राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

एच्टूओ's picture
एच्टूओ in जनातलं, मनातलं
30 Sep 2013 - 5:56 pm

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

कलानृत्यनाट्यसंगीतभाषासमाजजीवनमानचित्रपटछायाचित्रणप्रकटन

प्रतिक्रिया

मी_आहे_ना's picture

30 Sep 2013 - 6:03 pm | मी_आहे_ना

सावरखेड १ गाव, जोगवा सारखे मराठी चित्रपट देणारे प्रयोगशील दिग्दर्शक अशी अचानक एक्झिट घेऊन गेले, वाईट झाले.
:(

कपिलमुनी's picture

30 Sep 2013 - 6:37 pm | कपिलमुनी

फार लौकर गेले !!
अजून बरेच काही अपेक्षित होते त्यांच्याकडून ..
मराठी चित्रपटसृष्टीसाठी खुप मोठा धक्का आणि हानी आहे !

अत्रुप्त आत्मा's picture

30 Sep 2013 - 7:08 pm | अत्रुप्त आत्मा

अरे बाप रे! :-(

72
आयुष्य हा असा प्रवास आहे
ज्यात खूप माणसे
तुमच्या बरोबर चालत
असतात, पण फार थोडी
माणसे तुमच्यासाठी चालत
असतात...

कलंत्री's picture

1 Oct 2013 - 11:36 am | कलंत्री

चित्रपट आणि राजकारणातील लोकांचे आयुष्यात काम आणि याची विश्रांती याचा समतोल साधायला हवा. बर्‍याच वेळेस मनातील भव्यदिव्य कल्पना, अशरीरी ताणतणाव यातून बर्‍याच कलावंताचा अकाली मृत्यु होत असतो.

कलाक्षेत्रातल्या हरहुन्नरी माणसांनी विश्रांती घ्यावीच, पण राजकारणी? किती राजकारण्यांचे कामाच्या दबावामुळे नैसर्गिकरित्या अकाली मृत्यू झालेत? गेंड्याच्या कातडीला छर्याच्या गोळीने काहीही फरक पडत नाही...

>>गेंड्याच्या कातडीला छर्याच्या गोळीने काहीही फरक पडत नाही...
+१

पेस्तन काका's picture

22 Oct 2013 - 4:34 pm | पेस्तन काका

+१

पांगिरा, जोगवा, बहात्तर मैल अशा चित्रपटातून त्यांनी सामन्यांच्या व्यथा मांडल्या. वंशवेल हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

मृगनयनी's picture

1 Oct 2013 - 7:29 pm | मृगनयनी

Rajeev'ji... Very Early Exit.... Just Speechless..... ---------------------------------------------------

आत्ता कुठे मराठी इन्डस्ट्री एका वेगळ्या पाऊलवाटेवर स्थिरावत होती..... तिला एकटं टाकून निघुन गेलात !!...

Its really very shocking.......... Rest In Peace......... *~*~*~*

पेस्तन काका's picture

1 Oct 2013 - 6:01 pm | पेस्तन काका

अतिशय दुखद घटना... राजिव दादाची भेट पहिल्यांदा "प्रयोग परिवार" मध्ये झालेली... बहुतेक २००३ मध्ये.. अतिशय साधा सरळ माणुस... आम्ही अगदी छोटी एकांकिका करत होतो त्या निमित्ताने भेट झालेली..
त्यानंतर सावरखेड एक गाव चा वेळेस जवळुन संबंध आले.. आजहि विश्वास बसत नाहिये .. राजिव दा आपल्यात नाहि... :( खूप वाईट वाटले :(

पैसा's picture

1 Oct 2013 - 8:36 pm | पैसा

बर्‍याच कलाकारांबद्दल आजकाल असेच प्रकार ऐकू येतात. सतत धावत रहाण्यामागे अनेक कारणं असतील. कलावंताची कारकीर्द अगदी बेभरवशाची. प्रचंड ताणतणाव आणि सतत लोकांसमोर रअहाण्याचे कंपल्शन. कुठे थांबावं हे ज्याचं त्याने ठरवायचं. काही जणांना स्वतःच्या आरोग्याचीही फिकीर नसते. झाली ती घटना वाईटच त्यामुळे अनेकांचं अनेक प्रकारचं नुकसान झालं आहे.

मृतात्म्यास विनम्र श्रद्धांजलि.

पाषाणभेद's picture

2 Oct 2013 - 2:22 am | पाषाणभेद

चाळीस हे काही जाण्याचे वय नाही. फारच वाईट घटना आहे. राजीव पाटील यांना आदरांजली.

मुक्त विहारि's picture

2 Oct 2013 - 10:02 am | मुक्त विहारि

आदरांजली.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Oct 2013 - 12:53 pm | llपुण्याचे पेशवेll

सूरकरांनंतर पाटलांचीही अकाली एक्झिट?? अरे काय चाल्लंय हे?