लॉकडाऊन सुरु आहे. - भाग १ - बारावीचा निकाल वर्ष १९९५
मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा.
मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ.