शिळा सप्तमी

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in पाककृती
20 Feb 2008 - 6:08 am

आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्‍या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला.

शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा
पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात.

कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.

शिळ्या भाकरीसाठी पण हीच कृति पण त्यासाठी भाकरीचे बारीक तुकडे करून घ्यावेत.

ता.क.: कांदा बारीक चिरू न शकणारे, स्वयंपाक म्हणजे एक पाटी टाकणे असे विचार असणारे, शरीरयष्टी जागरूक (figure cautious) इ. लोकांनी >या पदार्थाच्या वाटेला जाऊ नये.

आपल्याकडे शिळ्या भाताचे काही वेगळे प्रकार होत असतील तर अवश्य सांगावेत.

कलाप्रकटनमतशिफारससल्लाअनुभवपाकक्रियामाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 7:01 am | सृष्टीलावण्या

शिळ्या भाताचा छान पदार्थ म्हणजे रात्री भात दुधात कालवायचा आणि विरजण लावायचे. दुसर्‍या
दिवशी त्यात उसळी मिरची अथवा पोलं (लाल सुकी मिरची तेलात तळून) आणि मीठ घालून खायचा. प्रवासात न्यायला पण चांगला.

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 8:49 am | विसोबा खेचर

फोडणीचाच भात अधिक आवडतो. फोडणीत कढिपत्ता, शेंगदाणे हवेतच!

तात्या.

चतुरंग's picture

20 Feb 2008 - 9:11 am | चतुरंग

तात्या, मिर्चीला विसरू नका त्याशिवाय तो झणझणितपणा नाही!
मला फो.भा. मधे मिर्ची लागतेच.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 9:21 am | विसोबा खेचर

करेक्ट! मी इसरलोच होतो!

गीतांजली's picture

20 Feb 2008 - 11:48 am | गीतांजली

रात्रीचा शिळा भात चांगला कुस्करून घ्यावा.
त्यात छोटा कांदा बारीक़ चिरुन तिखट, मीठ, धने, जीरे आणि थोडेसे डाळीचे पीठ घालावे.
भरपूर कोथिम्बिर चिरुन टाकावी.
मिर्ची प्रेमिन्नी हिरवी मिर्ची बारीक़ चिरुन टाकली तरी चालेल.
हे सर्व मिश्रण चांगले एकत्र (एकजीव) करावे.
पाण्याचा हात लावून हातावर छोटे छोटे चपटे वडे थापावेत. आणि तेलात तळावेत .
हे वडे चिंगु चटणी बरोबर खुप छान लागतात.

चिंगु : चिंच गुळ चटणी

ता. क. : हे माज़े पहिलेच लिखाण असल्याने चु.भू. द्या.घ्या.

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 11:55 am | सृष्टीलावण्या

मग पुढचे पण येऊ दे की... नक्की करून पाहिन तुम्ही सांगितलेली पाकृ... ...

गीतांजली's picture

20 Feb 2008 - 12:17 pm | गीतांजली

वडे कसे झाले ते सांगा बरं का..

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Feb 2008 - 4:13 pm | ब्रिटिश टिंग्या

कधी बनवताय वडे? लगेच खायला येतो.

-छोटी टिंगी

गीतांजली's picture

20 Feb 2008 - 4:29 pm | गीतांजली

जेव्हा घरात शिळा भात असेल तेव्हा

बेसनलाडू's picture

20 Feb 2008 - 12:01 pm | बेसनलाडू

याच पद्धतीने वडे न करता थालिपीठ करावे. मस्त लागते :)
(खवैया)बेसनलाडू

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 4:36 pm | सृष्टीलावण्या

वडे पटापट संपल्याने मजा येणार नाही वाटेल अजून हवे... थालीपीठाची चव त्यामानाने जास्त रेंगाळेल जीभेवर.

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 12:24 pm | विसोबा खेचर

पाण्याचा हात लावून हातावर छोटे छोटे चपटे वडे थापावेत. आणि तेलात तळावेत .

अलिबाग आणि आसपासच्या परिसरात (अष्टागरात) ही वड्यांची पद्धत रूढ आहे अशी आमची माहिती आहे. चूभूद्याघ्या...!

आपला,
(तळकोकणातला) तात्या.

ता. क. : हे माज़े पहिलेच लिखाण असल्याने चु.भू. द्या.घ्या.

मिसळपाववर स्वागत आहे...अजूनही अश्याच पा कृ येऊ द्या!

चिंगु : चिंच गुळ चटणी

चिंचगुळाच्या चटणीचा 'चिंगू' हा शॉर्टफॉर्म आवडून गेला! :)

आपला,
(चिंगूप्रेमी!) तात्या. :)

संजय अभ्यंकर's picture

20 Feb 2008 - 11:58 am | संजय अभ्यंकर

शिळ्या भातावर एवढे संशोधन पाहून मन भरुन आले.
हे भाताचे प्रकार खाण्यासाठी खास रात्री भात शिजवावा म्हणतोय..

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 4:40 pm | सृष्टीलावण्या

त्यासाठी मुद्दाम भात शिजवायचा नसतो, त्याला शिळ्या भाताची मजा येत नाही.

धमाल मुलगा's picture

20 Feb 2008 - 1:51 pm | धमाल मुलगा

आणखी एक

रात्रीचा भात दूध आणि दही घालून कालवायचा, जिरे, मिरची इ.इ. (बाकी काय कोण जाणे..आम्ही फक्त खाण्यातले, पा.कृ.च्या नावान॑...) घालून तुपाची फोडणी करून ती ह्या मीठ घालून कालवलेल्या भातावर घालायची..

एकदम खल्लास लागत॑ हे प्रकरण. आपल॑ फुल्टू फेवरिट.

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 4:44 pm | सृष्टीलावण्या

त्या तुपाच्या फोडणीत लाल भडक मोठे शेंगदाणे आणि पोपटी पण मध्यम मिरची हवीच.

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2008 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर

हा सुद्धा दोन पद्धतीने करता येतो.

१) मोहरीच्या फोडणीत शेंगदाणे, कांदा, कढीलिंब घालून भातावर हळद, तिखट, मीठ, साखर घालायचे आणि असा भात फोडणीवर टाकून परतायचा. भात झाला की वरून कोथींबिर भुरभुरून, दह्या बरोबर खायचा.

२) भातावर तिखट, हळद, मीठ, साखर, कोथींबिर, कच्चा कांदा घालून मिसळायचे. वरून फोडणी देऊन थंडच एकत्र करून खायचे. कच्ची हळद, कच्चे तिखट, कच्ची कोथींबिर, निट मिसळले मीठ आणि न विरघळेली साखर ह्यांचे एकून रसायन झकास लागते. (आवडत असल्यास फोडणीत शेंगदाणे घालावे, परंतु हा भात शेंगदाण्याशिवायच चांगला लागतो.)

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 4:33 pm | सृष्टीलावण्या

मला वाटत होते कच्च्या हळदीची चव एव्हढी छान लागत नसेल...

राजमुद्रा's picture

20 Feb 2008 - 2:42 pm | राजमुद्रा

झटपट फोडणीचा भात!

मी फोडणीत फक्त जिरे आणि हिरवी मिरची घालते, त्यामुळे तो चवीला सात्विक लागतो.
बाकी सर्व (कांदा, शेंगदाणे इ. ....) घातल्यावर त्याला पोह्याचा फील येतो.
त्यामुळे नवशिक्या लोकांसाठी "झटपट फोडणीचा भात" सोपा आहे.

राजमुद्रा :)

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 4:51 pm | सृष्टीलावण्या

कालनिर्णयच्या पाठी वाचले होते की शिळ्या भातात, जाडे पोहे भिजवून घालायचे. दोन्ही मीठ, मिरची (बारीक तुकडे), आले, काजूचे बारीक तुकडे घालून सैलसर भिजवावे नंतर (वाटल्यास कांदा घालून) आंबोळ्या कराव्यात.

स्वाती राजेश's picture

20 Feb 2008 - 3:41 pm | स्वाती राजेश

फोडणी करुन त्यात १.च्.उडीद डाळ्.१हरभरा डाळ, लाल मिरच्या घालून भात घालणे.सर्वात शेवटी २ च्.लिंबू रस घालणे.

भातात कणिक, बेसन्,आलं-मिरची पेस्ट,कोथिंबीर, धना-जिरे पावडर्,ओवा,गरम मसाला(ऐच्छिक्),तीळ घालुन मळणे. नेहमी प्रमाणे चपाती करणे.

भात फोडणी टाकताना त्यात मेतकूट टाकणे. खमंग चव येते.

शक्यतो भात साजुक तुपात फोडणी टाकावा.

सृष्टीलावण्या's picture

20 Feb 2008 - 4:55 pm | सृष्टीलावण्या

हे तर सर्व अकल्पनीय आहे... तुम्ही पाकृ दिली नसतीत तर कदाचित याचा विचारच मनात आला
नसता... आता मनावर घेतले आहे...