मनाच्या कुपितले-पडदा पडताना

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
28 Jan 2009 - 9:18 pm

मनाच्या कुपीतले या सदरातला हा पाचवा लेख
पडदा पडताना !

पार्श्वसंगीत चालू ......... "चालत राहील हे युध्द विचारांचे..........." असं म्हणत सर्व कलाकार स्तब्ध. आवाज वाढत जातो आणि पडदा पडतो, एका प्रयोगाचा शेवट होतो. नाटक ............. मानवी मनाला थेट भिडणारे माध्यम ..... जशी मैफलीतील एखादी चीज काळीज चर्र करते. तसेच नाटकातला एखादा संवाद हृदय फाडून टाकतो. म्हणूनच जशी एखादी शास्त्रीय संगीताची मैफल संपताना सर्वांची समाधी लागते. तशीच अगदी तशीच समाधी एखादा अत्युत्तम प्रयोग संपल्यानंतर होते. असे हे नाटक या नाटकाचा रंगमंचावरचा प्रवास जीतका रंगतदर असतो तितकाच पडद्यामागचा.

कलाकार एकत्र करण्यापासून सुरू होते नाटक निर्मिती. कथा, पटकथा ठरते. संवाद बसू लागतात. रंगीत तालीमी सुरू होतात आणि लेखकाच्या लेखणीतील अपत्य रांगू लागते. हळूहळू संवाद बसतात. चहाच्या साथीने रात्री रंगू लागतात. इकडे बॅकस्टेजवालेही झटत असतात. प्रकाश योजना, ध्वनीयंत्रणा सगळे जोमात काम करत असतात आणि मग सगळे एकत्र येतात आणि अंतिम रंगीत तालमी रंगू लागतात. कलाकार आपल्या भुमिकेत रंगून जातात. सिंक्रोनाईज् होत जाते. प्रकाशझोत, साऊंडची बीट आणि कलाकारांचे शब्द आपोआपच एकत्र होत जातात आणि एकेदिवशी सर्व रचना होऊन, मनोमन रंगदेवतेला स्मरून नाटयप्रयोगास सुरूवात होते.

एक तपश्चर्या शेवटाला येत असते. होय, तपश्चर्याच असते ती. एकाची नाही अख्ख्या संघाची. फक्त शरीराने नाही तर मनाने एकत्र येऊन ऑन स्टेज, बॅक स्टेज, घाम गाळला जातो. एखादे वाक्य यावे म्हणून कलाकार दिवस-रात्र तेच वाक्य घोटतो. नेपथ्यासाठी दिग्दर्शक स्वत: रंधा घेऊन बसतो. तर म्युझिकवाला विशिष्ट भावनिर्मिती व्हावी म्हणून तासन्तास विचार करत बसतो. आणि, सगळे जमले की चुकूनसुध्दा चूक होऊ नये म्हणून हजारदा प्रॅक्टिस ........... एकमेकांना सांभाळून घेणं ही सगळी तपश्चर्याच नाही का आणि ही तपश्चर्या असते त्या एक तासासाठी............ आणि त्या दिवशी मग तिसरी घंटा वाजते ...... प्रयोग सुरू होतो आणि रंगदेवता तपश्चर्येचे फळ देऊ लागते. नाटक रंगत जाते. तेंव्हा कलाकार या विश्वात नसतोच. तो नाटयरंगी रममाण झालेला असतो. तो समाधी अवस्थेत असतो. साक्षात् ईश्वराशी त्याचा संवाद होत असतो आणि प्रेक्षकांनाही तो ईश्वर भेट घडवण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्याला प्रेक्षकांना भेटणारा ईश्वर देखील दिसतो तो त्यांच्या खळाळत्या हास्यातून वा टपटप गळणाऱ्या आसवातून. समाधी अवस्था वाढत जाते. वाढत जाते आणि तो पृथ्वीवर येतो ते हजारो हातातून अगदी मनापासून वाजणाऱ्या टाळयानंतरच ...... आणि पडदा पडतो.... पडदा पडतानाच कलाकार तयार होतात पुन्हा समावधीव्स्थेत जायला ........ पुढच्या प्रयोगावेळी ....... हेच होतं प्रत्येकवेळी, प्रत्येक ठिकाणी आणि क्षणही तोच असतो पडदा पडतानाचा.

विनायक पाचलग
marathilikhan@in.com
vinayakpachalag@gmail.com

आता या लेखाच्या प्रयोजनाबद्दल थोडेसे
पहिल्यांदा आपण माझ्या मागच्या लेखाला दीलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद
उगाचच प्रतिक्रियेमुळे लेख वर येवु नये म्हणुन हे येथे सांगीतले
खरतर आज मी हा लेख लिहिणार नव्हतो दुसरा लेख तयारही होता पण या आठवड्यात असे काही प्रसंग घडले की मी सहजपणे हा छोटेखानी लेख लिहिला
ते प्रसंग म्हणजे
काही दीवसापुर्वी मी "एक युद्ध विचारांचे" या नाटकाला संगीत दीले होते
त्या नाटकाचा प्रयोग परवादीवशी कोवाड या छोट्याशा गावात झाला(रणजीत देसाइंचे हे गाव)
काही कारणामुळे मी गेलो नव्हतो पण मला असे समजले की तेथे जवळजवळ १००० प्रेक्षक हजर होते
माझ्यासाठी ही वेगळी गोष्ट होती
याशिवाय ४ दीवसापुर्वी मला एक उत्क्रुष्ट दीग्दर्शक अतुल पेठे याच्याशी संवास साधता आला नाटक या विषयावर चर्चा करायची संधी मिळाली
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काल मला शाम मनोहर या दीग्गज लेखकाला भेटण्याची संधी मिळाली जवळ्जवळ २० मिनिटे फक्त मी आणि ते बोलत होतो
याशिवाय त्यानी लिहिलेले नवीन नाटक मला बाहेर प्रकाशीत होण्यापुर्वी वाचायला मिळाले
एकुणात हा आठवडा काही वेगळे अनुभव घेवुन आला त्यानिमित्त हे लिखाण
बघा आवडतय का.........
(आमच्या नाटकाच्या तालमीचे फोटो आपण माझ्या खरडवहीत पाहु शकता.)
अवांतर- पुन्हा एकदा सारेगमपविशयी ..तसे आम्ही सारेगमचे अगदी त्यांच्या पहिल्या कार्यकरमापासुन पंखा आहे .कधीकाळी मी आणि अभिजीत ने एकत्र गाणे म्हटले होते तो जेव्हा या स्पर्धेत गेला तेव्हापासुन आम्ही पंखा झालो आणि आजतागायत आहे आणि त्यात भर पडली ती या कालच्या भागाची ..आम्ही या कार्यक्रमाचे वेडे झालो आहोत्..आहाहा काय कर्यक्रम होता कालचा ..वा..
खरेतर दीवस्भर तेच तेच चित्रपट पाहुन कंटाळलो होतो आज काही राष्ट्रीय सण आहे असे वाटत नव्हते पण त्या कार्यक्रमाने दीवस गाजवल या कार्यक्रमात सगळच अप्रतीम होते त्यामुळे जास्त बोलत नाही नाहेतर एक नवा लेखच तयार होइल बाकी एवढी एकच इच्छा की या कार्यक्रमाची सी डी निघावी खुप छान होइल बाकी याबाबत पण अक्षेप असतीलही(सावरकर प्रेम गांधींचा उल्लेखही नाही वगिअरे वगिअरे) त्यासाठी खरडवहीचा वापर करा कारण मी जरा जास्तच बहकतो सध्या .......बाकी जीयो सा रे ग म पा....
अतिअवांतर- नुकतेच बहुभाषीक ब्राम्हण समेलन झाले मी जावु शकलो नाही पण मला त्यासंबंधी माहिती हवी आहे वाचायला आवडेल कारण नेहमीप्रमाणे सकाळमध्ये फक्त एकांगी लेखच आले आहेत.
खरतर मी कधीकधी बहकतो या विषयावर कारण ४८ साली ब्राम्हणाना उकळत्या गुळाच्या पाकात टाकताना बघीतलेय माझ्या पुर्वजानी अगदी नॉन करप्टेड व निर्व्यसनी व ब्राम्हण म्हणून सरकारी नोकरीत त्रासही भोगलाय
कदाचीत या॑ वातावरणाचा परीणाम असेल पण समतोल राखायचा प्रयत्न करतोय
बाकी समजुन घ्यालच
विनायक

कलासंस्कृतीनाट्यवाङ्मयप्रकटनविचारलेखआस्वाद

प्रतिक्रिया

प्राची's picture

28 Jan 2009 - 9:51 pm | प्राची

>>त्याला प्रेक्षकांना भेटणारा ईश्वर देखील दिसतो तो त्यांच्या खळाळत्या हास्यातून वा टपटप गळणाऱ्या आसवातून.

अप्रतिम :)

अवांतरः
खरोखरच,२६ आणि २७ जानेवारीला झालेला सा रे ग म प (शुरा मी वंदिले) पंडित ह्र्दयनाथ मंगेशकरांनी एका वेगळ्याच उंचीवर नेला आणि त्याला जोड मिळाली ती वीरमाता,वीरपिता आणि वीरपत्नींनी साधलेल्या संवादाची.पंडित ह्र्दयनाथांकडून प्रत्येक गाण्याबद्दलची आठवण्,इतिहास ऐकणे हे आपले भाग्य होते,असे क्षण दुर्मिळ असतात.
या कार्यक्रमाची सी डी निघण्याची आपली इच्छा लवकरात लवकर पूर्णत्त्वास येवो.

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2009 - 3:09 am | भडकमकर मास्तर

तपश्चर्या, ईश्वराशी संवाद,समाधी अवस्था, ईश्वरभेट ...... :O :O :O :O :O

पहिला प्रयोग होताना असा समाधीचा अनुभव येणे म्हणजे अगायायाया...
आमच्या डोळ्यांत टच्कन पाणीच आले....
हृदय फाटले. खळाळून हसू आले...
काळजात चर्र झाले. वाचनरंगी रममाण होत ईश्वराशी संवाद सुरू झाला.
समाधी अवस्था आली. ईश्वरभेट घडते की काय असं वाटायला लागलं.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2009 - 3:03 am | भडकमकर मास्तर

१.उपमांचा भडिमार टाळा
२. छोटी का होईना नवीन माहिती द्या....
एखादा वेगळा किस्सा लिहा.....
३. लेखात जेन्युइनिटी असूद्या हो.... ( मला शंका आहे की तुम्हाला नाटकातला कलाकार ईश्वराशी संवाद करतो आणि समाधी अवस्थेत जातो , यावर विश्वास आहे)... उगीच शब्दाला शब्द जोडणं म्हणजे फार खोटंखोटं वाटतं हो ...
या दहावीच्या निबंधाच्या शैलीतून बाहेर या एकदा...

आता नाटक कसे तयार होते हे सार्‍यांनाच माहिती आहे.... त्यात तुमचे नुसते " हे म्हणजे जणू ते " " ते म्हणजे जणू हे" असल्या उपमांनी भरलेली वाक्ये वाचून फार त्रास होतो कारण नवीन माहिती शून्य....

मोठमोठे कलाकार म्हणतात की पहिले आठ दहा प्रयोग चाचपडण्यात जातात.... हे बरोबर आहे की नाही, ते नीट होईल की नाही, अमुक गोष्ट बॅकस्टेजवाले वेळेत करतील की नाही, लाईट नीट येइल की नाही वगैरे वगैरे शंभर गोष्टी डोक्यात असताना कसली आलीय समाधी आणि कसली आलीय ईश्वरभेट राव??

पूर्वी तुम्हाला सल्ला देणार्‍या गोगोल सरांची काही वाक्ये...
काय आहे ना की विद्वत्ता असणे आणि उगाच मोठाले शब्द वापरुन त्याचा आव आणणे यात खूप फरक आहे. दुर्दैवाने आज काल असा प्रयत्न लोकांना लगेच कळतो........................................
..........

यावर तुम्ही लिहिले आहे की मी उपमांचा अनावश्यक वापर टाळणार आहे....

या लेखावरून तरी तसे वाटत नाही...
असो.. तुमच्या वाटचालीला शुभेच्छा...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धनंजय's picture

29 Jan 2009 - 4:24 am | धनंजय

आईबाबांना माळ्यावरती सापडली. त्यावेळी मी गीतेतला ज्ञानमार्ग वगैरे गोष्टींनी भारावलो होतो. मग स्वतःच जीवनविषयक भाष्य वगैरे लिहिलेले आहे.

साहित्यिक दृष्टीने खूपच निकृष्ट दर्जाचे, वैचारिक दृष्टीने बालिश असलेले, तरी पण मनापासून लिहिलेले प्रामाणिक मासले त्यात आहेत.

काव्यालंकारांचा सोस त्या वयात खूप होता. मला वाटते स्नो-पावडर किती लावली तर भडक? हे कळायची सौंदर्यदृष्टी मुलींनाही थोड्या फसलेल्या प्रयोगांच्या नंतर येत असावी! मोठमोठाले शब्द आणि उपमा वापरून फसलेल्या प्रयोगांशिवाय ते अलंकार सुंदररीतीने चढवण्याचे कौशल्य कसे येईल?

तुमचे आणि गोगोल सरांचे सर्व मुद्दे विनायकने लक्षात घ्यावे. घ्यावेच.

(पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. माझी बाल-पौगंड-चोपडी आता बघितल्यानंतर मला तरी असे वाटते.)

चित्रा's picture

29 Jan 2009 - 6:01 am | चित्रा

पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे.

असेच म्हणते. मला माझे लहानपणचे लिखाण (डायरी, आणि काही लेख) आता वाचून खूप हसू येते. पण ते तेव्हा खरेच अगदी मनापासून लिहीले होते असेही जाणवते.

मला विनायक यांचे लेखन आवडले. अकरावीत असताना मी असे विविध उद्योग (नाटकांना संगीत देणे तर दूरच!) केले नव्हते, त्यामुळे माझे अनुभवांचे क्षेत्र मर्यादित होते असे जाणवते. विनायकना पुढच्या लेखनासंबंधी शुभेच्छा.

सहज's picture

29 Jan 2009 - 6:19 am | सहज

भडकममास्तरांचे म्हणणे योग्यच आहे तरीही मा. विनायक यांनी हे त्यांना योग्य वाटते असेच लिहले आहे :-) पुढील लेखनात ते नक्की वरील सुचना अमंलात आणतील व गोगोलसर व भडकमकर मास्तरांना सुखद धक्का देतील याची खात्री वाटते.

शाळेतले लेखन सोडाच,प्रेयसीला [आताची बायको] लिहलेली माझीच (बाळु )पत्रे पाहुन, मी तिला विचारले हे असे मी लिहले तरी तु कसे काय मला पसंद केलेस, तुला इतर कोणी मिळाले नाही का? ती देखील आयुष्यात सर्वात अवघड आव्हाने स्वीकारायचे ते वेडे वय होते, फसले म्हणून बोलुन घेते.

अवलिया's picture

29 Jan 2009 - 9:38 am | अवलिया

सहमत

*वरिल सुचनांचा मला पण उपयोग होईल असे वाटते. *
--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

छोटा डॉन's picture

29 Jan 2009 - 9:47 am | छोटा डॉन

मा. विनायक व इतर अनेक शिकाऊ अगर अनुनभवी लोकांनी भडकमकर मास्तर आणि धनंजयशेठ ह्यांचा सल्ला खरोखर मनापासुन अभ्यासावा. अतिशय सोप्या भाषेत ह्या लोकांनी "नक्की कसे असावे" ह्यासंबंधी मस्त लिहले आहे.

इनफॅक्ट मी सुद्धा बर्‍याच गोष्टी मनात नोंदवुन ठेवल्यात आणि भविष्यात ह्या सल्ल्याचा सदुपयोग जरुर करीन ...
अनुभवाचे बोल आहेत हे राजा, मनावर नक्की घेच.

बाकी तुझे चांगले आहे ह्यात वाद नाही, पण जास्त अलंकारिक, उपमा वापरुन, अगम्य आणि अतर्क्य लिहण्याचा नादात वाचकांशी जवळीक हरवु नकोस हीच अपेक्षा. बाकी पुढील लेखनास शुभेच्छा ...!
( भोचकपणाबद्दल क्षमस्व व स्पष्ट बोलल्याबद्दल राग मानु नये ... :) )

------
( तुझ्यासारखाच शिकाऊ ) छोटा डॉन

भडकमकर मास्तर's picture

30 Jan 2009 - 12:53 am | भडकमकर मास्तर

(पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. )
हो .. ते तसे बराच काळ स्वीकारलेही...
या नाटकावरच्या लेखानंतर अगदीच राहवेना म्हणून लिहिले...
"हीच ती आपली छान शैली" असा गैरसमज वाढीला लागू नये , ही प्रामाणिक इच्छा होती...
अर्थात सल्ल्याचं काय करायचं हा सर्वस्वी लेखकाच्या मर्जीचा प्रश्न....

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

30 Jan 2009 - 1:08 am | चतुरंग

लिखाणातला उपमाअलंकाराच्या सोसाचा आणि जीवनविषयक भाष्याचा साहित्यिक बोळा निघाला की पाणी वाहते होईल! ;)

चतुरंग

सर्किट's picture

30 Jan 2009 - 3:09 am | सर्किट (not verified)

पुलंनी गटणे कुणा खर्‍या व्यक्तीवरून ल्लिहिला किंवा नाही हे मला माहिती नाही.

आणि पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही.

पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे.

माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे.

-- सर्किट

कवटी's picture

30 Jan 2009 - 2:15 pm | कवटी

पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे.
सहमत.

माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. =)) =)) =))

कवटी

http://www.misalpav.com/user/765

शंकरराव's picture

30 Jan 2009 - 2:28 pm | शंकरराव

माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे.

+ १ सहमत
=)) =))

मिहिर's picture

29 Jan 2009 - 11:16 pm | मिहिर

भडकमकरांशी मी पूर्णपणे सहमत आहे. मला आधी तसेच वाटले होते, फक्त बोललो नव्हतो.

अवांतरः
सकाळमध्ये केवळ एकांगी आणि ibn लोकमत वरचे चांगले असे तुला वाटते का ?
ब्राह्मण समाजाला आरक्षण नको हा संमेलनातील मुद्दा मला पटला. मात्र सकाळ अग्रलेखातील मते मला पटली. ब्राह्मण हितालाच प्राधान्य द्यावे आणि आंतरजातीय विवाह करू नयेत हे ठराव आगरकरांसारख्या समाजसुधारकांच्या मताशी फारकत घेणारे आहेत.

संदीप चित्रे's picture

30 Jan 2009 - 1:22 am | संदीप चित्रे

लेख मनापासून लिहिला आहे ते खूप आवडलं. बाकी मास्तर आणि धनंजय यांनी योग्य सल्ला दिला आहेच.
नाटक, संगीत, पुस्तके.... व्वा.. वेगवेगळ्या प्रकाराने अनुभव ज्ञान वाढतंय ते महत्वाचं :)

नीधप's picture

30 Jan 2009 - 1:48 pm | नीधप

मी लेख पूर्ण वाचू शकले नाही. उपमा, अलंकारिक भाषा, रूपके यातून नक्की काय म्हणायचंय ते सापडेनासं झालं आणि मी प्रतिक्रियांवर आले.
भडकमकर मास्तर आणि धनंजय यांच्या प्रतिक्रिया मात्र नीट वाचल्या आणि पटल्या.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सखाराम_गटणे™'s picture

4 Feb 2009 - 1:48 pm | सखाराम_गटणे™

खरतर मी कधीकधी बहकतो या विषयावर कारण ४८ साली ब्राम्हणाना उकळत्या गुळाच्या पाकात टाकताना बघीतलेय
तुम्ही वयाच्या मानाने खुपच तरुण दिसता, संतुर लावता का?
दुसरी काय जडी बुटी असेल तर, मिपावर शेअर करा, प्लीज.

भडकमकर मास्तर's picture

4 Feb 2009 - 5:10 pm | भडकमकर मास्तर

पूर्णविराम नसल्याने गोंधळ झाला बहुतेक...

असे असावे वाक्य...

.....बघीतलेय माझ्या पुर्वजानी .

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

4 Feb 2009 - 5:36 pm | परिकथेतील राजकुमार

खरतर आज मी हा लेख लिहिणार नव्हतो दुसरा लेख तयारही होता
एक अजुन लेख ? #:S
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

विनायक पाचलग's picture

4 Feb 2009 - 9:04 pm | विनायक पाचलग

आपणा सर्वाना माझा सादर प्रणाम
प्रथम आपणा सरर्वांचे मनापासुन आभार यासाठी की आपण या पामराचे लिखाण न कंटाळता वाचता आणि त्यावर प्रतिक्रिया देता.
आता काही महत्वाचे
१. महत्वाचे म्हणजे सदरचे नाटक हे प्रायोगीक होते त्यामुळे याची एकुण दहा प्रयोग होतील की नाही हहीदेखील शंक आहे आता म्हणाल तर हे कल्पनाविस्तारात्मक लिखाण आहे आणि उपमांचा वापर करायचे /व्हायचे कारण असे की हा लेख एका वेगळ्या ट्रांस मध्ये लिहिलेला आहे ्आ लेख लिहिताना मी शाम मनोहरांचे वाचन ऐकुन आलो होतो साहजीकच त्यामुळे वेगळ्या विश्वात होतो आणि आपणाला माहित आहे की माझी मुळ प्रव्रुती उपमात्मक लिखाणाची आहे त्यामुळे हे जरा अतीच लिखाण झाले यापुढे आपणाला असे लिखाण वाचावयास लागणार नाही याचा नकी प्रयत्न करेन.
आणि शैली बरी म्हणाल तर माझी कोणतीच शैली नाही ना माझ्याकडे अनुभवांचे गाठोडे आहे की वाचनाची शिदोरी त्यामुळे मनाला येइल तसे व ते लिहितो(मनाच्या कुपितले म्हटले आहे ते त्याचसाठी)
बाकी नकी प्रयत्न करेन पण मला सहानभुती दाखवल्याबद्दल आभार आणि महत्वाचे म्हणजे येथुन पुढे माझा कोणताही लेख मला न विचारता उडवायचा अगदी कोणत्याही कराणासाठी मी एक चकार शब्द विचारणार नाही.
२.आणि गटणे म्हणाल तर चांगले आहे की हो दीवस दीवसभर गेम खेळेत पडण्यापेक्षा वा वाया जाण्यापेक्षा गटणे झालेले काय वाईट( ही बोलणे सत्य असुन माझ्या संगणकावर एकही गेम नाही)
३.बाकी IBN चा विषय येथे नको कधीतरी त्यानाही सविस्तर फाडीन ब्राह्मण्मु द्याबद्दल खरडीचा वापर करावा ही नम्र विनंती
पुन्हा एकदा असा बंडल लेख लिहिल्याबद्दल जाहीर माफी

आपला
(साधासुधा लेखक) विनायक

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले