आर्यचाणक्य यांच्या प्रवाहात मीही हात धुवून घेतले.. ;)
मिसळपाववर कोरडे बसण्यापेक्षा
मी जेव्हा मिसळीच्या डोहात बुडी मारली...
तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय करायचा प्रयत्न करतोय?
कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा वाचनावरती पहुडलो
तर कधी वाळके पान होऊन वाद्-प्रतिवादात गुरफटलो
कधी शब्द वेचले तर कधी काव्य शोधले
कधी निसटणारी प्रतिक्रिया हातात घेतली
तर कधी भांडणाने बोटे बरबटली
पण तरीही मला कळले नाही की मी काय करतोय?
दमून भागून शेवटी जेव्हा लिहायला लागलो
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा मिपाकडे पाहीले ....
तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या मिपामधूनच उगम पावलाय एक सिद्धहस्त लेखक...
जो लिहितोय दूर, दूर... क्षितीजापर्यंत
मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या मिपात...
आता मला उमगलंय
मला फक्त लिहित रहायचयं, पुढे पुढे जात रहायचयं
- बिनडोक बनी
प्रतिक्रिया
11 Sep 2008 - 8:06 pm | आजानुकर्ण
- प्राजु ???
बरं बरं
आपला,
(समजूतदार) आजानुकर्ण
संपादक - लेखिकेच्या विनंतीनुसार नावात दुरुस्ती केली आहे.
11 Sep 2008 - 8:12 pm | प्राजु
जरा घोळ झाला...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Sep 2008 - 1:40 am | विसोबा खेचर
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा मिपाकडे पाहीले ....
तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या मिपामधूनच उगम पावलाय एक सिद्धहस्त लेखक...
जो लिहितोय दूर, दूर... क्षितीजापर्यंत
मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या मिपात...
क्या बात है बने! सुरेख लिहिलं आहेस! :)
(सिद्धहस्त!) तात्या.
12 Sep 2008 - 3:24 am | टारझन
कोण म्हणतं बनी बिनडोक आहे... जबर्या लिव्हलय ...
बनी काय आमच्यावर लक्ष ठेउन आहे काय ? मस्त जमलय सगळंच !!!
असिद्धहस्त लेखक...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
12 Sep 2008 - 3:39 am | शितल
बने
मस्त ग !
कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा वाचनावरती पहुडलो
तर कधी वाळके पान होऊन वाद्-प्रतिवादात गुरफटलो
हे तर खास
:)
12 Sep 2008 - 9:53 am | चतुरंग
अगं मस्तं केली आहेस कविता! काय म्हणतेस? विडंबन आहे? बरं बरं, छान झालं आहे हो!
(स्वगत - ही बनी इथे कविता आणि विडंबनं काय करत बसली आहे? 'मुक्त'पणे यूरोप आणि भारतवारीवर जाणार होती ना ही? :W :? )
चतुरंग
12 Sep 2008 - 3:13 pm | पद्मश्री चित्रे
मस्तच की...
15 Sep 2008 - 5:20 am | फटू
नाव बदला तुम्ही :)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...