कॅमेरा /जुगार्/जुगाड
चांगला कॅमेरा पाहिजे असे मनाने घेतले..
तसा माझ्या कडे ओलिंफस चा एका डिजिटल कॅमेरा आहे..
पण पेन्सिल ब्याटरिवाला, वैतागवाडी काम.. तसेच तो थोडा बोजड पण आहे..
त्या मुळे त्याची ब्याग घेवून तो बाळगणे पण कंटाळवाणे व्हायचे... शिवाय ४ मेगा पिक्सल चा तो कॅमेरा..
नेट वर कलरपिस्कचे कॅमेरे पाहिले अन सिगारेट केसच्या आकाराचे ते हॅन्डी कॅमेरे मनात भरले.. निकॉन कंपनिचाच कॅमेरा घ्यायचा घेतला तर असे मनात ठरवले