जनातलं, मनातलं
द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.
चित्रकारः John William Waterhouse. (1888)
Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London
एखाद्या ठिकाणाची आठवण करून देण्याची शक्ती वासात,गंधात, असते.
तो दिवस मला आठवतो.शेतात कामकरणाऱ्या
माझ्या सकट इतर कामगारांना एक दुर्गंध येत होता.शोधता शोधता एका पिंपळाच्या झाडाखाली एका झुडपात दुर्गंध तिव्र झाला.
झुडूप विस्कटून पाहिल्यानंतर एक रान-मांजर
मेलेलं आढळलं.
रात्री घरी गेल्यावरही तो दुर्गंध माझ्या नाकात
“वास” करून राहिला होता.
धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... )
वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की...
भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे.
चाय की चर्चा..
या लेखाचं शीर्षक "चाय पे चर्चा" असं नाही बरं का. मला चाय पे चर्चा करून माझ्या एरियातल्या कोणत्याही समस्या मांडायच्या नाहीत. किंवा कोणतीही राजकीय चर्चा करायची नाही. मला ॲक्चुअल चहा याच विषयावर लिहायचं आहे.
चहाला चाय म्हणतात. चा म्हणतात. च्या म्हणतात. टी म्हणतात. प्रत्येक भाषेत चहासाठी शब्द आहे. यावरूनच त्याची जागतिक लोकप्रियता दिसून येते.
माझ्या बद्दल थोडं
माझ्याबद्दल थोडं.
मी साहित्यिक नाही सराईत साहित्यिक तर नाहीच नाही.
माझा “कृष्ण उवाच” नावाने ब्लॉग आहे तो shrikrishnasamantwordpress.com
ह्या url वर पण मिळू शकतो
मी गेली 17 वर्षे माझा ब्लॉगवर लिहीत आलो आहे January 2007 पासून. लिहित आहे.
मी आणि समुद्रकिनारा
निळा समुद्र, गरम वाळू, छोटे मासे, खारी हवा, समुद्राची झुळूक आणि तो उबदार सूर्य. ह्या माझ्या लहानपणी उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा समुद्रकिनाऱ्यावर खूप जीव होता..
मला वाटतं की, समुद्रकिनारा आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.
मला असं वाटतं की समुद्रकिनाऱ्याकडे मी
त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो
तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.
तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं
म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.
समाजमाध्यमांवरील निरागसता
साधारण १९९८ ला टर्निंग पॉईंट या संस्थेचं "फोरम" नावाचं तीन दिवसाचं शिबिर केलं होतं. व्यक्तिगत संबंध, कामाच्या ठिकाणी इप्सित ध्येय साध्य करण्यासाठीची बांधिलकी, आणि व्यक्तिगत प्रगती अशा गोष्टींवर काही नाविन्यपूर्ण कल्पनांच्या द्वारे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे असा त्या शिबिराचा उद्देश असतो. आजकाल अशी शिबिरं आणि त्यातील गुरु यांचा सुळसुळाट झाला आहे.
हृदयसंवाद (३) : नाडी, रक्तदाब व ‘इसीजी’
भाग २ इथे
.. .. ..
हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या काही मूलभूत तपासण्या नित्यनेमाने केल्या जातात. अशा प्राथमिक तपासण्यांची माहिती आपण या लेखात घेऊ. या चार चाचण्या अशा आहेत :
1. नाडी तपासणी
2. रक्तदाब मोजणी
3. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी
4. इसीजी तपासणी
पाकिस्तान - ११
लाहोर भारतासाठी विशेष महत्त्वाचे नव्हते. लाहोर जिंकणे हा ना कधी अजेंडा होता ना सैन्याने कधी प्रयत्न केले.
अमर प्रेमवीर शास्त्रज्ञ युगुल - मारी आणि पिअरे क्यूरी
प्रेम, शृंगार आणि प्रणय ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य आणि अजोड देणगी आहे. तरल कवीमनाला प्रेमप्रणयशृंगाराची फोडणी घातली तर मेघदूतासारखे सुंदर काव्य जन्माला येते. परंतु तरल कवीमनातल्या प्रतिभेतून केवळ काव्यच जन्माला येते असे नाही. विज्ञानजगतातले अनेक विस्मयकारक शोध हे तरल कवीमनाच्या प्रतिभेतूनच जन्माला आलेले आहेत. वैज्ञानिक हे आपल्यातूनच निर्माण झालेले आहेत.
अत्तराच्या कुपीतून दरवळणारा सुगंध. . .
रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही.
जय रायरेश्वर
जय रायरेश्वर
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळची प्रसन्न वेळ. रायरेश्वराचं अफाट पठार. पठारावरून ऊन हळूहळू खाली दरीत उतरत होतं. तर शिवाजीराजे किल्ल्यावर जात होते.
सारीकडे पिवळं पडलेलं गवत. त्यामुळे पठार सोनेरी भासत होतं. आणि तो सोन्याचाच दिवस नव्हता काय ?
काही आम्ही आणि एक म्हातारा.
काही आम्ही आणि एक म्हातारा.
आजचा दिवस आमच्या गँगसाठी खास होता. कारण आमच्या गँगच्या एका मेंबराची म्हणजे पक्याची कसोटी होती.
डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!
कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात.
एक अनुभव
आयुष्य कधी कधी गंमतीदार वळण घेतं. पण ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस असं काही वळण येईल, किंवा असं काही घडेल जे कदाचित चांगले असू शकेल असे त्यावेळेस वाटत नसतं. दिवस काढणं तर अवघड असतंच पण रात्र सुद्धा अंगावर येत असते. काय करावे, कसे करावे काही म्हणता काही सुचत नसते. फक्त आपल्याच आयुष्याचा आपण मांडून ठेवलेला तमाशा पहायचा आणि जमेल तितकी पडझड थांबवायचा प्रयत्न करायचा. दोन हात थिटे पडतात.
एक लघुकथा.
एक लघुकथा.
उन्हाळ्यातल्या एका संध्याकाळी ते त्याला गच्चीवर घेऊन गेले. तिथून त्याला पदुआ शहराचा देखावा दिसत होता. संध्याकाळ सरली आणि अंधाराचे साम्राज्य प्रस्थापित झाले. आकाशात सर्च लाईट टाकले जात होते. बरोबरचे दारुच्या बाटल्या आणण्यासाठी खाली गेले. गच्चीत आता फक्त तो आणि लुझ होते. लुझ बेडवर बसली होती. ती फुलासारखी टवटवीत दिसत होती.
- ‹ previous
- 28 of 1008
- next ›