(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.)
पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण
(पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन)
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.
पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली.
पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.
पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले. प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.
पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या.
पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.
- (पटकथा - पुष्कर)
प्रतिक्रिया
14 Jul 2008 - 8:34 am | विसोबा खेचर
पुष्करशेठ,
धन्य आहे रे बाबा तुझी!
आपला,
पात्या, सॉरी, तात्या! :)
14 Jul 2008 - 11:14 am | पुष्कर
"धन्य आहे रे बाबा तुझी!"
तुमच्या प्रतिसादाने मी 'धन्य' झालो याबाबतीत वाद नाही, 'धन्यवाद'!
14 Jul 2008 - 11:07 am | पुष्कर
'पब्दां'च्या अतिरेकाने डोक्याला त्रास दिल्याबद्दल क्षमस्व. पण मराठीत 'प' आणि 'म' पासून सुरू होणारे शब्द (विशेषतः क्रियापदं) बहुसंख्येने आहेत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं?
14 Jul 2008 - 11:23 am | मदनबाण
पुष्कररांवांच्या प प्रसारणामुळे प्रभावित..
(चरिचब चहिनतम चतलियघे) असे म्हणणारा
मदनबाण.....
14 Jul 2008 - 2:35 pm | मनस्वी
पस्त पिहिलंएस पुष्कर!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
16 Jul 2008 - 1:27 pm | विजुभाऊ
पहा पहा
* पेस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा पिणे वाढवून पिवेकानंद व्हा. * (हे लिहिताना कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अस्पष्टसाही हेतू नाहिय्ये..कृ.ख ह. घ्या.)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
14 Jul 2008 - 8:28 pm | llपुण्याचे पेशवेll
पुष्कररावांच्या प्रतिभेमुळे प्रभावित..
पुण्याचे पेशवे
16 Jul 2008 - 1:10 pm | पुष्कर
मदनबाण, मनस्वी आणि पुण्याचे पेशवे, आपला अत्यंत आभारी आहे.
तुमच्या सगळ्यांच्या नावांवरूनही हेच सिध्ह होतय की मराठीत 'म' आणि 'प' पासून सुरू होणारे शब्द खूप आहेत.
-पुष्कर
16 Jul 2008 - 1:55 pm | अनिल हटेला
ह्या ह्या ह्या!!!!!
पुष्कर दादा !!!
फार च तल्लख बुद्धी आहे बुवा तुझी......
कस काय सुचत रे तुला?
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
21 Sep 2009 - 1:28 pm | पाषाणभेद
मस्त लिहीलेस रे पुष्कर. शोधले व वाचले.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
26 Apr 2012 - 4:03 pm | बॅटमॅन
ओह म्हणजे वरिजिनल पुष्कर चे आहे तर!!! जियो!!! नेटवर लै पाहिलं होतं, पण कोण मूळ लिहिलं नव्हतं ठाऊक. सहीच!!!!
20 May 2012 - 3:19 pm | पुष्कर
धन्यवाद बॅटमॅन. मला एका मल्याळी मित्राने एक इमेल पाठवली आणि म्हणाला, काहीतरी मराठी आहे, बघ वाचून. बघतो, तर माझीच गोष्ट मला!! आता इकडे मित्रांना सांगितलं की ती गोष्ट माझी आहे, तर म्हणतात 'ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. एवढं पण गंडवायचं नाही, आम्ही इमेलवर कधीच्या काळी वाचलीये'. पण मी कधीच्या काळी लिहिलीये, त्याचं काय! काय करावे!