चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in जनातलं, मनातलं
2 Oct 2008 - 3:05 pm

नमस्कार मंडळी,

धाग्याच्या नावाने बिचकून जाऊ नका!!! कृपया एकवार वाचण्याचे कष्ट घ्या...
तर मंडळी, आपलं शास्त्रीय संगीत बर्‍याच लोकांना वाटतं तसं दुर्बोध आणि क्लिष्ट मुळीच नाही. किंबहुना, ते अत्यंत मनोरंजक आहे.
आंतरजालामुळे संगीताची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होउ लागली आहे. याचा माझ्या सारख्या शास्त्रीय संगीताच्या पंख्यांना मोठा फायदा झालेला आहे. आणि ईस्निप्स.कॉम सारख्या अनेक संस्थळांवर संगीत अपलोड करण्याची सुविधा आहे, ज्याचा आपण फायदा घेणार आहोत.

या धाग्याचा उद्देश असा आहे, की आपल्याला आंतरजालावर शास्त्रीय संगीताचा एखादा उत्तम तुकडा सापडला, तर त्याचा दुवा कृपया द्यावा. शक्य असल्यास तो कलाकार, तो राग याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. म्हणजे सर्व मिपाकरांना त्या संगीताचा आनंद घेता येईल. एकच अट अशी की इथे केवळ शास्त्रीय अथवा उपशास्त्रीय (ठुमरी, कजरी, दादरा, टप्पा, नाट्यगीत वगैरे शास्त्रीय संगीताशी जवळचे प्रकार) यांचेच दुवे द्यावेत. गझल, भावगीत वगैरे प्रकार इथे टाकू नयेत, जेणेकरून हा धागा मूळ मुद्द्यापासून भरकटणार नाही. उपशास्त्रीय संगीतही ज्या रागात आहे त्या रागाचं नाव दिल्यास उत्तम होईल (माहित नसल्यास आपले ज्ञानी मिपाकर मदत करतीलच). यानिमित्ताने मिपावर शास्त्रीय संगीताविषयी चर्चा होउन मिपा अधिक समृद्धच होईल अशी आशा आहे.

तर मंडळी चला शास्त्रीय संगीत ऐकूया...

कलासंगीतनाट्यप्रकटनविचारमतशिफारसप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

2 Oct 2008 - 3:09 pm | घाटावरचे भट

मी सुरुवात करतो मंडळी...
वसंतराव देशपांडे म्हटलं की चटकन मारवा राग डोळ्यासमोर येतो इतकं त्यांचं आणि मारव्याचं नातं अतूट आहे.
तो मारवा आपल्याला इथे ऐकता येइल -
http://www.esnips.com/doc/f1d0b49f-4a52-4150-a4be-c98c47241f7b/Dr.-Vasan...

ऐका आणि कळवा!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

शेखस्पिअर's picture

2 Oct 2008 - 8:11 pm | शेखस्पिअर

फोडलस...जियो.. बुवा...जियो...
घाटावरचे बुवा...
रापचिक....

नंदन's picture

2 Oct 2008 - 3:15 pm | नंदन

छान आहे. मागे सर्किट यांनी अभिजात संगीतातील दहा रत्ने यावर मते मागवली होती, तेव्हा त्यांनी निवडलेल्या रागांचा शोध घेऊन लिहिलेला हा प्रतिसाद येथे पुन्हा द्यावासा वाटतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आगाऊ कार्टा's picture

2 Oct 2008 - 4:06 pm | आगाऊ कार्टा

खालील दुव्यावर मी विविध गायकांची मला आवडलेली ध्वनीमुद्रणे साठवली आहेत...
तुम्ही ती डाऊनलोड करु शकता...
http://www.4shared.com/dir/5499114/ba18f5a6/Ameya.html

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2008 - 4:53 pm | बिपिन कार्यकर्ते

कार्ट्या... ;) छान आहे रे तुझी लिंक... डाऊनलोड करतोय...

बिपिन.

आगाऊ कार्टा's picture

2 Oct 2008 - 6:19 pm | आगाऊ कार्टा

धन्यवाद बिपिन महाराज....
अजुन एक दुवा....
http://www.4shared.com/dir/5849856/b0f96ecb/Marathi_Katha.html
येथे मला आंतरजालावर मिळलेल्या विविध कथा साठवून ठेवल्या आहेत...

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2008 - 6:35 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे वा!!! हळूच एक एक लिंका काढताय राव...

प्राजु's picture

2 Oct 2008 - 11:29 pm | प्राजु

खरंच तुझी हि लि़क खूप कामाची आहे. मी फेव्हरेट्स मध्ये ऍड केली आहे. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 4:44 pm | विसोबा खेचर

धन्यवाद भटसाहेब,

छान धागा आहे.. :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2008 - 4:52 pm | बिपिन कार्यकर्ते

भटा... छान आहे धागा.

बिपिन.

टारझन's picture

2 Oct 2008 - 6:26 pm | टारझन

भटा शास्त्रिय संगीताची आम्हाला फार भिती वाट्टे ... मिसळपाव वरचा सगळ्यात दुर्मिळ प्रकार "हॉरर धागा" सुरू केल्याबद्दल अभिनंदन ..
चालू द्या

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

मला 'आईशपथ' ह्या चित्रपटातील 'जागत तोरे कारन' हे गाणं खूप आवडतं.
तज्ञानी माहिती दिली तर नक्कीच आवडेल.

http://www.esnips.com/doc/c80c2070-adc2-442e-b5d9-d4e17af8014c/Aai-Shapp...

संगीतातील 'ढ'
- खडूस

सोम्यागोम्या's picture

5 Aug 2010 - 5:09 am | सोम्यागोम्या

खडूस,
जागत तोरे कारन ही बिलासखानी तोडी मधली सी. आर. व्यासांनी केलेली रचना आहे.

खडूस's picture

16 Aug 2010 - 10:35 am | खडूस

खूप खूप धन्यवाद :)

संजय अभ्यंकर's picture

2 Oct 2008 - 7:00 pm | संजय अभ्यंकर

शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीता साठी खालील दुवे:

http://www.sawf.org/music/articles.asp?pn=Music
http://www.parrikar.org/

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

वाटाड्या...'s picture

2 Oct 2008 - 7:34 pm | वाटाड्या...

माझेही थोडे योगदान...

यशवंत बुवा जोशी..भिमपलास...सुंदर..तालीम कशी हवी याची एक झलक...
http://fb.esnips.com/doc/726a95ed-5837-4055-b589-f33db813cff7/Raag-Bhimp...

स्वरभास्करांचा दरबारी...केवळ अप्रतिम...
http://fb.esnips.com/doc/7ae9ed9e-25a2-43a7-966d-b888554dd2c9/Bhimsen-Jo...

संजीव अभ्यंकर
http://hindustaniclassical-anand.blogspot.com/
http://sramsoft.blogspot.com/

आपलाच..
मुकुल...

हेरंब's picture

2 Oct 2008 - 8:27 pm | हेरंब

"याद ना जाये" हे , 'दिल एक मंदिर' मधले गाणे कुठल्या रागावर आधारित आहे ?

खडूस's picture

2 Oct 2008 - 9:29 pm | खडूस

ह्या दुव्यावर अधिक माहिती मिळू शकेल.
http://www.asavari.org/songs.html

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

पॅट्रिक मौटल्स ह्या संकेतस्थळावर भारतीय शास्त्रीय संगीताचा खजिना आहे.

नमस्कार लोक्स,

ईस्निप्सवर माझ्या एका मित्राने टाकलेले १९७८ सालातले एक लाईव्ह ध्वनिमुद्रण. यात वसंतरावांनी २ गंधार असलेला गौड मल्हार गायला आहे. कोमल गंधार आल्यामुळे रागाचं चलन थोडंफार रामदासी मल्हाराच्या जवळ गेलेलं आहे (उदा. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा रामदासी मल्हार). या रागात कोमल गंधार प्रबल आहे, आणि गौड मल्हारात महत्वाच्या असणार्‍या शुद्ध गंधाराचं महत्व थोडं कमी झालंय (हे सगळे मी ऐकून काढलेले निष्कर्ष आहेत). एक उत्तम श्रवणानुभव. कोमल गंधार आणि त्यासोबत टिपिकल गौड मल्हारासारखी 'म म प ध नी प' ही संगती यांचं कॉम्बिनेशन झकासच....जरूर ऐका...

हा दुवा -

http://www.esnips.com/doc/70964c63-640a-4159-8ecf-14bdb3020f39/Vasantrao...(LIVE)

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर's picture

3 Oct 2008 - 12:22 am | विसोबा खेचर

हा धागा चांगलाच आहे, त्यामुळे जुनी, काळाच्या आड गेलेली मंडळी आणि त्यांची ध्वनिमुद्रणे ऐकायला मिळातात हे निर्विवाद..

परंतु प्रत्यक्ष मैफलींची मजा काही औरच! मला माझ्या भाग्याने अगदी भरपूर प्रत्यक्ष मैफली ऐकायला मिळाल्या, ती मर्मबंधातली ठेव खासच आहे...

अभिजात संगीताच्या गेल्या २०-२५ वर्षातल्या खाजगी, जाहीर अश्या अनेक मैफलींच्या खूप खूप आठवणी आहेत, अगदी गवयाच्या हातात हात मिळवून समेला दाद देण्याचा आनंद मला अनेकदा मिळाला आहे आणि तो आनंद काही औरच असतो...

भटसाहेबांच्या हा धाग्यामुळे त्या मैफलींच्या आठवणी सांगायचा मोह होतो आहे परंतु तूर्तास निवांत अशी सवडच मिळत नाही... :(

असो,

तात्या.

घाटावरचे भट's picture

3 Oct 2008 - 12:41 am | घाटावरचे भट

तात्या,
माझ्या पिढीतली, माझ्या आसपास वय असलेली अनेक मंडळी मिपावर आहेत ज्यांना दुर्दैवाने अनेक दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली नाही. आम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणातच समाधान मानावं लागतं. तेव्हा आपल्या या आठवणी आमच्यासाठी नक्कीच आनंददायी ठरतील. अगदी पुनःप्रत्यय घेणं शक्य नसलं तरी निदान त्याच्या जवळपास तरी जाता येईल. तेव्हा येउ देत तुमच्या आठवणी. खरं तर तुम्ही 'मैफिली आठवणीतल्या' वगैरे सारखा एखादा क्रमशः धागाच सुरु करायला हवा. तुम्ही एवढं ऐकलं आहे की तुम्ही ते शेअर करायलाच हवं!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर's picture

3 Oct 2008 - 7:54 am | विसोबा खेचर

भटसाहेब,

थोडी निवांत सवड मिळू दे, नक्की लिहिणार आहे...

तात्या.

घाटावरचे भट's picture

13 Oct 2008 - 12:32 am | घाटावरचे भट

परमेश्वराने यमन ज्यांना आंदण म्हणून दिलाय अशा २ व्यक्ती...पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद आमिर खानसाहेब. ऐकूया त्यांचा यमन...
BJ
पं. भीमसेन जोशी

उस्ताद आमिर खानसाहेब

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मोहन's picture

13 Oct 2008 - 5:56 pm | मोहन

ITC ने कोलकत्यात चालवलेली Sangeet Research Academy गुरुकुल पध्दतीने शास्त्रिय संगीत शिक्षणाचे काम कित्येक वर्षे करत आहे. पं कशाळकर, रशीद खान सारखे लोक तेथे गुरू म्हणून काम करत आहेत. www.itcsra.org

www.sarangi.info ही पाकिस्तानी साईट आहे. ह्यावर अनेक दुर्मिळ संगीत आहे

www.adityakhandwe.com ही माझ्या मुलाची साईट. त्यात त्यानी गायलेले काही राग उतरवता येतील.

मोहन

विजुभाऊ's picture

30 Oct 2008 - 2:29 pm | विजुभाऊ

सातार्‍याजवळ औंध नावाच्या गावात पं गजाननबुवा जोशी दरवर्शी एक महोत्सव साजरा करायचे. अजूनही हा महोत्सव होत असतो. दिवाळी अगोदरच्या एकादाशीला हा कार्यक्रम होतो. आडगाव असूनही अनेक दिग्गज कलाकार इथे येतात.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

विसोबा खेचर's picture

2 Nov 2008 - 8:53 am | विसोबा खेचर

मी अनेकदा या उत्सवात गेलो आहे आणि अगदी मनसोक्त गाणं ऐकलं आहे...

आपला,
(गजाननबुवांच्या घरातला) तात्या.

घाटावरचे भट's picture

4 Nov 2008 - 5:55 am | घाटावरचे भट

मंडळी,

जुगलबंदी हा आपल्या शास्त्रीय संगीतातील एक मनोहारी प्रकार. जेव्हा दोन (आणि डॉन) लोकांच्या वेगेवेगळ्या शैलींचा मिलाफ घडून येतो, तेव्हा तो श्रवणानंद अवर्णनीय असतो. माझ्याकडे असाच एक दूरदर्शनचा जुना व्हिडीओ आहे, तो मी यूट्यूब वर टाकीन म्हणत होतो. पण परवाच मला दिसलं की कोणीतरी आधीच तो तिकडे अपलोड केलाय. माझं कामच झालं. असो, आता त्या व्हिडीओविषयी -

दिग्गज कलाकारांनी गायलेले २ पहाडाएवढे राग
पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद रशीद खां - राग दरबारी आणि राग मियां की तोडी

राग दरबारी (किन बैरन कान भरे - पारंपारिक दरबारी मधली चीझ. यातल्या 'मोरा पिया मोसे बोलत नाही' वर भीमण्णांनी घेतलेली जागा आणि त्यानंतर रशीद खां यांच्याकडे बघून दिलेलं मिष्कील हास्य.......वाह!!!)
भाग-१
भाग-२
राग मियां की तोडी (लंगर कांकरिया जी न मारो)
राग मियां की तोडी

आणि शेवटी डेझर्ट म्हणून राग शंकरा (आदि महादेव बीन बजावत)
भाग-१
भाग-२

त्याच कार्यक्रमात गायलेली खमाज ठुमरीसुद्धा आहे पण ती या भल्या गृहस्थाने अपलोड केलेली दिसत नाही. सवड होताच अपलोड करीन.

धन्यवाद.

घाटावरचे भट's picture

28 Dec 2008 - 10:25 pm | घाटावरचे भट

बापूराव पलुसकर - भीमपलास (आकाशवाणी ध्वनिमुद्रण)
बापूराव पलुसकर - जयजयवंती (आकाशवाणी ध्वनिमुद्रण)

तशी जुनी आणि दुर्मिळ ध्वनिमुद्रणं आहेत. आमच्या एका मित्रवर्यांनी ईस्निप्सवर चढवलीयेत. जरूर ऐकून पाहा. बापूरावांचा अत्यंत निकोप आणि तितक्याच तयारीचा आवाज, गळ्यावर चढवलेली अस्सल परंपरेची ग्वाल्हेर गायकी आणि भीमपलास आणि जयजयवंतीसारखे मधुर राग.....जवाब नहीं.

स्वानन्द's picture

28 Dec 2008 - 10:45 pm | स्वानन्द

मला शास्त्रीय सन्गीताचं स्वरांवर आधारीत रसग्रहण करता येत नाही. पण ऐकायला मात्र जरूर आवडतं. एक वर्ष शिकलो पण ते म्हणजे समुद्रातल्या थेंबाप्रमाणे म्हणता येईल. सद्ध्या नोकरीमुळे लगेच गाणं शिकता येणं कठीण दिसतंय. पण यादरम्यान रागाची माहीती वाचायची आणि त्याच्या जालावरून वेगवेगळ्या कलाकारांच्या बन्दीशी, ख्याल अगदी जे मिळेल ते ऐकायचं असं ठरवलय. ऐकायला तर मिळतय. पण वाचण्यासठी फारसं काही मिळत नाहीये. कोणी एखादं पुस्तक /ईबूक सुचवू / देऊ शकता का?

अच्युत गोडबोलेंचं नादवेध नावाचं एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण सदर लोकसत्तेत यायचं. तसं काही मिळलं तर खूप बरं होईल.

--स्वरानन्द

घाटावरचे भट's picture

31 Dec 2008 - 1:55 pm | घाटावरचे भट

बरीच पुस्तकं आहेत. नमुन्यादाखल काही

१) पं. भातखंडे - हिंदुस्थानी संगीत पद्धती
२) पं. विनायकराव पटवर्धन - राग विज्ञान भाग १ ते ७
३) पं. रामाश्रय झा - अभिनव गीतांजली

१ आणि २ बाजारात मिळतात की नाही ठाऊक नाही. १ मिळेल कदाचित, २ ची शक्यता धूसर आहे. ३ नक्की मिळेल.

पण ही हार्डकोअर म्हणावीत अशी शास्त्रीय संगीतावरची पुस्तकं आहेत. म्हणजे रागाची थोडी माहिती, आणि अनेक बंदिशी. तुमची निकड नक्की हीच आहे का ते मला ठाऊक नाही.

स्वानन्द's picture

31 Dec 2008 - 8:27 am | स्वानन्द

आहे का एखादं अस पुस्तक?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

5 Aug 2010 - 5:06 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

धृपद धागा दिला तर चालतो का?
काही डागर बंधुंचे अप्रतिम संकलन आहे.http://www.dhrupad.info/music.htm
त्यातला अभोगी ऐका.....अप्रतिम आहे.
मियाँ मल्हार ही सुंदर आहे.