सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
* आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो. खरडफळ्यावर चर्चा लांबल्या तर इथे टाकता येतील.
_______________________________________________
* कालपासून एक पुस्तक वाचत आहे. # शेक्सपीअरची शोकनाट्ये - लेखक परशुराम देशपांडे. काॅन्टिनेण्टल प्रकाशन. आतापर्यंत शेक्सपिअरचे सुबोध केलेले लेखन असलेली इंग्रजी पुस्तके वाचली पण काही कळले नव्हते ते आता यातून कळायला लागले. पहिल्या चाळीस पानांच्या प्रकरणात शोकांतिका लेखनाचे विश्लेषण आहे. ते समजलं. एकूण चांगलं पुस्तक आहे.
कढीतली भजी :- या प्रकारातली पाककृती https://youtu.be/FU2JCUT-7bw?si=IkPFb2ZC9RXKU0eM
या विडिओतल्या कृतीप्रमाणे करून पाहिली. बरोबर झाली. ही भजी कढीतही टाकता येतील.( मेथीना गोटानी कढी - मेथीच्या भाजीची कढी.)आता थंडीत बाजारात मेथी येत आहे. खरं म्हणजे मेथा. खरी कसुरी मेथी क्वचितच येते. ती पराठ्यातही घालता येते. कमी कडू असते आणि हलका पोपटी रंग असतो.
प्रतिक्रिया
9 May 2025 - 10:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली.
-दिलीप बिरुटे
10 May 2025 - 9:22 am | वामन देशमुख
तुमच्याकडून दुसरी अपेक्षा काय असणार?
इथे सगळी मिपाखरे गुरुजींचा आयडी बॅन केल्याबद्दल नापसंती व्यक्त करत आहेत, त्यांचे ससंदर्भ लेखन, विस्तृत माहिती, ऐतिहासिक दाखले हे सर्व acknowledge करत आहेत आणि तुम्ही मात्र...
असो, मिपावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.
9 May 2025 - 2:43 pm | कंजूस
हल्ली गवि यांनी मिपासन्यास घेतलेला दिसतोय. गोव्याचे लेख लिहिले की ते हटकून हजेरी लावतात. पण ते कुणी लिहित नाही.
9 May 2025 - 3:25 pm | गवि
बोला कंकाका. माझ्यालायक काय सेवा?
9 May 2025 - 8:00 pm | कंजूस
नमस्कार गवि, बरेच दिवसांत दिसला नाहीत म्हणून आठवण काढली.
7 Jun 2025 - 8:27 am | कंजूस
Starlink - elan musk - satellite internet
हे कसे काम करते याचा (अमेरिकेतल्या एक विडिओ)
https://youtu.be/Vh5cDulKvZ8?si=DVOI113Bq-_2_-Bm
हल्लीच दोन दिवसांपूर्वी इलान मस्कच्या स्टारलिंक कंपनीस भारतात सटेलाइटमधून इंटरनेट देण्याचे लायसन्स मिळाले. यांचे स्पेसएक्सचे जे उपग्रह आहेत त्यातून इंटरनेट देता येते. ( साधारणपणे अडीचशे टीवी चानेल्स देणाऱ्या उपग्रहांकडून आपण डिश टीव्ही पाहातोच आहोत).
इंटरनेट देणारे वेगळे असतील. या कंपनीशी एअरटेल आणि जियो यांनी अगोदरच करार केले आहेतच. नेट स्पीड किती मिळू शकतो ते वरच्या व्हिडिओत दिले आहेच.
आणखी काही वर्षांनी पुढची पिढी डोक्यावरच्या टोपीवर अँटेना बसवून आणि एका जागी बसून कुठेही इंटरनेट वापरणारी असेल.
एक दोन वर्षांत यांचे रेटही आवाक्यात येतील सामान्य माणसाच्या.
13 Jun 2025 - 2:18 pm | चौथा कोनाडा
रोचक.
1 Aug 2025 - 10:12 pm | गोरगावलेकर
आमचा पंधरा - सोळा जणांचा फॅमिली ग्रुप १ ५ ऑगस्टला माळशेज MTDC येथे मुक्कामी जात आहे . दुसऱ्या दिवशी नाणेघाट येथे जायचे आहे . जुन्नर बाजूने गाडी जाऊ शकते असे वाचले आहे . माळशेज घाटातून नाणेघाट येथे ट्रॅव्हलर गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे का आणि असल्यास रस्त्याची सद्यस्थिती कशी आहे याबद्दल माहिती हवी . नुकतेच कोणी तेथे जाऊन आले असल्यास मार्गदर्शन करावे.
गाडीतून उतरल्यावर किती अंतर चालावे लागते व कठीण श्रेणी काय ? ग्रुपमध्ये ३ ते ६५ वयोगटातील पर्यटक आहेत म्हणून विचारणा .
1 Aug 2025 - 10:51 pm | प्रचेतस
माळशेज घाट चढून आल्यावर चूल फाटा-गणेश खिंड - जुन्नर असा रस्ता आहे. ट्रॅव्हलर आरामात जाईल. दुसरा अजून लांबचा रस्ता म्हणजे ओतूर - जुन्नर.
गाडी पार नाणेघाटाच्या नळीपर्यंत जाते. जेमतेम 100 मीटर फ्लॅट वॉकने उतरंड सुरू होते. अजिबात सवय नसलेल्यांना नळीचे प्रथम दर्शन भयप्रद वाटू शकते मात्र प्रत्यक्षात सोपे आहे. बिनधास्त जावा.
1 Aug 2025 - 11:02 pm | गोरगावलेकर
तत्परतेने माहिती पुरवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
2 Aug 2025 - 8:03 am | कंजूस
एक सुचवतो.
घाट चढल्यावर खूबि फाटा, पिंपळगाव बसवंत धरणाची भिंत आणि त्यावरचा रस्ता( डावीकडे) खिरेश्वर गाव आणि मंदिराकडे नेतो. फंड्री सिनेमातलं चित्रीकरण झालेला रस्ता. येताना अथवा जाताना इकडे वळून बघता येईल.
2 Aug 2025 - 12:57 pm | गोरगावलेकर
वेळ मिळाला तर निश्चितच जाऊ . ते पिंपळगाव बसवंत नसून पिंपळगाव जोगा आहे बहुतेक .
शक्य झाल्यास ओझरच्या गणपतीचेही दर्शन घ्यायचे आहे .