गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३९

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
14 Apr 2015 - 8:45 pm

मागिल भाग..
मी दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाच्या पहिल्या येश्टीनी गावाकडे निघालो..
पुढे चालू...
==========================================

आणि पुन्हा येकवार तो येश्टीचा कंटाळवाणा परंवास करुन, मी दुपारच्या चिडचिडं करणार्‍या तिनाच्या तिरप्या उन्हात मुक्कामी पोहोचलो. बघतो..., तर चक्क काका त्याची ती भल्यामोठ्ठ्या क्यारियरची सायकल घेऊन स्वागताला उभा असल्यासारखा उभा.आणि बरोबर संघटनेतल्या दोनचार पोरांचं कोंडाळंही. आमची गाडी जशी ४नंबराला लागली तशी लाँचवरन मच्छी उतरवून घ्यायला धावतात,तशी ती पोरं माझी ब्याग आणि एक/दोन पिशव्या घ्यायला धावली. मग काका आणि मी निवांत गप्पा मारीत मारीत घराकडे निघालो.आणि त्या पोरांनी माझं हे लगेज आमच्या आधी घरी पोहोचवलं. काका मला सगळ्या तिकडच्या व्यावसायिक हालहवालीबद्दल अगदी कसून बारीक तपासणी केल्यासारखा विचारत होता. मी ही उत्साहानी सांगत होतो. शेवटी घरी पोहोचलो,आणि चाहापाणी आवरल्यावर माझा पहिला ताबा घेतला तो आज्जीनी. "आत्मू...तिकड्ये थेटरात शिनेमा वगैरे पाह्यलास का रे एखादा?" ..."नाय गं..वेळ कुठे मिळतो कामातून!" .. "बै बै..इतकी का पुण्यातली लोकं धार्मिक झाल्येत?" .. "अगं तसं नाय गो आज्जे! हा सीझन नाय का आमचा श्रावणाचा" ह्या वाक्यावर आमचा संवाद आला.आणि मग आईनी माझा ताबा घेतला "पण काय रे आत्मू? मी मागे एकदोन वेळा आल्येवते तेंव्हा पाह्यलेलं..तेव्हढीच गर्दी आहे का रे पुण्यात अजुन???" .."ह्हा ह्हा ह्हा ह्हा... अगं म्म्म्म्म्मम्मा ती गर्दी नेहमीच असते.शहर आहे ते!" ... "श्शी! कसल्या विचित्र हाका शिकलास रे तिकडे जाऊन..? म्म्म्म्म..म्मा काय? " ... " ह्ही ह्हा ह्हा..अगं तो मी र्‍हातो त्या वाड्यातला तो बारका शेखर आहे ना? तो कित्ती प्रेमानी हीच हाक मारतो त्याच्या आईला..मला ते फार आवडतं..म्हणून मी तुला माल्ली ना हाक. चिडतेस काय अशी? :( " .. "ह्हो! चिडतेस काय म्हणे!? "

आणि या चाललेल्या सुखसंवादात काकानी मग अपेक्षित भर घातलीच.."आगो...हाकेतले प्रेम बघशील का शब्द? वेडी कुठची! ..आणि चला जरा विश्रांती घेऊ दे त्याला जेवेपरेंत. आला नै जरा त जमली सगळी त्याच्या भोवतीनी.आमरिकेतनं आलेला नाहीये तो!" काकाच्या या दणक्यानी मग सगळेच उठले..आणि मी सांजेला बोलावणार्‍या त्या उन्हंसावलीच्या खेळाला अनुभवयाला ,त्या माझ्या प्राणप्रीय वाडीत पाय मोकळे करायला गेलो.

सुंदर ही हरीत दिसे,नारळी अन पोफळी..
ठाई तिच्या दडली गं माय माझी वेंधळी..
पायी तिच्या येई आज हाक एक आंधळी
बोलावुन बोलावुन थकली मायं सोवळी
भेटु दे गं..भेटु दे गं बंध कोणता नको
अवंजडंल्या कवनांचा छंद कोणता नको
प्रेमाची आस अशी अंतरात राहु दे
आर्त हाक ती सदैव ममतेतून पाहु दे

अश्या ओळी मनात बडबडत बडबडत...,मी वाडीतून पुढे होऊ लागलो.

पण सगळी मंडळी भेटलेली असताना,नेमकी ही कुठे गेली? हा प्रश्न मनात होताच. मनात म्हटलं..मी येण्यापूर्वी आदल्या दिवशीचा फोन केला नाही..म्हणून गाडी बिनसली,किंवा रुसलीबिसली की काय? पण मग गेली असेल गावात कुठेतरी ..असं समजुन मी वाडीतून चालत चालत मस्त छान ग्गार हवा देणार्‍या माझ्या विहिरीकडेच्या आंब्याच्या झाडाखालच्या त्या नारळाच्या ओंडक्यावर बसलो. आणि .. 'आता महिनाभर इकडे काढल्यावर पुन्हा एकदा आणि ते ही किमान सात आठ महिने आपणाला पुण्यपत्तनात जावे लागणार आहे...ही एक आता नेहमीचीच गोष्ट असणार आहे.. असलं विचारचक्र सुरु होत नै होतं ..तर एकदम मागुन येऊन कुणीतरी माझे डोळे धरले!

घाबरून पटकन मी भूत वगैरे ओरडणार होतो. पण हिचा तो आवडत्या अत्तराचा वास एकदम भस्सकन माझ्या नाकात गेला..आणि मी "वैजू..!" असा पटक्कन बोललो. पण हे सगळं एव्हढं सरळ घडल्यानी...गाडी मात्र माझ्यावर नाराजच झाली जरा. आणि माझ्या शेजारी बसुन मला.. "तू लगेच कशाला ओळखलस?" असा तक्रारीचा सूर झडला तिचा. "लगेच म्हणजे??? यात काय वेळ लावायचा असतो की काय? आमच्यात यजमान येईपर्यंत पवित्रक वळायला लावतात तसा?" यावर त्रासून हिनी .. "श्शी......! झाल्या सुरु तुझ्या धंद्यातल्या गोष्टी!" मग मी ही तिला.. "अगं आता पोष्टमन पत्रांबद्दल बोलणार नाही तर काय? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल बोलणार का?" असं सरळ विचारलं तर.." ह्हूं....तुला कै कळतच नै!" असं म्हणून तोंड फिरवून बसली.. " मग तू सांग ना..काय ते .. मला शाळेतपण कळायचं नै.. त्या मास्तरनी पण कधीच सांगितलं नै..मला तो-असच बिनडोक समजायचा..!" आणि त्यातल्या असच या शब्दावर मी मनात शंभरवेळा जीभ चावायला सुरवात करेपर्यंत माझ्यावर .." म्हणजे मी तुझी-मास्तर.....................????????????????" असं जोरात विचारत ही माझ्याकडे मारक्या म्हैशीचं तेज डोळ्यात एकवटून बघायला लागली,आणि कोपरानी मला ढुश्या दिल्यासारखं करून...'मी नै ज्जा.......!!!' पोझमधे जाऊन बसली.
मग मात्र मी तिला यथेच्छ चिडवून झाल्यावर.. "अगं पण मला खरच हे आपोआप ओळखणं नै ना कळत...! " असं अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. आणि मग हीनी अगदी समंजसपणानी "चला...नैच कळायचं ते कधी..म्हायत्ये मला.. उठा आता ..आणि चला तुमच्या घरला" असं म्हणत प्रकरण समारोपाला घेतलं. पण अजुनंही गाडी नाराजच होती. मग मी हळूच माझ्याचपाशी ठेवलेला,,तो गिफ्ट्पॅक खिशातून काढला..आणि दिला हतात.. तर मग त्यावर " हा एव्हढ्ढास्सा बारिक कसा आंगठिच्या बॉक्स एव्हढा? ड्रेसमटेरियल रेश्माचं आहे की काय? " असं म्हणाली..पण मी मुद्दामच काहिही न बोलता..फक्त डोळ्यांनी 'तो उघड!' असं खुणावलं. आणि मग मात्र आतली वस्तू बघुन, ही खरच सुखावली आणि मग मला "हे कसं कळलं तुला आता?... सांग सांग..." म्हणायला लागली. मग मी "मला खरच माहित नाही" असं पुन्हा आपलं त्याच प्रामाणिकपणे सांगितलं. पण आता ही न मागितलेल्या गिफ्टमुळे चांगलीच खुषीत आलेली असल्याकारणानी तितकिशी काहि चिडली नाही.. पण घराकडे जाई पर्यंत एकसारखं "सांग...सांग" चालु होतं. मग मात्र मी.. ह्या "सांग सांग" च्या वातीचा बॉम्ब नंतर घरात (काकासमोर..) फुटण्यापेक्षा इथेच मोकळा केलेला बरा म्हणून तिला म्हणालो.." तुझं ड्रेस मटेरियल घेतलं..आणि वाटेतून घराकडे परतताना त्या फुलवाल्याजवळ मला एकदम सोनचाफ्याचा वास आला. आणि तु ज्या कार्यक्रमात मला पहिल्यांदा दिसलिवतीस तो दिवस आठवला. तेंव्हाही तुझ्या केसात सोनचाफ्याची फुलं होती. मी काहि लक्षात ठेवलेलं नव्हतं.पण ते मला आठवलं.म्हणून मी हे सोनचाफ्याचं अत्तर घेऊन आलो. पण तुला एव्हढं आवडेल..असं खरच मलाही वाटलं नव्हतं" ह्यावर हिचा आनंदी चेहेरा आनंदीच राहिला..पण मागल्या दारानी घरात प्रवेशता प्रवेशता..मला एकदम "नशिब...एव्हढं तरी कळलं!" असा 'बुक्का' हिनी दिलाच.

पण आमची ही 'काहितरी कुजबुज' आज्जीच्या कानी गेली.आणि हिनी ओढणीआड दडवलेला..तो अत्तराचा बॉक्स आज्जीला कळला..आणि तिनी वैजूला "काय आहे गं? काय आहे?" करायला सुरवात केली. कळलं असतं तर कोणी काहि कारवाई वगैरे करणार नव्हतं माझ्यावर..पण मला मेलं फुकट कापरं भरायला लागलं. म्हटलं.., बाकि कुणालाही कळलेलं परवडलं..पण आज्जीला कळलं तर ती मला परत जाईपर्यंत छळणार. ह्याचे काय?. पण तेव्हढ्यात हिनी आज्जीला "कै नै हो वटवाघुळ पकडून आणलय...त्याचं तेल करुन लावतात ना वयस्क माणसांच्या दुखर्‍या पायांना...!" असं म्हणून मला हसवून हसवून पडायच्या बेताला आणलन. आज्जी मात्र वैजूनी ह्या खौट्पणे मारलेल्या दगडाला..काहिश्या चिडलेल्या परंतू नाइलाजात्मक मुद्रेनी सहन करत स्वयंपाक घरात गेली. मिही ह्यामुळे हिला "अगं ..इतकं खट्टकन आणि असं कशाला बोल्लीस? कळं तर कळ्ळं! त्यात काहि पाप आहे का?" असं म्हणताच ,हिनी मला "पाप नाहिच्चे! पण त्यांन्नी कश्शाला नाक खुपसलं आपल्यात?" असा प्रश्न टाकुन मला-ग्गार केलं. मी मात्र जेवणं होईपर्यंत मनातल्या मनात,हिच्या त्या वाक्यापेक्षा प्रसंगावधानाला जाम हसत होतो. तश्यातच हिनी माझ्याकडे पाहिलं..की मला ते हसू अजुनच अनावर होई. त्यातच सगळे जेवत असताना माडीवरून एक उंदिर माझ्यामागे पडला आणि पळून गेला. त्यावर सगळीच जणं हसली. पण आज्जीनी ह्या संधीचा फायदा घेत वैजुला "उंदिरच होता ना गं तुझ्या नवर्‍यापाठिमागे? ..नै तर वटवाघुळ असायचं!? " अस्सा दगड हाणला. आणि नंतर आंम्ही फक्त तिघेच हसलो..पण काकानी आंम्हाला अगदी हिटविकेट झाल्यासारखं नजरेनीच पकडलन. मी मनात म्हटलं..आता रात्री हाय आपली 'फोलिस तपासनी!'

पण माझा काका तो काकाच! त्याच्या एखाद्याला समजुन घेऊन समजावून सांगण्याच्या पद्धतीला तोड नव्हती. जेवणं झाल्यावर रात्री आंगण्यात शतपावली करता करता..तो मला म्हणाला , "आत्मू.. बाई आणि पुरुष विवाहानी असो,अथवा त्याशिवाय..परंतू नैसर्गिक भुकेची मर्यादा पाळत असतात,तोपर्यंतच त्यात गोडवा असतो. आणि तो असायलाही हवाच. नायतर ती पण एक विकृती होते.पण ती मर्यादा सार्वजनिकपणे व्यक्त होताना भानावरंही रहायला हवी. नायतर आपण गोठ्यातल्या गाईबैलांपेक्षा फक्त वेगळे हंबरतो एव्हढाच तिचा अर्थ होइल.." "तुझ्या बायकोस सांग...म्हणावं..मी मुलगी मानून तिला घरात मोकळेपणा तयार करून दिलाय..तो तसाच नीट जप. नायतर हा तुझा दुसरा बाप रुसेल हं तुझ्यावर!"
मला त्यातलं जे कळायचं ते कळलं..आणि मी ते हिला दुसर्‍या दिवशी सांगितलंही. पण ही घरामधे माझ्याही पुढे दोन पावलं मिसळलेली होती..हे मला नंतर कळलं. मी आणि काका ज्या एका एव्हढ्याश्या प्रसंगानी चर्चा करून र्‍हायलो होतो..तो प्रसंग हिच्या, आज्जिच्या आणि आइच्या गाविही नव्हता. मी हिला त्या बाबतीत बोलल्यावर मला ही म्हणते. "ते आंम्ही विसरलोपण दोघिजणी!" मी आश्चर्यानी हिला "अगं पण ..कसं???" असं विचारता झालो..तर त्याच्यावर हिनी मला चक्क एक थिअरीच सांगितलीन. .. "ज्याचं भांडण होइल,त्याच्यापेक्षा वेगळ्या माणसानी त्या भांडणाचा हिशेब पहायचा..तुमच्या आइच्या भिशीचा मी पहात होते...तसा! म्हणजे मग तो बरोब्बर कोणाचं काय चुकलं ते सांगतो. आणि ज्याची चुक संगितली जाइल..त्यानी सॉर्र्री म्हणायचच..कि संपलं ! आहे क्की नै सोप्पी आयडिया.? तुमच्या भटजींच्यात पण वापरा " मी ("मला" मिळालेल्या उपदेशासह! ;) ) थक्कच झालो हे ऐकून.. माझ्यामागे हीनी म्हणजे घरात ही अभूतपूर्व क्रांतीच केलीवतीन अगदी. नाहितर पूर्वी आइ आणि आज्जीचं कधी भांडण झालं, तर ते सोडवता सोडवता काकाही थकायचा कधी कधी!

एकुणातच ह्या संसाररूपी खेळाची वर्षदोनवर्षातच चांगली मजाहि यायला लागलेली होती. दिपावलीपर्यंतचा कालावधिही अत्यंत आरामात आणि सुखद चालला होता. त्यातच एक दिवस आंम्ही दोघे माझ्या गुरुजिंकडेही अगदी न कळविता गेलो. आणि अचानक भेट दिल्यामुळे गुर्जी जितके आनंदले..त्यापेक्षा काकु अधिक कितितरी सुखावली. पण मला हे सुखावलेपण अत्यंत साशंकित करत होतं. कारण मला भेटल्यावर काकू सुखावणारच होती..आणि मि देखिल तितकाच..पण मग 'माझ्यापेक्षा काकू आणखिनच का बरं सुखावली आहे?..कुठे नक्की ही दु:ख्खाची-एक्स्ट्रॉ जागा रिकामी झाल्ये?' हा प्रश्न मला छळू लागला. आणि त्यादिवशी दुपारची जेवणं झाल्यावर आमची ही .. पाठशाळेतल्या नवप्रवेशित बाळगोपाळांशी खेळण्यात रमलेली आहे..असं पाहुन मी काकूला "आज-मी भांडी घासणार! ..पाठशाळेत आल्यासारखं वाटू दे की मला एक दिवस ?" म्हणून आर्जव केलं. आणि मुद्दाम घरामागे धोत्राचा काचा मारून भांडी घासायला बसलोही..पण काकूला हे फार सहन होइ ना..आणि मधेच येऊन ति पण हात लाऊ लागली. पण तोंडानी गप्पच होती. मला हे गप्प-पण असह्य व्हायला लागलं आणि मी काकूला तिच्या माझ्या हातातलं काम टाकायला लाऊन..पाठशाळेतल्या दोन पोरांना हाक मारली..आणि त्यांना "मुलांनो...भांडी धुवा रे ही एव्हढी" असं सांगून काकूला तिच्या मनाविरुद्ध मागे वाडीत घेऊन गेलो.. आणि अत्यंत दाटलेल्या आवाजानी काकूला "सांग मला काय झालय ते?" असं विचारलं. तर काकू म्हणे , " नको रे बाळा विचारूस..आलास उगीच एक दिवस बायकोला घेऊन आनंदानी भेटायला..आणि कशाला माझी कहाणी ऐकतोयस?" .. मी :- "नाही! सांग मला....नायतर मी जाणार नाही आज इथुन. " ..काकू:- "हटवादी आहेस अगदी पूर्वी जसा होतास तस्साच! " मी:- "ते काहिही असो..पण सांगच .नैतर मी खरच जाणार नाही आज परत घरी" काकू:-" तुझा सदाशिवदादा आता वेगळा रहातो आमच्यापासून..तिकडे शहरखेडं असलेल्या त्या तालुक्याच्या गावी घरं घेतलायन.." ... मी:- "का पण? गुरुजिंशी भांडण वगैरे झालं का?" काकू:-"म्हटलं तर भांडणच..पण ते काय भांडण म्हणावं असं तरी आहे का रे? त्याचा आपला एकच आग्रह गुरुजिंपाशी.आता वयोमानानुसार पाठशाळा बंद करा.. किती समजावलं मी त्याला...म्हटलं...अरे,ही पाठशाळा हा तुझ्या बापाचा प्राण आहे रे!!!..तू तोच काढून टाकायला सांगतोस?" तर मला त्याच्या कोपिश्ट स्वभावाचं फळ दिल्यासारखा बोल्ला.. 'योग्य वेळ आली की प्राण जात नसेल,तर कुडीतून काढून टाकावा लागतो तो!' आता ही काय स्वतःच्या आइशी बोलण्याची पद्धत झाली का रे? हे शब्द तुझ्या गुरुजिंनी ऐकल्याक्षणी त्याला घरातून जा असं म्हणाले..आणि तो गेला..ह्यांची भांडणं झाली आणि माझा बळी गेला रे त्यात! " मला हे सदाशिव दादाचे शब्द कानामधे कोणितरी शिसाचा रस ओतावा तसे ऐकु येत होते. तळपायाची आग मस्तकभाजून बाहेर निघत होती.पण काकूच्या रडण्याबोलण्या समोर मी हे सगळं विसरून आधी तिला शांत केली .. "काकू.. तो गेलाय ना आता तर जाऊ दे .. आणि तुलाही म्हायत्ये..तो परत येणार नाही ते!." काकू:-"हो रे ..हे सगळं कळतं मला.. पण तो ही माझा मुलगाच ना? मनाला कुठनं समजवायचं रोज?" मी:-"अगं..पण एव्हढं सगळं घडलं..आणि तू आमच्यापैकी एकालाही का नाही कळवलस तात्काळ? आंम्ही येणारच नव्हतो का कुणी?" काकू:-"अरे तुम्हा मुलांना तुमची आयुष्य नाहीयेत का जगायला? आणि असंही एकदा आलवतं माझ्या मनात..पण तुझ्या गुरुजिंनी शप्पथ घालून ठेवली मला..मग मी काय करणार?"

मी अत्यंत निराश मनानी आणि काहिश्या रागातच पाय आपटत गेल्यासारखा गुरुजिंसमोर गेलो.. गुरुजिंनी मी आणि काकू घरात नाही,हे पाहुनच सर्व काहि जाणलवतं. आणि मी काहि बोलणार त्या आधीच मला , "आत्मू...बाळा बस बस ...कसं चाल्लय तुझं तिकडे पुण्याला? " असं म्हणून प्रसंग टाळायला लागले. पण आज मी काहिही ऐकायच्या मूडमधे राहिलोच नव्हतो.. " तुम्ही सदाशिवदादाचं का नाही ऐकलत? .. तुमच्या भांडणात माझ्या काकूला का त्रास?" असं एकदम बोलुन गेलो...आणि गुरुजिंसमोर मान खाली घालून रागानी रडायला लागलो. पाठाला बसलेले बाकिचे विद्यार्थीही एकदम स्तब्ध झाले. ही देखिल माझा हा कधिही न दिसलेला आवतार पाहुन थोडी हबकली.. मी हिला डोळ्यांनीच खूण करून 'काकुकडे जाऊन पहा' असं सांगितलं..आणि ही गेल्यावर काहिसा शांत होऊन.. पुन्हा गुरुजींना
मी:- "सांगा ना... का नाही ऐकलत सदाशिवदादाचं? तो बरोबरच म्हणत होता ना? "
गुरुजी:-" मुला...,तुझं अध्ययन झालं की विषय संपला का रे? बाकिच्यांनी कुठे शिकायचं मग?"
मी:-"शिकतील की दुसर्‍या पाठशाळांमधे...र्‍हाणारेत काय शिकायची?"
गुरुजी:-" अरे सखारामाच्या हिशोबी पुतण्या...,पण मी थकलोय का शिकवायला? .., हे तरी पहा दुसर्‍या बाजुनी..क्काय?"
मी:-" पण मग...एक/दोन वर्षात बंद करू...असं दादाला काहितरी तात्पुरतं आश्वासन देऊन तरी वेळ टाळुन न्यायची...आणि आंम्हाला कळवायचं..आंम्ही आल्यावर काहितरी मार्ग निघाला असताच की!"
गुरुजी:-"अरे मुला..आता ह्या जर तर च्या गोष्टी र्‍हायल्या फक्त. तुझा दादा निघून गेला जायचा तो.. आणि आला परत,तरी देखिल हिला जे दुखावून बोल्लाय..त्याची फेड केल्याशिवाय मी आत कसा घेइन त्याला? सांग बरं?"
मी:-"हो....अत्यंत अक्षम्यच बोललाय तो..नकाच घेऊ त्याला परत..पण आता या पुढे तुम्हाला शाळा चालवायची असेलच..तर चालवा..पण शाळेतल्या सगळ्या उटारेट्यापासून माझ्या काकुला सुट्टी द्या.आंम्ही माजीविद्यार्थी पैसे एकत्र करून पोहोचवत जाऊ ज्या त्या महिन्याला.. जास्ती १ नोकर आणि स्वयपाकी ठेवा.. पण काकुला आमच्या कोणाकडेतरी नाहितर..इथे विनाकामाचे सुखाने राहु द्या.. तेव्हढा तरी भार हलका झालाच पाहिजे तिचा! "
गुरुजी:-(शांतपणे..) "बरं...ठिक आहे... मान्य आहे मला..आजपासून पाठशाळेतुन काकुला रजा! आता राग सोड आणि तुझ्या बायकोला आपल्या सगळ्यांसाठी चहा करायला सांग बरं"

चहापाणि वगैरे सर्व झालं...आणि आंम्ही पाचाच्या सुमारास गुरुजींना आणि काकुला नमस्कार करून निघायच्या तयारीला लागलो. जाताना पुन्हा एकदा गुरुजींना मी आठवण करवून द्यायला विसरलो नाही. आणि आंगणाच्या कवाडीपाशी आलेल्या काकुलाही सांगितलं.."आता उद्यापासून पाठशाळेची आणि घरची देखिल सगळी वरंकामं तू आणि गुरुजिंनी देखिल करायची नाहीत. मी घरी गेल्यागेल्या काकाला इथल्यासाठी एक नोकर आणि स्वयंपाकि लाऊन द्यायची सोय पहायला लावणारे. आता माला वचन दे..की तुम्ही दोघेही फक्त शाळेतल्या मुलांकडेच पहाल. बाकिचं काहिही काम करणार नाही. झाडलोटंही करायची नाही.स्वतःचे कपडेदेखिल स्वतः धुवायचे नाहीत..करुं दे नोकराचाकरांना सगळी कामं.. तू शांतपणे रहायचं आता. नायतर मी तुला पुण्याला घेऊन जाइन माझ्याबरोबर...जाताना!" माझ्या ह्या नॉनश्टॉप बोलण्याला काकुनी अखेर ब्रेक लावलाच.. "बरं..बरं बरं..अरे किती बोलशील?" मी:-"मग तू ऐकणारेस का मी एव्हढं बोलल्याशिवाय?" काकू:-"अगं मुली .., तुझ्या नवर्‍याला थांबव गं जरा" (वैजू हसायला लागली. ) नुसता महापूर आहे महापूर.. वाहुन नेतो सगळ्यांना स्वतःच्यात...आणि स्वतःसाठी कुठ्ठेही रहात नाही. इथे होता तेंव्हा सकाळचा मऊभात केलन,तर सगळ्यांना खा..खा..करुन वाढायचा..आणि स्वतःसाठी तळाची खरपुडी पण ठेवायला विसरायचा..असला आहे हा...ह्याच्या गुरुजिंसारखाच! त्यांनाही त्यांच्या मुलानी त्यांच्याचसाठी सांगितलेलं समजलं नाही.. तसं ह्याचंही होइल आणि इथेच राहिल ...घरी ने त्याला. " ह्यावर मी ही रडता रडता हसायला लागलो..शेवटी वैजुनी आंम्हा दोघांमधेही मध्यस्थी करत काकूला "म्हायत्ये हो मला...मी पाठशाळेच्या गोष्टी तुमच्या त्या नोकराकडनं ऐकलेल्या आहेत.. " असं म्हणून पुन्हा एकदा मला चकित केलन..आणि ह्या काहिश्या समाधानानी दाटलेल्या हृद्य प्रसंगी, काकूचा निरोप घेऊन आंम्ही घराकडे परतलो.
===================================================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८..

समाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच! काय सरळ साधं लिहिता तुम्ही!

राघवेंद्र's picture

14 Apr 2015 - 9:00 pm | राघवेंद्र

हा ही भाग मस्तच!!!

वाह, कथानायक पण अत्तरं वैगरे आणतो म्हणे? निरीक्षण नोंदवलं हो!! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2015 - 9:24 pm | अत्रुप्त आत्मा

@कथानायक पण अत्तरं वैगरे आणतो म्हणे? निरीक्षण नोंदवलं हो!!>> अरे व्वा! धण्यावाद्स! आम्ही आपल्या विचक्षण निरिक्षण शक्तिपुढे ने'हमीच झुकत आलेले आहोत..आपल्या या(ही ;) ) न्रिक्षना बड्डलं आपनास माणाचा मुज्रा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 10:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

"""""""""""""कथानायकाची"""""""""""""" रसिकता आवडेश. :)

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 9:43 pm | पॉइंट ब्लँक

मस्त. ह्याच्यावर एक छान मराठी सिरियल होउ शकते.

खटपट्या's picture

15 Apr 2015 - 5:07 am | खटपट्या

त्या आधी एक पुस्तक आलं पायजेलाय !!

पॉइंट ब्लँक's picture

15 Apr 2015 - 6:58 am | पॉइंट ब्लँक

इथल कापी पेस्ट मारलं की झालं पुस्तक तयार, हाय का नाय?

निमिष ध.'s picture

15 Apr 2015 - 12:58 am | निमिष ध.

घ्या बुवाच्या अत्तर प्रेमाचे रहस्य इथे कळले तर ;)

येऊ द्या पुढची ष्टोरी

प्रचेतस's picture

15 Apr 2015 - 8:42 am | प्रचेतस

हा भाग पण एकदम मस्त.
वैजूवैनींचं पात्र कथानायकाशी बोलतं झालेलं दिसतंय आता हळूहळू.

सतिश गावडे's picture

15 Apr 2015 - 8:46 am | सतिश गावडे

छान सरकत आहे कथा पुढे.

कथा आवडली. पुभाप्र.

खटपट्या's picture

15 Apr 2015 - 11:11 am | खटपट्या

देवा, दर्शन लय दुर्लभ झालं बगा तुमचं !!

सुरेख लिहिलंय. कुजकट मेला तो सदाशिवदादा! :|
काकू आणि गुरुजी किती गोड, सरळ मनाची आणि मानी माणसं आहेत, त्यांची काळजी घेतली जाणार हे वाचून बरं वाटलं.

आणि हो, मुद्द्याची गोष्ट म्हणजे शेवटी डेस मटेरियल आवडलं की नै?

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2015 - 1:12 pm | अत्रुप्त आत्मा

@ आणि हो, मुद्द्याची गोष्ट म्हणजे शेवटी डेस मटेरियल
आवडलं की नै? >>> :-D ते मालाही अजुन माहीत नाही! :-D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2015 - 1:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

:-D ते मालाही अजुन माहीत नाही! :-D

तुम्हाला का कथानायकाला असा मला गोंधळात आणि तुम्हाला अडचणीत टाकणारा प्रश्ण माझ्या शंकेखोर मनाला पडलेला आहे =))

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2015 - 3:24 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्हाला का कथानायकाला असा मला गोंधळात आणि तुम्हाला अडचणीत टाकणारा प्रश्ण माझ्या शंकेखोर मनाला पडलेला आहे >>> आंsssssssssssss दु...दु...दु.. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif

ते लेखक म्हणून मला.. आणि (अजुन http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-050.gif ) अनभिज्ञ म्हणून कथानायकाला(ही) माहित नैय्ये! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif

किसन शिंदे's picture

15 Apr 2015 - 1:34 pm | किसन शिंदे

अत्यंत ओघवते लेखन! ३८ आणि ३९ दोन्ही एकत्रच वाचले. बुवा ललित लेखन तुम्ही अफाट करता राव. तेवढं जरा शुद्धलेखनाचं बघितलंत तर लेखन वाचायलाही फार मजा येईल. अर्थात आहे यातूनही तुमच्या मनातला आशय पोचतो आहेच.

शुद्धलेखन मार फ़ाट्यावर. बुवा शैलीतच वाचायला जाम मजा येते.

बॅटमॅन's picture

15 Apr 2015 - 2:10 pm | बॅटमॅन

फ़ाट्यावर नै फाट्यावर.

बाकी बुवांच्या शैलीत आहे तस्सं वाचायला खूप मज्या येते याशी सहमत.

बॅटमॅन's picture

15 Apr 2015 - 2:04 pm | बॅटमॅन

क्या बात है अत्रुप्तजी!!!!! खूप आवडलं.

बाकी

"कै नै हो वटवाघुळ पकडून आणलय...त्याचं तेल करुन लावतात ना वयस्क माणसांच्या दुखर्‍या पायांना...!"

आमच्या जातीवरच्या अन्यावाचा बदला आमी घेनार हां काय!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2015 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा

@ आमच्या जातीवरच्या अन्यावाचा बदला आमी घेनार
हां काय!>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-751.gif

नाखु's picture

15 Apr 2015 - 3:06 pm | नाखु

गावी घेऊन जा एकदा सुधारीत (मानवी) आव्रुत्ती तरी पाहू दे वटवाघळ ते वाटवादळ*
!!!
अर्थ फक्त व्यनीतून सांगीतला जाईल.
आत्मु भित