रिओ ऑलिम्पिक २०१६

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
4 Aug 2016 - 9:29 pm

रिओ ऑलिम्पिक २०१६

गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.

यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच.

भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते.

तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा.

भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा !

काही दुवे
स्पर्धेचे संस्थळ
पदकतालिका

धोरणसमाजजीवनमानक्रीडाप्रकटनशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाबातमीमाहिती

प्रतिक्रिया

राही's picture

19 Aug 2016 - 8:55 pm | राही

१४-१८

असंका's picture

19 Aug 2016 - 8:55 pm | असंका

अजून हरली नाही...पण..

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2016 - 8:55 pm | पिलीयन रायडर

१८-१४

राही's picture

19 Aug 2016 - 8:56 pm | राही

१४-१९

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2016 - 8:56 pm | पिलीयन रायडर

१४-१९

इडली डोसा's picture

19 Aug 2016 - 8:56 pm | इडली डोसा

.

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2016 - 8:56 pm | पिलीयन रायडर

मॅचपोईंट

राही's picture

19 Aug 2016 - 8:57 pm | राही

हरली अरेरे

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2016 - 8:58 pm | पिलीयन रायडर

१५-२०

असंका's picture

19 Aug 2016 - 8:58 pm | असंका

रौप्य...अभिनंदन सिंधू

राही's picture

19 Aug 2016 - 8:58 pm | राही

टफ फाइट
अभिनंदन्रौप्य पदक

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2016 - 8:58 pm | पिलीयन रायडर

सिल्व्हर!!!!!!!!

हरकत नाही राव.. खुप मस्त खेळली सिंधु!!

राही's picture

19 Aug 2016 - 8:59 pm | राही

मस्त खेळ.
अटीतटीचा.

इडली डोसा's picture

19 Aug 2016 - 8:59 pm | इडली डोसा

वेल प्लेड...

चतुरंग's picture

19 Aug 2016 - 9:00 pm | चतुरंग

जबरा खेळली सिंधू. खिलाडू वृत्तीचे जबर प्रदर्शन जवळ जाऊन कॅरोलिन ला उठवले आणि अभिनंदन केले.
खरी खेळाडू!! __/\__

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2016 - 9:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खूप खूप अभिनंदन.

-दिलीप बिरुटे

बहुगुणी's picture

19 Aug 2016 - 9:00 pm | बहुगुणी

सिंधू रौप्य पदक!

यशोधरा's picture

19 Aug 2016 - 9:05 pm | यशोधरा

व्हेरी वेळ प्लेड सिंधू!! व्हेरी प्राउड ऑफ यू!! कोणी विदेशी कॉमेंटेटर म्हणे, भारतासाठी पहिलं मेडल आहे, साक्षीच मेडल माहीत नाही काय हिला!!!

फारसं काही कळत नाही या खेळातलं. 3rd round is still in progress. She is 6 below par, and the leader is 10 below par. So she stands 8th so far. And top 10 from here will probably move to Finals tomorrow...

थॉर माणूस's picture

19 Aug 2016 - 9:15 pm | थॉर माणूस

2 times world champion and rank 1 player मरीनला तीन सेट झुंजवणे सोपे नव्हते. सिंधू मस्त खेळली. रौप्य पदक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन.

सामान्य वाचक's picture

19 Aug 2016 - 9:16 pm | सामान्य वाचक

हॅट्स ऑफ टू सिंधू

बहुगुणी's picture

19 Aug 2016 - 9:20 pm | बहुगुणी
यशोधरा's picture

19 Aug 2016 - 9:47 pm | यशोधरा

किती छान फोटो :)

मृत्युन्जय's picture

20 Aug 2016 - 4:19 pm | मृत्युन्जय

एकदम. तिच्या चेहर्‍यावरचे हास्य किती गोड आणि निरागस आहे. तिला निखळ आनंद झाल्याचे जाणवते.

पराभवही व्यवस्थित पचवता आला पाहिजे. सिंधु हारल्यानंतर औपचारिकतेपुरते नेटपाशी हस्तांदोलनासाठी थांबली नाही तर वळुन कॅरोलिनच्या बाजुला गेली तिथे ती आनंदामुळे खाली वाकुन रडत होती, तिला उठवले आणि खुल्या दिलाने तिचे अभिनंदन केले. कॅरोलिन ने देखील नंतर सिंन्धुच्या बाजुला जाउन गोपीचंदला अभिवादन केले.

अभ्या..'s picture

20 Aug 2016 - 4:26 pm | अभ्या..

अगदी अगदी. अप्रतिम फोटो.

महासंग्राम's picture

19 Aug 2016 - 9:33 pm | महासंग्राम

.

आयुष्यात भारत-पाकिस्तान मॅच सोडली तर अशी गर्दी दुकानासमोर पहिल्यांदा पहायला मिळाली !!!
तिथे उभं असलेल्या प्रत्येकाकडे सिंधू जिंकेल असा दुर्दम्य आशावाद होता, कदाचित पुढे होणाऱ्या सकारात्मक बदलाची हि नांदीच म्हणावी लागेल.....

चतुरंग's picture

19 Aug 2016 - 10:18 pm | चतुरंग

खेळाच्या जगात भारताकडून वेगळं काहीतरी घडू शकतं हा आशावाद सर्वसामान्य माणसात जागण्याची ही नांदीच!!

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2016 - 2:05 pm | धर्मराजमुटके

साक्षी आणि सिंधू चे मनापासून अभिनंदन !

प्रो कबड्डी चालू असतांना मला वाटते हैदराबादच्या सामन्यावेळी सिंधू उपस्थित होती व तिला सामन्यात राष्ट्र्गीत गायनाचा मान देखील मिळाला होता. माझी आणि तिची ही पहिलीच ओळख. (म्हणजे फक्त मीच तिला ओळखतो) त्या दरम्यान झालेल्या छोट्याश्या मुलाखतीतच तिच्या हसर्‍या आणि विनम्र स्वभावाचे दर्शन घडले होते.

ऑलंपिक मधे हॉकी व्यतिरिक्त बाकी काहि बघीतले नाही मात्र कालचा सामना बघीतला. पहिला सेट तीने अटीतटीच्या लढाईने जिंकून आणला. पहिल्या सेटमधे ती जवळ जवळ पुर्ण सामना सतत ३-४ गुणांच्या पिछाडीवर होती. मात्र शटल बदलल्यानंतर तिला यश मिळाले. दुसर्‍या सेटमधे मात्र पहिल्या सेटची जिगर दिसली नाही. तिसरा सेट देखील पहिल्या सेटच्या तुलनेत एकतर्फीच होता.

एकंदरीत ३ ही सेट बघीतले आणि एकूण गुणांचे तटस्थपणे विवेचन केले तर असे लक्षात येते की सिंधूने स्वतःहून मिळविलेले गुण कमी आहेत. कॅरोलिना मरीन ने केलेल्या चुकांमुळेच सिंधू ला जास्त गुण मिळत गेले. स्पेनच्या कॅरोलिना मरीनने सिंधूच्या उंचीचा फायदा उचलत कमी उंचीचे फटके मारुन स्वतःचा विजय सोपा केला. मात्र त्याच बरोबर पंचांना न विचारता वारंवार कोर्टाबाहेर जाणे, परस्पर शटल बदलणे अशा गोष्टिंसाठी तिला पंचांनी सामन्यादरम्यान कैकदा तंबी देखील दिली. सिंधूनेही यावर वारंवार आक्षेप नोंदविला.

एकंदरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूने अशा गोष्टी करणे मी स्वतः निंदनीय समजतो. मात्र कोणताही विधिनिषेध बाळगायचा नाही म्हणा किंवा आपल्या स्थानाचा गैरफायदा घ्यायचा म्हणा, अशा व्यक्ती माझ्या डोक्यात जातात. खेळाच्या नियमात काय काय बसते याची मला नीट माहिती नाही पण पंचांनी केवळ तंबी देऊन सोडणे हे योग्य नाही.

याच्या अगदी विरुद्ध टोकाची बातमी २-३ दिवसांपुर्वी वाचली. धावण्याच्या शर्यतीत आपली एक प्रतिस्पर्धी अचानक जमिनीवर कोसळली तेव्हा त्याच स्पर्धेतील दुसर्‍या महिला खेळाडूने मागे वळून तिला उठविले आणी नंतर परत पळण्यास सुरुवात केली. तिच्या जागी दुसरी कोण असती तर एक स्पर्धक कमी झाला म्हणून आनंदी झाली असती पण मेडलसाठी धावतांना माणूसकीला प्रथम प्राधान्य देण्यार्‍या अशा व्यक्ती पाहिल्या की अगदी आनंद होतो. दुर्दैवाने मला त्यांची नावे, देश लक्षात नाही. शोधाशोध करावी लागेल.

असो. सिंधूचा हा पहिलाच ऑलंपिक सामना होता. ती खेळण्यात कमी पडली नाही तर डावपेचांत थोडी कमी पडली. पण हरकत नाही. दत्ताजी शिंदेंना आठवा. 'बचेंगे तो और भी लडेंगे !' म्हणा आणि पुढे चला. तिला पुढील ऑलंपिकसाठी शुभेच्छा !

आणि हो ! ह्या तार्‍यांना प्रकाशित करण्यार्‍या गुरुंना तितकेच विनम्र अभिवादन ! साक्षीचे पहिले कोच ईश्वर सिंह दहिया आणि सिंधूचे कोच गोपीचंद यांना अभिवादन आणि अभिनंदन !

अजुन कोणत्या भारतीय कन्यांचे सामने बाकी आहेत काय ? कारण यंदाच ऑलंपिक बहुधा भारतासाठी महिला वर्ष ठरणार बहुतेक !

संदीप डांगे's picture

20 Aug 2016 - 2:21 pm | संदीप डांगे

अदिती अशोक, गोल्फच्या फायनल मध्ये

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2016 - 3:51 pm | श्रीगुरुजी

दुर्दैवाने काल संपूर्ण दिवस बाहेर असल्याने एक सेकंदभर सुद्धा सामना बघायला मिळाला नाही. एका चांगल्या सामन्याला दुर्दैवाने मुकलो.

आता भारताला पदकाची फारशी आशा नाही. कुस्तीत योगेश्वर दत्त चमकावा अशी इच्छा आहे. गोल्फमध्ये अदितीच्या आशा बर्‍याचश्या मावळलेल्या आहेत. तिसर्‍या फेरीअखेर ती संयुक्तरित्या ३१ व्या स्थानावर आहे. तिसरी फेरी तिला फारच वाईट गेलेली दिसते. पहिल्या दोन फेरीअखेर ती ६- पार अशी बर्‍यापैकी अवस्थेत होती. परंतु तिसर्‍या फेरीत '८+ पार' हा फारच वाईट स्कोर आहे.

02:21 (IST) Women's Golf update: Aditi Ashok ends the day tied at 31st with +2 overall (8 over 79 in Round 3)

गामा पैलवान's picture

21 Aug 2016 - 12:51 am | गामा पैलवान

लोकहो,

ब्रिटनने जोरदार मुसंडी मारंत चीनला मागे टाकंत पदकतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याला जमाना होऊन गेला आहे. तरीही सतत सुवर्णपदके मिळवत दुसरा क्रमांक टिकवून धरणे सोपे नाही. गेल्या खेपेस लंडन ऑलिंपिकमध्ये यजमान ब्रिटनला २९ सुवर्णांसह ६५ पदके मिळाली होती. या खेपेस शेवटचा दीड दिवस बाकी असतांना २६ सुवर्ण व एकूण ६३ पदके खाती जमा आहेत. जरी २९ सुवर्णांचा पल्ला पार झाला नाही तरी एकून पदकांचा पल्ला निश्चित पार होईल.

ब्रिटनचा चिमुकला आकार (महाराष्ट्राच्या ७८ % ) आणि मर्यादित लोकसंख्या (महाराष्ट्राच्या ५८ % ) ध्यानी घेता ही कामगिरी कौतुकास्पद आहे. शिवाय ब्रिटनची पदके बऱ्यांच खेळांत विभागलेली आहेत. हा मुद्दाही लक्षणीय आहे.

आ.न.,
-गा.पै.

तर्राट जोकर's picture

21 Aug 2016 - 1:41 am | तर्राट जोकर

लोकसंख्येबद्दल कायमच उल्लेख होत आहे तेव्हा एक निरिक्षण लिहावे वाटते. भारताच्या सव्वाशेकोटी जनतेतून दोन चार पदकविजेते मिळतात व त्याचवेळेला छोट्या देशांतून दुप्पट चौपट दहापट विजेते मिळतात अशी तुलना होते आहे. नेहमीच झाली आहे.

इथे एक उदाहरण देतो. समजा माझ्या घरात शंभर गायी आहेत आणि शेजारच्याच्या घरात चारच गायी आहेत. पण मी माझ्या शंभर गायी रानात सोडून दिल्या आहेत, त्यांचे त्या खातात, पितात, मजा करतात. मी त्यांच्यातल्या एखादीला पकडून कधीतरी दूध काढून दूधकेंद्रावर विकायला नेतो. त्याचवेळी माझा शेजारी चारही गायींना योग्य ते पोषण, वैद्यकिय उपचारसहित काळजी घेऊन पाळतोय. व त्यांचे रोज दुध काढतोय व ते सर्व दूध दूध केंद्रावर घेऊन येतो. दूध केंद्रावर आम्ही कधी एकत्र आलो तर शंभर गायींचा मालक असलेल्या माझ्या हातात चार लिटर दूध असते तर शेजारच्याकडच्या बुलेटवर कॅनमधे साठ लिटर दूध असते.

लोकसंख्येचा परिणाम तेव्हाच दिसू शकतो जेव्हा बहुसंख्य लोकं कुठल्या ना कुठल्या खेळात सहभागी असतात. त्यातून अधिक सामने घडून अधिक स्पर्धक मैदानात उतरतात, जास्तीत जास्त स्पर्धक असतील तर भरपूर अनुभवी व तरबेज असे उच्च दर्जाचे अनेक खेळाडू तयार होतात. जेवढं दूध असतं त्याप्रमाणात तूप तयार होतं. आपल्याकडे नुसतं भरमसाठ दूध आहे म्हणून तेवढंच तूप आपोआप मिळणार नाही. त्यासाठी त्या सर्वच्या सर्व दूधाला तापवावं लागेल, त्याचं दही बनवावं लागेल, त्यातून लोणी काढावं लागेल, ते लोणी उकळून मग कुठे तूप मिळेल. सव्वशे कोटी जनता तापायला तयार झाली तर मेडल्सचे तूप भरपूर प्रमाणात मिळेल.

नव्व्यान्नव टक्के भारतीय जनता आयुष्यात कुठलाही खेळ खेळत नाही, अवघ्या एक टक्का लोकांकडून सव्वाशे कोटींसाठी भरमसाठ पदके मिळवावी ही कल्पनाच गैरलागू आहे.

खेडूत's picture

21 Aug 2016 - 9:47 am | खेडूत

सहमत.
अन्य देश आठ वर्षांनंतरच्या ऑलिंपिकची तयारी करत असताना आपल्याकडे क्षेत्रीय आणि क्रीडा संघटनांचे राजकारण होत असते.
एकदा कॉवेन्ट्रीसारख्या इंग्लंड्मधल्या कमी महत्वाच्या शहरात रहात असताना मुलाला पोहोण्याच्या क्लासला घेऊन गेलो होतो. नगरपालिकेच्या तलावावर लिहीले होते: 'इथे नवशिक्यांपासून ऑलिंपियन्सपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जाते.'
साहजिकच उत्सुकता म्हणून तिथल्या व्यवस्थापकाला त्याबद्दल विचारले तेंव्हा त्याने गेल्या शतकात अनेक पात्र आणि पदकविजेते खेळाडू तयार झाल्याचे सांगितले.दोन महिन्यांनी झालेल्या लंडन ऑलिंपिकमधे यू के ला जलतरणाचे एक रौप्य आणि दोन कास्य पदके मिळाली.एकूण तिसर्‍या क्रमांकावर ते राहिले. या सर्व खेळाडूंची दुसरी किंवा तिसरी पिढी खेळात होती.
सामाजिक स्थैर्य हाही महत्वाचा मुद्दा वाटतो. सर्व क्रीडास्पर्धा, अगदी विंटर ओलिंपिकला सुद्धा आपले संघ जयला हवेत. तेंव्हा कुठे वीसेक वर्षांनी परिस्थिती सुधारेल!

इल्यूमिनाटस's picture

21 Aug 2016 - 10:31 am | इल्यूमिनाटस

पटले
खेळसंस्कृती भारतात रुजायला अजून बराच कालावधी लागणार यात काही दुमत नाही.
खेळांसाठी सोयी सुविधा किंवा प्रशिक्षण हा नंतरचा भाग झाला, मुळात खेळ सुद्धा एक करिअर असू शकते हि मानसिकता भारतीयांवर बिंबवायची गरज आहे.
सिंधू आणि साक्षी च्या कामगिरीनंतर त्यास मदतच होईल

गामा पैलवान's picture

21 Aug 2016 - 12:06 pm | गामा पैलवान

तजो, खेडूत आणि इल्यूमिनाटस तिघांशीही सहमत आहे. मात्र माझा मुद्दा थोडा वेगळा आहे. मला ब्रिटनची भारताशी तुलना करायची नसून चीनशी अभिप्रेत होती. (मात्र तुलनेसाठी महाराष्ट्राचा संदर्भ घेण्याने मुद्दा भरकटला ही चूक मान्य.)
आ.न.,
-गा.पै.

मुळात खेळ सुद्धा एक करिअर असू शकते हि मानसिकता भारतीयांवर बिंबवायची गरज आहे.

अं....
मला असे वाटते की करीअर म्हणले की हा इश्श्यु पालकांकडे जातो. आणि करीअर ह्याचा अर्थ पोटापाण्याचा व्यवसाय असा घेतला जातो. म्हणजे हेच करुन पुढे नोकरी मिळेल काय? वगैरे वगैरे. अशाने मिळतीलही काही एकलव्य. पण मुलाचा खरोखर कल, त्याची फिजिकल कपॅसिटी, त्याच्या गरजा, त्याला आवडणार्‍या खेळातील योग्य सुविधा, गरजा ओळखण्यात आजचे पालक सक्षम आहेत का? आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पध्दतीने खेळले जाते त्या लेव्हलला तयार करण्यासाठी त्यांचे डेडीकेशन किती असु शकेल?
त्यापेक्षा थोडेसे चीनसारखे हंटींग (लहान वयातच शालेय पातळीवर सुयोग्य व्यक्तींकडून सक्षम मुले हेरणे) त्यांचे नरिशिंग, त्यांना काही प्रमाणात शुअरिटी(अभ्यासाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत) देऊन योग्य ट्रेनिंग देणे. ह्यात राजकारनाचा कुठेही इश्श्यु न होऊ देता योग्य आणि पात्र मुलांना सतत स्पर्धा रेडी करणे (ह्यात थोडासा क्रूरतेचा भाग वाटू शकेल पण आंतररष्ट्रीय स्पर्धा असेल तर अशा तयारीला पर्याय नाही.) त्यांना परफॉर्मन्सवर काही इन्सेन्टीव्हज मिळत राहतील अशी सोय करणे. फक्त मेडल्स मिळवणे हाच उद्देश न ठेवता शारीरिक आणि सर्वांंगीण तयारीने सामान्य जीवनात पण फायदा होतो अशा दृष्टीकोनाने प्रयत्न केल्यास खेळ्संस्कृती रुजू शकेल.

फारच सुंदर करताहेत! चुकवू नका.

साधा मुलगा's picture

21 Aug 2016 - 7:37 pm | साधा मुलगा

योगेश्वर दत्त पहिल्याच फेरीत हरला, पदकाच्या शार्यातीतीतून बाहेर .............. :(
शेवटी भारताला एक रौप्य आणि एक कांस्य यावरच समाधान मानावे लागणार.

खेडूत's picture

21 Aug 2016 - 10:24 pm | खेडूत

हम्म!
भारत परवा एकूण ६१ वा होता, अजून खाली जाणार..
रिदमीक जिम्नॅस्टिक फायनल्स फार सुरेख होत्या.
अता जागून समारोप बघणे शक्य होणार नाही....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Aug 2016 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रमांक....!

-दिलीप बिरुटे

....हम होंगे कामयाब ...एक दिन!

चला कामाला लागू या...

गामा पैलवान's picture

23 Aug 2016 - 11:45 am | गामा पैलवान

लोकहो,

ही पहा आपल्या क्रीडाधिकाऱ्यांची तत्परता : जैशा आणि कविताला कुणी पाणीही दिलं नाही!

सुदैवाने एके ठिकाणी काही नावं सापडली आहेत :

१. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये हॉकी इंडियाचे पदाधिकारी या नात्याने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर
२. तरलोचन सिंह (हे भारतीय तिरंदाजी संघटनेचे कार्यकारी अध्यक्षही आहेत आणि त्यांचेच पुत्र ....
३. पवनदीप सिंह भारतीय ऑलिम्पिक पथकाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी
४. भारतीय तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा
५. भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री अखिलेश दासगुप्ता
६. भारतीय हौशी मुष्टीयुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अभिषेक मटोरिया
७. हॉकी इंडियाच्या आजीवन अध्यक्ष काँग्रेसच्या विद्या स्टोक्स आणि सहायक उपाध्यक्ष अनुराग ठाकूर
८. नॅशनल रायफल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार कलिकेश नारायण सिंह देव
९. भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत
१०. टेबल टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष खासदार दुष्यंत चौटाला
११. अ.भा. टेनिस असोसिएशनचे आजीवन अध्यक्ष यशवंत सिन्हा आणि ....
१२. उपाध्यक्ष खासदार दीपिंदर हुड्डा
१३. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंह

स्रोत : http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/rajdhaneetun/politics-in-sp...

उपरोक्त व्यक्तींना ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात दिल्लीत निर्जळी मॅरेथाॅन धावायला लावली पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

बाळ सप्रे's picture

23 Aug 2016 - 1:05 pm | बाळ सप्रे

हे ही वाचा
http://indiatoday.intoday.in/olympics2016/story/athletics-federation-of-...

जैशा हिची प्रतिक्रीया भावनेच्या भरात व सर्वोत्तम कामगिरी न करता आल्याच्या निराशेत असावी. व माध्यमांनी आधीच टीकेचे धनी झालेल्या भारतीय पथकातील अधिकार्‍यांवर वार करण्याची संधी न दवडण्याच्या नादात खर्‍याखोट्याची शहानिशा न करता बातमी झटपट प्रसिद्ध केली.

बर्‍याच अधिकार्‍यांनी रिओला जाउन खेळाडूंना सहाय्य करण्याऐवजी स्वतः ची चैन केली. हे खचितच अयोग्य होतं.

दर २-२.५ किमीवर पाणी देणे ही आयोजकांची जवाबदारी असते ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली होती.
पण साधं पाणी सुद्धा न मिळणं हे ऑलिंपिकसारख्या आयोजनात घडणे कठीण वाटते. तसे झाले असते तर जगभरातून यजमान देशावर टीकेची झोड उठली असती.

अ‍ॅथलीट्सना एनर्जी ड्रिंक्स, जेल्स वगैरे पुरवणे हे त्या त्या देशाच्या क्रूने करायचे असते. जे जैशा व कविताने सवय नसल्याने नाकारले होते असे अ‍ॅथलेटीक फेडरेशनचे म्हणणे आहे.

जे झाले ते दुर्दैवी होते. खेळाडू व प्रशिक्शक/ अधिकारी यात बाँडिंग नसल्याचे सूचित करते.

पाटीलभाऊ's picture

23 Aug 2016 - 1:25 pm | पाटीलभाऊ

सहमत...कालच एका वृत्तवाहिनीवर पाहिले...त्यावर जैशा सांगत होती कि "मुझे ये रुल्स वगैरे कुछ नाही पता...में बस दौडना जानती हू !"
आता यास जबाबदार कोण ?
खेळाडू आणि क्रीडा पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव..!

खेडूत's picture

23 Aug 2016 - 12:26 pm | खेडूत

अरेरे..!
दुर्दैव, दुसरं काय?
पण साफसफाई करणार कोण?