शिव्यांना शिव्या देऊ नये.

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
23 Nov 2013 - 2:12 am

अगदी खरं सांगतो, शक्यतो मी शिव्या देत नाही. पण तरी त्यांच्याबद्दल मनात एक आत्मीयता आहे. एक आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव आहे. विशेषतः मराठी शिव्यांबद्दल; नव्हे, फक्त मराठी शिव्यांबद्दलच. बाकी भाषांमधल्या शिव्या अतिशय नेभळट वाटतात... तर हा एक शिव्यांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न. [ज्या शिव्या लेखात दिसतील त्या मी स्वतः कोणाला देत नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ एक (प्रभावी आणि परिणामकारक) शब्द म्हणून पाहिलं जावं ही विनंती. रसभंग होईल या भितीने शक्य तिथे शि* असं न लिहीता शिवी असं पूर्ण लिहीलं आहे, तेव्हा थोर मनानं सांभाळून घ्या.]

सुरुवात झाली 'अईला!!' पासून. कोणी 'आयला' म्हणतं, कोणी व्यवस्थित 'आईला' म्हणतं, कोणी 'च्यायला' म्हणतं. मी पहिल्यांदा ऐकलं, काही मित्रांच्या तोंडी!! पहिलीत!! 'अईल्ला!!!' आपण आईगं म्हणतो, तसं हा आईला म्हणतोय, काही विशेष फरक मला वाटला नाही. घरी प्रयोग करून पाहिला आणि पाठीत आजीचा दणका मिळाला... "ही शिवी आहे, ती आईला लागते, ही कधी द्यायची नाही. याद राख पुन्हा कधी म्हटलंस तर..." कदाचित तेव्हा शिवी म्हणजे काय हे सुद्धा तिला मला समजवावं लागलं असणार... आत्ता नेमकं आठवत नाही. मग मीसुद्धा ठरवलं, की कोणालाही शिवी घालू देता कामा नये. चौथीपर्यंत, प्रामाणिकपणे, माझ्यासमोर मला पेलवेल अशा कोणत्याही मुलाने शिवी घातली की त्याला एक वाजवून दिली आहे. वर चोंबंडेपणा नसानसांत भिनलेला, त्यामुळे त्याची शाळेच्या बाईंकडे सुद्धा 'बाई हा त्याला गांडू म्हणाला' अशा तक्रारी केलेल्या आठवतात. माझ्या या चोंबडेपणाला घाबरून (आणि माझ्यामुळे प्रेरित झालेल्या काही इतर चोंबड्यांना घाबरून) चौथीपर्यंत तरी वर्गातल्या कुणी कधी शिवी दिलेली मला आठवत नाही. निदान, माझ्या तोंडावर तरी नाही.

तेव्हा आमच्या सोसायटीतले सगळे मोठे टगे, माझ्याहून किमान आठ-दहा वर्षांनी सिनिअर असलेले दादा लोक्स माझ्यावर दादागिरी करत बसायचे. मला पांडु म्हणून चिडवायचे आणि मधलं बोट दाखवायचे. मला गम्मत वाटायची. मी सुद्धा दाखवायचो. पण मला ते असं का करतात ते कळायचं नाही. घरी मी विचारलं, तर कोणी धड सांगेना. "जाऊ दे, आपण लक्ष नाही द्यायचं. ते असंच उगाच करतात. फार विचार करु नकोस." पुढे अर्थ कळला तेव्हा हे लक्षात आलं की शिव्यांना विशिष्ट भाषेचं बंधन नसतं. सांकेतिक खुणांनीही त्या देता येतात.

सहावीत सोसायटी बदलली, आणि माझं शिव्यांबद्दलचं ज्ञान किती अगाध आहे, याची प्रचिती मला वेळोवेळी येऊ लागली. माझ्याहून चारेक वर्षांनी मोठ्या असलेल्या दोघांच्या गप्पांमध्ये सारखं आपलं मध्ये मध्ये चुत्या-चुत्या काहीतरी येत होतं. मी न राहवून अर्थ विचारला, तर दोघेही हसायला लागले आणि त्यांनी मला सांगितलं की चुत्या म्हणजे नाणं. माझा विश्वास बसला नाही. घरी गेलो, तरी डोक्यात या नवीन शब्दाचाच विचार चालू होता. जर चुत्याचा अर्थ नाणं असता, तर चौथी स्कॉलरशिपसाठी समानार्थी शब्दांचा अभ्यास करताना तो शब्द येऊन गेला असता. मी स्वयंपाकघरात बसलो होतो. समोर दादा सफरचंद खायच्या तयारीत होता. आई काहीतरी काम करत होती. दादाने सफरचंदाचा चावा घ्यायला आणि मी माझी शंका प्रकट करायला एकत्र तोंड उघडलं - "आई चुत्या म्हणजे काय??" दादाला ठसका बसला. आईने फक्त "आं!! असं नाही म्हणायचं" असं काहीतरी दरडावलं आणि लगेच तिथून निघून गेली. मला कळलं, ही शिवी दिसते. बास!! त्या दिवशी माझ्या लैंगिक शिक्षणाचा पाया माझ्या दादाने रचला. पाहता पाहता वर्षभरात मी त्यात एसएससीही झालो. आणि माझं शाळेतल्या शिक्षकांना ते इतिहास-भुगोल वगैरे शिकवत असताना अख्ख्या वर्गासमोर मध्येच उठून निरागसपणे "सर पूर्वी हॉस्पिटल्स नव्हती मग बायका जन्म कशा द्यायच्या?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडणंही बंद झालं. अशाप्रकारे शिव्या ह्या जिज्ञासा वर्धक असतात आणि कल्पनाविश्व वाढवणा-या देखील असतात हे मला उमगलं.

शिव्यांबाबतीत अगदी वेळीच मला पुरेसं ज्ञान मिळालं असं म्हणायला हवं, नाहीतर पुढच्याच वर्षी सातवीत आमच्या वर्गात नॉन-व्हेज विनोदांना जो ऊत आला, त्याला मी मुकलो असतो. साहित्याच्या या एका नव्याच प्रकाराशी माझी ओळख झाली होती, हळूहळू तिचं मैत्रीत रुपांतर झालं, आणि शेवटी मी त्याच्या प्रेमातही पडलो. आणि एकेकाळी साधं कोणी 'आयला' म्हटलं म्हणून त्याला चोपणारा मी आता स्वतः सर्रास शिव्या देत सुटलो होतो. प्रत्येक वाक्यात शिवी असायची. वयानं सिनिअर असलेल्या मित्रानं उन्हाळ्याच्या सुट्टीत मला याबद्दल बरंच झाडलं, आणि त्याच्या संगतीत राहून मी फक्त गरजेपुरतं शिव्या द्यायला शिकलो. दुस-या शब्दांत सांगायचं म्हणजे मी शिव्या टाळणं शिकलो. तरी त्या अश्लील साहित्यप्रकाराबद्दलचं माझं प्रेम कमी झालं नव्हतं. ते कमी होणारच नव्हतं. पण यामुळे शिव्या या मनोरंजकही असतात हे लक्षात आलं.

नववीत असताना शाळेची फुटबॉल टीम काढावी या हेतूनं ब-याच वर्षांत कदाचित प्रथमच इंग्रजी आणि मराठी माध्यमाची पोरं एकत्र आली. आमच्या आधीच्या बॅचेसमध्ये मराठी-इंग्रजीच्या पोरांत हमखास राडा व्हायचा. आम्ही मात्र हातमिळवणी केली. आणि अजुन एका नव्या शब्दानं आयुष्यात एंट्री घेतली. 'फक!!' ही शिवी इंग्रजी माध्यमाची पोरं जाऊदेत, पोरी सुद्धा हमखास द्यायच्या. आणि प्रसंगी त्या मराठमोळ्या शिव्या सुद्धा द्यायच्या!! आम्ही चाटच पडलो. मराठी माध्यमाच्या पोरींसमोर शिव्या द्यायला आम्ही घाबरायचो, काय भरोसा पोरगी चुगली करायची. आणि इकडे बघतोय तर मुली स्वतःच शिव्या देताना दिसल्या. शिव्यांच्या मार्फत का होईना, पण स्त्री-पुरुष समानता वाढीस लागल्याचं दिसून आलं. (पुढे हिमालयाची सावली हे नाटक पाहताना रोहिणी हट्टंगडी यांना रांडेच्या, गाढवीच्या अशा शिव्या देताना पाहून अवाक् झालो होतो. आईने खुलासा केला, म्हणाली की पूर्वी बायकाच जास्त शिव्या द्यायच्या. चांगल्या, उच्च जाती-वर्णाच्या घरंदाज बायकासुद्धा अपवाद नव्हत्या म्हणे. पटलं. तेव्हा वाटलं की शिव्या द्यायला पहिल्यांदा स्त्रियांनीच सुरुवात केली असली पाहिजे. एकतर दुस-यांना नावं ठेवायची सवय पुरुषांपेक्षा त्यांना जास्त, आणि एवढ्या कल्पक शिव्या पुरुषांना कशा काय सुचतील? एक शंका आहे - शिंच्या म्हणजे नक्की 'कोणा'च्या? किंवा 'कशा'च्या?)
असो. हळूहळू आमच्या वर्गातल्या मुली सुद्धा हळूच एखादी शिवी तोंडातून लाजत लाजत सोडून द्यायला शिकल्या. अशाप्रकारे, शिव्यांनी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीला हातभार लावला.

पण मला सगळ्यात जास्त त्रास दिला, तो फक या शिवीने.. शिवीसुद्धा म्हणणार नाही मी तिला. भ-भे-भो-चु इ शिव्या देताना जी उर्जा बोलणा-याला आणि ऐकणा-याला जाणवते, ती फक-फकर या नेभळट शिव्यांमध्ये अजिबात दिसून येत नाही. याचं उत्तम उदाहरण आहे माझ्याकडे. कॉलेजमधला एक मित्र अजिबात शिव्या द्यायचा नाही. त्याला आम्ही मंदू म्हणायचो. एकदा तो फक म्हणाला. आम्ही सगळे आश्चर्यचकित्!!! आयला आपला मंदू चक्क फक म्हणाला?? तर तो म्हणतो, "हो मी फक बोलतो, त्यात काय?" त्याला पुन्हा एकदा फक म्हणायला सांगितलं. बिनधास्त म्हणाला - फक. मग म्हटलं आता 'चोद' म्हण. "नाही ते नाही म्हणणार मी. किती घाण वाटतं ऐकायला" अरेच्चा!! अर्थ एकच ना दोघांचा!! शिवी द्यायची नाही म्हणतोस तर असा भाषेनुरुप भेदभाव का?? म्हणजे शिवी मराठीत घातलीत तर घाण, - सॉरी, ग्रोस!! आणि तिचं इंग्रजीत भाषांतर करून घातलीत तर सॉफिस्टिकेटेड?? छान!! धन्य!! या मंदू सारखी विचारसरणी ब-याच मुलींमध्येही दिसून येते. इंग्रजीत सगळ्या शिव्या घालतील, पण त्याच अर्थाच्या मराठी शिव्या यांच्यासमोर दिल्या, तर किती घाणेरडा आहे हा मुलगा असं म्हणतील. पण याबद्दल वाईट वाटून घेणं मी सोडून दिलंय. कारण अशा व्यक्तींना शिव्या इंग्रजीत देताना, आपण शिवी देतोय असं जाणवतच नसावं. तितका दमच नाही त्या भाषेत. त्यामुळे एखाद्याला शिवी हासडायचीच, म्हणून जर शिवी द्यायची असेल, तर ती मराठीतून दिल्याशिवाय परिणामकारक ठरतच नाही अशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे. साधं उदाहरण देतो. एखाद्याला आपण "यू बेगर!!" असं म्हटल्यानं एवढं काही होईल असं नाही पण "अरे भिकारड्या!!" असं म्हटलं तर त्या एखाद्याची खोपडी फिरेलच ना.

शिव्या देणं चांगलं, असं माझं म्हणणं नाही. पण एक मात्र आहे, की मराठी भाषेला जिवंत ठेवण्यात शिव्यांचा मोठ्ठा वाटा आहे, असेल. माणूस भले मराठीतून शिक्षण घेवो, अगर इंग्रजीतून. तो शिवी घालतो, ती मराठीतूनच. राग, मत्सर, द्वेष, कटकट, वैताग, उद्गार यांना जेव्हा उत्स्फूर्तपणे व्यक्त करायची वेळ येते तेव्हा अनाहुतपणे माणूस 'ओ फक' म्हणण्याऐवजी 'आयचा घो' म्हणण्याचीच शक्यता जास्त वाटते. कारण माणूस जेव्हा आंग्लाळलेल्या सॉफिस्टिकेटेड शिव्या देतो, तेव्हा सहसा आपण कसे सॉफिस्टिकेटेड आणि मॉडर्न आहोत हे शो ऑफ करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, त्या शिव्या विचारपूर्वक दिल्या जातात. त्याउलट मनातली भावना, विचार करण्यात वेळ न दवडता उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना आपसूकच मायबोलीतल्या शिव्या तोंडावाटे बाहेर निघतात, कारण त्या मनापासून दिलेल्या असतात आणि मन हे कायम मायबोलीवर प्रेम करतं. अर्थात, फुशारक्या मारण्यासाठी मराठीतूनही शिव्या देणारी मंडळी असतातच, पण मी गरजेपुरतं शिव्या देणा-यांबद्दल बोलतोय. आयला ह्या शिव्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासही मदत करतात!!!! मस्तच वाटलं जाणीव झाल्यावर!!

तर अशाप्रकारे शिव्या ह्या माणसाला, त्याच्या संस्कृतीला, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या मनाला, घडवणा-या, फुलवणा-या चेतवणा-या असतात. शिव्या घालताना आणि त्या अंगावर घेताना मनात हलकल्लोळ उडत असतो. लोकलमध्ये सभ्य भाषेत वाद घालणा-या दोन प्रवाशांपैकी एकाने दुस-याला एक जरी शिवी घातली तरी दुसराही आपसुकच सभ्यपणा सोडून पहिल्याला उलट्या शिव्या ऐकवतो, आणि कोणी मध्यस्थी केली नाही तर दोघांचेही हात सहज एकमेकांच्या कॉलरी पकडण्यासाठी सरसावतात. माणसातला पशू बाहेर डोकावू लागतो. अशा प्रकारे शिव्या या माणसाला निसर्गाच्या जवळ नेतात.

शिव्यांचे असे विविधढंगी विविधरंगी फायदे आहेत. शिव्या ह्या सर्वव्यापक आहेत. त्यामुळे शिव्या जरी आज मी उगाच देत नसलो, तरी त्यांच्याबद्दल आधी नमूद केल्याप्रमाणे मला भयंकर आदरभाव, आपुलकी आणि जिव्हाळा आहे. शिव्यांचे माझ्यावर अगणित उपकार आहेत. त्यांनी माझे आत्तापर्यंतचे आयुष्य असे रमणीय केले आहे आणि यापुढेही करत राहतील त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. शेवटी शिव्यांना याच शुभेच्छा देईन की जशी त्यांच्या मानवी जीवनातील या महाकार्याची उपरती मला झाली, तशी ती एक दिवस सगळ्यांना व्हावी आणि मग कोणीही शिव्यांना शिव्या देऊ नये. :)

विनोदमौजमजाविचारअनुभवमत

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

23 Nov 2013 - 7:04 am | अग्निकोल्हा

इंग्रजीत शिव्या घालणे हुच्च्भ्रू पणाचे लक्षण मानणारी फार मोठी जमात अस्तित्वात आहे. बाकी लेखातील वाक्या वाक्यातुन आत्मचरित्र उघडत गेल्याचा भास झाल्याने लेख आवडल्या गेल्या आहे :)

मदनबाण's picture

23 Nov 2013 - 8:26 am | मदनबाण

मी खुपच कमी शिव्या दिल्या असतील ! पण हल्ली काय झाले आहे आहे कोणास ठावुक पण तोंडात शिव्या यायला लागल्या आहेत.विशेषतः टिव्हीवर राजकारणी मंडळी दिसली माझा संयम सुटतो ! ;) हल्ली दुचाकी वरुन प्रवास करताना माझ्या मागे उगाच मिनीटाला १०-१५ वेळा हॉन वाजवणारा आला की यथेच्च शिव्या हासडतो. आत्ता पर्यंत शिव्या देण्या म्हणजे बरेच सोज्वळ शब्दच वापरले जायचे उदा.अरे ए बैल्,गाढवीच्या,सुकटीच्या वगरै.पण हल्ली शब्दांना धार चढली आहे असे जाणवु लागले आहे. एबीपी माझावर कार्यक्रमा मधे राजकिय नेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांच्या जाहिराती आल्या की मी तोंडभरुन शिवीसुमने उधळतो...
बाकी विलायती शिव्यांबाबतीत सहमत ! असल्या शिव्या देणारे मुल मुली या मराठी असल्या तरी शिव्या देताना देखील अगदी स्टेटस सांभाळुन दिल्या सारखे आंग्ल शिव्या देतात. फक ही सगळ्यात आवडती शिवी या मंडळींची ! पण मराठी शिव्या यांनी ऐकल्या की अगदी आपण काय भयंकर आणि त्यांच्या भाषेत सांगायच झाल तर चीप ऐकत आहोत असा आविर्भाव दिसुन येतो.

तश्या हल्ली एक एक शिव्या नीट ऐकु लागलो आहे,हल्ली माझी आवडती शिवी भोसमारीच्या ही आहे. ;) बाकी व्यक्त केलेल्या मनोगताशी माझे अनुभव देखील मिळतेजुळतेच आहेत.
तुम्ही आगरी शिव्या कधी ऐकल्या आहेत का ? बेक्कार ! ;) मध्यंतरी व्होडाफोन ने जुजु असलेल्या अनेक जाहिराती बनवल्या होत्या.मला त्यातल्या काही फारच आवडल्या होत्या...म्हणुन तू-नळीवर जुजुच्या जाहिराती शोधत होतो आणि तेव्हाच आगरी जुजुचा साक्षात्कार मला झाला ! तो आगरी जुजु पाहिले आणि म्हंटले बास्स ! ;)

जाता जाता :- चुतिया ही शिवी {खरं तर ही शिवी नाही} मी जेव्हा पहिल्यांदा ऐकली होती तेव्हा काही तरी भयानक अर्थ असलेला हा शब्द आहे असे वाटले होते,पण नंतर त्याचा खरा अर्थ समजला. या बद्दल देखील तूनळीवर THE REAL MEANING OF CHUTIYA असे शोधावे,तुमचे प्रबोधन केले जाईल याची खात्री देतो.मुंलीचे म्हणाल तर त्या देखील बिनधास्तपणे शिव्या देतात,फक्त बर्‍याच वेळा मी नाही त्यातली हे दाखवणे त्यांच्यासाठी फार महत्वाचे असते...यावर देखील तूनळीवर भरपुर मटेरिअल सापडेल.

अनिरुद्ध प's picture

23 Nov 2013 - 11:43 am | अनिरुद्ध प

+१ सहमत

कपिलमुनी's picture

26 Nov 2013 - 12:26 pm | कपिलमुनी

हल्ली दुचाकी वरुन प्रवास करताना माझ्या मागे उगाच मिनीटाला १०-१५ वेळा हॉन वाजवणारा आला की यथेच्च शिव्या हासडतो

स्कारपियो आणि खादी टाळा ..
तब्येतीस जपून रहा ..

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2013 - 1:48 pm | प्रभाकर पेठकर

उगीच चारचाकी गाड्यांच्या पायातपायात येऊ नका.

मदनबाण's picture

27 Nov 2013 - 10:53 am | मदनबाण

@ कपिलमुनी आणि पेठकर काका,
खरंय अगदी खरंय मी शिव्या हासडतो ते त्यांना ऐकता येतील अश्या नाही ! मनातले फस्ट्रेशन बाहेर काढण्यासाठी,कुठेतरी संताप व्यक्त करण्यासाठीच.हल्ली हिंदुस्थानी लोक माज करु लागले आहेत्,त्यांच्याच मस्तवालपणा आणि मग्रुरी वाढली आहे की काय तेच कळेनासे झाले आहे.४ चाकी वाले विशेषतः मोठ्या गाडी बेफाम उधळणारे माझ्या बर्‍याचदा डोक्यात जातात ! हायवेवर ६०-६५ च्या स्पीडला कार चालवताना मधेच कारचा दरवाजा उघडतात आणि पचाकन पान थुकतात...त्यांच्या मागे दुसरी गाडी आहे,दुचाकी चालवणारा आहे त्यांच्या अंगावर हा पिचकारीचा स्प्रे उडेल याची अजिबात तमा न बाळगता हे गाण्या सुसाट चालवत असतात्.मध्यंतरी ठाण्याच्या कॅडबरी समोरील उड्डानपुला वरुन मी दुचाकी चालवत होतो तेव्हा एकदम वेगाने एक सुमो गेली आणि त्याच्या मधील एका व्यक्तीने जळती सिगरेट खिडकीतुन बाहेर फेकली ती तशीच माझ्या शर्टावर येउन पडली नशिब ती माझ्या शर्टाच्या आत किंवा हेलमेटच्या आत शिरली नाही,मी जोरात ओरडलो ! ते एकुन त्यांनी सुमोचा वेग कमी केला आणि बाईकला उड्डानपुलाच्या भिंतीला दाबण्याचा प्रयत्न केला,त्यांची सगळी भाषा माजोरडी आणि शिवीगाळ करणारी होती...माझा जीव आणि दुचाकी मोठ्या मुश्किलीने वाचली.या सर्व प्रकारांनमुळे हल्ली पारा लवकर चढतो की काय ते कळत नाही. माझ्या सारख्या नोकरदार मंडळींना रोज अश्या आणि अनेक समस्यांना रोज तोंड देउन घरदार चालवावे लागतो...तेव्हा मनोमन शिव्या देउन फस्ट्रेशन कमी करणे हाच काय तो तात्पुरता इलाज केला जातो.तोंडावर शिव्या देण्याची शक्यता ही जवळपास नाहीच.

प्रभाकर पेठकर's picture

27 Nov 2013 - 11:28 am | प्रभाकर पेठकर

हल्ली हिंदुस्थानी लोक माज करु लागले आहेत्, त्यांच्याच मस्तवालपणा आणि मग्रुरी वाढली आहे....

हे शंभर टक्के खरे आहे. मलाही तसा अनेकदा (मोजता येणार नाही इतक्यावेळा) अनुभव आला आहे. मीही शिव्या घालतो. माझा वरील प्रतिसाद असाच माजोरीपणा करणार्‍या दुचाकी स्वारांबद्द्ल आहे. सरसकट सर्व दुचाकी स्वारांबद्दल नाही. मी ही एके काळी दुचाकीस्वार होतो. माझा मुलगा आजही दुचाकीस्वारच आहे. पुण्यातले कित्येक दुचाकी स्वार असुरक्षित अंतरात चारचाकी समोर येतात त्या भ*** स्वतःच्या जिवाची पर्वा नसते त्याचा जीव वाचवयला आपल्याला करकचुन ब्रेक मारावा लागतो. कांही बोलल्यास बाह्या सरसावतात. कित्येकांना मीही खाली उतरून बाह्या सरसावून हिसका दाखवतो. पण ही (पायात कडमडायची) वृत्ती मोडून काढता येत नाही. शिवाय रहदारीत चारचाकीवाल्याला दुचाकीस्वाराचा पाठलाग करता येत नाही. पुण्यात मुली/महिला दुचाकीस्वारांचा माजुरडेपणा, अडविल्यास उद्धटपणा खुपच अनुभवास येतो. त्याच बरोबर महिला दुचाकीस्वारास गौण लेखणे, मुद्दाम त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना घाबरविणे आदी प्रकार चारचाकीवाल्यांकडून होतानाही दिसतात. ह्या माजुरड्या दुचाकीस्वारास आणि चारचाकीवाल्यांस शिव्या घालणे हा एकच मार्ग आपल्या वैफल्याला वाट करून देणारा असतो. ह्यावरून माझे आणि पत्नीचे अनेकदा खटके उडाले आहेत. त्यावर 'स्टिअरींगच्या मागे बस आणि मग जिवाचा शांत पणा दाखव' असे सांगावे लागते. एकदा तर बायकोला 'तुला आवडत नसेल तर तू आपली बसने किंवा रिक्षाने जात जा.' असेही सांगून झाले आहे. आधीच बाहेरच्या टिनपाट प्रकृतीच्या दुचाकी स्वाराचा माजुरडेपणा सहन न होऊन संताप आलेला असतो आणि त्यावर गाडीच्या आंत त्याच नाटकाचा दुसरा अंक (तोही घरी जाऊन नाही, तिथेच, ताबडतोब) सुरु असतो. अशावेळी डोके शांत ठेवायला आपण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वगैरेंची अवलाद असायला पाहिजे. सामान्य माणसाला शक्य नाही.
सगळे चारचाकीवाले आणि सगळे दुचाकीस्वार माजुरडे नसतात. हल्लीच्या जगात अचानक आणि अमाप पैसा (कुठल्याही मार्गाने) हाती आलेले, नगरसेवकांचे, स्थानिक राजकारण्यांचे पिद्दे चारचाक्या अक्षरशः उडवतात आणि इतरांना जाणूनबुजून त्रास देतात. दुर्दैवाने, अशांची संख्या जास्त आहे. त्यातून त्यांना असुरी आनंद मिळत असतो. माझ्यासारखा वयस्क आणि कुटुंबवत्सल माणूस तर त्यांच्यासाठी अगदी सॉफ्ट टार्गेट असतो. पोलीसही अशांपुढे हतबल झालेले पाहिले आहेत. नियमानुसार आणि एक जबाबदार नागरिक म्हणून वावरताना आपल्याला कोणी वाली नाही ही भावना प्रकर्षाने जाणवते. असो.

बाणा सांभाळ रे. हल्ली दुचाकी वाल्यांना चारचाकी वाले कचरा समजू लागले आहेत.

काळा पहाड's picture

28 May 2015 - 5:29 pm | काळा पहाड

मला जर एका दिवसाचा हुकुमशहा केलं तर सगळ्यात त्या संपूर्ण दिवसात मी फक्त एकच काम करेन. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या पॉलिटिशियन्स, त्यांचे चमचे, बिल्डर, सरकारी नोकर आणि स्कॉर्पियो, एन्डेव्हर, पजेरो, सुमो, ट्रॅक्स, अ‍ॅव्हेन्जर, फॉर्च्युनर, लॅन्डक्रूजर यांच्या डायव्हर आणि मालकांची यादी करायची आणि मग एक सर, एक गोली.

बॅटमॅन's picture

28 May 2015 - 6:13 pm | बॅटमॅन

डेथ नोट मधला यागामी लाईट (जपानी उच्चारात "राइतो") अर्थात "किरा" आठवला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 May 2015 - 9:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तु त्याला उगाच तसचं सोडुन दिलस. खाली खेचुन तुडवायचा. पुण्यात कुठेतरी असाचं किस्सा झालेला. एका मुलीच्या पँटमधे मागुन जळती सिगारेट टाकलेली. ह्यांना जागीचं ठेचलं नाही ना तर ह्यांच्या कारवाया वाढत जातात.

पेस्तन काका's picture

26 Nov 2013 - 4:43 pm | पेस्तन काका

हल्ली दुचाकी वरुन प्रवास करताना माझ्या मागे उगाच मिनीटाला १०-१५ वेळा हॉन वाजवणारा आला की यथेच्च शिव्या हासडतो

पुण्यात आलेले दिसतात *smile* :-)

जर्मन वर्मन धाग्यातला यशो आणि स्वॅप्स यांचा प्रतिसद वाचुन हा धागा आठवला !

फक ही सगळ्यात आवडती शिवी या मंडळींची !
अशोंनी छान प्रवचन दिले आहे... ऐकण्या सारखे आहे ! ;)
https://www.youtube.com/watch?v=kmqZIAw8vzY

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:53 pm | टवाळ कार्टा

फिश म्हणायचे ;)

वेल्लाभट's picture

23 Nov 2013 - 8:35 am | वेल्लाभट

माझं स्पष्ट मत आहे; शिव्या हा भाषेचा एक अलंकार आहे. त्याला नाकारून किंवा वाईट म्हणून काही होत नाही.
किती, कुठे, कुठल्या, आणि महत्वाचं म्हणजे, कशा आणि कुणी शिव्या द्याव्या, यावर सगळं अवलंबून असतं. तेंव्हा ते कळलं पहिजे. उठसूट वाक्यागणिक २ शिव्या निरर्थक घुसडणारे शिव्यांची मजा घालवतात. याउलट पुलंच्या रावसाहेबांसारखी लोकं एकच्च्च अशी परफेक्ट टायमिंग ला हासडतात, की त्या ठिकाणी कुणीही उपस्थित असो; त्याला ते गैर वाटत नाही, उलट गेलंच तर चेह-यावर हसू देऊन जातं.
तेंव्हा या भाषेच्या अलंकाराची ग्रेस सांभाळता आली पाहिजे.
विश्वास ठेवा, एकदा कधी तुम्हाला जरा वैफल्य आलं, चिडचिड झाली, तर एकटयात द्या हवं तर पण नुसत्याच काही शिव्या हासडून बघा; स्ट्रेस कमी होतो. ते शब्द, किंवा त्यांच्या अर्थाच्या फार खोलात शिरू नका.
शिव्या वाईट नसतात; त्या कशा, कोण, किती, कुठे, कधी देतो, यावर त्या वाईट किंवा चांगल्या ते ठरतं.

ग्रेटथिन्कर's picture

23 Nov 2013 - 9:06 am | ग्रेटथिन्कर

*** ** ,लै भारी लेख आहे राव.

बाबा पाटील's picture

23 Nov 2013 - 11:16 am | बाबा पाटील

शिवी म्हणजे कमित कमी शब्दात आपल्या भावना समर्पक रितीने पुढच्याला पोहचवणे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Nov 2013 - 12:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ही केवळ पोच.
सविस्तर प्रतिसाद निवांतपणे :-)

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2013 - 12:08 pm | टवाळ कार्टा

भें**...मस्तच ;)

खटासि खट's picture

23 Nov 2013 - 12:22 pm | खटासि खट

साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणात नेहमी काय मिसिंग असतं ते आत्ता हा लेख वाचतांना लक्षात आलं.
च्यायला, एकदा बनवाच अध्यक्ष.

खटासि खट's picture

24 Nov 2013 - 2:01 pm | खटासि खट

चुकून कधी सासं चा अध्यक्ष झालोच तर जिवंतपणा यावा यासाठी एक भाषण रेडी करून ठेवावं म्हणतोय. वडापाव भाऊ मदत करा जरा... म्हणत असाल तर पोस्ट करू इथंच !

चावटमेला's picture

23 Nov 2013 - 12:32 pm | चावटमेला

च्यायला, काय जबराट लेख आहे. मी सुध्दा ७ वी ते अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत , वाक्या वाक्या ला शिव्या द्यायचो. कसे काय माहीत नाही, पण नंतर हळूहळू कमी झाले. आजकाल 'फकत' आमच्या मॅनेजरला (ज्याला आम्ही लाडाने छगन म्हणतो) यथेच्छ शिव्या घालतो. तशा काही दिल्लीकरांच्या शिव्या सुध्दा दमदार वाटतात, पण येस त्याबाबतीत मराठीला कॉम्पिटिशन नाहीच

लोकसाहित्य शोध आणि समीक्षा ह्या रा. चि. ढेरे ह्यांच्या पुस्तकात शिवी आणि समाजेतिहास नावाचे एक अतिशय माहितीपूर्ण प्रकरण आहे.

मराठी साहित्यातील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तकही अभ्यासनीय ठरावे.

मराठी साहित्यातील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तकही अभ्यासनीय ठरावे.

हे पुस्तक चाळलंय. गंमत म्हणून परिशिष्टांप्रमाणे पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार अधून-मधून वाचत असतो. पहिल्यांदा शीर्षक पाहून उडालो होतो आणि आता या पुस्तकाची पारायणं होणार असंही वाटलं होतं, पण पुस्तक चाळल्यावर लक्षात आलं, की हे गंभीरपणे व्यवस्थित अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2013 - 1:37 pm | अत्रुप्त आत्मा

अत्यंत प्रसंगनिष्ठ लेखन! =))

@शाळेच्या बाईंकडे सुद्धा 'बाई हा त्याला गांडू म्हणाला' अशा तक्रारी केलेल्या आठवतात>>> http://www.smileyvault.com/albums/CBSA/smileyvault-cute-big-smiley-animated-013.gif

@मला पांडु म्हणून चिडवायचे आणि मधलं बोट दाखवायचे>>> =))

@शिव्या या माणसाला निसर्गाच्या जवळ नेतात. >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif
===========================================
बाकि अख्या लेखाबद्दल शिवी.साष् टांग दंडवत!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif अफाट मंजे अफाट लिवलय!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

खटासि खट's picture

24 Nov 2013 - 1:59 pm | खटासि खट

लेखात किती तरी अश्लील शब्द आहेत पण लेख अश्लील वाटला नाही.
बोले तो ऐसा क्यूं ?
लिहीणा-याचा उद्देश रोखठोक आणि निर्मळ असला कि असं होतं. नाहीतर काहींचं सभ्य लिखाण पण अश्लील आणि पकाऊ वाटतं. असो.

यसवायजी's picture

23 Nov 2013 - 2:49 pm | यसवायजी

प्रेसेन्तिन्ग- Osho
बगा विंग्रजी पण कित्ती कित्ती सम्रुद्द हाये.. ;)

प्यारे१'s picture

23 Nov 2013 - 3:16 pm | प्यारे१

>>>शिव्या ह्या सर्वव्यापक आहेत. त्यामुळे शिव्या जरी आज मी उगाच देत नसलो, तरी त्यांच्याबद्दल आधी नमूद केल्याप्रमाणे मला भयंकर आदरभाव, आपुलकी आणि जिव्हाळा आहे. शिव्यांचे माझ्यावर अगणित उपकार आहेत. त्यांनी माझे आत्तापर्यंतचे आयुष्य असे रमणीय केले आहे आणि यापुढेही करत राहतील त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. शेवटी शिव्यांना याच शुभेच्छा देईन की जशी त्यांच्या मानवी जीवनातील या महाकार्याची उपरती मला झाली, तशी ती एक दिवस सगळ्यांना व्हावी आणि मग कोणीही शिव्यांना शिव्या देऊ नये.

=)) =))

भन्नाट सारांश! चातुर्मास पुस्तकातली कथा आठवली.
अमुक तमुक व्रत केल्यानं जसं त्यांचं भलं झालं तसं सगळ्यांचं होवो स्टाईल.
बाकी दुर्लक्ष ही सगळ्यात मोठी शिवी आहे असं आमचे गुरुजी बिपिन कार्यकर्ते सांगतात. त्याची लिंक द्या रे प्लिज कुणी!

पैसा's picture

23 Nov 2013 - 8:47 pm | पैसा

अनेक जागा मस्त घेतल्या आहेत!

चाणक्य's picture

23 Nov 2013 - 8:59 pm | चाणक्य

आवडले. शिव्यांची देवाण घेवाण समजूतीने करावी. अहिंसेपेक्षा प्रभावी शस्त्र आहे हे हिंसा टाळण्याचे. *wink*

सुबोध खरे's picture

23 Nov 2013 - 11:51 pm | सुबोध खरे

शिवीने भाषेला जोर येतो. एखादा माणूस चांगला नाही म्हणण्याऐवजी तो माणूस हरामखोर आहे असे म्हटले तर त्याची पातळी जास्त प्रकर्षाने लक्षात येते. पण शिवी हि सुक्या भेळेतील मिरची सारखी असावी. एखाद्या घासात लागली तर लज्जत वाढवते पण प्रत्येक घासात लागली तर तोंडाला आग लागते.
बाकी डॉक्टर झाल्यावर जाणीवपूर्वक भाषेतून शिव्या काढून टाकल्या. कारण न जाणो चुकीच्या ठिकाणी तोंडातून निघून गेली तर अनर्थ होऊ शकतो. आणि इतक्या वर्षात तसे त्यावाचून फारसे अडले नाही असेही वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2013 - 3:00 am | प्रभाकर पेठकर

आणि इतक्या वर्षात तसे त्यावाचून फारसे अडले नाही असेही वाटते.

सहमत.

निपा's picture

23 Nov 2013 - 11:53 pm | निपा

आमच्या चंद्रपूर-नागपूर कडे का-बे, साल्या पासूनच वाक्याची सुरुवात होते . आईचा घो वैगेरे इकडे नाही . पण शिव्या भरपूर आहेत आणि नवीन शिव्या कल्पनाशक्ती लढवून तयार कराव्या लागतात . बाकी हा लेख मस्तच !!!
+१००

वडापाव's picture

24 Nov 2013 - 12:24 am | वडापाव

कडे का-बे, साल्या पासूनच वाक्याची सुरुवात होते

'वाक्याच्या सुरुवाती'वरून कॉलेजमधल्या एका मित्राची आठवण झाली. तो भेटला की हाय-बाय बोलणार नाही, 'आ भेन**' अशीच सुरुवात करेल. एकदा सहामाही परिक्षेचा निकाल लागला आणि मार्कशीट्स घेण्यासाठी 'पालकांना बरोबर घेऊन या' अशी कॉलेजने सक्ती केली. मी जिना चढत असताना हाच मित्र त्याच्या आईबरोबर जिना उतरत होता आणि मी 'क्या हुआ?' असं विचारल्यावर 'पास भेन**' असं मोठ्ठ्याने म्हणाला. मी गार झालो आणि त्याच्या आईची रिअ‍ॅक्शन न बघताच तिथून धूम ठोकली.

नानबा's picture

25 Nov 2013 - 9:16 am | नानबा

एका वाक्यात निदान ५ भे*** असायचे. आमच्या कॉलेजच्या मालकाच्या पोराला शाळेत पोरांनी तो "माझ्या बापाची शाळा" म्हणून सारखा माज करायचा म्हणून एकदा बेदम चोपल. ही हकिकत या मित्राने अशी सांहितली.
"अरे भे***, काय नाय भे***. तो ***** होता ना भे***, तो शाळेत असताना बापाची शाळा बापाची शाळा म्हणून जाम उडायचा भे***. पोरांनी ऐक ऐक ऐकला, आणि एक दिवस असा धुतला ना त्याला भे***, की तो चड्डीत मु*** भे***"

त्या प्रसंगापेक्षा मित्राच्या सांगण्याच तर्‍हेमुळे आम्ही हसून हसून ठार.

एक शंका आहे - शिंच्या म्हणजे नक्की 'कोणा'च्या? किंवा 'कशा'च्या?)

"शिंच्या" म्हणजे "शिंदळीच्या" या शिवीचं लघुरूप आहे. "शिंदळकी करणे" म्हणजे व्यभिचार करणे. त्यातून झालेली संतती म्हणजे "शिंदळीचा" म्हणजे "शिंचा".
.
माझं शिक्षण कटारिया प्रशाला नावाच्या एका महान शाळेत झालं. "शिव्या" या विषयाला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवणारे लोक शाळेत होते. माध्यम इंग्रजी, मराठी संस्थेने चालवलेली - त्यामुळे लोकांना शिव्यांमध्ये (किमान) द्वैभाषिक हुकूमत असे. एकशब्दी शिव्यांपासून "अच्चीत गच्ची..."ने सुरू होऊन साधारण तीन मिनिटे अखंड चालणार्‍या एकाच शिवीपर्यंत अनेक प्रकार होते. लघुरूपी शिव्याही असायच्या - उदा. बी.पी.एल. (याचा फुलफॉर्म मी अर्थातच इथे टंकू शकत नाही.) नववीत आमच्या वर्गात "बबन टाईम्स" नावाचे हस्तलिखित मासिक निघे (फॉर प्रायवेट सर्क्युलेशन ऑन्ली) - त्यात एक सदर फक्त नवशिव्यांना वाहिलेले असे.

आजही शिव्यांची एक लढाई आठवून जबरदस्त हसू कोसळतं. मधल्या सुट्टीत आम्ही क्रिकेट खेळत होतो. लानदे (हा बोबडा होता) मिडविकेटला फील्डिंग करत होता. बगावत (भागवत) नावाचा शिवी-तज्ज्ञाच्या बॉलिंगवर एक कॅच उंच उडाला आणि लानदेच्या दिशेने गेला. लानदेचं लक्ष कुठे होतं काय माहीत, त्याने कॅच (कटारियाच्या खास भाषेत) "गाळला" (किंवा "लानदे पोकला"). बगावत संतापाने हिरवा-निळा झाला आणि त्याने लानदेला भूतो न भविष्यति शिव्या द्यायला सुरुवात केली. (अशा वेळी खेळ अर्थातच थांबत असे, कारण शिव्यागाळी हा क्रिकेटचा अविभाज्य भाग होता.) एरवी दुसर्‍या बाजूनेही सामना रंगत असे, पण आमचा लानदे फारच मऊ माणूस. बगावतने त्याला अक्षरशः फायरिंग स्क्वॉड समोर उभं केलं होतं. आता लानदे काय उत्तर देणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली. लानदेचा चेहेरा शिवीगणिक कासावीस होत होता. आत काहीतरी साठून येतं आहे आणि आता बाहेर पडणार असं वाटायला लागलं. इतिहास में पहली बार लानदेकडून शिवी ऐकायला मिळणार की काय, असं वाटून सगळे लानदेपाशी गोळा झाले. लानदे लाल लाल. दमून बगावत थांबला. आता लानदेने पवित्रा घेतला. सगळ्यांनी श्वास रोखले, जिवाचे कान झाले. "ए बावलत..." लानदे बगावतला म्हणाला. सगळे प्रेक्षक हसून हसून लोळायला लागले!

प्यारे१'s picture

24 Nov 2013 - 1:34 am | प्यारे१

___/\___
क ह र!
फुटलो. आदूबाळ, स्टोरी टेलिंग एकदम मस्त!

तुमचा अभिषेक's picture

26 Nov 2013 - 10:02 am | तुमचा अभिषेक

हायला शिंच्याचा अर्थ असा आहे, गंमतीदार शब्द वाटायचा मला तो.
बाकी खालचा किस्सा मात्र गंमतीदार होता.

जबराट लेख. मस्त पञ्चेस घेतले आहेत, ते सगळे उद्धृत करायचे तर लेखच पेस्टवावा लागेल. त्यामुळे थांबतो इथेच.

मुक्त विहारि's picture

24 Nov 2013 - 11:57 am | मुक्त विहारि

प्रतिसाद...

तुमचा अभिषेक's picture

24 Nov 2013 - 1:43 pm | तुमचा अभिषेक

जेव्हा मित्रांच्या आठवणी नॉस्टेल्जिक करतात तेव्हा हमखास वाक्यावाक्याला प्रेमळ शिव्या घालत बोलायचे दिवस आठवतात आणि तेच जास्त मिस करायला होते सध्याच्या या नोकरीधंद्याच्या जागी.. इथे कितीही चांगले गट्टी जमली एखाद्याशी तरी त्या मैत्रीत शिव्या नॉट अलाऊड असा अलिखित नियमच असतो.. मग कधीतरी जुन्या मित्रांचा कट्टा भरतो तेव्हा आतवर साचलेल्या सार्‍या शिव्या बाहेर पडतात तेव्हा कुठेतरी हलके हलके वाटते..

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2013 - 9:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

शिव्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत असे माझे मत आहे. पण देताना समोर किती "भारी" माणुस आहे ते पाहुन दिलेल्या बर्‍या.नाहीतर नसते संकट ओढवायचे. यासाठी प्रत्येक कॅटेगिरीमध्ये २-३ शिव्या तयार ठेवाव्यात..म्हणजे लुंगासुंगा असल्यास, जरा ताकदवान असल्यास किवा तगडा असल्यास वेगवेगळ्या
शिवाय मध्यमर्गीय सोसायटीतले भांडण असल्यास,रस्त्यावरचे ट्रॅफिकमधले,ट्रेनच्या १ल्या आणि २ र्‍या वर्गातले,बसमधले ,विमानात किंवा एअरपोर्ट्वर झाल्यास....बाकी पुस्तक कोणते म्हणालात ते??:)

खटासि खट's picture

29 Nov 2013 - 8:17 pm | खटासि खट

बापूस, सांगा कुणाचा
बापूस, तुझ्या आईचा...(पॉज)
आई सांगा कुणाची
मेल्या तुझ्या अवशीचा ..घो
आई तुझ्या बापाची

येक गाणं शिवालयातलं. मच्छिंद्र कांबळींच्या नाटकातलं, अटलबिहारी वाजपेयी गाताहेत असं समजून वाचावं

कोकणात सिंधुदुर्गात मायझ* हि शिवी सर्रास वापरली जाते. कधी कधी तर तीर्थरूप आपल्या पाल्यास रागाने या शिवीने संबोधतात.

अत्रेंचा एक किस्सा - खरा कोटा देव जाणे.

अत्रे एकदा एका सभेला संबोधत असताना सारखे एका बाईंकडे बघत होते. हे जेव्हा अति झाले तेव्हा त्या बाई अत्र्यांना म्हणाल्या "काय हो अत्रे माघा पासून बघतेय तुम्ही सारखे माझ्याकडे बघताय. माझ्या भागात मला सर्व आइ म्हणून संबोधतात.

अत्रे म्हणाले मला माझ्या भागात आयझ*डा म्हणून संबोधतात.

शिव्यांचा विषय आहे म्हणून सांगितला. संपादक मंडळी आक्षेप घेणार नाहीत अशी अशा करतो.

बॅटमॅन's picture

28 May 2015 - 2:49 pm | बॅटमॅन

बाकी या अत्र्यांचा सगळा माज पु भा भावे नामक एका नागपूरकराने यथास्थित उतरवला ही स्टोरी माहिती असेलच. उरलेला महाराष्ट्र त्यांना दबून असला तरी या एका प्रसंगात मात्र अत्र्यांची मात्रा वट्ट चालली नाही.

================================================

त्याचे असे झाले, एकदा अत्र्यांनी सावरकरांवर काही टीका केली. अत्रेस्टाईलने जरा लागट बोलले, तरी सावरकर असल्याने जरा जपूनच बोलले. सावरकरांना १९४१ च्या सुमारास एक शीख अंगरक्षक बरोबर दिला होता, तर त्याला उद्देशून म्हणाले की १९०८ साली मार्सेलिसच्या बंदरात उडी मारणार्‍या सिंहाला आता अंगरक्षक लागावा? इ.इ.

पु भा भाव्यांची सटकली. ते कट्टर सावरकरभक्त. नागपूरहून निघणार्‍या 'आदेश' नामक अतिशय चिंधी, खूप कमी सर्क्युलेशन असणार्‍या एका साप्ताहिकात अत्र्यांवरती बिलो द बेल्ट कमेंटी करणारे, अर्थातच अत्रेशैलीतले लेखन येऊ लागले. अत्रे इतके चिडले की त्यांनी 'आदेश' वर अबूनुकसानीचा खटला दाखल केला. आणि चक्क हरले देखील =))

हा समग्र किस्सा 'आदेश विरुद्ध अत्रे' नामक एका छोट्याशा पुस्तकात दिलेला आहे. खतरनाक किस्से आहेत. त्यातल्या लेखनशैलीचा एकच मासला देतो.

(सावरकर = अर्जुन आणि अत्रे = उत्तर असे अभिप्रेत आहे.)

"अरे काचघराच्या रहिवाशा, कुणावर दगडफेक करतोस? कुठे तो कुंतीपुत्र अर्जुन आणि कुठे तो विराटपुत्र उत्तर? रणभूमी हे एकाचे वांछित शय्यास्थान, तर शय्यास्थान ही दुसर्‍याची वांछित रणभूमी!"

संदीप डांगे's picture

28 May 2015 - 8:52 pm | संदीप डांगे

मस्त किस्सा सांगितला बॅटमॅनराव... :-)

srahul's picture

6 Oct 2016 - 10:33 pm | srahul

हा लेख अत्रे यानि नाही तर त्यान्चे सन्पाद्क वेलदे यानी लिहिला होता , (कर्हेचे पाणी)

शि बि आय's picture

28 May 2015 - 4:07 pm | शि बि आय

ब्बाहौ …. कसल्या रसरशीत शिव्यांचा पाढा वाचलाय राव तुम्ही… अगदी मिसळीवरल्या डबल जाळ तर्रीची आठवन झाली ना …

शिवीमुळे भाषेला नसर्गिक जोर आणि वजन येते. आणि २ ते ४ वाक्याचे सार एक शिवीत हि मावते. रागात असताना एखादी कचकचित शिवी दिली की
जिवाला पण आरम मिळतो आणि समोरच्यालाही नेमके काय ते उमगते.

एवरी आगावू एक्शन देअर इज शिवीने रिअकशन ….

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 May 2015 - 9:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कॉलेजातले दिवस आठवले. हल्ली जवळपास बंद झालयं शिव्या द्यायचं पण.

नूतन सावंत's picture

28 May 2015 - 9:42 pm | नूतन सावंत

जबरदस्त विवेचन.मुंबईच्या लांब पल्ल्याच्या लोकलमध्ल्या महिलांच्या डब्यातून प्रवास करताना महिनाभरात इतक्या शिव्या माहितीच्या झाल्या की पहिल्यांदा बायका अशा शिव्या देऊ शकतात का ही शंका नंतर बायकाच असल्या शिव्या देऊ शकतात या विश्वासात बदलून गेली.

सिरुसेरि's picture

2 Jun 2015 - 1:44 pm | सिरुसेरि

व्यंकटेश माडगुळकरांच्या अनेक पुस्तकांमध्ये माणदेश भागातील ( सांगोला ,पंढरपुर , बार्शी व अशीच सोलापुरच्या जवळपासची ठिकाणे) बोलीभाषेतील शिव्यांचे उल्लेख असतात . पण त्यांत कधी 'कडु' या शिवीचा उल्लेख दिसला नाही. कडु हा अपशब्द बहुतेक नंतर अस्तित्वात आला असावा.

मृत्युन्जय's picture

2 Jun 2015 - 1:59 pm | मृत्युन्जय

मस्त आहे धागा. मजा आली वाचताना.

इकडे आणि पल्याड काहींनी मला प्रश्न केला कि बाणा ठीक आहेस ना ? डोक तापलयं का ? राग आलाय का ?
हो, माझं टाळकं जाम सटकल आहे... कारण ज्या पद्धतीने आपल्या सैनिकांना ठार केले जात आहे ते कुठेतरी माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे आहे. जेव्हा पासुन उरी ची घटना झाली तेव्हा पासुन कुठेतरी मनात काही तरी ट्रिगर झाले आहे.शिवाय ज्या गोष्टींचा अंदाजा होता तेच आता सगळीकडे दिसत आहे, ते म्हणजे आपल्या लष्कराने केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंर मोकाट सुटलेले वायझेड राजकारणी आणि बॉलिवुड तसेच निर्बुद्धवादी त्यात आता बटाट्याची फॅक्टरी लावणारे सुद्धा भरती झाले आहेत...
यांच्यासाठी माझ्या मनात असलेल्या भावना खाली एका व्हिडियोत व्यक्त झालेली आहे. या धाग्याचा आणि खालचा व्हिडियो यांचा संबंध योग्य वाटले म्हणुनच माझ्या मनातील भावना याच व्हिडियोतुन व्यक्त करत आहे. व्हिडियोतील व्यक्ती स्वतः कमांडो ट्रेनर आहे हि महत्वपूर्ण बाब लक्षात ठेवुनच हा व्हिडियो पहावा. १८ वर्ष वय पूर्ण असणारे आणि ज्यांना झेपेल त्यांनीच हा व्हिडियो पहावा हि विनंती ! व्हिडियो पहाणारच असाल तर तो पूर्ण पहा आणि मगच तुम्ही तुमचे मत बनवा ही अजुन एक नम्र विनंती.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations