समुद्राच्या लाटांवर माझ्या विचारांची खलबल.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
10 May 2024 - 1:19 am

कधी कधी अ-वास्तव विषयावर लिहिणं सुद्धा मनोरंजक असू शकतं.माझा खालिल लेख तसाच काहिसा नमुना आहे.

मला समुद्राजवळ बसून निळ्या काळ्या लाटांकडे पाहयाला आवडतं.
मला असं वाटतं की जर मी तिथे बराच वेळ बसलो आणि माझ्या “मनाला” खरोखर इकडे तिकडे फिरू दिलं तर लाटांपर्यंत पोहोचेपर्यंत वाळूमध्ये, कमी झालेल्या पाण्यात पडून, माझं मन वाळूत रूतलं जाईल. आणि पुन्हा एखादी मोठी लाट येऊन पाण्याबरोबर फरफटत जाईल. आणि माझे विचार पुन्हा एकदा समुद्रात नेले जातील.

किनाऱ्यावर माझं शरीर खारट वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन, माझ्या विचारांना मंथन करणाऱ्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेत राहिन .मी अनेकदा माझ्या विचारांना उभारी देतो.

तो एक दिवस विशेषतः वाईट होता, आणि खूप गर्दी असलेल्या जगाची वीट येऊन माझं “मन” आणि माझ्या भावना समतोल राहाव्यात म्हणून मी चौपाटीवर आलो होतो.

मी वाळूत बसलो आणि मी माझे डोळे बंद केले आणि माझे खांदे खाली सोडले. मी खाली पाहिलं,आणि मला दिसलं की विचारांचे छोटे चांदीचे धागे वाळूच्या ढिगाऱ्यातून पुढे सरकत होते.मी घाबरलो नाही.मला मोकळं राहून शांत वाटलं.छान वाटलं.

माझ्या विचारांना स्फुरण्यासाठी जागा हवी होती. लाटांमध्ये विचारांचे धागे हळूवारपणे उलगडलेले जात होते.ते सर्व माझ्याकडे किनाऱ्यावर परत येत नव्हते.
माझ्या मनाचे धागे एकमेकांच्या आत आणि बाहेर विणले जात होते आणि चपळतेने माझ्या शरीरात भरती ओहोटीं मधून सरकले होते.

समुद्राच्या पाण्याच्या लाटा पाहून मला अधिक आनंदी आणि अधिक खंबीर झाल्यासारखं वाटतं.
कधी कधी रात्री मी समुद्रकिनारी परत जातो. तिथे अंधारात मला माझ्या प्रिय असलेल्या “विचारांच्या स्वप्नांचा” लाटांवर तरंगण्याचा प्रयास पाहून खूष व्हायला होतं.

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीकृष्ण सामंत's picture

16 May 2024 - 12:28 am | श्रीकृष्ण सामंत

ह्या वयातही मी कॅलिोर्नियातील बिचवर
लाटा पहाण्यासाठी अधूनमधून जात असतो.