शशक- माकडांपासून सुटका!!
मी काॅलेजला गेले त्यावर्षीची गोष्ट. काय झाले काय माहीत पण अचानकच गावात माकडांची संख्या खूप वाढली. जिकडेतिकडे माकडेच दिसू लागली. गावातल्या चौकात, वडाच्या पारावर, ईमारतींच्या गच्चीवर, चक्क देवळात आणि रस्त्यांवरही माकडे मुक्तपणे संचारू लागली. गावातील लोक आणि दुकानदारही त्यांच्या माकडचाळ्यांनी त्रस्त झाले. संध्याकाळी अंगणात माझी लहान भावंडे खेळत, अन या माकडांच्या टोळ्या घराभोवती हुंदडत. कधीकधी माकडे त्यांना वाकुल्या दाखवत, डोक्यावर टपली मारत, गालगुच्चा घेत. माझ्या मैत्रिणींच्या घरीदेखील हीच परिस्थिती.