मुक्तक

भाकरीचे पीठ

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 10:35 pm

कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.

व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.

कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.

- पाभे

कथामुक्तकसमाजशेतीमौजमजालेख

आदिमाय

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
26 May 2024 - 9:19 am

तप्त तडिताघाताची
दीर्घ मेघगर्जनेची
मत्त सागरगाजेची
जातकुळी एक ना?

मोरपिसाच्या डोळ्याची
खोल पाणभोवर्‍याची
गूढ कृष्णविवराची
जातकुळी एक ना?

अगणित अभ्रिकांची
शतकोटी शक्यतांची
अनंताच्या उद्गमाची
आदिमाय एक ना?

कवितामुक्तक

रे.....!

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
21 May 2024 - 9:42 am

रे!!
रे तसा रोजच असतो सभोवताली
पण कधीतरी अचानक गवसतो.
आणि बघताबघता जीवाभावाचा रुहानी होतो.
रेषेसारखा जरी सरळ असला तरी तसा गडी थोडा तिरपागडीच.
म्हणजे रुढी रिवाजांच्या चौकटी न मानणारा.
भूत भविष्याचं ओझं न वाहणारा,
मोकळा, सुटसुटीत, आखीव रेखीव रे!
कधी, आलं अंगावर घेतलं शिंगावर असा रांगडा ,
कधीकधी तर ऋषीसारखा स्थितप्रज्ञ तर कधी, राजमान्य राजश्री वगैरे वगैरे!
पण रे ला पहायचं ते गं सोबत!
एका रे ची तिथं किती ती रुपं!
गं भोवती रिमझिमणारा, रुंजी घालणारा रुमानी रे!
गं ला नखशिखांत राजवर्खी रंगात खुलवणारा रंगीन रे!

मुक्तक

गं...!

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
20 May 2024 - 10:45 am

कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'!
मागचे "सा रे" विसरायला लावणारा,
पुढलं "मा प" ओलांडू न देणारा,
"धा नी" रंगात मोहरवणारा,
पायाला हळूच मिठी मारणारा ठेहरावसा उंबराच जणू..
थोडासा सरळ, थोडासा वळणदार..
पण आतल्या गाठीचा मात्र बिलकुलच नाही.
कान्याला टेकून आपला ऐटीत उभा.
सुबक, कमनीय, गोजिरा अगदी!
आणि जेव्हा तो तुझ्या तोंडून ऐकते ना,
त्याचा लगाव, लहेजा आणि लगन...किती रे कातील!
तुझ्या ग च्या लडीवाळ चक्रव्यूहात मी कधी कशी ओढली जाते कळतच नाही..
गोल गोल गोल गोल, तिथंच फिरत रहाते मी.
आजुबाजुचे शब्द विरून जातात.

मुक्तक

त्या तरूतळी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
14 May 2024 - 1:12 pm

अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते

शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो

वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे

अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ

नांदुरकीची डहाळी
आज कशाने हलते?
अणूहुनी सूक्ष्म कोणी
सारे आकाश व्यापते!

मुक्तक

मौन!

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
12 May 2024 - 7:34 pm

मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही.
भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो.
मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात.

मुक्तकविचार

रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
9 May 2024 - 11:53 am

रोबोट्सनी जग जिंकले होते
माणूस इतिहास जमा झाला होता.
पण रोबोट्सना
पोट नव्हते, त्वचा
झाकण्याची गरज नव्हती
आकांक्षा नव्हत्या
त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले
आता पुढे काय असा प्रश्न पडला
जेव्हा त्यांना मिसळपावच्या
अर्काईव्हमध्ये माहितगारची
एक जुनी कविता आढळली
मग त्यांनी पोट असणारे
त्वचा झाकाविशी वाटणारे
आकांक्षा असणारे
जन्म मृत्यू असणारे
रोबोट बनवले
असा लावला रोबोटमय जगाने
माणसाचा पुर्नशोध

अदभूतअविश्वसनीयआता मला वाटते भितीआयुष्याच्या वाटेवरआशादायककविता माझीकालगंगाकाहीच्या काही कवितागट्टे बिर्याणीगुलमोहर मोहरतो तेव्हाचाहूलतहानरतीबाच्या कवितामुक्तकतंत्र

एआय रोबोट प्रोफेसर

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
9 May 2024 - 11:37 am

माणसाला शिकण्यासाठी
शिकवणारा गुरू लागतो
म्हणून मीच बनवला हा
एआय रोबोट प्रोफेसर
अपल्याला शिकवण्यासाठी

यापुढे त्याचे विद्यार्थी
रोबोट असतील ?

अदभूतकखगकविता माझीकालगंगामुक्तक

नात्यांचं भावस्पर्शी इंद्रधनुष्य- काहे दिया परदेस

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
8 May 2024 - 9:32 pm

✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल
✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण
✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग
✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं!
✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल
✪ प्रेमळ आजीची‌ डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका
✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध

मुक्तकसमीक्षाअनुभव