“पडणे” एक कला

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
15 Dec 2014 - 12:05 pm

दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे. आता तुमच्या लक्षात आले असेच की “पडणे” या विषयावर बोलण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती या भूतलावर नाही आहे.

काही लोक केळाच्या सालीवरून घसरून पडतात व मी “पडलो” असे तोंड वर करून सांगतात, अहो पण हे पडणे नाही आहे, हे चुकून केळाच्या सालीने तुमच्या पायाखाली यावे व तुम्ही पडावे एवढी साधी घटना आहे. पडणे एक कला आहे, एक आर्ट आहे. अनेक जण तर उभ्या उभ्या पडतात, का म्हणे तर चक्कर आली. अहो, दिवसभर व्यवस्थीत पाणी ढोसले असते, पोटाला मुठभर अन्न दिले असते तर काय बिशाद तुम्ही चक्कर येऊन पडाल?

पडणे म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही २०-२५ च्या वेगाने धावत जिना उतरत आहात व पाच एक जिने उतरल्यावर तुम्ही एका मोक्याच्या क्षणी उडाण करता व पुढे जिन्यावर पायाचा स्पर्श न होऊ देता तुम्ही शरीराच्या मदतीने बरोबर तळ मजल्यावर येता व लगेच हात झटकत उभे राहून मला काय झाले नाही, असे नाकातून आलेले रक्त शर्टाच्या उजव्या बाहीने फुसत सांगू शकलात म्हणजे तुम्ही योग्य रीतीने पडलात. अनेकदा आपण पडलो हे इतरांना सांगता यावे म्हणून काही महाभाग ठेचकाळले असले तरी “किती, जोरात मी पडलो!” असे बिनधास्त खोटे बोलून जातात, पण अश्या लोकांच्या मुळे आमच्या सारख्या सतत अभ्यास करून पडणारया लोकांच्यावर मान खाली घालण्याची वेळ येते हे त्यांना कळत नाही. पडण्याचे दुसरे सुंदर उदाहरण म्हणजे वाहन चालवताना पडणे (या विषयावर मी माझा पिय-चडी प्रबंध सादर केला आहे) वाहन चालवताना पडण्याचे अनेक प्रकार आहेत पण नेहमी ज्याचा आनंद घ्यावा म्हणजे वाहन घसरणे!

वाहनावरून घसरून पडणे आणि वाहनासहित घसरून पडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अनेक महाभाग आम्ही पाहिले आहेत जे वाहनावर बसतानाच पडले. मी त्यांच्याबद्दल लिहित नाही आहे, मी वाहनासहित जे पडतात अश्या थोर लोकांच्याबद्दल सांगत आहे. तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते) गाडी योग्य जागी आली म्हणजे काहीतरी गाढवपणा करावा, उदा. उगाच पुढील ब्रेक मारणे, समोर रस्तावर खडी दिसत असली तरी वेग वाढवणे, समोरचा खड्डा आपल्याकडे पाहून खदाखदा हसतो आहे व आपण त्याला टाळू शकत नाही हे माहिती असून देखील टाळण्याचा प्रयत्न करणे, एकादी सुंदरी बाजूने जात असेल तर तिचा चेहरा पाहण्याचा निरर्थक प्रयत्न करणे, तीव्र उतार असेल तर झिगझ्याग पद्धतीने उगाच गाडीचा वेग वाढवत जाणे.. इत्यादी इत्यादी. आता यातील कोणताही एक गाढवपणा केला कि तुम्ही सहजपणे पडू शकता. लगेच पडता येत नाही, थोडा अभ्यास करावा लागतो, पण जमेल. अजून एक वाहनाची दोन्ही चाके वर झाली व तुम्हाला कोणी थोबाडावर पाणी मारून उठवले म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे पडला नाहीत हे समजून घ्या व पुढील वेळी दक्ष रहा.

जेव्हा आपण वाहनावरून पडत असू, तेव्हा शरीराचा धरणी सोबत होणारा प्रत्येक स्पर्श आणि स्पर्श तुम्हाला जाणवलाच पाहिले, जेव्हा धरणीमाते चरणी तुमचे डोके तुम्ही ३-४ दा ठेवाल तर तो सुखद स्पर्श तुमच्या आंतरमनात नाहीतर किमान खोपडीवर कोरला जायलाच हवा. पडताना आपले पाय, आपले हात, आपली उरलेली सर्व हाडे कुठे कुठे आहेत याचा अंदाज तुम्हाला असायलाच हवा जेणे करून नंतर डॉक्टरने एखादे हाड गायब केले तर तुम्हाला समजू शकेल. याचे जिवंत उदा. मीच आहे, मी एक उच्च कोटीची पडण्याची कला दाखवली होती, पायातील हाड बाहेर आलेले मी याची देही-याची डोळे पाहिले होते पण नंतर डॉक्टरने बील दिले कि पायाचे हाड सापडले नाही म्हणून रॉड घातला. तर आपल्या सर्व हाडांची दक्षता घ्या आणि हो, तुम्ही पडलेले आहात, बरं तुम्ही एकटे पडलेले नाही आहात, तुमचे वाहन.. ह्या ह्या ह्या.. विसरला काय राव!!!! तर ते वाहन एकतर तुमच्या पुढून घसरत असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही, पण ते मागू घसरत येत असेल तरी काळजी करू नका, जे घडणार ते घडणार. मग थोड्यावेळाने सर्वकाही थांबेल, म्हणजे तुम्ही, तुमचे वाहन, मागचे ट्राफिक! घाबरून जायचे नाही, सावकाश हसत हसत उठायचे, हसणे मस्ट आहे, कारण तुमचे नाक तुटले असेल, किंवा बत्तीस पैकी काही शिल्लेदार तोंड सोडून गेले असतील, गालावर कुठे लागले असेल तर लगेच जाणवते. मग हळूच पाय हालवून पहा, पाय हालला, म्हणे तुम्ही हालवल्यावर हालला तर ओके, पण आपोआप लुडकला असेल तर जयपूर फुट स्वस्त झाले आहेत काळजी नसावी. पाय सलामत असतील तर हात हालवून पहा, मग मान, मग पार्श्वभाग.. दुखत तर सर्वत्र असेल पण कळ येत नसेल तर तुम्ही पुन्हा पडण्यास सज्ज आहात.. याची मी खात्री देतो.

• नेहमी डोक्यावर हेल्मेटची सवय ठेवा, मी अनेक वेळा त्याचमुळे वाचलो आहे. आणि वाहन काळजीने, काळजीपूर्वक चालवा (आता मीच ३ दिवसापूर्वी पडलो, लगेच दुसऱ्याच दिवशी त्याच जागेवर अजून जोरात पडण्याचा पराक्रम केला आहे, शक्यतो हे विश्वरेकोर्ड माझ्या नावानेच लागेल. तरी घ्या मनावर आणि सुरक्षित रहा!)

धोरणमांडणीकलापाकक्रियाइतिहासबालकथामुक्तकभाषाव्युत्पत्तीविनोदसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादसल्लामाहितीसंदर्भमदत

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

15 Dec 2014 - 12:08 pm | भिंगरी

मिपावर पडलेली मी पयली का?

वाचून पडला असाल तर उत्तम आहे!

भिंगरी's picture

15 Dec 2014 - 1:29 pm | भिंगरी

धाडकन पडले आहे,तेही भरपूर खाऊन,पिऊन(पाणी)

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 12:14 pm | टवाळ कार्टा

जो पर्यंत "प्रेमात" पडत नाहीत किंवा "आपटत" नाहीत तो पर्यंत तुम्ही "पडलाच" नाहीत ;)

तो काय माझा "प्रांत" नाही हा ;)

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 12:22 pm | टवाळ कार्टा

अशांना मग "बायको" नामक "शक्ती" तोंडघाशी पाडते =))

(कृ.ह.घे.)

दशानन's picture

15 Dec 2014 - 12:25 pm | दशानन

आज सकाळी फेसबुक वर खालील कमेंट दिली होती ;)

"मी प्रेमात पडणे व प्रेमभंग यावर एवढे लिहले मिसळपाव या साईटवर की एका वाचक मित्राने लिहले होते "राजे, तुमची मोनोपॉली झाली आहे प्रेमभंग हा विषय. नवीन रक्ताला वाव दया" तेव्हा पासून तो विषय सोडला! "

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 12:32 pm | टवाळ कार्टा

=))

प्रेमात 'पडल' तर ठिक आहे ,पण 'आपटल' तर....

"तु पारो झाल्यावर,मी देवदास झालो,
चंद्रमुखीच्या शोधात,जिंदगी बरबाद केलो"
अशी अवस्था होऊ शकते. *wink*

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 12:33 pm | टवाळ कार्टा

या बाबतीत "उस्ताद आमिरखां" यांचा सल्ला नेहमी लक्षात ठेवावा....बस, ट्रेन और... ;)

पैसा's picture

15 Dec 2014 - 1:04 pm | पैसा

परवा फेसबुकावर तुमचा पराक्रम पाहिला. टाईप करण्याइतपत हात जागेवर आला का?

दशानन's picture

15 Dec 2014 - 1:09 pm | दशानन

डावा हात हातात आला आहे, उजव्याची ३ बोटे काम करू लागले आहेत. पण सर्व पार्ट व्यवस्थित जागेवर येण्यासाठी १५ दिवस लागतील... बाकी ऑल ओके!
:D

पैसा's picture

15 Dec 2014 - 1:12 pm | पैसा

कोण तरी डॉक्टरने सांगा प्लीज, आपल्या शरीरात एकूण किती हाडे असतात, म्हणजे या दशाननाला अजून किती वेळा हॉस्पिटच्या वार्‍या करायचा फर्स्ट टैम चान्स आहे? रिपीट लक्षात घेतलेले नाही! :D

यावेळी नाक,खांदे हे दोन पार्ट माझ्याकडे आहेत हे समजले :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Dec 2014 - 1:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शरिरात २०६ हाडं असतातं.

बोले तो २०६ टाईप का सिर्फ हड्डी होता है! तोडते वक्त सोच्ते थे क्या =))

(रेफ्रन्स मुण्णाभाई येम.बी.बी.येस. =)) )

दशानन's picture

15 Dec 2014 - 1:20 pm | दशानन

आयला!
यातील माझी बघा... नाक, दोन खांदे, उजवा हात, एकदा डावा हात, एकदा दोन्ही हात, एका गुढगा.. डावा, एकदा उजवा पूर्ण पाय (तीन हाडे असतात, तिन्ही) तळपाय घे तुटण्यासाठीच निर्माण झालेले असतात म्हणून ते जमेत धरले नाही. एकदा कंबर, डोक्यावर १६ टाके आहेत पण कवटीला काय झाले असेल का नाही ते माहिती नाही म्हणून ती पण मोजत नाही. =)) =))

:D

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 1:24 pm | टवाळ कार्टा

haa

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Dec 2014 - 1:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

तुमचा ऑर्थोपेडिक्स डॉक्टर सगळ्यांना आमचा नेहेमीचा पेशंट आहे असं सांगत असेल ना? =))
तुमची हिस्टरी बघता फक्त जिभेचं हाड जागेवर आहे =))

ह.घ्या.

मी सर्व ऑर्थोपेडिक्स डॉक्टर यांचे पोट भरावे म्हणून दर वेळी वेगळा पकडतो :D

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 1:29 pm | टवाळ कार्टा

हे घेउनच टाका आता \m/

he

दशानन's picture

15 Dec 2014 - 1:30 pm | दशानन

आयडीया उत्तम आहे :D

पैसा's picture

15 Dec 2014 - 1:33 pm | पैसा

हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर बायको लाटणे घेऊन वाटच बघत बसलेली असेल घरी!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Dec 2014 - 1:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१० डोकी लागतील आयर्न मॅन ला =)) आणि त्यांना आयर्न पेक्षा कॅल्शियमची जास्त गरज आहे =))

=))

कॅल्शियमचा रतीब चालू असतोच!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Dec 2014 - 1:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

@दशानन

आपसे गिरा हुआ इन्सान आज तक नै देखा =)).

काळजी घ्या. गेट वेल सुन!!! आणि दहाच्या दहा डोक्यांना एक एक हेल्मेट घ्या =))

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 1:25 pm | टवाळ कार्टा

Beee

=))

अनिल यादव नावाचा माझा दिल्लीत एक मित्र होता, त्याने जानेवारी २००५ ला पहिला अपघात करून घेतला ;) पाय तुटला, सलग त्या वर्षी त्याने त्याच जागी ३ वेळा अपघात करून घेतला ;) व टोटल सहा हाडे त्याची त्या वर्षी मोडली होती :D

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Dec 2014 - 2:04 pm | ज्ञानोबाचे पैजार

पडण्याचा एवढा दांडगा अनुभव असेल तर पुढच्या लोकसभेला उभे रहाच .

पैजारबुवा,

भिंगरी's picture

15 Dec 2014 - 2:12 pm | भिंगरी

कोणाच्या तिकीटावर?
काँग्रेस की मनसे?

आयुर्हित's picture

15 Dec 2014 - 2:33 pm | आयुर्हित

आपण लिहिलेल्या वाक्यावरून मला मै तेरा हिरो आठवला.

कि. क.. एक आर्ट है, एक कला है!

ओ मेरी जान तेरा यूं बार बार गिरना, तो गलत बात है,
अपने हड्डीयोंको को संकट में लाना, तो गलत बात है,

Please get well soon!

प्यारे१'s picture

15 Dec 2014 - 3:33 pm | प्यारे१

चान चान!

अद्द्या's picture

15 Dec 2014 - 3:34 pm | अद्द्या

हिहीहाह

हसून हसून पडलो =)) =))

बबन ताम्बे's picture

15 Dec 2014 - 3:35 pm | बबन ताम्बे

चांगले लिहीलेय.

तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते)
हे चुकुन सुद्धा पुणेकरांना समजवण्याचा प्रयत्न करु नका ! :P स्वहित आणि आत्मरक्षा /सुरक्षा हा विषय त्यांना समजण्या पलिकडचा आहे, असे हल्लीच मिपावर झालेल्या चर्चेतुन मला उमगले आहे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

मुक्त विहारि's picture

16 Dec 2014 - 1:45 am | मुक्त विहारि

स्वतःच्या चुका मान्य करत, स्वतः वरच विनोद करणे, फारच कमी लोकांना जमते.

श्रीरंग_जोशी's picture

16 Dec 2014 - 1:52 am | श्रीरंग_जोशी

असे लेखन करण्याची निमित्ते यापुढे तुम्हाला न भेटो ही प्रार्थना.

वेल्लाभट's picture

16 Dec 2014 - 11:39 am | वेल्लाभट

पडतो जरा आता.

योगी९००'s picture

16 Dec 2014 - 12:53 pm | योगी९००

शारिरीक जास्त वेळा पडलो नाही पण "तोंडावर पडलो किंवा आपटलो" असे खूप वेळा झाले आहे...

पडण्यावरून गडकर्‍यांच्या एक लेख आठवला. बाळकराम का तिंबूनाना यापैकी कोणाचे तरी वडील एकदम विक्षिप्त असतात. ते एकदा जिन्यावरून पडतात तर जिन्यावर राग काढण्यासाठी .."पाड पाड मला ..बघतोच किती वेळा पाडतोस ते" असे म्हणून मुद्दाम त्याच जिन्यावरून ४-५ वेळा पडून घेतात..(आणि शेवटी हॉस्पिटलात जातात). गडकर्‍यांनी या प्रसंगाचे छान वर्णन केले होते.

बाकी लेख आवडला हे सांगायला विसरलोच..

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 2:29 pm | टवाळ कार्टा

;)

मोठी किंमत उगाच मोजावी लागते, जर काळजी घेतली नाहीतर.. मी आज २२ व्या दिवशी पण बेडरेस्टवर आहे. असो.

सुबोध खरे साहेब तुमच्यासाठी :)

सचिन काळे's picture

11 Jul 2017 - 4:53 pm | सचिन काळे

मी लक्षात रहाण्याएवढं कधी पडलो नाही, पण कल्याण स्टेशनवर भरगच्च भरलेल्या कर्जत गाडीतून उतरताना धक्काबुक्कीमध्ये एका टोणग्याचा पाय माझ्या डाव्या पायावर पडला आणि माझ्या पायात वाटीवाला चामड्याचा बूट असूनसुद्धा आतमध्ये माझे पाऊल अक्षरशः नाजूक फुलासारखे कुस्करले गेले. पाऊलातील बोटांची हाडे आतल्याआत एकमेकांवर घासली गेली आणि त्यांना स्क्रेचेस आले. चांगला महिनाभर घरी बसावे लागले होते. घरात ह्या खोलीतून त्याखोलीत जाताना सरळ न जाता खोलीच्या चारही भितींचा हाताने आधार घेत घेत पूर्ण वळसा घालत घालत जावे लागत असे.

ट्रेड मार्क's picture

11 Jul 2017 - 11:53 pm | ट्रेड मार्क

मी पण खूप वेळा पडलो आहे. डोक्याला २ ठिकाणी खोक, भुवईवर टाके, ओठावर आतून बाहेरून टाके, कॉलर बोन फ्रॅक्चर, उजव्या हाताची दोन्ही हाडे पूर्ण मोडलेली, पावलाला फ्रॅक्चर, म -८० चा एक्सेल घुसल्याने पाठीला झालेली ८ इंच मोठी जखम, हाताच्या एका बोटाचे मीच मारलेल्या कोयत्याने झालेले उभे २ भाग (नशीब हाड शाबूत राहिलं), रेझर ब्लेड माझ्याचमुळे चुकून हाताच्या शिरेवर लागल्याने न थांबणारे रक्त ई उल्लेख करण्याजोग्या आहेत. दुचाकी व कार मध्ये बरेच अपघात झाले पण नशिबाने फारसं लागलं नाही.

काही काही अपघात तर फारच विचित्र आणि गमतीशीर होते तर काही सहनशक्तीची परिसीमा बघणारे होते. उजव्या हाताची हाडे एका डोंगरावर फ्रॅक्चर झाली. सकाळी १० वाजता झालेलं फ्रॅक्चर आम्ही तसेच डोंगर उतरून खाली आलो, पुढे चालत स्टेशनवर आणि लोकल मधून घरी. रविवार संध्याकाळ असल्याने डॉक्टर आणि एक्स-रे शोधत पायपीट असं करत करत रात्री १० वाजता प्लास्टर घातलं.

सचिन काळे's picture

12 Jul 2017 - 3:49 am | सचिन काळे

@ ट्रेडमार्क, खरंच ग्रेट आहात तुम्ही!