नमस्कार मित्रानो,
मनाच्या कुपीतले या सदरातला हा दुसरा लेख.....
(सुचना- या लेखात जेथे जेथे इश्वरवाद हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी नास्तिकानी निसर्गवाद हा शब्द वाचावा कारण तो मुद्दा फक्त त्याच द्रुष्टीने घेतला असुन त्याचा कोणत्याही धार्मीक भावनेशी काडीमात्र संबंध नाही.)
समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?
आज एकूणच मानवजात, समाज एका विशिष्ठ परिस्थितीस येऊन पोहोचला आहे. आज, समाजाला निर्णय घ्यायची गरज आहे. गेली 10-15 वर्षे, विशेषत: गेली 3-4 वर्षे समाज विविध विचारप्रवाहांमध्ये अडकलेला आहे. मात्र गेल्या 3 महिन्यात निर्माण झालेल्या स्थितीमुळे तर घोडा मैदान जवळ अगदी तोंडावर येऊन ठेपले आहे. पण असं घडलंय तरी काय ? की त्यामुळे मी असं कांही लिहितोय ,एवढं काय घडलंय तरी काय असं जगात ? अजुनही लोक छानचौकीत जगतायत. कोणती युध्दे गेल्या 3 वर्षात झालेली नाहीत. जग प्रगतीपथावर आहे. मग असं काय बिघडलंय ?
वरवर पाहता जग नीट चालू आहे. सर्व ठिकाणी प्रगती चालू आहे. पण लक्षात घ्या, हा वरवरचा गिलावा आहे. आत कांहीतरी वेगळं घडतंय, जे कदाचित सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित नाही. पण, कधी ना कधी हा गिलावा उडून जाणार आहे. पण, मग प्रश्न काय आहे ?
गेल्या 200 वर्षात औद्योगिक क्रांतीनंतर विश्व दोन तत्वावर चालत आहे. पहिला समाजवाद आणि दुसरा भांडवलवाद. समाजाचा गाडा या दोन तत्वांवर नीटपणे चालू होता.
व्यक्तीपेक्षा समाज महत्वाचा या तत्वाच्या आधारे समाजवाद निर्माण झाला. रशियात उगम झालेल्या या वादाने थोडया कालावधीत बरेच जग काबील केले. कामगारांचे हित हे या धोरणाचे उद्दिष्ट होते. पहिल्या 20 वर्षात त्याचे चांगले परिणामही घडून आले. रशिया महासत्ता म्हणून उदयास आली. पण, हळूहळू या तत्वातील दुष्परिणाम जगापुढे आले. या तत्वात एक मुलभूत दोष होता. हे तत्व मनुष्यापेक्षा समाज मोठा या तत्वावर चालते. येथे मनुष्याच्या गरजांना, सुखसोयींना दुय्यम प्राधान्य दिले गेले तरी तो माणूस आहे. आणि माणसाला स्वार्थ असतोच की ? तो तो कितीवेळ दाबून ठेवणार. यातूनच, समाजवाद पोकळ होत गेला. आणि, 1990 मध्ये रशियाच्या विघटनाने साम्यवाद संपुष्टात आला. भारत, चीन सारख्या देशात तो कांही प्रमाणात अजूनही आहे. पण, 2 महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ समाजवादी नेत्याने समाजवादाचा पराभव झाला असे खुलेआम मान्य केले . आता याला काय म्हणायचे ?
हे जग चालवणारा दुसरा वाद भांडवालवाद. याची व्याप्ती ही समाजवादाच्या कैकपटीने मोठी. भांडवलवादाचे मुख्य सुत्र मी(व्यक्ती). हा भांडवलवाद या "मी" भोवती सतत फिरत राहतो. मी, माझे नातलग माझे कुटुंब, माझा पैसा, माझ्या सुखसोयी. सगळं माझं ! हा विचार व्यक्तीकेंद्रीत आहे. त्यामुळे साहजिकच येथे फक्त स्वत:च्याच फायद्याचा विचार केला जातो. बाकी जग गेलं उडतं. माझा फायदा म्हणजे सगळं. हा वाद मानवी मनास पुरक होता. त्यामुळे तो प्रचंड वाढला. यशस्वी ठरला. अनेक मोठमोठया कंपन्या, अब्जाधीश, ही त्याचीच उदाहरणे. क्वचित भांडवलवाद, चंगळवादात रूपांतरीत झाला. त्यातून मग व्यसने, मौजमला वगैरे आली आणि बरेच कांही. पण गेल्या दोन महिन्यात भांडवालवाद कोसळला. हे विधान अतिशयोक्ती असेल. पण माझे स्पष्ट मत आहे कीं, भांडवलवाद कोसळला. पत्त्याच्या डोंगराप्रमाणे कोसळला. पडणारे शेअरबाजार, कोसळणाऱ्या बँका, डबघाईला आलेले उद्योग, वाढते दर आणि विशेष म्हणजे माणसांची खचलेली मनोवृत्ती. सारं कांही याचंच द्योतक आहे असं मला वाटतं. पण असं का घडावं ? मीच म्हणालो ना, की हा वाद मानवी प्रवृत्तीस अनुकूल होता. मग असं का ? माणसाची खरी गल्लत इथेच झाली. सुखाचे दार उघडल्यावर तो आपसुक त्यात ओढला गेला आणि एखाद्या घोडयाप्रमाणे आजूबाजूचा समाज, त्याला दिसेनासा झाला. इतकेच काय, तर घोडयाप्रमाणे सरळ जात असल्याने तो आपले अंथरूण विसरला. कुवत विसरला. यु.एस.ए. तील गृहउद्योग, गृहकर्जे हे त्याचेच ज्वलंत उदाहरण ती सरळ जात होता. पण, आजुबाजूला पडणारा अंधार त्याला दिसत नव्हता. स्वत:च्याच युगात वावरणारी तरूणाई हे त्याचेच उदाहरण विविध उद्योगात आलेली बूम हे त्या घसरणाऱ्या पायास अधिक पोषक ठरली. तत्वनाश झाला. पण जेंव्हा तो अंधार त्या वाटेवरही पसरला तेंव्हा तो झटकन् कोसळला. कारण जगात दु:ख असतं, हे तो विसरला होता. ते सोसायची ताकद त्याने कधीच गमावतो होती. कायमची .............
पण, मग आता काय करायचं ? जगरहाटी चालवायला कोणती तरी विचारधारा हवीच ना ? मग कुठे आहे ती विचारधारा ? आता विचार कसा करायचा ? या सर्व प्रश्नांवर उत्तर आहे, ईश्वरवाद अहं ! हा कुठला नवीन वाद नाही. आपण भारतीय तर तो पूर्वीपासून वापरतोय हा ! आणि यात कर्मकांड तर अजिबात सांगितलेली नाहीत. फक्त लोक वाचतील म्हणून हे नांव दिलंय म्हणा आपण याला निसर्गवाद असेही म्हणु शकता हवं तर ! फक्त काय झालं, या वादावर इतर दोन वादांनी गारूड केलं. आपणही ते निमूटपणे ऐकलं, जग म्हणतंय म्हणून, थर्ड वर्ड म्हणून घेतलं. आणि फर्स्ट वर्ड होण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. पण, मग काय आहे हा वादात. कोणत्या तत्वावर हा उभा होता किंवा आता तग धरेल ? तर याची तत्वे आहेत मी आणि समाज माणसाला स्वत:चं कल्याण करायचं आहे हे त्रिवार सत्य आहे आणि, ती समाजप्रिय आहे. त्यामुळे समाजाचे कल्याण हे त्याचे कर्तव्य आहे. समाजवाद फक्त समाजहीत जाणत होता. तर, भांडवलवाद स्वहीत. पण, या दोहोंचा सुवर्णमध्य साधतो तो ईश्वरवाद. आज लोक म्हणतात कीं, ईश्वरच नाही आहे, मग हा ईश्वरवाद कसला? पण ईश्वर असणे आणि नसणे हा हा श्रध्देचा भाग आहे. पण, कदाचित कधी तरी हा वाद वापरणाऱ्यांनी समाजासाठी म्हणून किंवा मानव मोकाट होऊ नये म्हणून किंवा तो पूर्णपणे स्वनियंत्रित होऊ नये म्हणून वापरलेली संकल्पना म्हणजे ईश्वर असे मला वाटते. तर आता त्या संकल्पनांसंबंधी तर हा वाद सांगतो मी आणि समाज. एक, मी स्वत: आहे. मला मानवजन्म लाभला आहे, हा जन्म नक्कीच इतरांहून वेगळा आहे. म्हणून मला माझे कल्याण करायचे आहे ते झाले नाही. तर त्या मानवाचे जीवन निरर्थकच. पण, माझा जन्म फक्त माझ्यासाठी नाही. कळत-नकळतपणे आपल्या प्रगतीत अनेक जणांचा हातभार लागतो. मग झोपेतून दररोज जागी करणारी अज्ञात शकतो. असो, वा कधीतरी पाण्याचा लोटा देणारा अनोळखी मार्गस्थ ...... आणि या सगळयांचे आपल्यावर उपकार आहेत. उपकाराची जाणीव तर पशुपक्षीही ठेवतात. मग, आपण का ठेवायची नाही. म्हणूनच येथे येतो तो समाजाचा विचार. प्रत्येकाने समाजकल्याणाचा विचार करायचाच. पण, समाजकल्याण करताना स्वत:ला विसरायचे नाही, हेच सांगतो ईश्वरवाद ! मानवाकडे विचार करायची ताकद आहे. हे वेगळेपण त्याला मिळालंय म्हणूनच त्याचं आयुष्य वेगळं आहे. पशु भोगवादी असतो. पण, मानवाचं आयुष्य भोग आणि त्याग यांचा मिलाफ आहे. बरं ! एवढं सगळं बोलतात. पण याला प्रमाण ? आहे ना ! समाजवादाचा जाहीरनामा होता. भांडवलवादावर तर अनेक पुस्तके आहेत. तसेच, ईश्वरवादालाही प्रमाण आहे. देव, त्याचे अस्तित्व यांवर तुमचा विश्वास असो वा नसो. पण, कांही भारतीय वाङमय हे लिखित स्वरूपात आहे आणि लिखित आहे, याचा अर्थ त्याला अस्तित्व आहे. आपण ते देवाने नव्हे तर मानवाने लिहिले आहे असे समजू. पण इतर वादही मानवनिर्मित आहे. त्यामुळे, यांवर वाद होण्याचे कारण नाही. मी स्वत: वेद वाचलेले नाहीत. मी त्याचा अभ्यासकही नाही. पण, मला मिळालेल्या लेखातून जे मान्यताप्राप्त आहेत. एवढे स्पष्ट होते कीं, ईश्वरवाद वैदिक वाङमयात स्पष्ट केला आहे. तो कडक शब्दात आहे. पण, त्याचे सामान्यीकरण भगवद्गीतेत करण्यात आलेले आहे.
या ईश्वरवादास अजून एक पुष्टी मिळते. समाजवाद, भांडवलवादावर जग 200 वर्षे चालले. मात्र ईश्वरवादावर जग जवळ-जवळ 1000 वर्षे वा त्यापेक्षा जास्त गुण्यागोविंदाने चाललेले आहे. पण, मग प्रश्न उपस्थित होतो की, त्यानंतर तो वाद का कोसळला ? याला उत्तर असे कीं, त्यावेळी परकीय व्यक्ती, राजकारणी आणि विचारप्रवाह या देशात आले. त्यांच्याशी या वादाला समरस होता आले नाही. आणि, इतरांनी आपल्या शक्तीच्या जोरावर त्यांवर मात केली. पण ती त्या वादाचा पराजय नव्हता. ती परिस्थिती होती. या वादातही त्रुटी आहेतच. हा वादमध्ये वाहवत गेला. कर्मकांडाचे स्तोम माजले. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेत अवनत झाली. पण, या सर्वांचा इतका भयंकर परिणाम झाला नाही कीं, जगायचे कसे ? हा प्रश्न पडावा आणि झाला असेल तर, तो भरून काढण्यात आला. एखादी चुक दुरूस्त करायची व्यवस्था बहुधा याच वादात असावी. आणि म्हणूनच 2000 वर्षानंतर देखील भोग, त्यागाचा मिलाफ सांगणारे विवेकानंद जन्माला येतात.
हा ईश्वरवाद सांगुन तर झाला. पण या वादानुसार जगायचे कसे ? तसे म्हटले, तर याचे अनुकरण प्रत्येकाला आपापल्यापरीने करणे शक्य आहे. त्यासाठी काळ, वेळ, पंथ, सुबत्ता, पत याची गरज नाही. हजारो माणसांमुळे समाज निर्माण होतो आणि आपण समाजाचे घटक आहोत ही गोष्ट जर प्रत्येकाने ध्यानात ठेवली आणि आपली वर्तणूक समाजास हानीकारक होणार नाही याची काळजी घेतली व फावल्या वेळात ध्येय व मनोरंजन याचे संतुलन साधून कांही वेळ समाजकार्यास दिल्यास नक्कीच ईश्वरवाद साधता येईल. मग, त्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्याचा उहापोह करण्याचे हे साधन नाही. तसा ह्या लेखाचा उद्देशही नाही. येथे, फक्त ईश्वरवाद या संकल्पनेचा उहापोह करण्यात आलेला आहे.
तर असा हा ईश्वरवाद, निसर्गवाद म्हणा हवं तर ! मानव प्रयोगशील आहे. तर मग या वादाचा प्रयोग करायला काय हरकत आहे. मुळात म्हणजे हे हवेत सोडलेले बाण नव्हेत. याला तात्विक अधिष्ठान आहे. हजार वर्षांची परंपरा आहे. मग, करायचा का प्रयत्न हा वाद वापरायचा. फायदा झाला तर चांगलंच. आणि तोटाही फारसा नाही. नाही तरी स्वत:च्या आवाजाला मुरड घालून आपण जे जगतोय. त्यातून फार कांही आनंददायक घडतंय अशातला भाग नाही. मग काय, बघूया ना हा प्रयत्न करून ?
मी कोणताही तत्वचिंतक, विचारवंत, वा कोणाचाही समर्थक नाही. मी फक्त 16 वर्षांचा असल्याने माझे अनुभव फार तोडके आहेत. नाहीतच ! त्यामुळे, सामाजिक परिस्थिती, विविध लेख आणि आत्मचिंतन यांच्या आधारावर हा लेख लिहिलेला आहे. हा लेख लिहिताना तटस्थता बाळगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असून, तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास त्याबद्दल क्षमस्व ! या लेखातून कोणतीही भावना रूजवायचा, फुलवायचा प्रयत्न केलेला नाही. येथे फक्त एक पर्याय सुचवलेला आहे. त्यांवर विचार करणे, वापरणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. हे विचारमंथन आहे. जे फायदेदायी आहे. त्यामुळे मी आपल्या विचारांचे, प्रतिक्रियांची वाट पाहतोय. माझ्यादृष्टीने त्या फार महत्वाच्या आहेत. तर नक्की, प्रतिक्रिया द्या. प्रतिक्रियांची वाट बघतोय. आता लहान तोंडी एवढा मोठा घास घेतल्यावर एवढंच म्हणीन. की बाबानो समजुन घ्या या मुर्खाला.......
धन्यवाद !
विनायक वा. पाचलग,
vinayakpachalag@gmail.com
www.vinayakpachalag.blogspot.com
www.marathilegends.tk
अवांतर- याच दीवशी गेल्या आठवड्यात मी "छानसे वाचलेले "या संकेत्स्थळाबद्दल माहिती दीली होती.गेल्या आठवड्यात त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार ,
अशीच कृपा राहुदे हीच इश्वरचरणी प्रार्थना.
प्रतिक्रिया
8 Jan 2009 - 9:53 am | अविनाशकुलकर्णी
इश्वर वाद जो आपण म्हणता आहात..त्या सारखा तर खतर नाक वाद जगात नाहि...मुळात प्रत्येक धर्माचे ईश्वर निराळे आहेत..इश्वर एक हा फक्त कागदि सिध्धांत...व तो कोणीच मानायला तयार नाहि...इश्वर आराधने साठि अनेक उपासना पध्धति निर्माण झाल्या..कालांतराने त्या एका जातिची मक्तेदारी होऊन बसली..त्या आधारे मानवाने इतर जातिंना पशुतुल्य वागणुक देवुन सा~या मानव जातिचे अकल्याण केले...ईश्वराचे नाव घेत एका हातात धर्मग्रंथ व दुस~या हातात तलवार घेवुन मानवाने या पृथ्विवर धुमाकुळ घातला आहे..इश्वर वाद हि भावना आहे कल्पना आहे...कल्पनेवर व भावनेच्या आधरे राज्य व्यवस्था चालत नाहि..ते एक शाश्त्र आहे..नियम आहे...ति व्यवस्था साम्यवास/समाजवाद/भांडवल्शाहि/लोकशाहि/डायनास्टी च्या माध्यमातुन मिळु शकते...अर्थात प्रत्येक व्यवस्थेत हे गुण दोष असणारच..म्हणुन कार्ल मार्क्स ने लिहुन ठेवले आहे कि.."जेंव्हा भांडवल शाहिचा अतिरेक होतो तेंव्हा परत साम्यवादाचा जन्म होतो" त्या मुळे इश्वरवाद हा पर्याय होइल असे समजणे हे भाबडेपणाचे होइल....त्या मुळे अश्या कल्पना मांडून समाजात बुध्धिभेदाचे वातावरण निर्माण होईल असे वाटते...व त्या आधारे परत जातिव्यवस्थेचे भुत समाजाच्या मुंडक्यावर बसेल अशि स्थिति निरमाण होइल कि काय असे वाटते.
अविनाश.....एक बेधुंद..मुक्त जिवन
8 Jan 2009 - 8:57 pm | विनायक पाचलग
हे सर्व होते अवडंबर मात्र मुळ गोष्ट अशी नाही .मी मुळ भारतीय जीवनपद्धतीला इश्वरवाद असे संबोधतो ते दोश आपणच काढायला हवेत .
असो आणि हो समाजात दुही माजणार नाही.
इतर वादानी फर चांगले घडवल्याचे माझ्या वाच्नात नाही तेव्हा हे ट्राय करायला काय हरकत आहे
बाकी उत्तर नंतर देइन अजुन तेवढे वाचन नाही.
असो मला अपेक्षित वाद खाली खरडीत देला गेलेला आहे
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
11 Jan 2009 - 9:46 pm | टारझन
आई शप्पथ ... १ पॅराग्राफ वाचला भो ....... पुढे वाचायची आमची डेरिंग णाही झाली !! लिहीत रहा भौ !
मनातल्या कुपीतले भाववाद , भांडवलवादाचा इश्वरवाद असं वाचलं त्यात :(
- लगोलग(लेखटाकू) टारझण
8 Jan 2009 - 10:00 am | अविनाशकुलकर्णी
आपण इश्वर वादाला निसर्ग वाद म्हणा कि आणखि काहि म्हणा..ते सारे शाव्दिक खेळ आहेत..आपल्या लेखातुन नेमके काय म्हणायचे आहे ते आम्हाला कळाले आहे..इश्वर हि मुल्ला मौलवि/पाद्री/ब्राह्मण समाजाचि मक्तेदारी आहे...जर इश्वर वादाच्या नावखालि राज्य करायला लागले तर ह्या वर्गाचि मक्तेदारी होइल..व सर्व समाजाचे वाट्टोळे होइल.....
8 Jan 2009 - 2:14 pm | ऍडीजोशी (not verified)
म्हणजे हे का?
हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही. असे शुध्द चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृध्दी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीत कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
अर्थ -
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।
9 Jan 2009 - 7:43 pm | लिखाळ
नमस्कार,
निबंध वाचला. चांगला आहे.
वाचकांसमोर मांडण्यासाठी तो अजून आटीव आणि घोटीव करायला हवा असे वाटले.
निसर्गवाद म्हणजेच भारतभूमीवरची जीवनपद्धत असे तुम्हाला म्हणायचे आहे असे वाटले.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
9 Jan 2009 - 10:56 pm | विनायक पाचलग
होय मला तोच अपेक्षित आहे
गोटीव व्ह्याल हवा होता पण काय झाले असे लेख कसे लिह्यायचे याची आम्हाला गंधवार्ताही नाही हो
आम्ही आपले आले डोक्यात की निबंध खरडणारे
बाकी जसे जसे वय आणी अनुभव वाढत जाइल तसे इतर लिखाणही जमावे हीच अपेक्षा आहे गजानन चरणी
आपला
विनायक्(निबंध स्पेशालिस्ट)
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
9 Jan 2009 - 11:15 pm | लिखाळ
मी आपल्या लेखाला निबंध म्हणालो याचा आपल्याला राग आलेला दिसतो. पण साधारणतः मोठ्या वैचारिक लेखाला निबंध असे सुद्धा म्हणतात असे मी पाहिले आहे म्हणुन मी ते सहजच म्हणालो. या निबंध शब्दाची निवड मी तुम्हाला कमीपणा द्यायला केली नव्हती. राग आला असेल तर क्षमा करा.
आपण लेख प्रकाशित केला की अनुकूल-प्रतिकूल प्रतिसाद येणारच. माझे प्रमाणिक मत मी नोंदवले.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
9 Jan 2009 - 11:37 pm | धनंजय
हा लेख मी अनेक वेळेला वाचला, पण तो समजला नाही, म्हणून प्रतिसाद दिला नव्हता.
वरील "निसर्गवाद म्हणजेच भारतभूमीवरची जीवनपद्धत असे तुम्हाला म्हणायचे आहे" वरून काही दिशा मिळाली. पण तरी समजले नाही.
जगातले सर्वच लोक "स्वार्थ आणि समाजकल्याण यांच्यात समतोल साधावा" असेच काही म्हणतात. समाजवाद आणि भांडवलवादाचे प्रणेते स्वतःच्या वादांबद्दल असेच काही म्हणतात.
भारतभूमीवरील जीवनपद्धत म्हणजे नेमके काय - भारतातले लोक वेगवेगळ्या प्रकारे जगताना दिसतात. इतकेच काय २००० वर्षांपूर्वी आणि १००० वर्षांपूर्वी बघितले, तर जीवनपद्धती खूपच वेगळी असेल.
त्यामुळे आज वाचकांनी वेगळे कसे वागावे, याबद्दल मला तुमच्या लेखतून काय ते नीट समजून येत नाही. मिसळपावावरच्या कोण्याही लेखकाचे लेख-प्रतिसाद वाचल्यास असेच दिसते की त्यांना एकमेकांविषयी/मराठी-माणसाविषयी/देशाविषयी, म्हणजे कुठल्यातरी प्रकारे समाजाविषयी कळकळ आहे. शिवाय स्वतःबद्दलही आस्था आहे.
कुठल्याही पाश्चिमात्त्य वर्तमानपत्रातले संपादकीय वाचले, तर लोक/देश वगैरेंविषयी कळकळ दिसून येते. आणि त्यापुढे पाककृती/स्वास्थ्य/गुंतवणूक पुरवण्या वाचल्या तर स्वार्थ कसा सांभाळावा त्याबद्दल रुची दिसते.
लोक आपापल्या परीने सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न करतच आहेत. म्हणजे तुम्ही म्हणता त्या तात्त्विक व्याख्येने
आपण सर्वच जण आहोत तिथे ठीक आहोत. (यात काही वाईट नाही म्हणा - पण मग लेखप्रपंच कळला नाही.)
याबद्दल साशंक आहे. "फक्त" म्हणणारे कोणीच नाही. प्रत्येक आपापल्या परीने सुवर्णमध्य सांगत आहेत. "व्यक्तिहित नसते" असे म्हणणारा कोणी कट्टर/प्रामाणिक समाजवादी तुम्हाला भेटला आहे काय? "समाजहित नसते" असे म्हणणारा कोणी कट्टर/प्रामाणिक भांडवलवादी तुम्हाला भेटला आहे काय?
असो. तुम्ही कळकळीने लिहिले आहे, पण मला मात्र नेमकी कळकळ कशाबद्दल आहे, ते खरेच समजलेले नाही.
तरी लिहीतच राहा, आम्हाला तुमच्या विचारांचा ओघ सांगतच राहा, अशी विनंती.
10 Jan 2009 - 9:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही नक्की काही समजलं नाही. खरंतर गाडी पहिल्याच काही परिच्छेदात अडली.
घडलंय तरी काय असं जगात ? अजुनही लोक छानचौकीत जगतायत. कोणती युध्दे गेल्या 3 वर्षात झालेली नाहीत. जग प्रगतीपथावर आहे. मग असं काय बिघडलंय ?
लोकं छानछोकीत जगत आहेत (गेल्या+येत्या काही महिन्यात तेही बदलू शकतं, नाही का?) पण त्याचबरोबर मान्सूनचा लहरीपणा वाढतोय, मेक्सिकोच्या आखातामधून जाणारी वादळं फारच जास्त विध्वंसक ठरत आहेत, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींबद्दल जास्तीतजास्त चिंता प्रकट होत आहे.
गेल्या तीन वर्षात इस्रायलने एक युद्ध केलं आहे, लेबेनॉनशी; गाझा पट्टीत बाँब्ज टाकणंतर वेगळंच आहे. इराक, अफगाणिस्तान, इस्रायल-पॅलेस्ताईन, इत्यादी ठिकाणी सैन्य मारामार्या करत आहे याला युद्धच म्हणायचं ना?
प्रगती होत नाही आहे असं मी अजिबातच म्हणणार नाही पण म्हणून काहीच बिघडलं नाही आहे किंवा वरवर काही दिसत नाही आहे हे मला पटत नाही.
पहिला समाजवाद आणि दुसरा भांडवलवाद. समाजाचा गाडा या दोन तत्वांवर नीटपणे चालू होता.
असहमत. तसं असतं तर शीतयुद्धतरी का झालं असतं?
बाकी धनंजय म्हणतात त्याप्रमाणे तुमचे विचार नीटसे कळले नाहीत.
अवांतरः थर्ड वर्ल्ड या शब्दाचा अर्थ नीटसा कळलेला नाही आहे. ना साम्यवाद ना भांडवलशाही, म्हणजे पहिले दोन पर्याय सोडून तिसरा अनुसरणारे ते तिसरे का आणखी काही?
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
10 Jan 2009 - 1:01 pm | अवलिया
तुमचे विचार नीटसे कळले नाहीत.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
10 Jan 2009 - 1:06 pm | सखाराम_गटणे™
+१
सहमत
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
10 Jan 2009 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार
'राघुनानांची कन्येस पत्रे'
सुज्ञांस अ.सां. न.ल.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
10 Jan 2009 - 3:54 pm | विनायक पाचलग
प्रथमतःआपणा सर्वांचे प्रतिक्रिया दील्याबद्दल आभार .
आता काही मुद्दे
१.मला निबंध म्हणल्याचा अजीबात राग आलेला नाही.
साधारण सर्व ललित लेख हे निबंध टाइपच असतात.
आणि हो मी आमच्या इथल्य्७आ व्रुत्तपत्रातुन यापेक्षा वाइट लेख वाचत असतो त्यामुळे मला राग नाही.
आणि हो सुनीलजी असेच प्रतिसाद येवु देत मी जे काही लिहितो ते लोकांपर्यंत माझे विचार पोहोचवण्यासाठी त्यामुळे प्रतिक्रिया हेच माझे टॉनिक आहे.
२.धनंजय प्रथम आपण माझा लेख इतक्यांदा वाचायची तसदी घेतलीत त्याबद्दल आभार.
मला अपेक्षित वागणुक ही साहजीकच दोन्ही वादांचा संमन्वय साध्णारीच आहे.
आपापल्या परीने प्रत्येक्जण समन्वय साधायचा प्रयत्न करतोय .बरोबर आहे
मात्र आज अनेक लोक आपली समाजवादी किंवा भांडवलवादी विचारसरणी सोडायला तयार नाहीत .
आणि काही लोक या दोन्हीचे समन्वय सधाताना चुकतात. यासाठी मी हा लेखनप्रपंच साधला
आणि हो आज माझे अनेक मित्र वा माझे समवयस्क पाशिमात्यांचे आंधानुकरण करताना व्यसानांच्या आधीन झाली आहेत आइ वडीलांचे पैसे बुडवत आहेत
ही संस्क्रुती आज कोल्हापुरसारख्या गावातही रुजते आहे पण या गोश्टी प्रमाणात असव्यात हे सांगणारे आज कोणी नाही.
काहिना तर त्यांचे आइ वडील्च प्रोत्साहन देतात .यालाच मी भांड्वलवादाचे अंधानुकरण समजतो.
याउलत
माझे महाविद्यालय ज्या भागात आहे त्या भागात अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत तेथे मी अनेक मोर्चे पाहतो पण त्यातले अनेक्ज विषय असे असतात की समाजाच्या प्रगतीसाठी अनुपयुक्त असतात
मी अशी अनेक भाशणे ऐकली आहेत ज्यात वक्ते या दोन्ही वादांचे गाठा गातात मात्र या दोघातले प्रमाणात वागणे सांगत नाहीत.
३.वरील उद्देशाने हा लेख मी १५ नोव्हेंबर रोजी लिहिला होता.त्यमुळे त्यावेळी बाँबस्फोट घडला नव्हता. मात्र टाइपिंगला वेळ मिळत नसल्याने व ते नीट होत नसल्याने मी ते एकांकडुन टाइप म्करुन घेतले व परिवर्तन ही प्रणाली वापरुन ते उनिकोडात केले त्यामुळे काही विराम्चिन्हे उठलेली नाहीत.
साहजीकच मी काही नवे बदल यात सामावु शकलेलो नाही व काही ताईपंग चुकांमुळे एक दोन वाक्याचे अर्थ वेगळे लागलासारखे वाटर्त आहे असो बदल करीन.
४.समाजाचा गाडा या दोन तत्वावर चालु होता म्हणजे युद्ध वगैरे होत होतीच पण प्रत्यक्ष सामान्याना त्याचे फार झळ बसत न्हवती.
आणि थर्ड वर्ड चा अर्थ असाच काहीतरी तुम्ही म्हणता तो.(हा श्बद हेडन नामक एका वेड्या पण चांगल्या खेळाडुने म्हटयाने मला समजला आणि मी वापरला इतकेच)
बस आणि हो लेख लिहिताना मी एक महत्वाची चुक केली होती ती म्हणजे मी या फक्त अर्थव्यवस्था न मानता त्याना समाज्व्यवस्थेचे स्वरुप दीले होते
भांडवलवाद म्हणजे साधारण त्या व्यवस्थेवर जगणारा समाज आणि तसेच समाजवादाचे (त्यामुळे समाज्वाद व साम्यवाद याना मी एकत्रच धरले आहे)
आणि आता इश्वर्वादाबरोबर
गेली कित्येक वर्शे भारतात देवाची भीती घालुन वा श्रद्धेचा वापर करुन या दोन वादांचा समन्वय साधाला होता म्हणून या पद्धतीला मी इश्वर्वाद हे नाव दीले.
तर आता बदल बदल म्हणजे मी असा करायचा म्हणत होतो की आपण हीच संस्क्रुती पुन्हा बाणली पाहिजे
सामाजेक नव्हे तर वैयक्तीक पातळीवर
आजकाल लोक जेष्ठाना नमस्कार करत नाही त्याना लाज वाटते अशा ठिकठिकाणी इतर संस्क्रुतीनी गारुड केले आहे
आणि सध्याचा परिस्थीती सगळे जण आता काय करायचे असे म्हणत आहेत.
याला उत्तर म्हणजे आपण नेहमीसारखे वागले तर नाकीच परिस्थीती बदलेल
आपल्या संस्क्रुतीत पोट्यापुरतेच खायला सांगीतले होते पण आपण जास्त खाल्ले आणि आता ओकओय इतकेच .
तर या विषयावर माझे हे मत
*****महत्वाचे म्हणजे हा लेख म्हणावा तसा जमलेला नाही याची मलाही जाणीव आहे मात्र तरीही आपण तो वाचलात आणि प्रतिसाद दीलात याबद्दल आभार आणि हो मी लिहिता लाहणारच आहे
कारण त्याशिवाय मी जगु शकत नाही.आणि हो मी जास्त वाचन केलेले नाही त्यामुळे ही मते माझ्या अनुभवावरुन व काही फुटकळ वाचनावरुन केलेली होती त्यामुळेच घोळ झाला होता .
पण असो आणि हो आताही दोष लगेच आणि जरुर सांगा वाट पाहतोय..
आपला,
(खुप आनंदीत)विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
10 Jan 2009 - 5:21 pm | विसुनाना
नक्की काय म्हणायचे आहे ते समजले नाही.
को.दा. विनायकराव,
वयाच्या मानाने प्रयत्न स्तुत्य आहे. पण सावरकर उपनामे एक दुसरे विनायक होते त्यांचा आदर्श समोर ठेवा.
त्यांची मते काही लोकांना चुकीची वाटली तरी ती चुकीची मांडली आहेत असे कधीच वाटू शकत नाहीत.
लेखात आपल्याला नक्की काय मांडायचे आहे ते ठरवा.
आपले म्हणणे कसे बरोबर आहे ते पटवून द्यायचा प्रयत्न करा.
सूचनांबद्दल राग नसावा ही विनंती.
10 Jan 2009 - 9:58 pm | विनायक पाचलग
राग अजिबात नाही अहो माझ्या फायद्याचेच आहे न ते मग राग कसला
बस मला फक्त भारतीय संस्क्रुतीचे श्रेश्ठत्व आणि त्यापरमाणे वागाय्चे गरज सांगायची होती
असो
पुढच्या वेळी बघु जमतय का
आणि हो सावरकरच माझे आदर्श आहेत्(आता गांधी आम्हाला पटले नाहीत त्याला काय करणार बुवा)
असो
धन्यवाद
आणि हो
हे काही लेख
नकी सुट होतात माझ्या विचाराना
http://www.loksatta.com/daily/20090110/ch01.htm
http://www.loksatta.com/daily/20090110/ch02.htm
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
10 Jan 2009 - 11:17 pm | वेताळ
विनायका तुझा लेख दोनदा वाचला. तुझी विचार करण्याची पध्दत आवडली. सदर लेख लिहिताना तुझा खुप गोधंळ उडाला आहे असे मला वाटते. समाजवाद व साम्यवाद हे दोन्ही भिन्न आहेत.रशियाने व चीन ने साम्यवाद स्विकारला.नेहरुनी स्वातंत्र भारतासाठी समाजवाद स्विकारला.अमेरिका व इतर राष्ट्रे भांडवलशाही आहेत. प्रत्येक व्यवस्थेचे काही गुणदोष आहेत.कोणतीही व्यवस्था सर्वगुणसंपन्न नाही. त्यामुळे आपण जी व्यवस्था स्विकारतो ती दोषविरहित बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रशियात साम्यवादाचे तीनतेरा वाजले. परंतु तोच साम्यवाद भांडवलशाहीच्या मुक्तअर्थ व्यवस्थेत चीनमध्ये कसा गुटगुटीत झाला आहे तु बघतोच आहेस.मग साम्यवाद नष्ट कसा झाला?अमेरिकेत भांडवलशाही कोसळली असे म्हणणे पण चुकीचे आहे. कोणत्याही व्यवस्थेत काही चुका ,उणिवा असतात.त्या कधी कधी वर उग्ररुप धारण करतात. म्हणुन ती व्यवस्था चुकीची आहे असे एकदम म्हणता येणार नाही. आता आपण ही समाजवादातुन मुक्त अर्थव्यवस्थेचा स्विकार केला आहे.त्याबद्दल आताच काही बोलणे योग्य होणार नाही.अजुन काही काळातच आपल्याला कळेल .
भारतात निसर्गवाद का ईश्वरवाद होता असे तु काय म्हणत आहेस त्या बद्दल मला काहीच कळाले नाही. पण मला वाटते ब्रिटीशाच्या आक्रमणा आधी भारतात जवळ जवळ सर्व खेडी स्वंयपुर्ण होती. परंतु ब्रिटिश आक्रमणा मुळे व त्याच्या मालाला हव्या असणार्या बाजारपेठेसाठी त्यानी आपली ही व्यवस्था मोडीत काढली.परंतु ती ईश्वरवादी होती का निसर्गवादी होती , म्हणजे काय? फक्त तु ईश्वरवाद व निसर्गवाद म्हणजे काय ते एकदा स्पष्ट कर.म्हनजे तुझा लेख समजायला सोपा जाईल.तुझ्या भावी लिखाणास माझ्या कडुन शुभेच्छा.
वेताळ
11 Jan 2009 - 8:54 pm | विनायक पाचलग
वेताळ आपले व माझ्या लेखावर प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आभार
मला थोडक्यात फक्त एवडेच सांगायचे होते.
की आपण जगातील कोणत्याही वादाचे अंधानुकरण करण्ञापेक्षा आपल्या भारतीय जीवनपद्धतीनुसार जगावे.
बस हे सांगताना मी अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांचा समन्वय साधायला गेलो होतो
मात्र अपुर्या अभ्यासामुळे आपटलो असो....
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
11 Jan 2009 - 10:03 pm | गोगोल
केलेला आहे, पण जमलेला नाही.
मागे पण तू एकदा शाळेविषयी लेख लिहिला होतास, मी त्याला त्यावेळी निबंध असे म्हणालो होतो. आता या दोन्ही लेखांवरून मी काही सजेशन्स देतो आहे
1. अवजड शब्दा सहजरीत्या वापरणे फार थोड्या लेखकांना जमते. ते जर जमले नाही, तर तो लेख सखाराम गटणे या पुलंच्या व्यक्तिरेखेप्रमाणे होऊन बसतो. म्हणजे काय की शब्द तर बरेच माहिती आहेत, पण अर्थ उमगलेला नाही. काय आहे ना की विद्वत्ता असणे आणि उगाच मोठाले शब्द वापरुन त्याचा आव आणणे यात खूप फरक आहे. दुर्दैवाने आज काल असा प्रयत्न लोकांना लगेच कळतो.
2. काही माहिती सपशेल चुकीची आहे. तीन वर्षात युद्ध नाही? असेल तर सर्वसामान्यांना त्याची झळ नाही? मला माहीत नाही की तू कुठली वर्तमान पत्रे वाचतोस पण गेल्या पन्नास वर्षापेक्षा जग आज अधिक पेटलेले आहे.
3. "मी फक्त 16 वर्षांचा असल्याने माझे अनुभव फार तोडके आहेत. "
हा मुद्दा अत्यंत बरोबर आणि खरा आहे. माझा असा सल्ला असेल की थोडे बाहेरच्या जगातले अनुभव मिळाले तर लेखन अधिक समृद्ध होईल. या बाबतीत तू दुसरे लेखक जसे की पिवळा डांबिस, बिपीन कार्यकर्ते, विसोबा खेचर, प्रियाली आणि छोटा डॉन यांचे लेख बघ. साधे सोपे शब्द, सुटसुटीत वाक्ये, ओघवाती शैली यामुळे त्यांचे लेख अगदी खमंग होत असतात. त्यांच्या लेखनात एक प्रकारचा उस्फुर्तपणा आहे.
4. तुझ्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यात वादच नाही. जश्या की तू सुरू केलेली वेबसाइट. ती सुंदर आहे आणि त्याबद्दल अभिनंदन!!
5. आमचे पूर्वज श्रेष्ठ होते. त्यांनी हे शोध लावले, त्या काळात अशी प्रगती केली. हे सर्वा आता सोडून द्यायला पाहिजे आणि इतिहास अब्जेक्टिव्ली अनलाइज़ केला पाहिजे. एक अशीच वेबसाईट जी असा प्रयत्न करते तिची लिंक आहे http://khattamitha.blogspot.com/ . मी सगळ्याच मतानबरोबर सहमत नाही, पण काही मुद्दे विचार करायला जरूर भाग पाडतात.
हे परीक्षण थोडेसे परखड झाले आहे, पण मी काही ह. घ. वगैरे म्हणणार नाही. मला जे वाटते ते मी लिहिले. उद्या जर तू खरच मोठा लेखक झालास आणि पुस्तके लिहिलिस, तर तुला याहूनही खडतर परीक्षणांना तोंड द्यावे लागेल.
12 Jan 2009 - 3:59 pm | विनायक पाचलग
गोगोल आपण अगदी बिनधास्त आणि योग्य प्रतिक्रिया दीलीत त्याबद्दल आपले आभार
१.माझे लेखन अतीच अलंकारी होते हे अगदी सत्य आहे
बर्याचदा मी कारण नसताना उपमा आणि अलंकार वापरतो याची मलाही जाणीव होत आहे
याचे कारण असे आहे की मी माझे लिखाण साधारणतः दहावीनंतर सुरु केले
दहावीच्या काळात मी अनेक निबंध लिहिले आणि गरज म्हणून त्यात अनेक अलंकारी शब्दांचा वापर केला
त्यामुळे त्या काळात वाचनही त्याच प्रकारचे केले आणि तेच शब्द डोक्यात बसले त्यामुळे आता कोणत्याही लेखात माझ्याही नकळत हे शब्द वापरले जातात यावर हळुहळु मात करत आहे .
बघु काय होत ते.
२.मी ते वाक्य उपहासाने लिहिले होते पण बर्याच जणांचा तेथे घोळ झाला असो पुढच्यावेळी पासुन सुधारीन स्वतः ला
३.होय माझे अनुभव तोकडेच आहेत पण तसे असुनही मी लिहित आहे आणी तुम्ही ते वाचत आहात हेच मला समाधान देते .आणि अनुभव वाढतीलच तोपर्यंत आपले ललित लिखाण्च ब्वरे असे वाटत आहे
आणि हो मीही उत्स्फुर्त लिहितो आणि लिहिल्यावर त्यात काहीही बदल करत नाही पण हे क्रुत्रीमतेचे बुरुज लवकरच पाडीन
मिपावरच्या जेष्ठ लोकांच्या लेखांचे वाचन सुरु आहे
४.माझ्या उअपक्रमाची स्तुती लेल्याबद्दल आभार
आणि हो या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपरयंत पोहोचवा ही नम्र विनंती
५.ब्लॉग वाचला चांगला आहे
पुन्हा एकदा धन्यवाद
आणि हो यापुढे चांगले लिहिण्याचा प्रयत्न करीन
आपल्या अशाच प्रतिक्रियांचे स्वागत आहे
आणि हो माझा हा वैचारीक लेखाचा पहिलाच प्रयत्न होता
असो पण यापुढे चांगला प्रयत्न करीन
असो फक्त एकच गोष्ट खटकते मला लेख लिहिल्यावर माझ्या वयाचा उल्लेख करावा लागतो
जेव्हा माझे वय विचारात न घेता लोक माझे लेख चांगले म्हणतील तो दीवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा असेल.
आपला
(एक लेखक्)विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
29 Jan 2009 - 12:04 am | भडकमकर मास्तर
गोगोल यांच्याशी सहमत...
...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/