रसराजेश्वर..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
13 Mar 2009 - 1:51 pm

साला, मुक्तछंदातल्या आमच्याही या काही ओळी..

मार्च अर्धा संपला जवळजवळ!

तो आता येणारे,
तो येतोय,
येऊ घातलाय..!

चला त्याचं स्वागत करुया,
सज्ज राहूया,
गुढ्यातोरणं उभारून!

तो राजा आहे,
तो बादशहा आहे
तो सम्राट आहे..!
तो साक्षात चक्रवर्ती आहे..!

तो माणसाला माणूस जोडतो,
तो मनातले सारे विकार
करतो नाहीसे एका क्षणात..

तो वाटतो फक्त प्रेम
तो आहे साक्षात अमृतकुंभ
तो आहे रसेश्वर, तो आहे रसांचा राजा!
रसराजेश्वर..!

त्याच्यासारखा तोच..!
जिथे सारे स्वाद संपतात,
जिथे सार्‍या चवी संपतात,
जिथे सारे सुगंध संपतात,
तिथे तो सुरू होतो..!

चला करुया सडा-शिंपण,
घालुया छानशी रांगोळी,
आणि
सज्ज राहूया
गुढ्यातोरणं उभारून
त्याच्या स्वागतासाठी..!

(त्याचा भक्त, त्याचा प्रेमी, त्याचा अभिमानी, त्याचा दुराभिमानी!) तात्या अभ्यंकर.

संस्कृतीवाङ्मयमौजमजाप्रकटनसद्भावनाशुभेच्छाआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

जयवी's picture

13 Mar 2009 - 2:12 pm | जयवी

अरे वा...... रसराजाच्या आगमनाची तयारी इतक्य लवकर :)
मुक्त स्वागत आवडेश :)

अवलिया's picture

14 Mar 2009 - 3:01 pm | अवलिया

हेच बोल्तो

सुमीत भातखंडे's picture

13 Mar 2009 - 2:16 pm | सुमीत भातखंडे

रसराजेश्वराचं काव्यमय रसग्रहण आवडलं.

(रसराजेश्वराच्या प्रतिक्षेत) सुमीत.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Mar 2009 - 2:49 pm | घाशीराम कोतवाल १.२

अहाहा!!! तात्या अहो तोंडाला पाणी सुटले ना
काय तो रस दार आंबा अहाहा!!!
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

घाटावरचे भट's picture

13 Mar 2009 - 2:52 pm | घाटावरचे भट

वा. खरोखर तोंडास पाणी सुटले.

शितल's picture

18 Mar 2009 - 5:55 am | शितल

सहमत. :)

प्रभाकर पेठकर's picture

14 Mar 2009 - 2:47 pm | प्रभाकर पेठकर

मस्त मुक्तक आणि 'रसराजेश्वर'.
दर मोसमात डॉक्टरांचा आणि सहधर्मचारिणीचा डोळा चुकवून हाणतोच जमेल तितके.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

लवंगी's picture

14 Mar 2009 - 2:55 pm | लवंगी

थोडे आंबे इथे पाठवून द्याना तात्या..

गणपा's picture

18 Mar 2009 - 2:14 pm | गणपा

असेच म्हणतो.
-गणपा

प्राची's picture

14 Mar 2009 - 3:00 pm | प्राची

तात्या ह्या उन्हाळ्यात एकदा,मिसळपावचा आंबा कट्टा करा की 8>

अनामिका's picture

14 Mar 2009 - 5:24 pm | अनामिका

तात्या !
कशाला इतक्या सुंदर आणि रसाळ हापुसचे चित्र टाकलेत् आणि त्याच बरोबर त्या वर तुम्ही केलेली कविता .............तुमच्या या कवितेने आमच्या रसना मात्र चाळवल्या...............
आंम्हाला नाही हो खायला मिळणार् इतका चांगला आंबा .........आणि खाऊ म्हणे पर्यंत आंब्याचा मौसम गेलेला असेल...............तरीसुद्धा याचे आगमन आताशा मंडईत झाले असेलच्.............थोडेफार इथे पण द्या पाठवुन!

"अनामिका"

क्रान्ति's picture

15 Mar 2009 - 1:46 pm | क्रान्ति

B) मस्त! तोंडालापाणी सुटल.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्रमेय's picture

18 Mar 2009 - 5:44 am | प्रमेय

आता फक्त वाट पाहतो ती भारतभूमीची...
परतीचे वेध लागलेच आहेत... त्यात ही रसपूर्ण, सुवर्णकांतीची भर पडली...

तात्या, आता अमेरिका सोडा, देवगडला जमवा बेत... हाणूया तिच्या आयला फक्कडपैकीं...

समिधा's picture

18 Mar 2009 - 6:06 am | समिधा

मस्त हो तात्या, घरची आठवण आली आंबा बघुन
खुप मस्त स्वागत केल आहेत त्या रसराजेश्वराच :)

सँडी's picture

18 Mar 2009 - 1:31 pm | सँडी

मस्तचं!

आम्बे आम्हास्नी बाराही महिने प्रियचं!

अवांतरः या वर्षी जरा जास्तच महाग आहेत असे ऐकण्यात आले. जाऊ देत आपल्याला काय खायशी मतलब!

- रसाळ आंबाप्रेमी

विसोबा खेचर's picture

18 Mar 2009 - 2:05 pm | विसोबा खेचर

रसाळ प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व आंबाप्रेमींना धन्यवाद.. :)

आपला,
(मण्यार-फुरश्यातला, रातांबा-पोफळीतला, आंब्याफणसातला) तात्या.

पर्नल नेने मराठे's picture

18 Mar 2009 - 2:16 pm | पर्नल नेने मराठे

चुचु