साप्ताहीकी अर्थात ज(व्)ळून दुरदर्शन
निळ्या रंगातील साप्ताहीकी स्थानीक मिपा वाहीनीसाठी तर लाल रंगातील आम, खास आणि अर्थात मिपासहीत सर्वांसाठी
दिवस पहिला:
कलर मराठी वाहिनी
तू माझा सांगाती
वारे पाहून पक्ष्यांतर करण्यारा महाभागांचे भक्तीगीत कार्यक्रम सहभागी :
गावीत कन्या, लक्ष्मण जगताप, ,राम कदम आणि तमाम किमान तीन चार पक्ष फिरलेले आजी माजी आमदार.
कार्यक्रमाची सांगता हम होंगे कामयाब एक दिन या समूह गायनाने होईल. कंटाळी प्रेक्षकांनी तो पर्यंत आपापल्या फराळावर ताव मारावा
आधी उटणे की लाटणे एक घरोघरीचा परी संवाद:
पात्रे नेहमीचीच जागा मकदूराप्रमाणे माष्टर बाथरूम अर्थात मालकाचे (नसलेले) स्नानगृह.
यानंतर उनक च्या सभासदांची प्रकट मुलाखत घेतली जाईल. “सुरुवातीची दिवस खरेच परीसस्पर्शाचे होते आता...
आता दुसर्याच हाकेला ओ दिली नाही तर उटण्याअगोदर लाटणे..”
सह्याद्री मराठी दूरर्दशन वाहिनी
संसार माझा वेगळा
सेना भाजप आणि दोन्ही कॉन्ग्रेस याच्या महाराष्ट्रभर युत्या आघाड्या बिघाड्या यांच्यावर एक लघुपट. यात एका मतदारसंघात एकेमेकांच्या गळ्यात गळे आणि तिथेच वॉर्डात "एकेमेकांचे गळे धरलेले चित्रफलक (पक्षी पोष्टर) पाहून प्रेक्षकांनी आपापल्या संसारात लक्ष केंद्रीत करावे.
बारश्याला किंवा अगदी डोहाळजेवणालाही जमलेल्या गृहीणींचा चर्चासत्र कार्यक्रम:
मी घेतलेली "धर्मावरम"कशी अस्सल आणि महागडी असूनही स्वस्तात मिळवली या आणि अश्या सुरस कथा सांगीतल्या जातील.समस्त पुरुष मंडळी मी अजिबात ताटाखालचेच काय पण फळीवरचेही मांजर नाही या करिता कपोलकल्पित पराक्रमाच्या गोष्टी सांगतील. प्रेक्षकांनी टीव्हीवरील रामायण महाभारतातील ट्रीक सीन आणि कवीकल्पना जितक्या सहजतेने घेतल्या तितक्याच घ्यावात, यातील कुठल्याही पराक्रमाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये. दिवाळीतच होळीचा साक्षात्कार होऊ शकतो
दिवस दुसरा:
स्टार प्रवाह मराठी वाहिनी
पुढचं पाऊल
मालीकेचं नाव जरी पुढचं असलं तरी मागंच आणि मागास (चालीरीती) दाखविल्याशिवाय कुठलाही भाग पूर्ण होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे.या वेळेचे मानकरी आहेत रा रा जाणता राजा आणि एक नाराज टाक रे.
ऐनवेळी बुचकळ्यात टाकणारी पावले पाहून अनुयायी किमान ५० पावले मागे थांबतील. चुकीच्या पावलांचे समर्थन करायला आव्हाड आणि सरदेसाई यांची नेमणूक केली आहे.
आपल्या पहिल्या वहिल्या धाग्याने हुरळून जाऊन आपण आपलाच विनोद कांबळी करावा का नाही या करीता समस्त पाटील मंडळींसाठी मार्गदर्शक कार्यशाळा "पुढचं पाऊल - पण जरा जपून" मार्गदर्शक : कॅप्टन जॅक आणि बिंग फोडणारे रंग्गाणा (दोघेही खरडफळा इनकौंटर स्पेशालीष्ट आहेत हा निव्वळ जोगायोग आहे याची नोंद घ्यावी)
कलर मराठी वाहिनी
माझीया माहेरा
आताच्या पक्षापेक्षा आधीचा(मूळ) पक्ष कसा चांगला होता यावर वात कुक्कुट विनायक निम्हण्, आदी लोक माहेरच्या गुणगौरव बाता मारतील आणि स्वग्रूही परतण्याचे संकेत देतील.
आता हा विषय महिलांच्या "जिव्हा"ळ्याचा विषय असलेने याचे लिखित असे स्क्रीप्ट (पक्षी पटकथा संवाद) नाहीत. आपल्या माहेरच्या सोसायटीच्या वॉचमनपासून ते माहेर च्या भाजीवाल्यापर्यंत भरभरून बोलण्यासाठीच या कार्यक्रमाची निर्मीती केली आहे.
मोठ्या खुबीने या मालेकेचे प्रसारण पाडव्याचे आधी करून "पाडवा औक्षण" ओवाळणी अवमूल्यन करण्याचे पाप टाळले आहे, याची सूज्ञ मिपाकर प्रेक्षक नोंद घेतीलच
झी मराठी वाहिनी
नांदा सौख्यभरे
केंद्रातील सरकारने दिलेला सल्ला आणि महाराष्ट्रातील जनतेची ईच्छा म्हणून प्रातनिधीक पत्रांचे जाहीर वाचन युती मधील (मती मंद नसलेल्या) नेत्यांसमोर वाचन.
सहभाग : श्री दिवाकर रावते,श्री गिरिश महाजन्,श्री.सुधीर मुनगंटीवार्,श्री गजानन किर्तीकर,
कार्यक्र्माची सांगता हम साथ साथ है च्या समूहगानाने होईल
वरील कार्यक्रमावर उतारा म्हणून आणि खास समस्त महीला वर्गाच्या धमकी+विनंती+आग्रहावरून वरून ही मालीका प्रसारीत करीत आहोत. घराघरातील महिला वर्ग हा आपाप्ल्या पतीदेवांच्या आवडीचे जिन्नस पदार्थ या अर्थाने करून घालतील. चाणाक्ष मिपा महिलांवॄंदाने, नवर्याच्या (अवेळी गप्पा-तळ ठोकणार्या)मित्रांकडे दुर्लक्ष्य करण्याचे व्रत अंगिकारावे असा सल्ला देतो.त्याचा लाभ पाडव्याला जरूर होतो.
दिवस तिसरा:
कलर मराठी वाहिनी
अस्स सासर सुरेख बाई
ज्या ज्या राजपात्रीत अधिकार्यांना पक्षात राजकारणात यायचे डोहाळे लागले आहेत त्यांच्या साठी मार्गदर्शक कार्यशाळा:
वक्ते : श्री श्रीनिवास पाटील (आयुक्त ते गव्हर्नर असा दीर्घ अनुभवी) श्री व्ही के सिंग,यात सरकारच्या नसलेल्या ,फसलेल्या योजनांची तारीफ कशी करायची याची सोदाहरण माहीती दिली जाईल.
कालच्या कार्यक्रमात राहिलेली कसर आजच्या स्तुती स्तवनात भरून काढावी, यात सासूची आणि परदेशी किंवा किमान परराज्यात असलेल्या नणंदेची तोंड भरून स्तुती करावी. अहो आई गावी असतील तर आवर्जून फोन करून (नवर्या समोरच)शुभेच्छा द्याव्यात.
नवरे मंडळींनी मित्रांबरोबर खुशाल रमीचा डाव टाकावा आज अटकाव होणार नाही.(याचा अर्थ जे अजून नवरे झाले नाहीत त्यांनी रमी खेळूच नये असा जालीय खुस्पट अर्थ काढू नये)
झी मराठी वाहिनी
का रे पुरावा
निवडणूकांपुर्वी असलेल्या ढीग भर पुराव्यांचे पुढे सत्तेत आल्यावर नक्की काय होते याचा मागोवा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न.ह्या मालीकेचे नाम साधर्म्य दुसर्या शी असले तरी ती मूळ मालीका लप्पा(वा)छप्पी आहे हे लक्ष्यात असू द्या.
सदर कार्यक्रमात ढीग भर पुराव्यांबाब्त टीच भर माहीती देतील श्री किरिट सोमय्या,श्री रामदास कदम्,श्री धनंजय मुंडे आणि तमाम आक्रस्ताळी पत्रकार यांचे प्रतीनिधी म्हणून श्री निखील वागळे व प्रसन्न जोशी.
मिळालेल्या मुल्यवान (पण घरच्यांच्या लेखी महागड्या) ओवाळणी वरून वाद उदभवला तर सासू बैं ना (आता अहो आई नाही )आणि नणदेला स्वतः वरील पुरावे (शोधून काढून) कशे द्यावेत याचे मार्ग दर्शन करतील जयच्या वहिनी,जगन्मान्य बेबी आत्या,जान्हवीची आई आणि जय म म्हाळसाची आई. गृहीणींना विनंती की त्यांनी याचे रेकॉर्डींग करून ठेवावे हा मसाला वर्षभर टिकणारा आहे.
सह्याद्री मराठी दूरर्दशन वाहिनी
चंद्रमुखी की सदा दु:खी
मिळालेल्या खात्यात काहीही उजेड न पाडता आल्याने सदा दु:खी असलेल्या असंतुष्ट मंत्र्यांचे आत्मकुंथन आणि मनातील खळबळ बाहेर काढण्याचा मानसोपचार प्रयोग. ( काहीजण या खळबळीलाच भडास असे म्हणतात म्हणू देत बापडे) आपंण लक्ष्य देऊ नये.
सहभागी : श्री विनोद तावडे,श्री एकनाथ राव खडसे,श्रीमती पंकजा मुंडे,श्री विजय शिवतारे
इतर नव लेखकांच्या धाग्याला मिळालेल्या (चांगल्या प्रतीसादामुळे) पोट दुखत असल्याने बद्ध्कोष्टी लेखकांसाठी विरेचन-रेचक कार्यक्रम.
सूत्र संचालन विद्यावाचस्पती श्री रा रा सूड . सहभागी आमंत्रीत श्री रा रा लाटकर , श्री रा रा समीर पाठक,
ता क याने कुणाच्या भावन दुखावल्या असतील तर त्यांनी खफ संचालीत खुसफट निर्मूलन संघाच्या पत्र पेटीवर संपर्क साधावा पौड फाटा येथे
प्रतिक्रिया
16 Nov 2015 - 9:36 am | आनन्दा
यात ढीगभर पुराव्यांचे मुकुटमणी रा रा मफलरसम्राट, दिल्लीसिंहासनाधीश्वर श्री रविंद जरीवाले यांना न बोलावल्याबद्दल जोर्दार णिषेद!
16 Nov 2015 - 10:41 am | श्रीरंग_जोशी
वाह, काय एक एक चिमटे काढले हायेत....
आमची वाहिनी सह्याद्री वाहिनी.
पी २४ तास वरील बातम्यांच्या हेडलाइन्सच्या प्रतिक्षेत :-) .
16 Nov 2015 - 11:23 am | एस
वावावा! :-)
16 Nov 2015 - 6:11 pm | पैसा
:D
17 Nov 2015 - 1:21 am | रातराणी
सगळ कळल. :)
17 Nov 2015 - 6:49 pm | अन्या दातार
जबरीच =))
17 Nov 2015 - 10:18 pm | प्रचेतस
खी खी खी =))
भारीच.
17 Nov 2015 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ..हुक्क!
17 Nov 2015 - 11:44 pm | टवाळ कार्टा
खिक्क...
18 Nov 2015 - 3:11 pm | असंका
_/\_
काय सुरेख वर्णन...!!