==================================================================
खाऊगल्ली : भाग १
==================================================================
बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा.
तर चला एकमेका सहाय्य करू-------
वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी. नंतर तक्रार चालणार नाही.
पहिल्या धाग्यावर आलेले नवे प्रतिसाद कळत नाहीत ही श्रीश्री पप्पू अदूबाळ यांची रिक्वेष्ट मान्य करून हा धाग्या त्यांच्या चरणी अर्पण करीत आहोत.
चार ओळींच्यापुढे लेखन (ढापलेले का असेना) गेल्याने संमं मजवर क्रिपा करून हा धागा टिकू देतील अशा आशा!
आज अपर्णाने सांगितलेल्या पाकृनुसार डाळ कांदा नावाची रेशिपी करून बघतिये.
मला हरभरे, जे सुकवल्यावर तपकिरी दिसतात, जे भिजवल्यावर हळदीकुंकवाला ओटी भरण्यासाठी वापरतात त्याच्या उसळीची पाकृ हवी आहे. त्यात फोडणी करताना ओवा घालतात ती! सांगण्याची कृपा करावी. सवडीने पाकृ आली तरी चालेल, लगेच हरभरे आणलेले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद.
प्रतिक्रिया
4 Jun 2015 - 10:42 am | स्वीत स्वाति
हो हो या रेसिपी चे नाव खुळा च आहे.
सलाड मध्ये मोड्णारी
साहित्य .
मेथी निवडलेली .
काकडी
लिंबू
कोथिंबीर
मुळा
मुळ्याची हिरवीगार पाने
मिरची चवीनुसार
मीठ चवीनुसार
कृती:
मेथी ची पाने , मुळ्याची पाने , कोथिंबीर धुवून निथळायला ठेवा.
तोपर्यंत मुळा , काकडी बारीक चिरून घ्या.
आता मेथी ची आणि मुळ्याची पाने , कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
सर्व साहित्य मिक्स करा . मिरची बारीक कापून टाका , मीठ चवीनुसार टाका आणि वरून लिंबू पिळून घ्या.
टीप:
आमच्याकडे उडीद पापड भाजून त्याच्या चुरा (एकदम बारीक नाही ह )
करतात आणि त्यामध्ये शेंगदाणा चटणी (जळगाव स्पेशल ) टाकून तेल टाकून खातात त्यालाही खुळाच म्हणतात आणि रसाबरोबर (आमरस ) तोंडी लावायला हाच खुळा असतो इतर कोणत्या सुक्या भाजी पेक्षा ..
4 Jun 2015 - 6:28 pm | श्रीरंग_जोशी
पौष्टिक वाटत आहे ही पाकृ.
आमच्याकडे जो मेथीचा घोळाणा करतात त्याच्याशी बरेच साधर्म्य आहे. घोळाणा म्हणजे प्रामुख्याने मेथी (पालेभाजी) व टोमॅटो - कांदा यांचे सॅलड. चवीपुरते मीठ व तिखट घालायचे व लिंबू पिळायचे.
4 Jun 2015 - 4:35 pm | इरसाल
दोन तीन थेंब माझेही.
उथळ पॅनमधे बटर फिरवुन सालासहित किसलेला बटाटाव्यवस्थित अंथरुन घ्यायचा मग मंद आचेवर त्याला ठेवुन झाकण ठेवुन शिजवुन घ्यावा, शिजत आला की वरुन थोडे बटर सोडावे, खालच्या बाजुने कुरकुरीत-सोनेरी झाला की पलटुन घेवुन त्यावर ऑरेगेनो भुरभुरावे + मीठ, आवडत असल्यास एक अंडे फोडुन टाकावे. अंडे ज्यापद्धतीने शिजलेले आवडेल तसे शिजले की खावे. लहान मुलांना हा प्रकार खास आवडतो.
बटाटे शिजवुन सालं काढुन त्याच्या इंचाच्या फोडी कराव्यात, परत पॅन मधे बटर किंवा तेल टाकुन त्या फोडी त्यात परतत असताना त्यात मीठ, ऑरेगॅनो, चीझ स्लाइस टाकुन मंदपणे ढवळावे आणी गरमागरम......हादडावे.
किंवा बटाट्याची भाजी करुन, बटाटवडे किंवा त्या भाजीत उकडलेले चणे मिक्स करुन पाणीपुरी साठी वापरावे.किंवा तिच भाजी शिळ्या पोळीला थोडे तव्यावर तापवुन किंचीतसे मीठ टाकुन त्यात रोल करुन पुन्हा तव्यावर शेकुन खावी.
भेंडी! हाय काय त्यात. बटाटा अपुन को बहुत प्रिये हय. अवर मंगताय तो दोन्तीन आय्ड्या फेकके मारेंगा.
5 Jun 2015 - 4:07 pm | मदनबाण
मिसळपावर मिसळपावच्या पाकॄ कोणी कोणी दिल्या आहेत का ? मागच्या आठवड्यात शोधत होतो... शेवटी चकली ताय ची पाकॄ त्यांच्या सायटीवर वाचली.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक