तटबंदी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
9 Jun 2024 - 5:39 pm

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी
ओतप्रोत जे असे
सांग ते का न तुला दिसतसे?

त्रिमितीच्या पिंजर्‍या वेढुनी
अमित असे जे वसे
सांग ते का न तुला दिसतसे?

धन-ऋण एकाकार होती त्या-
-स्थळी शून्य जे वसे
सांग त्या अभाव मानू कसे?

जड-चेतन सीमेवर धूसर
तटबंदी जी असे
सांग ती का न मला दिसतसे?

अव्यक्तमुक्तक

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

11 Jun 2024 - 11:44 am | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर !
आस्तिकता मांडणारी अर्थपुर्ण रचना आवडली.

पुकलेहाशु !

चौथा कोनाडा's picture

11 Jun 2024 - 11:46 am | चौथा कोनाडा

आणि ...

जड-चेतन सीमेवर धूसर
तटबंदी जी असे
सांग ती का न मला दिसतसे?

सुरेखच !

आणि मला या शब्दाचा वापर करुन वेगळी मिती व्यक्त केली हे खासच !