipedia.org/wiki/Shabbir_Sayyad )

13.

Most of all, his ascension showed that beneath the surface of what the elite had believed was a liberal syncretic culture, India was indeed a cauldron of religious nationalism, anti-Muslim sentiment and deep-seated caste bigotry.

The elite are deracinated, due to which they don't understand the masses. Therefore they accuse masses for not fitting in elite view. That's the problem, isn't it?

14.

The country had a long history of politically instigated sectarian riots, ....

But Modi stopped them.

15.

Modi, by his deafening silences after more recent atrocities, such as the killing of more than 1,000 people, mostly Muslims, in his home state of Gujarat in 2002, proved himself a friend of the mob.

Absolutely baseless allegation. Do you know why Modi was never exonearated by the coutrs? The reason is, he was never charged for the alleged offence. The courts believe that Modi should NOT be charged at all in first place.

16.

Modi, without offering an alternative moral compass, rubbished the standards India had, and made all moral judgment seem subject to conditions of class and culture warfare.

Can you explain any of those so called standards India had ?

17.

The high ideals of the past have come under his reign to seem like nothing but the hollow affectations of an entrenched power elite.

That is exactly they are. Hollow shells of power elite.

18.

.... he is trying to resurrect the spirit of 2014, which was the spirit of revolution.

This so called spirit of revolution is due to Congress's mismanagement and corruption.

19.

.... –the country had centuries of Muslim rule before the British took over in 1858– ....

Utterly wrong perspective. The muslim rule in Delhi was never acknowledged by the Hindu rulers.

20.

.... Ayodhya, a place where Hindu nationalist mobs in 1992 had destroyed a 16th century mosque, ....

Another fakery by india's elite. There was no babri mosque. The disputed structure was the old temple. Babar did NOT construct any mosque. For the reason it is an extreme insult upon islam to build a mosque over a non-islamic shrine. I hope you can see through the babri mosque's scam !

21.

.... Modi’s economic miracle failed to materialize, ....

Modi never promised any miracle.

22.

.... he has also helped create an atmosphere of poisonous religious nationalism in India. ....

In past have you ever seen India gaining a vast international recognation she enjoys today? Is it not due to Modi's efforts? Hindus need an expression and Modi gave it. Fullstop. What you call poison is actually a nectar for us Hindus.

23.

.... If you are not with Modi, then you are strengthening anti-India forces. ....

Fortunately or unfortunately some 500 million indians exactly think so. I would suggest you to find out reasons behind this mindset. So many people can't be fooled at once, can they be?

24.

.... Hindu mobs, often with what seems to be the state’s tacit support, have carried out a series of public lynchings in the name of the holy cow, that ready symbol of Hindu piety.

Cow slaughter is an offence in most of India. These incidences are viewed as law breaking. Muslims are disproportionately represented in criminal activities. What you call as mob lynching is actually people helping to restore law and order.

25.

Hardly a month goes by without the nation watching agog on their smartphones as yet another enraged Hindu mob falls upon a defenseless Muslim.

Hardly a month goes by without love jihad, land jihad, muslims attacking hindus for petty reasons. Remember Savan Rathod? Ankit Saxena? Dhruv Raj Tyagi? Go and google!

26.

.... the same people who are willing to attack Muslims are only too willing to attack lower-caste Hindus as well.

How do you claim that same people attack everywhare and everyone? Anyways, these attacks are exceptions. Hindus live peacefully with eachother.

27.

The party cannot afford to lose the lower-caste vote, ....

Again you are wrong, my friend. BJP can afford to lose dalit ( = lower castes) votes. But this doesn't make Modi anti-dalit.

28.

.... but one of the ugliest incidents occurred in Modi’s home state of Gujarat, in July 2016, when upper-caste men stripped four lower-caste tanners, paraded them in the streets and beat them with iron rods for allegedly skinning a cow.

Skinning dead cattles is the traditional business of those tanners. That's precisely the reason they became untouchable. In a way the high caste men, by objecting to publicly skinning the cattles, were preventing untouchability. However, I agree that they should've done it in a more humane way!

29.

Modi’s record on women’s issues is spotty.

It isn't.

30.

.... Sheikh Hasina, Bangladesh’s Prime Minister, had a good record on terrorism, “despite being a woman”; ....

Every man from subcontinent knows how hard a woman fights! She is not like her western counterpart. She works hard all the day and then looks after her family in the evening. The evening chores are as demanding as the corporate environment. Modi's praising Sheikh Hasina for efficiently managing her affairs despite being a woman, is a spontaneous expression. Indians do not viewe it as a derogatory remark.

31.

Yet Modi also appointed a woman Defense Minister.

What an ignorence ! Modi never doubted women's abilities.

32.

.... it must be said that under Modi minorities of every stripe–from liberals and lower castes to Muslims and Christians–have come under assault.

That's what you want to believe. But Modi finished triple talaq. Who do you think is under attack here? I never came across any avarage christian or dalit lower caste person complaining against Modi. On the contarary the nuns are coming forward to complain against clergy's sexual exploitation. That's women's empowerment. Modi did it.

33.

.... he has achieved a state in which Indians are increasingly obsessed with their differences.

That's not a problem. Unity in diversity is the motto. You call it as differences, we say it's diversity.

34.

.... Modi will never again represent the myriad dreams and aspirations of 2014.

He never intended to in first place !

35.

Then he was a messiah, ushering in a future too bright to behold, ....

Again messiah ( or Moshiach as some call it ) is a western semetic concept. It holds no value to indians.

36.

Now he is merely a politician who has failed to deliver, ....

Wrong! He has delivered! Look at the infrastructure projects. I am sure you never heard of 'Jandhan' a.k.a. 'Public Wealth' bank accounts. Till now govt money spent for the poor was siphoned off by the indermidiary agents. Now the poor get subsidy in their accounts straightaway. No middlemen. That's what people want. Not some petty thieves complaining agains Modi for loss of their heist.

37.

.... city of Varanasi, which Modi had chosen as his constituency, repurposing its power over the Hindu imagination, akin to that of Jerusalem, Rome or Mecca, ....

Big blunder, Brother! Varanasi is neither Mecca, nor Rome, nor Jerusalem to Hindus. Hindus like to view their nearby holy places as local Varanasi. Go figure, what that means !

38.

.... the country Modi would bring into being would have no place for me; ....

Absolutely wrong. You DO have a place. Kick off those lutyenians and you will be all set to explore new India. You might be a muslim or an english speaker, that simply doesn't count.

39.

India was not going to become a modern country by being more authentically itself.

Wrong assertion. Hindus are a modern race. That's because modern science is not contradictory with Vedic Principles. Nehru is plainly wrong in this regard.

40.

It needed the West; it needed science and technology; it needed, above all, to embrace “the scientific temper” and to eschew the obscurantism and magic that was at the heart of its traditional life.

India never needed the West. Science and technology were already a part of indian psyche. Magic was never at the heart of traditional life. It was the british rule that took technology and education away from the masses.

41.

“There must have been some plastic surgeon at that time who got an elephant’s head on the body of a human being and began the practice of plastic surgery.”

You precisely got the indian psyche. Being curious about our glorious past and investigating thereoff. Magic has no plce in investigation.

42.

.... leading India down the road to a profound anti-intellectualism.

According to you what's pro-intellectualism ? I doubt if such a thing ever exists. But I am giving you a chance to explain yourself.

43.

.... the renowned Columbia economist Jagdish Bhagwati said, “If he’s an economist, I’m a Bharatanatyam dancer.”

Manmohan Singh was a renowned scholar. But look at his regime. He's done far more harm than good. India and indians do not need bookish stooges.

44.

.... BJP appointed a hate-mongering priest in robes of saffron, the color of Hindu nationalism, ....

Do you have any proof that Yogi Adityanath is a hate monger ?

45.

.... Modi attacked the idea of qualification itself.

Manmohan Singh, a great scholar, was in fact a dumbhead. So, what's the criteria for his selection? Modi needs to question such criteria. But that doesn't mean idea of qualification is attacked. You may not like Yogi, but he has another set of qualifications. They just don't match with your expectations. Never mind, people of Utter Pradesh are happy with Yogi !

46.

.... India’s places of learning have been hollowed out, ....

They like Jawaharlal Nehru University were already hollow shells.

47.

.... the administration and professors chosen for their political ideology rather than basic levels of proficiency.

That's what the left does, isn't it ? Why blame Modi ?

48.

What Modi cannot–or will not–do is tell India the hard truth that if she wishes to be a great power, and not a Hindu theocracy, the medieval Indian past, mired in superstition and magic, must go under.

This is an utterly ignorent remark. I am disappointed. The Hindu literature does not have even a word for Theocracy. And you accuse indians of medieval Hindu theocracy? What a shame indeed.

By the way, magic and superstition are a part of semetic religions. Not Hindu tradition.

49.

“In India, as in Europe,” wrote the great Sri Lankan historian A.K. Coomaraswamy, “the vestiges of ancient civilization must be renounced: we are called from the past and must make our home in the future. But to understand, to endorse with passionate conviction, and to love what we have left behind us is the only possible foundation for power.”

Very bold statement indeed. But what about the two super bloody world wars, eh ? Let's say India leaves behind its past. What's the guarantee that the result won't be a bloody mess like Europe ?

50.

The desperation that underlies Modi’s India is that of people clinging to the past, ill-equipped for the modern world, people in whom the zealous love of country stands in for real confidence.

Indians are well-equipped for the modern world. Don't you know the success rate of ISRO (Indian Space Research Organisation)? Wake up my bro!

51.

The question of what is hers, and what has come from the outside, is a constant source of anxiety in India.

Finally a correct statement ! The solution is developing a process of adopting and customising the outside influence. We need a Hindu think tank. Modi is well aware of the need.

52.

Last month, Amit Shah compared Muslim immigrants to “termites,” and the BJP’s official Twitter handle no longer bothers with dog whistles: “We will remove every single infiltrator from the country, except Buddha [sic], Hindus and Sikhs.”

What you call as immigrants are, in reality, invaders. I think Europe should learn from Mr Amit Shah.

53.

.... rich Muslim history and a Muslim population of over 25%, ....

I bet you don't know that Bhopal royalty is Shia. And Shia's don't like sunni infiltrators. Amit Shah knows what he is speaking. But you don't. Get a grasp on reality, mate. I am sure you can. I know you are intelligent. I've read at least one article from your blog.

54.

.... a saffron-clad female saint, who stands accused of masterminding a terrorist attack in which six people were killed near a mosque.

Well, the courts think she is not even a suspect. What to speak of a case against her!

55.

Modi’s India feels like a place where the existing order of things has passed away, without any credible new order having come into being.

Please do not worry about the incoming new order. Intellectuals like me will ensure that India is heading in the right direction.

Why don't you join us ? Just get rid of the lutyenian stupidity. You've nothing to lose and everything to gain.

56.

India’s oldest party has no more political imagination than to send Priyanka Gandhi–Rahul’s sister–to join her brother’s side.

Very true.

57.

Modi is lucky to be blessed with so weak an opposition–a ragtag coalition of parties, led by the Congress, with no agenda other than to defeat him.

Very true.

58.

.... he must know he has not delivered on the promise of 2014.

He delivered. Nobody in the opposition is referring to BJP's 2014 manifesto. They know that Modi will give a fitting reply to allegations based on the manifesto.

59.

Like other populists, he sits in his white house tweeting out his resentment against the sultanate of “them.”

The sultanate is a hard fact rather than Modi's invention.

60.

.... one cannot help but tremble at what he might yet do to punish the world for his own failures.

I digress. If Modi fails, I won't tremble. Instead I will help him restore the order.

Why don't you join our side ? I know you are intelligent. I've read at least one article from your blog. Your observations about deracinated elite are spot on.I agree with you regarding careful infusion of Sanskrit (https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20141215-aatish-taseer-...). You have got a lot to contribute. I would love to see India benefit from your knowledge and insight.

---- end of comments ----

Thanks for reading.

Humbly yours,
-Gamma Pailvan

डँबिस००७'s picture

19 May 2019 - 8:32 pm | डँबिस००७

जबरदस्त !!

भंकस बाबा's picture

19 May 2019 - 8:42 pm | भंकस बाबा

समर्पक उत्तरे
लगे रहो पैलवान भाई

गड्डा झब्बू's picture

19 May 2019 - 9:19 pm | गड्डा झब्बू

मला वाटत पाकिस्तानी पितृत्व लाभलेल्या या महान बुद्धीवन्तानी या लेखाच शीर्षक Can the World's Largest Democracy Endure Another Five Years of a Modi Government? ऐवजी Can India's Secular's and lutyens Delhi Endure Another Five Years of a Modi Government? अस ठेवायला पाहिजे होत. बुद्धीजीवी असल्याच्या बाता मारून लिहिलेला एककल्ली लेख आहे हा. राहुल आणी प्रियांकाला थोडा दोष दिलाय भाड्याने. पण नेहरुची चाटूगिरी सोडली नाही पट्ठ्याने. अनुदानावर पोसला गेलेला जीव असेल बिच्चारा.

जालिम लोशन's picture

19 May 2019 - 10:49 pm | जालिम लोशन

बिच्यार्‍याच्या वडीलांना मुस्लिम अतिरेक्याने मारले. त्यात पाकीस्तानात रहातो. झिम्मी आहे, स्वत:चा जीव, संपत्ती वाचवायची आहे. त्यात vaticanचा अजेंडा चालवायचा आहे. एकाच parishचे आहेतना brother Robert आणी family lutyans मधील काय करणार पोटासाठी लिहावच लागत.. थोड समजुन घ्या. शेवटी जगभर प्रसिध्दी दिलीच ना ऐन निवडणुकीच्या काळात front pageवर.! लोक कुठे वाचतायत आतमधले?

डँबिस००७'s picture

19 May 2019 - 11:31 pm | डँबिस००७


Can India's Secular's and lutyens Delhi Endure Another Five Years of a Modi Government?

दिल्लीतल्या लुटीयन्स तर आहेतच पण मायबोलीवरचे बांडगुळ खड्डेकर गेले पाच वर्षे दुःखात आहेत ! येत्या २३ तारखेला त्यांच्यावर दुःख्खाचा डोंगर कोसळणार आहे !
रुदाली सुरु झालेली आहेच !!

गामा पैलवान's picture

20 May 2019 - 1:05 am | गामा पैलवान

डँबिस००७ आणि भंकस बाबा,

प्रोत्साहनानिमित्त धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

हे भाष्य आतिष तोसार पर्यंत पोचवलं आहे ना?

गरज अजिबात नाही.
मला तर वाटते हे आपल्या अशा भारतीयांसाठी आहे जे वस्तुस्थिति न बघता केवळ परदेशी माध्यमानी छापले म्हणून डोक्यावर घेऊन नाचतात.

गामा पैलवान's picture

20 May 2019 - 11:51 pm | गामा पैलवान

mayu4u,

अतिश तासीर यांचं संकेतस्थळ http://www.aatishtaseer.com चालू नाहीये. पण अक्षरनामा वर संदेश टाकलाय. कोणतरी जालनिर्देश पोचवेल (अशी आशा आहे).

आ.न.,
-गा.पै.

भृशुंडी's picture

20 May 2019 - 11:27 am | भृशुंडी

ज्या स्वरूपात आपण प्रतिसाद लिहिला आहे तो वाचणे कठीण आहे.
प्रत्येक वाक्याला पुढे प्रतिवाद म्हणून नवीन वाक्य लिहिण्यापेक्षा एकसंध प्रतिक्रिया दिलीत तर निदान पूर्ण वाचली जाऊ शकते.
सध्या ज्या स्वरूपात लिहिलं आहेत त्यात १० वाक्यंही सलग वाचता येत नाहीत.
अनेक मुद्द्यांना तुम्ही फक्त "नाही, हे खोटं आहे" प्रकारे विरोध केलेला आहे - तो थोडा बाळबोध वाटतो.

आनन्दा's picture

20 May 2019 - 3:01 pm | आनन्दा

हेच म्हणार होतो..
तुमच्याकडून अश्याप्रकारे वकिली युक्तिवादापेक्षा एखादा सविस्तर लेख वाचायला आवडला असता.

गामा पैलवान's picture

20 May 2019 - 11:14 pm | गामा पैलवान

भृशुंडी,

प्रतिसादाबद्दल आभार. तुम्ही म्हणता तसा प्रतिसाद म्हणून एकसंध लेख लिहिणं मनात होतं. मात्र त्यामुळे प्रतिसाद लांबलचक झाला असता. तसाही तो झालाच आहे. मात्र माझ्या प्रतिसादाचं प्रमुख लक्ष्य श्री. अतिश तासीर हे आहेत. त्यामुळे त्यांना सोयीस्कर पडेल अशा रीतीने प्रतिसाद दिला आहे.

अर्थात, तुमची सूचना निश्चितंच स्वीकारार्ह आहे. यापुढे जमेल तसा प्रयत्न करेन. :-)

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

20 May 2019 - 12:43 pm | प्रकाश घाटपांडे

पुर्व इतिहास पहाता मोदीन्मधे खरोखर आन्तरिक बदल झाला आहे कि ते नाटक करतात याबद्दल काही पुरोगमि साशन्क आहेत. १४ साली पुरोगाम्यान्ची धरपकड होईल असे वाटत होते

आनन्दा's picture

20 May 2019 - 12:54 pm | आनन्दा

असे का बर वाटत होते? मला नव्हते बुव वाटत असे..
लोकशाहीची चौकट मोडणे तितके सोपे नाही. आणि तसेही २०१९ मिळणे आवश्यक होते.

पण आता काही खरे नाही बुवा.

प्रकाश घाटपांडे's picture

20 May 2019 - 3:11 pm | प्रकाश घाटपांडे

तशी भिती एका सभेत व्यक्त झाली होती १४ साली मोदी पन्तप्रधन झाल्यावर

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

20 May 2019 - 4:02 pm | हणमंतअण्णा शंकर...

बहुतांश मुद्दे पटले.

परत सांगतो, मसीहा ( काहीजण मोशीयाश म्हणतात) ही पाश्चात्य संकल्पना आहे. भारतीयांच्या दृष्टीने ती कवडीमोल आहे.

तुम्हाला पाश्चात्य संकल्पनांविषयी अढी आहे असे दिसते. वरील उत्तर, मला आशा आहे, तुम्ही भारतात बसून, भारतीय कंपनी/सरकार यांचे येथे इमाने-इतबारे काम करून किंवा भारतभूमीत तन मन धनाने पूर्णत: मिसळून गेलेल्या अवस्थेत लिहित आहात. परक्याचं मीठ खाऊन इथला पुळका येत नसावा अशी अपेक्षा आहे. नाहीतर तुम्ही कितीही त्वेषाने/चातुर्याने हे मुद्दे मांडा, माझ्यासाठी ते निरर्थक ठरतील.

गामा पैलवान's picture

20 May 2019 - 11:48 pm | गामा पैलवान

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर,

माझं विधान थोडं चुकलंच. मला पाश्चात्य संकल्पना न म्हणता मध्यपूर्वीय संकल्पना म्हणायचं होतं.

चूक निदर्शनास आणल्याबद्दल आभार!

आ.न.,
-गा.पै.

शब्दानुज's picture

20 May 2019 - 9:02 pm | शब्दानुज

मतभेदाचे मुद्दे अनेक आहेत. पण आपला एक प्रतिवाद वाचला आणि पुढे काही बोलण्याचा उपयोग होईल असे वाटले नाही.

बहुतांश भारतात गोहत्या हा अपराध आहे. गोहत्या हे कायदा तोडणे आहे. गुन्हेगारीत मुस्लिम प्रमाणाबाहेर अधिक संख्येने आढळून येतात. तुम्ही ज्याला जमावी हत्या म्हणता ती खरंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांनी केलेली उत्स्फूर्त मदत आहे.

एवढे अतर्क्य विधान वाचून थक्क झालो. कोणत्याही नागरिकाला , मग तो कोणताही धर्माचा असेना त्याला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. हत्येचे कसल्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही. त्या समूह हत्या हा धार्मिक उत्माद होता आणि आहे. याला उघड उघड गुन्हेगारी म्हणतात.

कायदा राखायला संस्था उभ्या आहेत. तुम्ही पुरावे गोळा करा , पोलिसात जा आणि गुन्हा दाखल करा. कायदा मोडला जातो आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या लोकांना कुणी दिला ? पोलिस पकडील , न्यायलये निकाल देतील आणि मग पुढे कारवाई होईल. यांना डावलून कोणत्यातरी संशयावरून जमावाने घुसून खुन पाडणे याचेही समर्थन इथे मिपावर होऊ शकते असे वाटले नव्हते.

अशा विधानाचा जाहिर निषेध !

भंकस बाबा's picture

20 May 2019 - 11:11 pm | भंकस बाबा

तुम्ही खरोखरच न्यायव्यवस्थेला मानणारे वाटता.
न्यायव्यवस्था ही फक्त हिंदुनी मानण्याची संकल्पना आहे अशी या देशातील शान्तिप्रिय समाजाची समजूत झाली आहे.
दर शुक्रवारी परवानगी नसताना केवळ धार्मिक अधिकार या नावाखाली शान्तिप्रिय समाज वाहतुकीचा खोलंबा करतात.
न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना कोणत्याही वेळी आपल्या प्रार्थनास्थळावरुन भोंगे वाजवतात.
कुर्बानीला विशेष व्यवस्था असताना देखिल कायदा हातात घेऊन रस्त्यावर प्राण्याची हत्या करून रक्ताचे पाट वहावले जातात.
इंडियन पीनल कोड अस्तिवात असताना शरियातले कायदे खटले सोडवण्यासाठी वापरले जातात.
या सर्वाविरुद्ध येथील इतर धर्मीय मूग गिळून बसतात, कारण थोडासा त्रास सहन करण्याची सहिष्णुता येथील इतर धर्मीय दाखवतात. पण जेव्हा हा शांतिप्रिय समाज खुल्लमखुल्ला गाईला मारून हिंदुच्या धार्मिक भावना दुखवतो तेव्हा त्यांनी क़ाय करावे? खटले भरावे? चला मग तुमच्यापासुन सुरुवात करूया, वरील दाखवलेल्या गुन्हाची तुम्ही तक्रार करा. अगदी आपल्या भागात जिथे हिंदू बहुसंख्य आहेत अशा जागी करा. मग हा शान्तिप्रिय समाज तुमच्या पाठी हात धुवून कसा पडतो ते पहा.

गामा पैलवान's picture

20 May 2019 - 11:37 pm | गामा पैलवान

शब्दानुज,

तुम्ही फारंच घाईत निष्कर्षांवर उडी मारता बुवा. अहो, मी कायदा मोडायला आजिबात सांगत नाहीये. माझं म्हणणं इतकंच की गोहत्याविरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याची ताकद कधीकधी पोलिसांत नसते. पोलिसांना मदत करणं हे कोणत्याही नागरिकाचं कर्तव्यच आहे. हे कर्तव्य बजावतांना जमावाकडून अनवधानाने कधीकधी रेषा ओलांडली जाते. अशा वेळेस कायदाप्रिय लोकांकडे 'कायदा हातात घेणारे' अशा रीतीने पाहू नये. तर 'पोलिसांना मदत करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळालेले अज्ञ लोक' या दृष्टीने पहावे. व त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी. इतकाच माझा आग्रह आहे.

आ.न.,
-गा.पै.

भृशुंडी's picture

21 May 2019 - 1:50 am | भृशुंडी

शाब्दिक कोलांट्या मारल्या तरी अर्थ काय ? "पोलिस नसतानाही अडाणी लोकांना कायदा हाती घ्यायची सोय" असण्याचं तुम्ही समर्थन करता आहात.
उत्तम.

भृशुंडी,

भारतात न्यायसहायी ( = अमिकस क्युरी ) ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली आहे. तशाच धर्तीवर गोहत्याप्रतिबंध पोलीससहायी ही कल्पना राबवता येईल ना?

काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम पारित करण्यात येणार होता. त्यात पोलीस नसलेला, पण पोलिसांना मदत करणारा दक्षता अधिकारी नेमण्याची तरतूद होती. फक्त अंधश्रद्धेच्या जागी गोहत्याप्रतिबंध हा शब्द टाकायचा.

त्यामुळे मी म्हणतोय या कोलांट्या नसून तर वास्तवाचं चौकटबाह्य ( = out of the box )आकलन आहे

आ.न.,
-गा.पै.

जालिम लोशन's picture

21 May 2019 - 8:04 am | जालिम लोशन

फक्त भिती माणसाला आदर करायला भाग पाडते. मग ती कायद्याची, पोलीसांची, जमावाच्या हिंसेची कशाची ही असु द्यात. भारतीय समाज शिस्तीसाठी कधीही प्रसिध्द नव्हता आणी नाही आणी भारतीय न्याय व्यवस्था त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रसिध्द नाही. त्यामुळे कायदा हातात घेतला जातो आणी तो सर्व ग्रुपकडुन केले जाते. आणी कायदे काय आकाशातुन पडलेले नसतात माणसांनीच बनवलेले असतात.. त्यामुळे अशा कृत्यांना गुन्हेगारी नाम्हणता जमावाचा न्याय संबोधावे.