शिव्यांना शिव्या देऊ नये.
अगदी खरं सांगतो, शक्यतो मी शिव्या देत नाही. पण तरी त्यांच्याबद्दल मनात एक आत्मीयता आहे. एक आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव आहे. विशेषतः मराठी शिव्यांबद्दल; नव्हे, फक्त मराठी शिव्यांबद्दलच. बाकी भाषांमधल्या शिव्या अतिशय नेभळट वाटतात... तर हा एक शिव्यांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न. [ज्या शिव्या लेखात दिसतील त्या मी स्वतः कोणाला देत नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ एक (प्रभावी आणि परिणामकारक) शब्द म्हणून पाहिलं जावं ही विनंती. रसभंग होईल या भितीने शक्य तिथे शि* असं न लिहीता शिवी असं पूर्ण लिहीलं आहे, तेव्हा थोर मनानं सांभाळून घ्या.]
