हे' शास्त्रीय संगीत ' हाय तरी काय राव ? भाग २

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
31 Jan 2013 - 10:52 am

इथे भाग १ वाचावा

आपण पहिल्या लेखांकात पाहिले आहे की राग एक मसाला असेल तर पदार्थ म्हणजे काय बुवा ? ते आता जरा पाहू. राग हा गोडवा निर्माण करण्याचा राजमार्ग आहे. असाच पदार्थ चविष्ट करण्याचा " राजमार्ग" मसाला उत्पादकानी शोधून काढला आहे. असो. तर मी काय म्हणत होतो तर पदार्थ म्हणजे काय? तर पदार्थ म्हणजे " ख्याल" आणि उपशास्त्रीय प्रकार.

त्याअगोदर जरा स्वर या संकल्पनेची माहिती घेउ. मानव वंश विकसित होत असताना मानवाने २० ते २०००० हर्टझ या आवाक्यातील निरनिराळ्या ध्वनिलहरी ऐकून घेतल्या. त्यासाठी, पक्ष्यांचे आवाज, समुदाची गाज, निर्झराची खळखळ यांचा उपयोग झाला. नंतर मात्र कातडी, तंतू .वेळू ई च्या साह्याने विविध वाद्यांचा विकास जसा होत गेला तसा ध्वनिच्या आकलनाचा माणसाचा आवाका ही वाढत गेला. परिणामी पहिल्या फेज मधे सा रे ग म या चारच स्वरांचा साक्षात्कार माणसाला झाला. आजही आदिवासी लोकसंगीत आपण ऐकलेत तर त्यात सा रे ग यातच तिथल्या तिथे फिरत असलेले
गान आपल्याला आढळेल.फार कशाला ... आपली आरती जरा पेटीवर वाजवून पहा... माळाच्या मळामदी कोन ग उभी हे
गाणे वाजवून पहा... गंगू तारुण्य तुझ बेफाम हे गाणे वाजवून पहा ... असं पतियाळा घराण्च्याच्या परवीन सुलताना यांच्या साडेतीन सप्तकी गायकी सारखं तुम्हाला तिथं काहीही मिळणार नाही. पण स्मरणीयता ही रंजकतेची बहीण आहे ती लोकगीतात साधेपणामुळे तुम्हाला सापडेल.

त्यात मानवाला पुढे असे ही कळून आले की सा रे ग म यांच्या वारंवारितेचा (frequency) काही तरी निस्चित परस्पर संबंध आहे.सा च्या काही प्रमाणात ( बहुदा दीडपट) जी वारंवारिता ती म्हणजे पंचम मग प ध नि सा यांचे शोधन होऊन
सप्तक पुरे झाले.प ध नि सा हे दुसरे तिसरे काही नसून वरच्या वारंवरितेला धरून सारेगमच पुन्हा येतात हे कळून आले. त्यात खालचा सा व वरचा सा हे एकदम एकरूप आहेत हे कळून आले. मग सा व पंचम हे एकदम वाजविले की कानाला विशेष आनंद मिळतो हे कळून आले ( हार्मनी) आज पाश्चिमात्य अभिजात संगीत हे स्वरसंवाद तत्वावर तर आपले भारतीय संगीत स्वर संगति ( वा स्वरावली) ( मेलडी) या वर आधारीत आहे. आपल्या इकडे आरोह
अवरोहाचे नियम कडक आहेत.कारण एरवी निर्विकार असलेला एकाकी असलेला स्वर दुसर्‍या स्वरामागे वा पुढे उभा राहिला की तो कोणता तरी रंग ,पोत घेउन येतो याचा अनुभव कानाना आल्याशिवाय रहात नाही.पाश्चात्य संगीतात " कॉर्ड" चे महत्व फार आहे. कॉर्ड म्हणजे दोन किंवा अधिक स्वर एकदम वाजविणे. यात रंजक व अऱंजक अशा दोन्ही प्रकारच्या कॉर्डस असतात. बहुदा पियानो वा कीबोर्डवर गीत वाजविताना डाव्या हाताने मंद्र वा मध्य सप्तकात कॉर्ड वाजवितात तर मेलडी उर्फ चाल ही मध्य व तार सप्तकात वाजवितात. याचे भन्नाट प्रात्यक्षिक चेतन घोडेश्वर यांच्या अदाकारीत इथे - झुबी डूबी - ( थी इडीयट) वर ऐका.

वर आपण पाहिलेच की पदार्थ म्हणजे " ख्याल" यात बडा ख्याल व छोटा ख्याल असे प्रकार. बड्या ख्यालात घेतलेली वर
मूळ हळद जिरे मोहरी ई ची फोडणी या छोट्या ख्यालतही कमी प्रमाणात का होईना येणारच. या ख्रेरीज धृपद व धमार हे
चांगले पण कमी लोकप्रिय पदार्थ ही आहेत. ( ज्या प्रमाणे जुना बुंदीचा लाडू काय वाईट होता का पण आताच्या मेनूत रस मलाई व गुलाबजाम असतातच की नाही ?) आता हळ्द, हिंग, जिरे, ची फोडणी म्हणजे काय ते पाहू या.
आलापी, सरगम, तानक्रिया, बढत ही तो फोडणीचे सामग्री. एखाद्या क्रिकेटर कडे समोरचे व्ही मधले फटके, ऑन चे फटके,ऑफ ड्राईव्ह यांचा खजाना अधिक तसा तो परिपूर्ण फलंदाज तसेच गायकाचे( खरे तर गवयाचे असा शब्द हवा ) ही
असते. ह्या सगळ्या अंगांचा समावेश गायकीत होणे म्हणजे रसिकास पर्वणीच असते.
उपशास्त्रीय हा अभिजात संगीताच्या मैफलीत नंतरची स्वीट् डिश या प्रकारात मोडणारा पदार्थ . यात प्रामुख्याने ठुमरी, दादरा, टप्प्पा. तराणा असे काही पदार्थ वाढले जातात. या खेरीज शास्त्रीय मैफलीत न येणारे पण इथे जाता जाता उल्लेख करावा असे पदार्थ म्हणजे, कजरी, चैती, सावन, नज्म, कव्वाली, गजल, मांड, हीर, भजन, निर्गुणी भजन आणि अनेक.
क्रमशः

मांडणीसंगीतआस्वादलेखमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2013 - 11:02 am | बिपिन कार्यकर्ते

छान... मात्र ते पदार्थ वगैरेचं अजीर्ण होतंय हो!

नगरीनिरंजन's picture

31 Jan 2013 - 12:26 pm | नगरीनिरंजन

आमच्या सुदैवाने कोणीतरी अखेर निव्वळ जार्गन न फेकता आणि गोलगोल न बोलता शास्त्रीय संगितावर लिहायला लागले आहे हे पाहून अत्यानंद झाला आहे. त्याबद्दल चौकटराजा यांचे शतशः आभार!
पण ते मसाला आणि पदार्थांचे रूपक फार ताणू नये ही विनंती. लेखमालेत पुढे उदाहरणांसहित तपशील येईल ही आशाही आहे.

ते रूपक केवळ मूळाक्षरांची कल्पना यावी म्हणून घेतले आहे.आता यापुढचा भाग रीतसर रागनिर्मिती व्रर येणार भौ !

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2013 - 3:39 pm | बिपिन कार्यकर्ते

ओके... उगाच रसभंग होत होता.

पिवळा डांबिस's picture

1 Feb 2013 - 2:48 am | पिवळा डांबिस

ते रूपक केवळ मूळाक्षरांची कल्पना यावी म्हणून घेतले आहे.आता यापुढचा भाग रीतसर रागनिर्मिती व्रर येणार भौ !

अरेरे! म्हणजे तुमचा लेखदेखील यापुढे या आआआ-ऊऊउ वर बेतलेल्या इतर असंख्य आंतरजालीय लेखांप्रमाणे बेचव होणार म्हणायचं. असं करू नका राव! ह्या बिकाचं काय ऐकताय तुम्ही? ते रात्री प्रत्येक मिपाकट्ट्यावर जबरदस्त जेवण हाणतंय आणि मग सकाळी मात्र उगीच संगीतसोवळं नेसून भाबडं होऊन बसतंय!!! अहो, सवाई गंधर्व उत्सवाची लोकप्रियता देखील तिथे खाऊच्या गाड्या लागल्यापासूनच वाढली (असं आमचा पुण्याचा वार्ताहर गुपचूप कळवतो!!)
:)

शुचि's picture

2 Feb 2013 - 1:33 pm | शुचि

बिकांशी असहमत आहे. याच उपमा बर्‍या वाटतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2013 - 2:15 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ! माझा प्रतिसाद नीट वाचा! मी अजीर्ण म्हणलंय... कळलं का?

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2013 - 2:17 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! पिडां उगाच खोड्या काढू नका... रात्री कट्ट्यांवर पोटभर हाणूनही सकाळी सोवळं नेसू शकतो, (पितांबर नेसायची पाळी येत नाही) म्हणजे आपली काय पॉवर आहे ते समजून घ्या! ;)

श्रावण मोडक's picture

2 Feb 2013 - 7:01 pm | श्रावण मोडक

ते रात्री प्रत्येक मिपाकट्ट्यावर जबरदस्त जेवण हाणतंय

छ्या हो. गेल्या कट्ट्याला त्यांनी 'बिनमिरचीची खिचडी' अशी ऑर्डर दिली होती हे मी ऐकलं आहे. असलं जेवल्यानंतर सकाळी सोवळं हे बरोबर (पितांबराची गरज नसते)... ;-) कट्टा होतो तिथं दूधभात मिळत नाही म्हणून, नाही तर... असो. ;-)

मन१'s picture

31 Jan 2013 - 11:06 am | मन१

हा ही भाग वाचनीय.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Jan 2013 - 12:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अन मजा येतो आहे.
पुढचा भाग लवकर येऊद्या.

सस्नेह's picture

31 Jan 2013 - 1:11 pm | सस्नेह

जरा दमानं घ्या...
सगळे 'पदार्थ' एकदम वाढू नका, एकेकाचा साग्र'संगीत' आस्वाद घेऊ द्या..
हाही लेख भारी.

तर्री's picture

31 Jan 2013 - 4:57 pm | तर्री

लागे राहो. वाचतो आहे , आवडते आहेच.

सूड's picture

31 Jan 2013 - 5:17 pm | सूड

फक्त मसाल्याने मसालिताचे गुण वाढू देत, मुदलातला पदार्थ कमी होऊन व्याजातला मसाला जास्त होऊ नये ही अपेक्षा. हाही भाग वाचनीय हेवेसांनल !!

अन्या दातार's picture

31 Jan 2013 - 8:49 pm | अन्या दातार

बाडीस.

किसन शिंदे's picture

31 Jan 2013 - 5:32 pm | किसन शिंदे

व्वा!!

आणखी खोलात जाऊन लिहलंय, चौराकाका लेखमालिका मस्तच सुरूय. पुढचा भाग सावकाशीत येऊ द्या.

अभिरत भिरभि-या's picture

31 Jan 2013 - 9:32 pm | अभिरत भिरभि-या

दोन्ही लेख आवडले. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

आजही आदिवासी लोकसंगीत आपण ऐकलेत तर त्यात सा रे ग यातच तिथल्या तिथे फिरत असलेले
गान आपल्याला आढळेल.

Interesting!

सुनील's picture

31 Jan 2013 - 10:01 pm | सुनील

छान. हार्मनी आणि मेलडीतील फरक चांगला समजावून सांगितला आहे. हार्मोनियम का म्हणतात आणि सुरुवातीला रेडियोवर त्यावर बंदी का होती, याचा अंदाज येतो.

"उपशास्त्रीय हा अभिजात संगीताच्या मैफलीत नंतरची स्वीट् डिश या प्रकारात मोडणारा पदार्थ"
हे पटले नाही बुवा...उपशास्त्रीय हे तोंडीलावण्यासारखे असे मला वाटते. बाकी छान चालू आहे, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

एक शंका - सा रे ग म प ध नी सा ............ च का?
ता वे श ढ फ ज ठी ला का नाही :(

चौकटराजा's picture

2 Feb 2013 - 2:03 pm | चौकटराजा

हे अब क ड १ २ ३ ४ आपले मानवाचे खेळ आपण ज्या स्पीशी मधे जन्माला आलो त्याला मा न व म्हणतात गा ढ व का नाही ?

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2013 - 1:52 am | पिवळा डांबिस

ता वे श ढ फ ज ठी ला का नाही?
हाय की!
विंग्रजीत सारेगमपधनीसा ला डोरेमीफासोलाटी म्हंत्यात की!!
कुठनंपन आवाज निघाल्याशी कारन!!!
:)

शुचि's picture

3 Feb 2013 - 5:30 am | शुचि

डो अ डीअर अ फिमेल डीअर,
रे अ ड्रॉप ओफ गोल्डन सन .....

आठवलं आठवलं.

चौकटराजा's picture

3 Feb 2013 - 5:38 am | चौकटराजा

डो रे रे मी मी सो सो, रे फा फा , ला टी टी
व्हेन यू नो द नोटस टू सिंग
यू कॅन सिंग मोर मेनी थिंग !

पैसा's picture

2 Feb 2013 - 8:39 pm | पैसा

तब्बेतीत लिहा!

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2013 - 1:57 am | पिवळा डांबिस

कशाला उगाच कन्फूज करताय त्यांना?
तो बिका तिथं त्यांचं जेवण तोडायला निघालाय आणि तुम्ही म्हणता की तब्ब्येतीत लिहा...
नक्की कराव तरी काय माणसानं?
:)

पैसा's picture

3 Feb 2013 - 10:25 am | पैसा

जेवणापुढे तडजोड नाय! फक्त अपचन होता कामा नये!

रमेश आठवले's picture

3 Feb 2013 - 12:29 pm | रमेश आठवले

चौकटराजा यांनी ' हे शास्त्रीय संगीत हाय तरी काय राव ?' या विषयावर दोन लेख लिहिले आहेत. दोन्ही लेखात त्यांनी रागाचे घटक समजावून सांगण्यासाठी उपमा म्हणून पाकक्रियेत वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचे घटक आणि मसाले तयार करण्याच्या पध्तीनबद्दल लिहिले आहे. त्यावरून ओघाने असा विचार येतो कि प्रत्येक रागासाठी आपण एक लक्षण पदार्थ मनोनीत करू शकतो का ?
उदाहणार्थ कोणाला एखादा राग ऐकून जिलबी ची आठवण झाली तर त्या रागाचा लक्षण पदार्थ जिलबी असे म्हणावयाचे. तसेच वेगवेगळ्या रागांसाठी श्रीखंड , बासुंदी, वडा असे वेगवेगळे पदार्थ मनोनीत करता येतील.
हि कल्पना काही एकदम नवी नाही. शास्त्रीय संगीताच्या पुस्तकांमध्ये प्रयेक रागाचे एक लक्षण गीत देतात. त्यामध्ये रागाचे सूर व चलन दर्शवणारी आणि त्याच रागात गाण्यासाठी एक बंदिश लिहिलेली असते. लक्षण गीतासारखेच लक्षण पदार्थ.
मी असे ऐकले आहे कि पंडीत जसराज म्हणतात - रागोमे दुल्हा बसंत बाकी सारे बाराती- तेंव्हा वसंत रागाचा लक्षण पदार्थ म्हणून मिसळपाव ला मनोनीत करावयास मिपाकरांची अनुमती असेल असे वाटते.

चौकटराजा's picture

3 Feb 2013 - 2:31 pm | चौकटराजा

रागांमधे मोठा राग ( मोठा म्हणजे सातही स्वर असलेलाच पाहिजे असे नाही ) रागिणी व क्षूद्र राग असेही प्रकार आहेत.
( क्या से क्या हो गया, ( बर्मन) रूठे सैंया हमारे सैंया ( रोशन) बाई बाई मन मोराचा ( आनंदघन) यानी झिंओटी या रागाची सुरावट घेऊन ही गीते केली आहेत. असे राग फारसे गायले जात नाहीत ते उपशास्त्रीय साठी वापरले जातात.

मिपाचा संदर्भ घेता असे म्हणावेसे वाटते की कोणत्याची क्षूद्र रागाला "जिलबी" म्ह्णणता येईल.

चौकटराजा's picture

3 Feb 2013 - 2:33 pm | चौकटराजा

त्य रागाचे नांव झिंझोटी असे हवे.