हे' शास्त्रीय संगीत ' हाय तरी काय राव ? भाग ३

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
9 Feb 2013 - 3:35 pm

भारत देशात अभिजात संगीताच्या दोन शैली प्रामुख्याने आढळतात. त्यात हिन्दुस्थानी शैली व कर्नाटक शैली असे दोन प्रकार आहेत.वापरले जाणारे ताल, साथीसंगतीची वाद्ये व सादरीकरण ( यात आवाजाचा लगाव,. तान क्रिया ई चा समावेश ) यात मूलभूत फरक आहे. रागांचे वर्गीकरण करण्याचीही पद्धत वेगवेगळी आहे. पण या गुंतागुन्तीच्या विषयात आपल्याला शिरायचे नाही.कारण ऐकले तर आवडते पण का आवडते हे समजत नाही अशी अवस्था असलेल्या रसिकाला समोर ठेवून ही मालिका लिहिली जात आहे.

हिंद्र्स्थानी अभिजात संगीतात घराणी नावाचा एक प्रकार आहे. त्या बद्द्ल एवढेच आपण समजून घ्यायचे आहे की घ्रराणे म्हणजे सादरीकरणाची शैली. किराणा घराण्यात " ताल गया तो बाल गया , स्वर गया तो सर गया" असे म्हणून स्वरांच्या शुद्धतेचे महत्व अधोरेखित करण्यात येते. जयपूर घराण्यात पूर्ण आकाराचा स्वराचा लगाव व जटील ताना , तर आग्रा घराण्यात आक्रमक गायकी, पतियाळा घराण्यात स्वरांची उच्च नीच तत्वावरची व्याप्ती (रेंज) असे महत्वाचे निकष मानतात.

ख्यालातून रागाचे आरोह अवरोह याबरोबरच त्या रागाची ठराविक पकड हे सूत्र पाळावे लागते. म्हणजे त्या व त्याच रागाचे
स्वरूप रसिकासमोर येते. आता ख्यालात काय असते आपण पाहू..

ख्यालाचे शरीर म्हणजे चीज .यात अस्ताई ( मुखडा) व अंतरा( कडवे) असते. साधारण पणे अंतरा हा अस्ताईच्या तुलनेत उच्च कंपनांच्या स्वरांची मदत घेऊन केलेला असतो. अशी चीज विशिष्ट तालाच्या बंधनात बंद केली की तिला बंदिश म्हणतात. याचाच अर्थ असा की एकच चीज वेगवेगळ्या रागात असू शकते व तिच्या एकाच रागात विविध बंदिशी असू शकतात. गायनाचे विलंबित लयीत व मध्यम लयीत व द्रूत लयीत असे तीन भाग असतात.
कोंणत्या लयीत काय सादर करायचे याचे एक तंत्र ठरलेले आहे. सावकाश लयीत आलाप व विस्तार , मध्य लयीत बोलताना, सरगम, द्रूत लयीत साधारण पणे ताना व तराणा अशी विभागणी असते. आलाप म्हणजे संथ गतीत सलग विस्तारित स्वर लावून रागाला आवश्यक असलेल्या स्वरांचा उच्चार करणे. त्यात एका स्वरावरून दुसर्‍या स्वरावर जाताना
आसयुक्त लगाव करणे हे ऐकण्याचा आनंद मिळतो. जसजसे स्वर लागत जातील तसे रागाचे एक अव्यक्त पोट्रेट तयार होत जाते. एखादा राजा. राजकुमार , साधु, नर्तकी अशा व्यक्त आकृत्या आपण आपल्या कल्पनेने तयार करून अनुभवू शकतो.
मध्य लयीत काही प्रमाणात ताना ( तुलनात्मक द्रूत लयीतील आलापी म्हणजेच तान होय) सरगम ( सा रे ग म अशा अक्षरांचा वापर करून निरनिराळ्या उपजा (variations) करणे )हा प्रकार लोकाना फार आवडतो कारण लयकारी यात दाखविता येते. बोलताना म्हणजे जे चीजेचे बोल आहेत ते वापरून केलेली दूत लयीतील आलापीच.

या सर्व सादरीकरणात निरनिराळ्या प्रकारचे मगदूराचे रसिक वेगवेगळ्या भागाचा आनंद लुटतात बरेचसे रसिकाना दूत चीज आवडते. आलापीतील "आ उ " ते त्या द्रूत बंदिशीसाठी " सहन" करतात तर काही उलटपक्षी त्याच संथ आलापीतील लगावाचा आनंद घेतात.काहीना लयकारी आवडते. तर काहीना अनपेक्षित " जागा" . तार षडज लावणे, व मंद्र ( खालच्या) सप्तकातील अगदी खालचा सा लावणे या दोन जागा रसिकांचे मन अगदी चिंम्ब भिजवून टाकणार्‍या असतात.
'समेवर येणे" या प्रकार लय भारी या स्वरूपाचा असतो. आग्रा घराण्याचा आक्रमक गायकीत तर रसिकाला अगदी 'विद्ध' करीत समेवर येणे हा फार रंजक भाग असतो. तीन ताल असेल तर १३ व्या मात्रेपासून १६ व्या मात्रेपर्यंत काही आकृतिबंध गायक व तबलजी तयार करून समेवर येतात. ( सम म्हणजे आदल्या आवर्तनाचा तालातील शेवट व नव्या आवर्तनाची सुरवात ही जागा )

ख्यालात आपण चीजेतील काव्याचा आनंद घेउ शकतो का की निव्वळ स्वरानंद या विषयी रसिकांमधे व अभ्यासकांमधे मतमतांतरे आहेत. प्रत्येक स्वराला काही मतलब आहे उदा. कोमल रिषभ - गांभीर्य, तीव्र मध्यम आर्तता . त्यांचे वेगवेगळ्या रागातील अस्तित्व रागाचे स्वरूप कसे बनविते तो पुढे पाहू !

मांडणीकलासंगीतआस्वादलेखमाहिती

प्रतिक्रिया

ऐकून कधीही पोट न भरणारे, अतिशय आवडते गाणे - बाझीचा-ए-अतफाल - शुजात हुसेन
यात खालचा म्हणजे मंद्र स्वर आहे का? हा स्वर फार आवडतो.

शुचि's picture

9 Feb 2013 - 6:27 pm | शुचि

वा! "विद्ध" हा समर्पक शब्द योजलात आपण चौकटराजा जी. या शब्दावरुन कविता आठवली. शेवटच्या ओळी "विद्ध" शब्दाशी रेझोनेट होणार्‍या -

ही निकामी आढ्यता का ?
दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरतो का ?
चोरिता का वाहवा...
मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी...
दाद देणे हे ही गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट...
नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा...
चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही...
ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा...
- आरती प्रभू

मस्त मैफिल जमवलीये. लगे रहो!

हे गाणेदेखील तासन तास ऐकत बसते. यातील संयत स्वर हा मंद्र आहे का? या गाण्याची जातकुळ काहीशी त्या वरच्या शुजात हुसेन यांच्या गाण्यासारखी वाटते.

चौकटराजा's picture

10 Feb 2013 - 8:46 am | चौकटराजा

हे गीत फारच सुंदर आहे. त्याचा मूड संयत विनंतीचा आहे. स्वरांचे म्ह्णणाल तर यात मंद्र सप्तक जवळ जवळ नाहीच तर मंद्र षडज लावण्याची बातच येत नाही. मंद्र सप्तकातील निषादाखाली हे गीत जातच नाही. आपण पंडीत जसराज यांची एखादी कलाकारी ऐकून पहा त्याना हा " खर्ज" लावण्याची फार हौस व जबर क्षमता आहे. साधारणपणे मंद्र सप्तकातील काम पुरूष गायक अधिक समर्थपणे करतात असा अनुभव आहे.

मराठी_माणूस's picture

10 Feb 2013 - 10:44 am | मराठी_माणूस

लिंक बद्दल धन्यवाद. आज हे गाणे दिवसभर डोक्यात घोळत रहाणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2013 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन आहे, वाचतो आहे.

-दिलीप बिरुटे

जसजसे स्वर लागत जातील तसे रागाचे एक अव्यक्त पोट्रेट तयार होत जाते. एखादा राजा. राजकुमार , साधु, नर्तकी अशा व्यक्त आकृत्या आपण आपल्या कल्पनेने तयार करून अनुभवू शकतो.

ही आयडीया छान आहे.

काल म्हणजे रवीवारी मी गुरुद्वारामध्ये गेले होते. तेथे दर रवीवारी कीर्तन सोहेला असते. खूप आळवून आळवून पण खड्या (खास शीख आवाजात)आवाजात कीर्तने होतात. इतका सुरेख अनुभव होता ...काही ताना/आलाप म्हणजे अक्षरक्षः "मेकींग लव्ह विथ द अ‍ॅब्स्ट्रॅक्ट अँड ऑलमायटी बीईंग" असा काहीसा अनुभव वाटला.