प्राध्यापक

श्री गावसेना प्रमुख's picture
श्री गावसेना प्रमुख in काथ्याकूट
3 Apr 2013 - 10:32 am
गाभा: 

महाराष्ट्रात गल्लो गल्ली कॉलेजेस चे पेव फुटले आणी प्राध्यापक नावाची एक नवीच जमात लोकांच्या नजरेस यायला लागली,त्या अगोदर बहुसंख्य विद्यार्थी हे ९ वी १० वी पर्यंत च गुचक्या देत बाहेर व्हायचे,हे प्राध्यापक म्हणजे चालता बोलता सरस्वतीचे अवतारच,

बिचार्या प्राध्यापकांना शिक्षणाचा खर्च् भरपुर,वर जिथे ते नोकरी करतात तिथले संस्था चालक हे प्राध्यापकांच्या अर्ध्या वयापर्यंत त्याला अर्धाच पगार देणार्,बिचार्यांच कस काय भागणार.
मग हे कॉलेज मध्ये शिकवण कमी करु लागले आणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी बोलावुन शिकवु लागले(ज्याला आपण क्लासेस वैगरे म्हणतो),प्राध्यापकांचा पगार हा वेतन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे वाढत गेला ,तरी महागाई ही काय त्यांचा पगार पाहुन वाढते काय्,त्यांना त्या पगारात काय परवडणार.

मग त्यांनी कॉलेजात शिकवण जवळ जवळ बंदच केल्,आणी पोर कॉलेजात जायच सोडुन ह्या प्राध्यापक महाशयांच्या घरी जायला लागली,तुम्ही कोणत्याही शहरात बघा एखाद्या बंगल्याबाहेर गठ्ठा सायकली दिसल्या की हा प्राध्यापकांचाच बंगला समजावा,त्यात सरकारने पगारवाढ द्यायच सोडुन नेट सेट च बुजगावण उभ केल(नेट सेट केल्याने तरी काय फरक पडतो),नेट सेट वाल्यांना जास्तीचा पगार बाकीच्यांनी काय कराव मग्,पी एच डी केली की पगार वाढतात हे कळल्यापासुन पी एच डी वाल्यांचा सुळसुळाट झाला,पर्त्येक इंक्रीमेंट ला १०००/२००० चा फरक पडतोच्,त्यातही दुसर्याच्या लेखातुन ढापुन स्वता पी एच डी घ्यायला लागले,ह्यावर विद्यापीठाने उतारा काढला त्या लेखांना डिजीटल स्वरुपात साठवण्यास सुरवात केली,त्यामुळे ह्याला पायबंद बसतो की नाही हे नंतर कळेलच.
हं तर मी म्हणत होतो की आता ह्या नेट सेट मुळे दोन प्राध्यापकांच्या पगारात भली मोठी तफावत झाली,नेट सेट वाल्याला ७०/८० हजार बिगर नेट सेट वाल्याला २० /३० हजार्,मग अडलेय कुठे
तो आत्ता लागला त्याला ५०००० पगार व मी २० वर्षापासुन नोकरी करतोय मला फक्त २० /३० हजार हे नाही चालायचे,(झाली पोट दुखी चालु कुणी इनो द्या रे)मग काय संप करायचा ,समाजाशी आपल्याला काय घेण देन्,आपला पगार भला आपण भले, ही बाब महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक जीवनाच्या मुळावर उठलीये ह्याला कोण जबाबदार सरकार की जनता की हे प्राध्यापक लोक्स,,http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5298448253712619367&Se...?
ह्यांनी संप करायचा सरकारणे मागण्या मान्य करायच्या,हेच चाललेय वर्षाणुवर्षे चालु द्या कुणाच काय जातय.
दुसर्या बाजुला शिक्षणापासुन महाराष्ट्रातील लाखो मुल वंचीत आहे त्याच काय http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4685821476739781916&Se...
वित्तविना मती गेली
मती विना गती गेली

गती विना विद्या गेली

विद्येविना शुद्र खचले

एवढे अनर्थएका वित्ताने केले...

प्रतिक्रिया

नि३सोलपुरकर's picture

3 Apr 2013 - 10:43 am | नि३सोलपुरकर

साहेबांनी मांडवली केली आहे आणी १५०० कोटी रुपये सरकार ने द्यावेत असा निरोप धाडला आहे असे वाचुन कळते.
बाकी खरे खोटे प्राध्यापकच जाणोत.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Apr 2013 - 11:10 am | घाशीराम कोतवाल १.२

प्रा डॉ च्या प्रतिसादाच्या प्रतिक्क्षेत .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2013 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चर्चा प्रस्ताव नुसताच विखुरलेला आहे. विषयाची माहिती घेऊन मांडणी नाही. 'प्राध्यापक' इतकाच संदर्भ चर्चा विषयात दिसतो आहे , असे वाटल्यामुळे विषय माझ्या आवडीचा असूनही माझा बॉ या विषयावर पास. आमची आठवण केल्याबद्दल धन्स.

बाकी, चालू द्या.

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

4 Apr 2013 - 11:44 pm | नाना चेंगट

लवकरच प्राध्यापक ही शिवी होईल अशी चिन्हं दिसत आहेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Apr 2013 - 8:42 am | श्री गावसेना प्रमुख

बाकी सरकारी कर्मचार्यांसारखे ह्या प्राध्यापकांना काहीही न करता पगार हवा असतो,
बरेचसे प्राध्यापक हे संस्थाचालकाला मस्का मारुन प्राध्यापक झालेले असतात ह्यांच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार.
संपकरी प्राध्यापकांनी आत्मपरीक्षण करायची नितांत आवश्यकता आहे.