रविवार.....मस्त सुट्टीचा वार ..सकाळचे दहा-अकरावाजले होते. उनं उंडारायला चालू झाली होती.
बेडरूमची खिडकी उघडीच राहिली होती बहुतेक काल रात्री. त्यातूनच उनाचे कवडसे मला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न करत होते.
पडदाही फडफडत होता. हलकिशी हवा पडली होती.
माझ्या कानाजवळचं गजराचं घड्याळही (तिच्यायचं ते घड्याळ...बारावी पास झलो नसतो तर ते पण नसतं मिळालं) टिक-टिक-टिक-टिक-टिक करून माझ्या साखरझोपेचं (सकाळी दहा-अकरा वाजता ????...आणी ही सकाळ होय???) खोबरं (ओलं का सुकं ..माहीत नाही बुआ) करण्याच्या प्रयत्नात होते.
अचानक खनSSSSSन असा आवाज झाला. एका क्षणात झोप होत्याची नव्हती झाली.
काय नाय हो...काहीच झाल नव्हतं...आमच्या मातोश्रींनी माझ्या कानाखाली जाळ कढला होता..
"उठतोस का नाही रे मेल्या....उठ की...काल रात्री एक तर उशिरा आलास...उशिरा येणार म्हणून फोन पण केला नाही काही नाही..कुठं तोंड काळं करायला गेलं होतं कार्ट देव जाणे...उठतोयस का नाही आता???? "
आई स्वगत : " काय ही आजकालची पोरं..काही कशाचं भान नाही. इथं आई-बापाच्या जिवाला चिंता वाटते त्याचं काहीच नाही. "
तरीही आमची स्वारी ढिम्मच..शेवटचा उपाय म्हणून आईनी माठातल्या थंड पाण्याचा तांब्या माझ्या तोंडावर रिकामा केला.
झक मारून उठावच लागलं.
जागा तर झालो होतो पण आंथरूणातून उठायच मनच होईना. चादर दिली एका कोपर्यात फेकून आणी आंथरूणातच लोळत पडलो.
आई : "उठ रे आता, आवर आणी ये नास्टा करायला. दडपे पोहे करतेय मी"
दडपे पोहे तर मी दात न घासताच खाण्याच्या तयारीत होतो...आपले जीव की प्राण हो...
आई : "आधी तोंड धूवून ये , त्याशिवाय काही मिळणार नाही."
स्वरी गेली बेसिन वर...ब्रशवर पेस्ट लावली.....मान वर केली आरशात बघायला...
तर दिसतय काय????
स्वताचं प्रतिबिंब
(आरशात मग काय डोंबलं कतरीना दिसणारे का मंडळी??)
(आरशात कतरीना पाहण्यासाठी मंडळी ईथे टिचका.)
प्रतिक्रिया
23 Sep 2009 - 2:20 am | श्रावण मोडक
आवाज झाला ना डोक्यात. मध्यरात्री या वेळेला. काही डोक्यात गेलं नाही.
चला आता झोपतो. सकाळी उठून प्रतिबिंब बघायचंच आहे. ;)
23 Sep 2009 - 4:05 am | पाषाणभेद
चालूद्या
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
23 Sep 2009 - 4:51 am | लवंगी
ते हरवलेत सध्या..
23 Sep 2009 - 9:28 am | अवलिया
:S
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 8:52 am | क्रान्ति
मजा आली! :))
आधी वाटलं अजून एक भूत आलं की काय सकाळी सकाळी!;)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
23 Sep 2009 - 9:29 am | अवलिया
प्रेरणा लिहित जा रे प्रतिबिंबाच्या.. ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 9:30 am | दशानन
सटकला आहेस !
***
राज दरबार.....
23 Sep 2009 - 3:28 pm | धमाल मुलगा
प्रभ्या,
लेका तरी तुला सांगत होतो तुला जास्त होतीये, नको घेऊ इतकी..नाय ऐकायचं!
आता कसं झालं? ऑं?
बाकी, म्हातारीच्या हातचे दडपेपोहे ह्या उल्लेखानं अंमळ हळवा झालो रे....
23 Sep 2009 - 4:00 pm | प्रभो
काय करणार रे???
संगतीचा अंमळ परिणाम तर होणारच ना.. :)
23 Sep 2009 - 4:23 pm | श्रावण मोडक
अंमळ परिणाम नव्हे हा, हा तर अंमल परिणाम! :)
टारझन पण असतो ना संगतीत? तो परिणाम कसा होत नाही? ;)
23 Sep 2009 - 4:30 pm | प्रभो
खव आहे ना अशा चर्चांसाठी....ह्या चर्चा तिकडे करू....नाहीतर हा धागा झपाटला जायचा.. :)
23 Sep 2009 - 6:57 pm | टारझन
काय पाणचट पणा चाल्लाय रे मुलांनो (आम्हाला सोडून ?)
-(प्रतिंबिंब प्रेमी) टार्या
24 Sep 2009 - 5:41 pm | सूहास (not verified)
उलट्या डोक्याने सरळ लिहिलास...
सू हा स...