कथाश्री २०१४

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
4 Feb 2015 - 10:02 am

कथाश्री २०१४ हा दिवाळी अंक गरज या विषयाला वाहिलेला आहे.
या विषयाला अनुसरून उचित लेख आहेतच्,शिवाय मंगला खाडीलकरांनी घेतलेल्या तीन मुलाखती वाचनीय आहेत.

  • कुमार सप्तर्षी यांची मुलाखत त्यांची राजकीय जडण घडण , सामाजीक भान आणि वैचारीक स्पष्टता अगदी तपशीलवार उलगडली जाते. आजच्या राजकीय प्रगल्भतेच्या (दिवाळखोरीच्या) पार्श्वभूमीवर त्यांची पक्षविरहीत मते नक्कीच विचारात पाडतात
  • दुसरी मुलाखत ही विनय सहस्त्रबुद्धे यांची "रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी" च्या वाटचालीबद्दल आणि योगदानाबद्दल आहे. राजकीय क्षेत्रातही प्रबोधनाची किती गरज आहे हे आपण भूछत्राप्रमाणे उगवणार्या गल्ली नेत्यांच्या फलकबाजीतून रोज अनुभवत आहोतच
  • तिसरी मुलाखत चतुरंग प्रतिष्ठान संक्ल्पना आणि विविध उपक्रमांचा वेध घेणारी आहे. एखाद्या व्यासंगाने झपाटलेली व्यक्ती काय झेप घेऊ शकते त्याचे उदाहरण म्हणजे चतुरंग प्रतिष्ठान !

पण विशेषांकातील मला पुन्हा पुन्हा वाचावसे वाटलेले "गरज" विषयक २-३ लेख (तसे एकूण ८ पेक्षाही जास्त लेखांपैकी)

  • स्त्री स्न्मान आणि स्त्री आत्मभान.
    आपलं आयुष्य हे आपलं आहे ही जाणीव असेल, तसं स्वातंत्र्य असेल.

आपण सर्वच जण घरातील प्रत्येक स्त्री सदस्याला (बहीण असो, आई असो, बायको असो की मुलगी) जसे गृहीत धरतो आणि बर्याचदा त्यांच्या विचारांना महत्व देत नाही त्यावेळेला आपल्याला काही वावगे वाटत नाही कारण घरातील जेष्ठ स्त्रीयांच्या रूढी-परंपरांच्या बेगडी संकल्पना बोलू देत नाहीत.

लैंगीकता शिक्षण :
"लैंगीक भूक ही प्रजोत्पादन आणि वंशसातत्यासाठी एक मूलभूत गरज आहे पण प्रजोत्पादन हा उद्देश जावून केवळ कामक्रीडा म्हणून याला महत्व मिळू लागलं तस या नैसर्गीक गरजेचं विकृतीकरण होऊ लागलं"

पण या अंकाचा कळसाध्याय वाटलेला लेख म्हणजे:

अहंकार आणि अस्मिता

लेखातील शब्दातच कारण यापेक्षा जास्त अचूक आणि नेमके मला लिहिताच येणार नाही (शब्द दारिद्र्य दुसरं काय?)
"अस्मिता आणि अहंकार यातली सीमारेषा फार पुसट आहे. "मी आहे" (संस्क्रुत मध्ये 'अहं अस्मि') हे वाक्य आपण तपासून पाहू. या वाक्यातला जेव्हा 'आहे'हा शब्द महत्वाचा असतो तेव्हा व्य्क्तीच अस्तीत्व, तिच वावरण- थोडक्यात म्हणजे तिच्या वागण्याच्य क्रियांना महत्व असतं आणि व्यक्ती गौण ठरते. ज्यावेळी 'मी आहे मधला 'मी' महत्वाचा ठरतो तेव्हा क्रिया किंवा कर्तुत्व गौण थरट. आणि व्यक्तीपूजा सुरू होते.आत्मकेंद्रीतपणा, इतरांना तुच्छ लेखणं ही अहंकाराची लक्षण आहेत्.अस्मितेच्या मुळाशी आत्मविश्वास असतो. अहंकाराच्या मुळाशी असुरक्षीतता असते, भीती असते."
हा लेख पुन्हा पुन्हा वाचल्यावरच पचेल असा आहे.(लेखक मानोसपचार तज्ञ आहेत त्यामुळे वैज्ञानीक दाखले दिलेले आहेतच)

विषेश ताक: हे नवनित हवे असेल तर अंक बुकगंगावर उपलब्ध आहे (माझा बुकगंगाशी दुरान्वयानेही संबंध नाही हे फक्त माहीती करीता)

वाङ्मयसाहित्यिकसमाजऔषधोपचारआस्वादमतशिफारसमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

विशाखा पाटील's picture

4 Feb 2015 - 10:58 am | विशाखा पाटील

छान ओळख! धन्यवाद. पण बुकगंगावर २०१४ चा अंक उपलब्ध नाही.

नाखु's picture

4 Feb 2015 - 4:42 pm | नाखु