मित्रहो, उद्या संध्याकाळी मी होशंगाबादला पोहोचून ४ दिवस तिथे रहाणार आहे. बहुशः मोकळाच असेन. तरी तिकडे काय काय बघण्यासारखे आहे ? नर्मदेचे सौंदर्य बघायला सर्वोत्तम जागा/वेळ कोणती? काही प्राचीन अवशेष, किल्ला, जंगल वगैरे आहेत का ? शिवाय कोणी मिपाकर आहेत का ? कळवावे.
जायचे अचानक ठरल्याने आधी विचारणा करता आली नाही. कदाचित तिथे नेट नसेल, त्यामुळे तिथे मिपाकर कुणी असतील तर मला कृपया फोनने संपर्क करावा.
९९५३९०८२२१.
प्रतिक्रिया
2 May 2017 - 6:25 pm | कंजूस
होशंगाबाद - मप्र टुअरिस्ट नकाशातून
2 May 2017 - 9:35 pm | चित्रगुप्त
आभार कंजूसराव. भीमबैठिका पूर्वी बघितलेले आहे. मी गेलो होतो त्यावेळी ते फार कमी लोकांना ठाऊक होते. आधी भोपाळपासून ट्रकच्या टपावर बसून प्रवास, मग अनेक मैल जंगलातून दूरवर दिसणार्या भीमबैठिकाच्या खडकांच्या दिशेने पायपीट वगैरे करून पहुचलो होतो. रस्ते, वस्ती वगैरे काहीच नव्हते. एका उंच खडकावर एक बैरागी रहायचा (जीएंच्या कथांमधे असतो तसा) त्याला भेटायचे, तर खडकाला टेकवलेल्या वीस-तीस फुटाच्या ओंडक्यावरून चढून जावे लागायचे (तेही केले होते). नंतर पुन्हा एकदा वाकणकर सरांबरोबर एक आठवडा तंबूत राहिलो होतो. आता अनेक टूरिस्ट जातात, पक्के रस्ते, हॉटेल वगैरे झाले असल्याचे ऐकले आहे, त्यामुळे जाण्याची इच्छा नाही.
बाकी उन्हात वणवण करणे आता तितकेसे झेपत नाही, त्यामुळे सकाळ-संध्याकाळ जवळपास फिरणे एवढेच शक्य आहे.
2 May 2017 - 10:14 pm | कंजूस
पचमढीचा रिव्ह्युमध्ये( बहुतेक holidayiq) एकाने लिहिल्याचे वाचल्याचे आठवते की कारसाठी बरेच टोल घेतात.१)वनखाते,२)रस्तेवाले,३)पर्यटन प्रवेश वगैरे. शिवाय प्रत्येक पॅाइंटला कार रस्त्यावर उभी राहाते आणि पायवाटेने खाली चढउतार करावे लागते॥ दोनतीन पाइंटात दमायला होते.
# नकाशातल्या किमीचा उपयोग होतो.
# तुम्ही खुद्द वाकणकरांबरोबरच भीमबेटका पाहिलेत!!
#मी अजून हा भाग पाहिला नाही.
2 May 2017 - 10:15 pm | कंजूस
पचमढीचा रिव्ह्युमध्ये( बहुतेक holidayiq) एकाने लिहिल्याचे वाचल्याचे आठवते की कारसाठी बरेच टोल घेतात.१)वनखाते,२)रस्तेवाले,३)पर्यटन प्रवेश वगैरे. शिवाय प्रत्येक पॅाइंटला कार रस्त्यावर उभी राहाते आणि पायवाटेने खाली चढउतार करावे लागते॥ दोनतीन पाइंटात दमायला होते.
# नकाशातल्या किमीचा उपयोग होतो.
# तुम्ही खुद्द वाकणकरांबरोबरच भीमबेटका पाहिलेत!!
#मी अजून हा भाग पाहिला नाही.
2 May 2017 - 10:20 pm | कंजूस
शिल्पकलेसाठी उदयगिरी,ग्यारसपुर नावाजलेले आहे. ६-८ शतकातील गुप्तकाळातील शिल्पे आहेत.पण ते भोपाल-विदिशाच्यापुढे आहे आणि आताचा उन्हाळा. जमणे कठीण.