नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा
ब देशाचा राजा: तुमचे नाणे दुप्पट वजनी असल्यामुळे आम्हाला एका नाण्यांसाठी दोन नाणे मोजावे लागतात.
अ देशाचा राजा: आपले कारीगर , आमच्या येथे पाठवा, आम्ही त्यांना आमच्या सारखे नाणे बनविणे शिकवू.
कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले.
कारीगराने नाणे बनविले, ब देशाच्या राजाने डोक्यावर हात मारला. शिकल्या प्रमाणे कारीगराने अ देशाचेच नाणे बनविले होते.