व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.
8
तुझ्याबरोबर आणखी कोण आहे?/
अॅन आहे
तो कोण आहे?
अर्धमानव
म्हणजे?
म्हणजे मानवी शरीराशी तंतोतंत जुळणारी तशीच यंत्रणा वापरुन कृत्रिम-रित्या बनवलेला रोबोट .फक्त दर आठवड्यातून एकदा त्याला रीचार्ज करावे लागते... आणि त्या रोबोमध्ये अॅलेक्स नावाच्या एका व्यक्तीचा आत्मा आहे ,जो 2057 साली मृत झाला होता.
तो कसा काय?
फोन वापरताना बरेच वेळा फोन ची कॉर्ड एकमेकात आडकते
फोन येतो व आपण गडबडीत रिसिव्हर उचलतो अन कॉर्ड एकमेकात गुंतल्याने फोन पण रिसिव्हर सगट उचलला जातो अन गोंधळ उडतो.
ते टाळण्या साठी एक साधी युक्ती.
१..बाथरुम मध्ये वापरतो त्या रबरी नळी चा साधारण ३ " लांबीचा तुकडा घेणे (चित्र क्र .एक)
२.कॉर्ड काढुन त्यात हा रबरी नळिचा तुकडा साधारण मधोमध ओवणे (चित्र क्र .दोन )
"
ह्या वर्षाचे अंदाजपत्रक सादर होण्यापूर्वी बाजार नरमच होता. अंदाजपत्रकाच्या येण्यापूर्वीची धामधूम बाजारात दिसत नव्हतीच. अर्थमंत्र्यांच्या समोर पर्याय कमी होते आणि शेअर बाजाराच्या अपेक्षा बर्याच होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला व्याज दर पाव टक्क्यानी कमी करून रीजर्व्ह बँकेनी बाकी सर्व जबाबदारी अर्थखात्यावर सोपवली होती. २०१४ हे निवडणूकीचे वर्ष असल्याने अर्थमंत्र्यांनी कमीतकमी राजकीय जोखीम घेण्याचा पवित्रा आज चिदंबरम यांनी घेतलेला दिसतो आहे. अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी कसेही करून मँडीटरी ओव्हर संपवण्यासाठी खेळाडू जसे खेळतात तसे आजचे अंदाजपत्रक आहे.
'प्रेम' ही खरेच इतकी मोहक गोष्ट आहे का !
चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनेक तर्हेनी हाताळूनसुद्धा अजून शोध घेणे संपलेले नाही.
--
आत्तापर्यंत असंभव, अग्निहोत्र अशा मालिका आणि गैर, मुम्बई पुणे मुम्बई, एक डाव धोबीपछाड असे चित्रपट काढल्यानंतर
दिग्दर्शक सतिश राजवाडे यांचा 'प्रेमाची गोष्ट' नावाचा हा चित्रपट.
त्यांचा गैर सारखा सस्पेन्स थ्रिलर हिट्ट होऊनही ते बहुधा मुम्बई पुणे मुम्बई,
एका लग्नाची दुसरी गोष्ट सारख्या चित्रपटांसाठी जास्त ओळखले जाऊ लागले असावेत.
जादूगार चिदंबरम यांचा दीड तासाचा खेळ संपला. दोन वरून पाच लाख पर्यंत आयकरात मुक्ती मिळेल अशी जादू दाखवायची राहूनच गेली. त्यामुळे घरी, दुकानात बजेट पहाणारे फार नाराज झाले. "एकतरी कट वाला शॉट पायजे व्हता राव ! " असे निराशेचे उदगार पिटातल्या प्रेक्षकाने काढावे तसे झाले. असो. मी माझ्या समान दोन ते पाच वाल्यांच्या दु:खात सहभागी आहे.
आता खालील वार्तापत्र पहा.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन सध्या भारताच्या दौर्यावर आहेत. मे २०१० मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच केलेल्या भारत दौर्यानंतर अवघ्या २-२.५ वर्षातला हा ब्रिटिश पंतप्रधानांचा दुसरा दौरा. १४० व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींचे ब्रिटनच्या आजवरच्या इतिहासातले हे सर्वात मोठे व्यापारी शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आहे. अर्थात, मागच्या प्रमाणे ह्याही दौर्याचा उद्देश उगवती महासत्ता असलेल्या भारताबरोबर व्यापारी संबंध दृढ करुन काही व्यापारी करारमदार करता येतील का ते पाहाणे हाच.
पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्या नेत्याचे भय असते.
पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.