मिशी नृत्य
असणे नसणे
जाणीव स्मृती
खर्या गूढ आभासी
मिशी नृत्य अधाशी
पुस्तक घेऊनी डोईवरी
शिष्या राहे उपाशी
असे ते शीष्ट दिसे
उष्टवी शब्द पिशी
मांडीने डाव मांडले
मिशीने शब्द पुसले-खुपसले
आपल्या जगण्यासाठी
शब्दांवरी नाच नाचला
तीने लेऊनी त्यांची मिशी
-स्वल्प प्रेरणा 'फ्रिडा काहलोची मिशी'