“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
10 May 2024 - 8:35 pm

हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला.
ते म्हणाले,
“ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे.
आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं.
हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं
शकतात.
त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात.
आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात.

माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन.
कुठच्याच गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ न देणं म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं हा‌ एक मार्ग अंगिकारणं.
नक्कीच, जीवनात महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात आणि तुम्ही ते निर्णय कसे निवडता आणि तुम्ही किती चांगल्या तऱ्हेने ते निर्णय यशस्वी करता आणि यशस्वी होण्यासाठी,कसे योग्य बदल करूं शकता यावर अवलंबून असतं.

परंतु, जर तुम्ही तुमच्या जीवनाच्या वाटचालीत तुमच्या आशावादकडे आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रभावित होऊ दिला नाही तर येणाऱ्या संधीचे वारे आणि नशिबाच्या लहरी तुम्हाला तिथे घेऊन जातील जिथे तुम्ही आनंदी व्हाल.
मला वाटतं की दैनंदिन जीवनातील क्षुल्लक गोष्टींबद्दल काळजी न करणं योग्य असतं.
कोणीही आयुष्यात परिपूर्ण नसतो.
संपूर्ण जगाच्या अपेक्षा कोणीही पूर्ण करू शकत नाही.

कधी तरी आयुष्यात सर्व काही संपलं आहे असं वाटणं, कुणालाही चुकत नाही.
जर तुम्ही आयुष्य सहजपणे घेतलं आणि स्वतःला काळजी करण्यापासून दूर ठेवलं, तर शेवटी सगळं काही आपसूप गेल्यासारखं
वाटेल. काळजी करू नका. जरका आपण काहीतरी बदलण्यास असहाय्य आहात? मग काळजी कशाला?!
"काळजी करू नका, आनंदी रहा."
असं कुणी तरी अनुभवी आणि विख्यात व्यक्तीने म्हटलंय.

ताणतणाव हे अनेक माणसांचे पतन होण्यासाठी उद्भवतात.
चांगलं किंवा वाईट होवो पण काळजी मुक्त रहावं.
आयुष्यात मोठी झेप घेणं, कुणाला सुटलेलं नाही.
फिनीक्स पक्षासारखा मी राखेतून उठून परत उंच भरारी घेईन.असं म्हणत रहाणं मन उत्तेजीत करतं.”

प्रो. देसाई हे सर्व आपल्या अनुभवातून सांगत ंहोते.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

10 May 2024 - 9:55 pm | अमरेंद्र बाहुबली

तुमचे लेख आले नाहीत तर जे मिपाकराना वाटतं त्याला आनंद म्हणतात.

श्रीकृष्ण सामंत's picture

11 May 2024 - 12:10 pm | श्रीकृष्ण सामंत

मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ
भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द),

अमरेंद्र बाहुबली's picture

11 May 2024 - 3:02 pm | अमरेंद्र बाहुबली

:)