कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
18 Nov 2008 - 9:12 am

औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली. त्यापैकी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे हे कनकालेश्वर...

बीड शहराच्या पूर्वेला बिंदूसरेच्या तिरावर असलेले हे महादेवाचे हजारो वर्षांपूर्वीचे मंदिर पुराणांमध्ये तसेच रामायणातही उल्लेखलेले आहे. काही पुराणांमध्ये परशुरामाने येथे महादेवाची स्थापना केली असा उल्लेख आहे. तर इतिहासकारांच्या मते हे किमान १००० ते १४०० वर्षे जुने असावे. याचे बांघकाम हेमाडपंथी स्वरुपातले आहे... केवळ दगडांवर दगड गुंफून हजारो वर्षे उभे असलेल्या या देवळाने केवळ ऊन, पाऊस, वारा यांचाच नव्हे तर मुसलमानी आक्रमकांच्या पहारी, हातोडे, तोफा, यांचाही सामना केला आहे.

या दुष्काळी/कोरड्या भागातही कोरडे न पडणार्‍या या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या या देवळात जायला एक छोटा दगडी पूल आहे जो पावसाळ्यात पाण्याखाली असतो. त्यावरुन आत गेलो की हे प्रवेशद्वार दिसते.

अल्लाउद्दीन खिलजीचा मूळचा गुजराथ/राजस्थान या भागातला सेनापती महादेव कपूर ज्याचे धर्मांतर केल्यानंतर मलिक कपूर असे नामकरण करण्यात आले त्याने पहिल्यांदा या देवळावर आक्रमण केले.
पुढे औरंग्याच्या कर्दनकाळी सैन्याने या मंदिरावर कमीत कमी २७ वेळा हल्ले केले. त्यात एकून एक सर्व मुर्ती भग्न केल्या गेल्या. हे मंदीर त्या नंतर बहुतेक वेळा हिंदूंसाठी बंदच होते. ते परत हिंदूंच्या हाती यायला १९४८ साल उजडावे लागले.

या देवळाच्या आत सर्व भिंतीवर देवदेवतांच्या सुबक व कोरीव भग्न मूर्ती त्या आक्रमकांच्या क्रौर्याची साक्ष आजही देतात.

गाभ्यार्‍याच्या छताचे मूळ कोरिवकाम सुदैवाने आजही सुरक्षित आहे. ते पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होते. या देवळाला त्याच्या या श्रीमंतीमुळे/वैभवामुळे कनकालेश्वर हे नाव पडले. (कनक = सोने, सूवर्ण).

या मंदिराचे पुजारी कल्याण महाराज हे प्रसिद्ध समाजसेवक आहेत. त्यांच्या मते हे देऊळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात जर हिंदूंनी मिळवले नसते तर याचेही बाबरी झाले असते. त्यांचे हे म्हणने किती वास्तववादी आहे याची प्रचिती याच शहरातील आणखी एक मंदीर (पद्मावती मंदीर) जे की आज एका विशाल मशिदीमध्ये रुपांतरीत झालेले आहे त्याकडे पाहून येते. तेथे मदरशे म्हणजे आतंकवादी तयार करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर या कनकालेश्वर मंदिरात अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. जसे की या मागास भागातल्या ग्रामीण व गरीब कुटुंबातल्या लग्न कार्यांसाठी हे देऊळ अगदी वाजवी दराने दिले जाते, वगैरे.

येथे कर माझे दोन्ही जुळती.

जाता-जाता - दहावीच्या परिक्षेच्या काळात देवळाचा हा भाग माझी दिवसभराची अभ्यासाची खोली होता.

बहेर रणरणते ऊन असू देत पण येथे मात्र कसे थंड-थंड वाटे. बरेचदा अभ्यास सोडून मी या तळ्यातल्या रंगिबेरंगी माशांना पहात तर कधी कधी ते सुंदर कोरीव नक्षिकाम तासन तास न्यहाळत बसे.
कनकालेश्वराच्या या तळ्यात एक ते दोन फूट लांबीचे वेगवेगळ्या रंगाचे चमकदार मासे हे बच्चे कंपनीचे विषेश आकर्षण होते. पण या काही वर्षात ते मासे नष्ट झाल्याचे कळते. तसेच या तळ्यात गाळही खूप साचला आहे. लोक या तळ्यात गणपती विसर्जन करतात. तसेच निर्माल्यही फेकतात. ते थांबायला हवे नाहीतर हे तळेच नष्ट व्हायचे.

असे हे आमचे कनकालेश्वर मंदिर... आम्हा बीडकरांचे श्रद्धास्थान, आमच्या पूर्वजांच्या वैभवाचे, लढवय्येपणाचे प्रतिक... सध्या त्या वैभवशाली वारशाच्या वारसदारांकडून योग्य त्या काळजी अभावी एकटेच परिस्थितीशी झुंज देत उभे आहे.

संस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानछायाचित्रणलेखसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

18 Nov 2008 - 9:33 am | यशोधरा

छान आहेत फोटो व माहिती.

आनंदयात्री's picture

18 Nov 2008 - 12:25 pm | आनंदयात्री

उत्तम लेख. जुन्या आठवणी ताज्या केल्या. कैक वेळा गेलो आहे इथे.

भास्कर केन्डे's picture

18 Nov 2008 - 8:38 pm | भास्कर केन्डे

म्हणजे आपला बीडशी ऋणानुबंध आहे तर! कुणाकडे येता आपण बीडात?

आपला,
(बीडकर) भास्कर
आम्ही येथे वसतो.

टारझन's picture

19 Nov 2008 - 12:02 am | टारझन

किल्लास लिवला भास्कर भौ .. भारतात खास फिरायला गेलात काय तुम्ही ? मजा आहे राव ..
फोटू लैच उत्तम .. बाकी मंदीराभोवतालच्या तलावात पोहण्यास बंदी नाही ना ? असं पाणी पाहिलं की आमच्यातला पेंग्विन जागा होतो.

-टारझण

मराठी_माणूस's picture

18 Nov 2008 - 2:17 pm | मराठी_माणूस

छान सचीत्र माहीती.

मदनबाण's picture

18 Nov 2008 - 8:42 pm | मदनबाण

लेख आवडला...:)

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

लिखाळ's picture

18 Nov 2008 - 8:59 pm | लिखाळ

लेख आणि चित्रे आवडली..
आपली अभ्यासाची जागा तर एकदम भारी आहे...
-- लिखाळ.

भास्कर केन्डे's picture

18 Nov 2008 - 9:09 pm | भास्कर केन्डे

आपली अभ्यासाची जागा तर एकदम भारी आहे...
काय करणार. एका खोलीत सहा सात जन रहात होतो. पुन्हा येणारे जाणारे होतेच. म्हणून कंकालेश्वराच्या छायाछत्राखाली जायचो. घरापासून फार दूरही नव्हते हे देऊळ. सायकल वर टांग टाकली की ४-५ मिनिटात देवळात.

आपला,
(कनकालेश्वराच्या आशिर्वादाने शिकलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

लिखाळ's picture

18 Nov 2008 - 9:21 pm | लिखाळ

ह्म्म.. पण जागा छान निवडलीत ! मी आमच्या बिल्डिंच्या गच्चीत करायचो अभ्यास.. छान सावली असायची... सूर्यास्त पाहूनच खाली जायचो..
तसेही अभ्यास किती केला हा भाग वेगळाच ...
-- लिखाळ.

भास्कर केन्डे's picture

18 Nov 2008 - 10:15 pm | भास्कर केन्डे

तसेही अभ्यास किती केला हा भाग वेगळाच ...
हे मात्र खरं. मी सुद्धा कनकालेश्वराच्या तळ्यातल्या रंगिबेरंगी माशांना पहात तर कधी कधी ते सुंदर कोरीव नक्षिकाम तासन तास न्यहाळत बसे.

आनंदयात्री's picture

19 Nov 2008 - 11:23 am | आनंदयात्री

>>तळ्यातल्या रंगिबेरंगी माशांना पहात

माझी माश्यांशी पहिली ओळख तिथेच !!

अवांतरः आम्ही अजुन ५० वर्षांनी "पुन्हा बालपणीचा काळ सुखाचा" अशी मालिका लिहणार आहोत,तेव्हा यावर एक चाप्टर नक्की !!

प्राजु's picture

18 Nov 2008 - 9:50 pm | प्राजु

भास्कर राव,
अतिशय सुरेख चित्रे आहेत. खूपच छान. गाभार्‍यावरच्या घुमटाचे नक्षिकाम अप्रतिम.
धन्यवाद एका सुंदर स्थळाची ओळख करून दिल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पक्या's picture

18 Nov 2008 - 11:54 pm | पक्या

छ्हन लेख ..आवडला. छायाचित्रे हि सुरेख.

विसोबा खेचर's picture

21 Nov 2008 - 10:03 am | विसोबा खेचर

फोटो लै भारी..!