छपाकसे पेहेचान ले गया...

शा वि कु's picture
शा वि कु in जनातलं, मनातलं
13 Jan 2020 - 10:00 pm

दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं.
हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे-

1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.

2) दीपिका- दीपिकाचा तर आपण पंखाच.सध्याच्या सर्वोत्तम हिंदी अभिनेत्रींनपैकी एक.
3) विक्रांत मेसे (उच्चार कसा करायचा ?)- मिर्झापुर मधला बबलू भैया. याचा स्क्रीन प्रेसेन्स जबरी आहे.
ठीक, आता मला हा सिनेमा फार का आवडला, ते सांगतो.

1) संवेदनशीलता-
डायरेक्टर समोर मोठ्ठ चॅलेंज आहे, कि पीडितांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे दुःख हे प्रेक्षकापर्यंत प्रभावीपणे पोचवायचय. हे करताना खूप ह्रदयद्रावक आणि भेसूर गोष्टी दाखवता आल्या असत्या, आणि त्या सत्य परिस्थितीला धरूनच असल्या असत्या. त्यामुळे मी सरकारी कॅन्सरविरोधी जाहिरातींसारख्या दृश्यांची कल्पना करत होतो, आणि ते अपल्याच्यानं बघवणार का असा विचार करत होतो. पण मेघना गुलजार ने तेच ह्रदयद्रावक दुःख आणि यातना अपल्यापर्यंत अतिशय उत्तमरीत्या पोचवले आहे.

2) कथबांधणी-
कथेचं स्ट्रक्चर अगदी विचार करून ठरवलं आहे. आशादायी वर्तमान आणि वारंवार होत असणाऱ्या पाशवी घटना आलटून पालटून समोर येतात. कथेमध्ये प्रेक्षक गुंतून राहतो.

3) संवाद-
निव्वळ अप्रतिम. छपाक सिनेमा काय चीज असणार आहे हे अगदी सुरुवातीच्या काही डायलॉग्जमध्येच कळते. संवादामधून कथेचे अगदी लहान लहान कंगोरे अगदी शिताफीने दाखवले गेलेत. आयपीसी मध्ये ऍसिड अटॅक बद्दल अजूनही किती जुनाट तरतुदी आहेत हे अजिबात अनैसर्गिक/कृत्रिम न वाटता सहजपणे आपल्या पर्यंत पोहचते.सिनेमाची सुरुवात 2012 च्या निर्भया आंदोलनातून होते. विक्रांत सुरुवातीलाच निर्भया बलात्कार प्रकरणी होणाऱ्या आंदोलनांचा परीघ किती लहान आहे हे त्याच्या साध्यासुध्या पण ताकदवान वाक्यांमधून सांगतो. "आंदोलनामुळे किती ट्रॅफीक जाम झालंय" या बस कंडकटर च्या वाक्यातून तुमच्या आमच्या, सगळ्यांचाच बोथट संवेदना दिसतात.
मालतीच्या कुटुंबियांचे, संस्थेमधील समदुःखी मैत्रिणींचे, सगळ्याच संवादांची भट्टी मस्त जमली आहे. खास करून उल्लेख करायचा तो म्हणजे मालतीच्या वकिलबाई आणि तिच्या मैत्रिणींचे संवाद. हे संवाद आपल्याला कायद्यातल्या विविध तरतुदी कळवण्यासाठी बखुबीने पेरले गेले आहेत.

4)अभिनय-
विक्रांतच पात्र छपाक मध्ये बबलू भैया पेक्षा अगदी वेगळं आहे. अमोल ऍसिड अटॅक सर्व्हायव्हर्स साठी एक संस्था चालवतो. तत्वनिष्ठा तगडी आहे. हा पत्रकार असूनही स्वतःला समाजकार्यात झोकून दिलेला आहे. विक्रांतने अमोलच्या भूमिकेला न्याय दिला असला, तरी दीपिकाच्या उत्तुंग अभिनयापुढे विक्रांत कडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.तसेच वकिलबाईंचा नवरा म्हणून अगदी छोट्याश्या रोलमध्ये आनंद तिवारी पण भाव खाऊन जातो.
दीपिका... काय बोलावं ?
दीपिकानं मालतीची भूमिका मस्त केलीये या पलीकडं काय सुचतच नाही. कारण ही भूमिका बर्फी मधल्या प्रियांका चोप्राच्या भूमिकेसारखी नाही की त्यातून अभिनयकौशल्य अगदी उठून ठळकपणे दिसेल. तरीही काही अगदी सौम्य भूमिका असतात ज्या आपल्याला आवडून जातात, पण नेमकं बोट ठेवता येत नाही का आवडल्या म्हणून ! या सिनेमात आपण दीपिकाला शोधत राहतो कायमच. फक्त चेहरा बदलल्या मुळे नव्हे, तर यामुळे की दीपिका नावाची सुंदर आणि उत्साहाने खळखळणारी मुलगी या सिनेमात नाहीच आहे. सिनेमात आहे आपली पूर्ण ओळख हिसकावून घेतल्यावर पुन्हा जगणारी मालती नावाची मुलगी.
चेहरा विद्रुप झाल्यामुळे स्वतःला कोशात गुरफटून घेणारी मालती, नोकरी साठी वणवण करणारी मालती, कोर्टमध्ये बचावपक्षाच्या वकिलाच्या हल्ल्यांना निमूटपणे सामोरी जाणारी मालती, दुःख सारून पुन्हा हसणारी मालती... यातलं कुठलंही परिवर्तन जराही खडबडीत झालं नाही, हे दीपिका आणि मेघनाचे श्रेय आहे. जेव्हा एक पत्रकार तिला प्रश्न विचारतो " तुमच्या हल्लेखोराला तुमच्या PIL बद्दल माहिती आहे का ?" (हल्लेखोर त्या वेळेस बेल वर सुटून विवाहित सुद्धा झाला आहे आणि बाप सुद्धा झाला आहे)- तेव्हा "पता नहीं, जानते हो तो अच्छा है" अस सूडाच्या पार जाऊन केवळ ऍसिड विक्रीवर बंदी यावी याचा विचार करणारी मालती आपल्याला अंतर्मुख करणार हे नक्कीच !

5) गाणी-
गुलजारच्या साहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या चपखल ओळी आणि शंकर एहसान लॉय यांच्या संगीतातून मिळालेलं टायटल सॉंग अगदी श्रवणीय आहे. छपाक टायटल ट्रॅक

कोई चेहरा मिटा के
और आंख से हटा के
चंद छिटे उडा के जो गया
छपाक से पहचान ले गया !

कोई चेहरा गिरा
जैसे मोहरा गिरा
जैसे धूप को ग्रहण लग गया
छपाक से पहचान ले गया !

तर असा हा सिनेमा. 2020 च्या सुरुवातीलाच इतका तगडा घोडा ऑस्कर रेस साठी मिळाला आहे.

संबंधीत बातमी- लक्ष्मी अग्रवाल च्या वकीलबाईंनी कोर्टात तक्रार केली असून, कोर्टाने सिनेमा निर्मात्यांना 15 जानेवारी पर्यंत वकीलबाईंना सिनेमामध्ये श्रेय देण्याचा/नावाचा उल्लेख करण्याचा आदेश दिला आहे.

अवांतर- रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. चित्रपटाची IMDb रेटिंग 4.2 आहे. 82% टोमॅटोमिटर असलेल्या सिनेमाचा खराखुरा स्कोर इतका कमी खचितच असू शकत नाही. इतकं spitefull व्हावं का ?

आणखी अवांतर- देश वाचवण्यासाठी दीपिकाला बहिष्कृत करा आणि देश वाचवण्यासाठी तिकीट खरेदी करा म्हणणाऱ्या दोघांची वटवट ऐकून कान किटले आहेत. एक अतिशय सुदंर सिनेमा आहे, जरूर बघावा. हा, दीपिकाला मदत करणे हे उदात्त मोटिव्ह तर आपल्याला कधीही चालेल ;)

चित्रपटविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधमतशिफारस

प्रतिक्रिया

मी सुद्धा तलवार आणि राझी बघितले होते , खरंच उत्तम सिनेमे होते यात काहीच वाद नाही .
"मेघना गुलजार एक प्रगल्भ दिग्दर्शिका आहे हे तिने यापूर्वीच दाखवून दिले आहे .
दीपिका आणि रणवीर चे एक ही सिनेमे मी सोडत नाही पण छपाक ची बात च और !!!

इतक्या महत्वाच्या विषयाला हात घालणे म्हणजे विषाची परीक्षा ! भारतात मसालेदार च सिनेमे चालतात हे माहीत असूनदेखील ' ऍसिड हल्ल्या ' वर बनवावा म्हणजे खरचं ग्रेट .

महत्वाचे म्हणजे हे सगळे मी तानाजी चा शो नुकताच बघून आलोय : ) : )
दीपिका ने छपाक चा गल्ला घालवला हे निश्चित .
तरण आदर्श च्या ट्विट नुसार
काल रविवार पर्यंत तान्हाजी 61 करोड आणि छपाक 21 करोड चे कलेक्शन !!! सरळ सरळ बऱ्याच लोकांनीं छपाक ला काट मारलेली दिसतेय !!!

तानाजी सुद्धा बघणार आता येत्या रविवारी...

प्रसाद_१९८२'s picture

14 Jan 2020 - 11:11 am | प्रसाद_१९८२

तान्हाजी व छपाकचे आकडे वर वर पाहाण्याला अर्थ नाही.
छपाकच्या तुलनेत तान्हाजी बर्‍याच जास्त थेयटर मधे प्रदर्शीत झाला आहे, तेंव्हा त्याच्या कमाईचा आकडा देखील जास्त असणार आहे.
--
परिक्षण आवडले.
चित्रपट पाहायची इच्छा असली तरी, त्यातील अ‍ॅसिड हल्ल्याच्या दृष्याममुळे पाहावणार नाही.

शा वि कु's picture

14 Jan 2020 - 6:37 pm | शा वि कु

थिएटर स्क्रीन्स चा आकडा विचारात घ्यायला हवा, बरोबर आहे.
आणि मी समजू शकतो , मी पण घाबरत घाबरत गेलो सिनेमाला. काही भावनिक आणि raw दृश्य असणार अस धरूनच गेलो आणि आहेतच.

शशिकांत ओक's picture

13 Jan 2020 - 11:01 pm | शशिकांत ओक

कलेला पैशाच्या तराजूत तोलून धरले तर ते अन्यायकारक ठरेल. सिनेमा यथावकाश पाहू. पण आपण केलेल्या सुंदर समीक्षेची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. सिनेमा 'असुंदर' सत्य कथनावर आधारित असून त्यात सौंदर्यस्थळे दाखवण्याची हातोटी अप्रतीम!

शा वि कु's picture

13 Jan 2020 - 11:29 pm | शा वि कु

21 करोड. कलेक्शन कमी झालंय, पण हे दीपिका पदुकोण सिनेमाच्या तुलनेंत कमी झालंय. दीपिकाचे मानधन सोडले तर काही अति मोठे प्रोडक्शन खर्च नाही दिसतं. मेघना गुलजार च्या तलवारच भारतातील टोटल रन टाइम कलेक्शन फक्त 32 करोड होतं. त्यामुळे opportunity cost सोडून दिली तर 21 करोड 4 दिवसात, तेही नॉन मसाला सिनेमासाठी, हे अजिबात वाईट नाही :)

शशिकांत ओक's picture

13 Jan 2020 - 11:33 pm | शशिकांत ओक

मांडायचे साहस सहजपणे केले जाते. त्यामुळे पैसे किती कमावले किंवा गमावले याची गणिते आता गौण ठरतात. असो.

जे एन यु ला भेट देऊन हात दाखवून अवलक्षण केलं दीपिका ने !!
दीपिकाच्या 10 / 15 प्रोडक्ट च्या जाहिराती संबंधित कंपन्यांनी दोन आठवडे स्थगित केल्या आहेत .
आता इथून पुढे तिला सिनेमा किंवा जाहिराती साइन करून घेण्याअगोदर निर्माते ' कुठल्याही सामाजिक विषयावर भूमिका मांडायची नाही ' असा क्लॉज टाकण्याची शक्यता आहे .
दीपिका चा दर --
जाहिरात 6 करोड
सिनेमा 10 करोड .

शशिकांत ओक's picture

14 Jan 2020 - 11:11 am | शशिकांत ओक

कलेक्शन किती हा आकडा महत्वाचा नाही या अर्थाने ते शीर्षक दिले होते. असो.
मला कॅप्टनशिप दिल्या बद्दल धन्यवाद...

गणेशा's picture

14 Jan 2020 - 7:51 pm | गणेशा

वा मस्त परिक्षण...

शा वि कु's picture

15 Jan 2020 - 9:52 pm | शा वि कु

.

दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच.
( तसे पाहिल्यास बऱ्याचशा बॉलिवूड मधील प्रेक्षणीय चेहऱ्यांची हीच स्थिती आहे)
एका हुशार अभिनेत्रीने मुंबईत ताज मधील हल्ल्यावर बोलताना फार वाईट वाटले असे सांगितले कारण काय तर तिची व्हॅनिटी बॅग( मेक अप करण्याची) तिथे आगीत नष्ट झाली.
परंतु आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये हेही तितकेच सत्य आहे.
असो
मी एकंदर सिनेमे फारसे पाहत नाही.पण जनेयु मध्ये गेल्यामुळे दीपिका ताईंची बाजारातील किंमत कमी झाली याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही.

शा वि कु's picture

16 Jan 2020 - 7:29 pm | शा वि कु

दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच.

did I miss something ?

यश राज's picture

17 Jan 2020 - 1:27 am | यश राज
शा वि कु's picture

17 Jan 2020 - 8:03 am | शा वि कु

2010 मधलं स्टेटमेंट आहे हे.

शा वि कु's picture

17 Jan 2020 - 8:09 am | शा वि कु

2010 मध्ये दीपिकाच काय, बऱ्याच जणांना राहुल गांधी आवडायचा. त्याच पप्पूफिकेशन 2014 च्या अर्णब गोस्वामी मुलाखती नंतर झालंय.

२०१० मध्ये दीपिका ताईंनी श्री राहुल गांधी यांच्यात असं काय पाहिलं होतं (गांधी घराण्यात जन्म घेण्याव्यतिरिक्त) कि ते पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहेत.

म्हणूनच त्यांच्या बौद्धिक पातळीची कल्पना येते असे मी म्हटले आहे.

शा वि कु's picture

19 Jan 2020 - 9:58 am | शा वि कु

मला तर दीपिकाच्या बौद्धिक पातळीची कल्पना तिच्या सिनेमांवरून आली.

कधीच सोडून दिले आहे.

काही आणखी कारणे आहेत ?

मुक्त विहारि's picture

19 Jan 2020 - 10:59 pm | मुक्त विहारि

वेश्या व्यवसाय. ...

आतंकवादी हल्ले. ...