खाऊगल्ली भाग २

रेवती's picture
रेवती in जनातलं, मनातलं
30 Apr 2015 - 7:45 pm

==================================================================

खाऊगल्ली : भाग १

==================================================================

बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा.
तर चला एकमेका सहाय्य करू-------
वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी. नंतर तक्रार चालणार नाही.
पहिल्या धाग्यावर आलेले नवे प्रतिसाद कळत नाहीत ही श्रीश्री पप्पू अदूबाळ यांची रिक्वेष्ट मान्य करून हा धाग्या त्यांच्या चरणी अर्पण करीत आहोत.
चार ओळींच्यापुढे लेखन (ढापलेले का असेना) गेल्याने संमं मजवर क्रिपा करून हा धागा टिकू देतील अशा आशा!
आज अपर्णाने सांगितलेल्या पाकृनुसार डाळ कांदा नावाची रेशिपी करून बघतिये.
मला हरभरे, जे सुकवल्यावर तपकिरी दिसतात, जे भिजवल्यावर हळदीकुंकवाला ओटी भरण्यासाठी वापरतात त्याच्या उसळीची पाकृ हवी आहे. त्यात फोडणी करताना ओवा घालतात ती! सांगण्याची कृपा करावी. सवडीने पाकृ आली तरी चालेल, लगेच हरभरे आणलेले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद.

धोरणपाकक्रियाजीवनमानमतसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदत

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

30 Apr 2015 - 7:47 pm | आदूबाळ

पप्पू =)) लोल! धन्य झालो आज!

आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;)

{ चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2015 - 11:17 pm | अत्रुप्त आत्मा

:-D
मलाही वाचताना असच वाटलं आधी

गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये.
अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत.
...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

मी काल मूगडाळीचा शिरा केला होता, फारतर त्याची रेशिपी मिळेल. ;)

रेवती's picture

30 Apr 2015 - 8:39 pm | रेवती

हो, दे की!

सूड's picture

30 Apr 2015 - 9:02 pm | सूड

तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

रेवती's picture

30 Apr 2015 - 9:04 pm | रेवती

धन्यवाद.
एक प्रश्न. मूगडाळ भिजवून मग मिक्सरवरून काढायची ना?

सूड's picture

30 Apr 2015 - 9:06 pm | सूड

नाही, मी कोरडीच दळतो.

मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

फक्त भांडं जाड बुडाचं किंवा नॉनस्टिक घ्यायचं, नाहीतर झाकणावर पाणी ठेवलं तरी कधीकधी लागतो.

रेवती's picture

30 Apr 2015 - 9:41 pm | रेवती

ओक्के.

हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही.

अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

रेवती's picture

30 Apr 2015 - 11:36 pm | रेवती

हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

पैसा's picture

30 Apr 2015 - 9:15 pm | पैसा

आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

अरेरे, तुमच्याकडे चितळे नाहीत? मग आता पर्यायी चालेल.

श्रीरंग_जोशी's picture

30 Apr 2015 - 8:45 pm | श्रीरंग_जोशी
रेवती's picture

30 Apr 2015 - 8:59 pm | रेवती

ध न्य वा द हो पं त.

रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको.
आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

रेवती's picture

30 Apr 2015 - 11:33 pm | रेवती

ओक्के. धन्यवाद.

स्पंदना's picture

1 May 2015 - 4:53 am | स्पंदना

तिखट नाही?

रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

स्रुजा's picture

1 May 2015 - 5:46 am | स्रुजा

तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

रेवती's picture

1 May 2015 - 12:12 am | रेवती

सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला.
सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

मटान क्येलं होतं काल, त्याची रेशीपी पायजेलाय का ?

यशोधरा's picture

1 May 2015 - 3:43 am | यशोधरा

प्लीज द्या.

खटपट्या's picture

1 May 2015 - 5:01 am | खटपट्या

मटण

साहीत्य -
दोन कीलो मट्ण,
पाच मोठे कांदे,
दोन चमचे आले लसूण पेस्ट,
एक सपाट चमचा हळद,
आठ लसणाच्या पाकळ्या,
दोन टोमॅटो,
तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील),
एक छोटी वाटी सुके खोबरे,
पाच लवंगा,
आठ काळेमीरी,
एक ईंच दालचीनी,
एक्/दोन तमालपत्र,
पाच टेबलस्पून तेल,
मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला)
जीरे पावडर एक चमचा,
धणे पावडर एक चमचा,
मीठ,
बाजारातला मट्ण मसाला एक चमचा

ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा.

क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.)
सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या.
एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता.
आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका.
आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या.
आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या.
मटण तयार.

स्पंदना's picture

1 May 2015 - 5:04 am | स्पंदना

भलं री दादा भलं!!

मस्त! मला काळीमिरी जर्रा जास्त वाटली, पण तरीही करुन पाह्यले जाईल.

खटपट्या's picture

1 May 2015 - 7:00 am | खटपट्या

हो काळीमीरी कमी केले तरी चालेल.

पगला गजोधर's picture

1 May 2015 - 12:59 pm | पगला गजोधर

पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.

पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

खटपट्या's picture

1 May 2015 - 11:22 pm | खटपट्या

सजेशन बद्द्ल धन्यवाद .... :)

स्पंदना's picture

1 May 2015 - 4:50 am | स्पंदना

द्या की राव!
दम धरवेना!!

विशाखा पाटील's picture

1 May 2015 - 7:03 am | विशाखा पाटील

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद!
स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

आदूबाळ's picture

1 May 2015 - 11:11 am | आदूबाळ

सुपेकर का?

पुण्यात मासे चांगले मिळत नाही म्हणालीस तू, मग काम वाढवायला नको का ? :P

नूतन सावंत's picture

1 May 2015 - 9:55 am | नूतन सावंत

खाऊगल्लीत फोटो आवश्यक नाहीत का?

इरसाल's picture

1 May 2015 - 12:04 pm | इरसाल

क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी,
४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना
१ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम)
२ मध्यम कांदे
१/२ टी स्पुन जिरे
१/२ टी स्पुन मोहरी
१/२ टी स्पुन हळद
५/६ लसुण पाकळ्या
कोकणी मसाला २ चमचे
मीठ चवीपुरते.
सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा.
आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या.
आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा.
भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

विशाखा पाटील's picture

1 May 2015 - 1:20 pm | विशाखा पाटील

धन्यवाद! केल्यावर कळवते.
@ आदुबाळ - हो.

कॅफे गुडलक (पुणे) चं 'फ्रुट फन्नी' कुणी खाल्लंय का हो? कसं करत असावेत हा पदार्थ?

मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2015 - 1:30 am | श्रीरंग_जोशी

याबद्दल मलाही कुतूहल आहे.

कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

आनन्दिता's picture

5 May 2015 - 3:01 am | आनन्दिता

मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल.

मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत.

हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

क्या बात ! धन्यवाद आनंदिता ताई.

आनन्दिता's picture

5 May 2015 - 3:15 am | आनन्दिता

हॅ हॅ हॅ!! :) तळा मिरच्या तळा.. चैन करा लेको..

स्रुजा's picture

5 May 2015 - 3:28 am | स्रुजा

हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P

ये तू पण वडापाव खायला.

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2015 - 4:32 am | श्रीरंग_जोशी

सोपी वाटत आहे पद्धत.
परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.

पैसा's picture

5 May 2015 - 9:19 am | पैसा

तिखटपणा कमी करण्यासाठी मिरच्या काही वेळ ताकात बुडवून ठेवतात.

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2015 - 9:25 am | श्रीरंग_जोशी

आनंदिताने सुचवलेली अन तुम्ही सुचवलेली पद्धत वापरून प्रयोग करून बघतो.

आनंदिता ची पद्धत वापरून मी काल मिरच्या केल्या. झकास झाल्या आता पै ताई ची स्टायील ट्रायते लवकर च.

आनन्दिता's picture

5 May 2015 - 10:23 pm | आनन्दिता

शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))

रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)

आनन्दिता's picture

5 May 2015 - 10:43 pm | आनन्दिता

ते रंगाकाकाच्च आहेत. मला काका, आजोबा, काय वाट्टेल ते म्हणा असं छातीठोक पणे म्हणणारे एकमेव मिपाकर. ;) =))

बायो, एकदा काय लिहायचंय ते ठरव. सतरांदा तो प्रतिसाद एडीट करु नकोस.

आनन्दिता's picture

5 May 2015 - 11:07 pm | आनन्दिता

आता फायनल. :)

मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P
आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 1:19 am | अत्रुप्त आत्मा

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!!

सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील..

तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण!

बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!

श्रीरंग_जोशी's picture

6 May 2015 - 1:49 am | श्रीरंग_जोशी

क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) .

या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.

जुइ's picture

6 May 2015 - 2:20 am | जुइ

गुर्जी झक्कास पाकृ!

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 9:33 am | अत्रुप्त आत्मा

ठांकु! :)

आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास!

काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 7:14 am | अत्रुप्त आत्मा

:-D :-D :-D

स्पंदना's picture

30 May 2015 - 5:29 am | स्पंदना

अय्याया!!
एका मिरचीचं एव्हढ पुराण? अन ते ही सांग्रसंगित?

सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.

मीही अशीच करते. काही बनवायचे नाहीच सुचले तर फ्रिजमध्ये टिकेल बहुतेक खोबरे.

त्रिवेणी's picture

28 May 2015 - 10:03 am | त्रिवेणी

मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते.
त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे.
आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली-
ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.

२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत!

कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...

बहुगुणी's picture

30 May 2015 - 1:04 am | बहुगुणी

नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास!
(पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)

बहुगुणी's picture

30 May 2015 - 1:33 am | बहुगुणी

पॉईंट नोटेड, श्रीरंग :-)
दुव्यांबद्दल दुवा! (बाकी अशा उपयुक्त दुव्यांच्या प्रतिसादांसाठी वाचनखूण कशी साठवायची?)

श्रीरंग_जोशी's picture

30 May 2015 - 1:50 am | श्रीरंग_जोशी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित.

मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

टीपीके's picture

4 Jun 2015 - 8:56 pm | टीपीके

मिसळपाव सर्च इंजिन
https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y

कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2015 - 9:01 pm | श्रीरंग_जोशी

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले.

मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

टीपीके's picture

4 Jun 2015 - 9:14 pm | टीपीके

हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

टीपीके's picture

4 Jun 2015 - 9:10 pm | टीपीके

मराठी सर्च इंजिन

https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo

सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते
मिसळपाव
मनोगत
मायबोली
उपक्रम
ऐसी अक्षरे

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2015 - 9:17 pm | श्रीरंग_जोशी

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच.

देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2015 - 9:17 pm | श्रीरंग_जोशी

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच.

देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

टीपीके's picture

5 Jun 2015 - 3:46 pm | टीपीके

हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत
https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo

यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा

मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work
marathishodh.tk

रुपी's picture

30 May 2015 - 1:50 am | रुपी

दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !!
श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही!

बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :)

जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

श्रीरंग_जोशी's picture

30 May 2015 - 2:01 am | श्रीरंग_जोशी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) .

यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे...

दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:)
पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

स्पंदना's picture

30 May 2015 - 6:08 am | स्पंदना

कट वडा??????

रमेश आठवले's picture

30 May 2015 - 7:14 am | रमेश आठवले

बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

रमेश आठवले's picture

4 Jun 2015 - 9:17 pm | रमेश आठवले

या माहिती साठी पैसाताई यांना धन्यवाद .

रंगण्णाना "लिंकहित" असा किताब आणि खिलत आहे. अधिक माहितीसाठी (त्यांना) व्यनि करा.

एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ.

उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2015 - 4:27 am | श्रीरंग_जोशी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) .

झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता.
हरभरे रात्री भिजवा .
दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल
इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या.
आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या.
आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या.

एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया.
चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.