अजून एक बार..

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
29 Mar 2016 - 10:41 pm

गेल्या उन्हाळ्यातली एक दुपार. टळटळत होते. बाईक घेउन निघालं.
एरवी गावात आंब्या-चिंचेखालची पोरं किंवा आईस्क्रीम-कुल्फीवाला सोडल्यास विशेष लगबग नसेल. बळीराजा रानावनात झोपलेलं. दुपारचे दोन वाजत आलेलं. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. गाव नेहमीसारखंच आळसावलेलं. संध्याकाळी अजून काही कामे होती. म्हणून या भेटीकरता दुपारच उत्तम म्हणून निवडलेलं.

मॅडम एका बसस्टॉपवर बसलं होतं. मला बघताच स्माईल करत उठलं. कानातले हेडफोन काढून मोबाईल पर्समध्ये ठेवलं. 'हाय' म्हणून हस्तांदोलन केलं चक्क. (असो..!)

दुपार थोडी अधिकच टळटळत होतं. 'कुठे सावलीतच बसूयात का?' म्हणून विचारलो.
'हरकत नाही सर, हे काय दुपार म्हणायचं,
फिरुयात की थोडं उन्हातंच' म्हटल्या.

म्हंटलो, जाऊ द्या..

'मग कुठे जावू यात? इराण्याच्या हॉटेलमध्ये चलता का?' त्या स्वतःच माझ्याकडे विचारल्या.

'त्येच्यापेक्षा उत्तम जागा त्या तिकडं आहे, निवांतपणे बसूयात' म्हटलो.
इराण्याच्या गर्दीत कशाला घुसायचे उगाच?

मॅडम थोडं मागे पुढे केलं. पण नंतर ' चांगले असेल ना, ठिक आहे मग, चला' म्हटल्या.

मग निघालो. मी बाईकवर. त्या पायी. 'बसा ना गाडीवर' म्हटलो. तर त्या 'जावू याकी चलतच' म्हटल्या. मग स्टॉपवर बाईक लावून निघालं चलतच.

पुढचे काही मिनटे बोलण्यात. त्यांच्या माझ्यातले अंतर जाणवून जावू लागले. मी थोराड तर त्या अजून विशीतच. मी पायजमा-चपला-ढगळ्या सदऱ्यात, तर त्या जीन्स-स्पोर्ट शूज-टी शर्टात. मी सावलीत थांबून गारवा शोधणार, अन त्या उन्हात घुसून "तापूयात की" म्हणणार..
मी म्हटलो तर मातीतला गावरान, त्या दूर मुंबईतल्या शहरी. मी हाताची घडी घालून काळजीवाहू अन त्या दोन्ही हात पसरुन उडनछू..

काही मिनटात हॉटेलाजवळ पोहोचून आत शिरलो. कोपऱ्यातलो ऐसपेस टेबल निवडलो. "काय थंडगार घेणार का?" म्हणून विचारलो, तर "कॉफी घेऊयात की गरम" म्हटल्या.
मग गोंधळतच सापडलो. शिटीतले लोकांचं सवय भन्नाटच की..!

मग वेटरला "एक कॉफी स्पेशलं, अन एक लस्सी थंडगारं" मागितलो. मॅडम पर्समधलं मोबाईल काढलं, अन माझं एक फोटो खेचलं. चक्क. (असो..!)

मग वेटर आलं. मला लस्सी देवून मॅडमचे पुढ्यात कॉफी ठेवलं. हातामधी गिलास घेत "कसा वाटला आमचो गाव?" म्हणून विचारलो.
"हे काय गाव म्हणायचं सर, टळटळीत की?"म्हटल्या.

म्हंटलो जाऊ द्या..

हे मॅडम मावशीकडे आलेलं. चार दिवस उन्हाळा झोडायचा म्हणूनं. काल मग ते मावशी आमचे वाड्यावर आलेलं. मग तिथे आक्कासाहेबाशी काय की बोलणं केलं. सकाळी उठून मग संचालकांनी या भेटीस पिटाळलं. हे संचालक आमचो बाप. तेमुळे मग मला येणे भागच पडिले.

हे मॅडमशी कुठलं जमायला ऐसी शंका येऊ घातलेली. आम्ही पडलो कारखानदार, अन हे मॅडम फॅशन डिझायनर. कशाचा कुठे मेळ नसेल.

"सार, ते लश्शी तेवढं पिवून टाका की" मॅडम चुकटी वाजवत म्हटलं.
ते लस्सी मी एका दमात पिऊन "संपलच की" म्हटलो. तेवढ्यात "मला जाऊ द्या ना घरी" करत माझं मोबाईलचं रिंगटॉन केकटलं. कुणाचं की काय म्हणून काटून टाकलं.
मॅडम मग तेंच्या मोबाईल मध्ये काय की काटकूट केलं. अन सरळ उठून माझ्याकडेच आलं. "सर, हे डान्स बघणार काय? "म्हणत जवळ खु्र्चीवर बसलं.

हे एक निराळंच की. म्हटलो काय ते बघावतरी, तर मॅडम "अप्सरा आली" वरंच नाचत होतं. फारच माधुर्यपुर्ण होतं ते. उन्मादक का काय म्हटतात ते.
व्हिडिओ संपल्यावर मॅडम माझ्याकडे बघितलं, "अद्भुतच की" म्हटलो. मग घुटमळतच, "फारच सूंदर नृत्य करता, लावणीचे आम्ही शौकीनच की, ते सुरेखा पुणेकरपण छान नाचतं, त्येंचा ठेका बघितलाय का कधी? " म्हटलो.
"ते सुरेखाबाई तर अॅक्चुवल् क्वीन सर, रियल क्वीन..! आमंच गुरुमाऊली ते" म्हटल्या.

आज स्कॉर्पिओ आणली असतो बरंच झालं असतो. असलं फटाकडं आयटम बायको म्हणून मिळालं तर काय की म्हणून विचार करत राह्यलो
"येकदा लाइव्ह बघायला नक्की आवडेल बघा तुमचं ते लावणी " म्हटलो.
मग मॅडम गॉगल लावून, पर्स आवरुन, "काय सर, लावणी माझे नसानसात की, तिकडे आमराईत चलता का, येक अदाकारी दाखिवतो तुम्हांस" म्हटल्या. अन निघायच्या तयारीत पुढे चलू लागल्या.

आणि मला.. आता एखादा बार भरावा कि काय की म्हणून वाटू लागले.

संदर्भगीत : 'कारभारी दमानं'

प्रेरित

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतमौजमजाआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

29 Mar 2016 - 10:45 pm | मी-सौरभ

कुठली मराठी ही?

हैय्यो हैयय्यो चे तंजावरी साहेब. गिटारवाले.

आनंद कांबीकर's picture

29 Mar 2016 - 10:55 pm | आनंद कांबीकर

नविन प्रयोग. जमलं.
पर ते गावांत 'इरन्याचं' हॉटेल कुठून आनलं?

नीलमोहर's picture

29 Mar 2016 - 11:07 pm | नीलमोहर

आधी वाटत होतं मॅडम शिक्षिका असतील,
पण जीन्स-स्पोर्ट शूज-टी शर्ट, फॅशन डिझाइनर आणि लावणी हे समीकरण तेवढं पटलं नाही

चांदणे संदीप's picture

30 Mar 2016 - 12:29 am | चांदणे संदीप

जव्हेरभाऊ.... त्येंच ते गाटभेट पाहून कुच कुच जाल्लं बगा! ;)

भन्नाट!
Sandy

उगा काहितरीच's picture

30 Mar 2016 - 12:54 am | उगा काहितरीच

पुभाप्र ...

तर्राट जोकर's picture

30 Mar 2016 - 1:58 am | तर्राट जोकर

हे एक निराळंच की =))

नाखु's picture

30 Mar 2016 - 10:23 am | नाखु

आणि नवीन काय झेंगाट !

आधी म्हसरं आता आमराई कुठं कुठं लक्ष्य ठिवाच म्हंतो मी !!

पारवरचा नाखु पाव्हना

टवाळ कार्टा's picture

30 Mar 2016 - 1:45 pm | टवाळ कार्टा

उस नाई का वो म्हणतो मी तिथे

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2016 - 2:17 pm | श्रीगुरुजी

मस्त!

पुढे आमराईत काय झालं ते सांगा की!!!

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2016 - 2:47 pm | पिलीयन रायडर

????

मलाही समजावुन सांगा.. नक्की काय झालं..

आणि ही भाषा कोणती नक्की? २-३ बोली एकत्र केलेल्या वाटत आहेत. मध्येच कोल्हापुर .. मध्येच ते कर्नाटकी लोक बोलतात तसं मराठी.. मध्येच पुणेरी "असोच"!!

मूळ प्रेरणा जास्त छान होती पण.

मराठी कथालेखक's picture

30 Mar 2016 - 3:30 pm | मराठी कथालेखक

भाषा सोलापूरी वाटते..

अभ्या..'s picture

30 Mar 2016 - 3:33 pm | अभ्या..

अवघडे ;)

मराठी कथालेखक's picture

30 Mar 2016 - 7:50 pm | मराठी कथालेखक

का हो , सोलापूरी नाही का ? कुठली आहे मग ?

अद्द्या's picture

30 Mar 2016 - 3:53 pm | अद्द्या

नेहमीची मजा नाय आली जव्हेर भाऊ

पीशिम्पी's picture

30 Mar 2016 - 9:58 pm | पीशिम्पी

नेहमीची मजा नाय आली जव्हेर भाऊ ++++१