एक डाव माह्या सपनात श्रीदेवी आली.
म्हने काळजी नोको करु तुले भेटनार हाये पैसेवाली.
आंग पाय धुऊन दुसर्याच दिवशी मोहीम चालु केली.
पन घराच्या बाहेर निंघाल्या बरोबर, घरचीच मांजर आडवी गेली.
बस स्टँड वर ऊभा होतो तं, आल्या जींसवाल्या.
म्या केसातुन हात फीरवला तं फिदीफिदी हासुन गेल्या.
मनात म्हनलं आपन साली कारवालीच पाहाव.
लगन करुन तिच्यासंग मंग भल्ली ऐश कराव.
कार थांबवाले एकीची, हात पुढं केला.
तं समोरुन येनार्या मानसानं, हातात रुपया टाकला.
म्हने धडधाकट असुन भीक मांगाची लाज नाही वाटत काय तुले?
म्हटलं, तु काय भिकारी समजला काय बे मले?
मांगं पलटुन पाह्यलं तं एक कार येऊन थांबली.
अनं तिच्यातली पोरगी मलेच बोलाऊन राह्यली.
मनात म्हनलं हे काहुन बोलावते आपल्याले?
आपल्यासाठी श्रीदेवीनंच तं पाठंवलं नसंन हिले?
जवळ गेलो तं थे म्हने, इंजीनीरींग कालेज कुठं हाये?
म्या बी थाप ठोकली, मले बी तं तिथंच जायंचं हाये.
दरवाजा उघडुन थे म्हने, मंग माह्यासंग चाला.
मनात म्हनलं साला भल्ला चान्सं आला.
गाडीत बसल्याबरोबर तिनं गानं चालु केलं.
पन इंग्रजी होतं म्हनुन मले थोडंसकबी नाय समजलं.
म्या इच्यारलं तुमचं लगंन झालं का नायी?
थे म्हने तुमच्यासारखा कोनी हॅन्ड्समच भेटला नायी.
नाव इच्यारलं तं थे म्हने, माय नेम इज शालु.
मनात म्हनलं च्या बहीन, दिसते बी भल्ली चालु.
म्हने मायं तुमच्यावर पहील्या नजरेतंच प्रेम बसलं.
मनात म्हनलं, हे तं सालं, भल्लं मस्तं जमलं.
जवळ ओढुन म्या तिच्या ओठात ओठ घातले.
तेवढ्यात माह्या मायचा आवाज ऐकु आला मले.
माय म्हने अमल्या उठतं का नायी? अरे सुर्य वरतं आला,
अन् मंघान् पासुन पाहुन राह्यली , थ्या मांजरीलेच पिचकुन राह्यला….
प्रतिक्रिया
15 Nov 2013 - 7:32 pm | जेपी
=))
आवडल .
विदर्भाकडची भाषा आहे का ? जांगडबुत्ता आठवला .
15 Nov 2013 - 7:34 pm | जेपी
वेगळ दिल असता तर बर झाल असत
15 Nov 2013 - 7:38 pm | बॅटमॅन
कविता खोलून लागलो वाचायले
हसू हसू सर्वे रोफलू रोफलू र्हायले
15 Nov 2013 - 7:42 pm | वडापाव
ह ह पू वा
मस्त कविता
15 Nov 2013 - 8:56 pm | अत्रुप्त आत्मा
@अन् मंघान् पासुन पाहुन राह्यली , थ्या मांजरीलेच पिचकुन राह्यला….>>>
16 Nov 2013 - 4:40 pm | अतिसामान्य मी
;-)
16 Nov 2013 - 5:19 pm | स्पंदना
गोऽऽड आहे भाषा.
कविता तर सुप्पर लाईक!
16 Nov 2013 - 8:34 pm | प्यारे१
+११११
17 Nov 2013 - 2:09 pm | चित्रगुप्त
थोर हो, फारच थोर.
साष्टांग दंडवत स्वीकारा, आणि आणखी पिचकुन राहल्याच्या कविता लवकर टाका.
17 Nov 2013 - 2:19 pm | चाणक्य
आवडली रचना.
18 Nov 2013 - 1:31 pm | दिपक.कुवेत
दोन्हि आवडली
18 Nov 2013 - 1:36 pm | सुहास..
हा हा हा ! ...लई भारी हो मेंढे पाटील ;)
18 Nov 2013 - 1:40 pm | प्यारे१
खिक्कुशा
(श्रेय अव्हेरः स्पा आणि वल्ली)
18 Nov 2013 - 3:59 pm | अमोल मेंढे
धन्यवाद मित्रांनो...
18 Nov 2013 - 7:14 pm | धन्या
पोटट्या, बम मजा आली.
झिंगीनांग चिकिनांग झिंगीनांग चिकिनांग :)
19 Nov 2013 - 8:10 am | आतिवास
कविता आणि भाषा - दोन्ही आवडलं :-)
19 Nov 2013 - 8:15 am | पाषाणभेद
जबरा
21 Nov 2013 - 9:39 pm | ajay wankhede
दीवास्वप्न लई भारी
अजय
"रांड सांड सीढीं सन्यासि
ईनसे बचें तो सेवे कासी"
21 Nov 2013 - 10:01 pm | रेवती
धन्य आहात.
21 Nov 2013 - 10:45 pm | पैसा
कविता वाचून मस्त मजा आली!