आपल्याला ' मधुबनमे राधिका नाचेरे ' हे गीत आवडत असते पण राग " हमीर" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' अब तो तेरे बिन जी लेंगे हम "' हे गीत आवडत असते पण राग " अहीर भैरव " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' छैया रे छैया ' ( द ट्रेन) ' हे गीत आवडत असते पण राग " मालकंस" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' गोरी तोरी बाँकी ' हे गीत आवडत असते पण राग " भैरवी" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' साज हो तुम आवाज हुम मै ' हे गीत आवडत असते पण राग " पटदीप " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' तू चीज बडी है मस्त मस्त ' ही गीत आवडत असते पण राग " भीममपलास" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' कही आर काही पार ' हे गीत आवडत असते पण राग " पिलू" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' कई सदियॉसे कई जन्मोसे ' हे गीत आवडत असते पण राग " चारूकेशी " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' मेरी मुहबत जवा रहेगी ' ही गीत आवडत असते पण राग " भूप" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
अशा सर्वांसाठी हा लेख आहे.
खाणे व गाणे यात काहीसे साम्य आहे. कितीही प्रयोग केले तरी श्रीखंडाला लसणीची फोडणी देऊन चालत नाही व मेथीच्या
भाजीत वेलची घातलेली चालत नाही. शास्त्रीय संगीताचे स्टॅन्डर्ड मसाले ठरलेले आहेत. पूर्व सुरीनी सा रूपी लवंग रे रूपी दालचिनी, ग रूपी तमालपत्र, प रूपी बाद्ल ध रूपी दगफफूल व नि रूपी धने असे वेगवेगळया प्रमाणात व वर्ज्यावर्ज्य साधून खाउन पाहिले चार जणाना खायला दिले व जे स्वादिष्ट वाटले त्यांची रेसिपी लिहून ठेवली. त्या रेसिपीलाच " राग " असे म्हणतात.
यः रंजयति सः राग: अशी रागाची साधी सोपी व्याख्या पूर्वजानी केली आहे. अर्थात रंजनाची कल्पना काही प्रमाणात व्यक्तिसापेक्ष असल्याने मला खास करून " हंसध्ननि " राग आवडतो असे लता मंशेशकर म्हणतात. त्याचे इंगित असे आहे.
राग म्ह्णणजे कामगार कायद्यातील standard code of conduct" सारखे असतात त्यात जरा बदल करून पण मूळ गाभा तसाच ठेवून जे राग तयार होतात त्याना जोड राग तसेच अनवट राग असे म्हणतात. जोड व अनवट हे एकमेकाना पर्यायी शब्द नाहीत हे लक्षात ठेवावे.
आता रागातील रंजकता साधण्यासाठी काही अगदी मूलभूत नियम तयार केले आहेत ते वारंवार " रागाच्या मसाल्याची" चव घेऊनच ! ते नियम असे.
१. एका सप्तकात मुख्य व विकृत( कोमल व तीव्र ) धरून बारा स्वर असतात. तरीही रागासाठी यातील कोणतेही सातच स्वर कच्चा माल म्हणून निवडले जातात.( अपवाद- पिलू या रागात बाराही स्वर लागतात ) .
२. या सात स्वरातील कोणते तरी पाच स्वर कमीतकमी हवेतच आरोहात पाच व अवरोहात पाच ( स्वरांचा चढ उतार )
असे स्वर असले की त्यास औडव औडव राग म्हणतात . सहा सहा स्वर असतील तर षाडव षाडव व सात सात स्वर असतील तर संपूणे संपूर्ण राग असे म्हणतात.
३. आरोहात व अवरोहात दोन सलग ( सलग बारा स्वर स्थाना मधले ) स्वरांपेक्षा जास्त अंतर असू नये.
४. ज्या रागात एकाच स्वराची शुध व कोमल स्वर ही दोन्ही रूपे येतात त्यात आरोहात शुध व अवरोहात कोमल स्वर
घेतला पाहिजे ( उदा सारंग रागात ( सावन आये या ना आये हे गीत ) चढताना शुध निषाद व उतरताना कोमल निषाद) .हे नियम पाळून अनेक " मसाले" बारा स्वरांत करता येतात.
पण असे गणिती permutation combination केले म्हणजे झाला मसाला तयार असे नाही. तो कुटायची पद्धत बदलली की एकाच कच्या मालाचे दोन राग तयार होतात .( उदा मारवा व पूरिया, भैरव व जोगिया ,भूप व देसकार ) पण ते लगाव , श्रुति, अल्पत्व बहुत्व हे बाकी सविस्तर विचार पुढे करू अतः क्रमशः हा शब्द लिहितो..
प्रतिक्रिया
29 Jan 2013 - 10:13 pm | सूड
पुभाप्र !!
29 Jan 2013 - 10:58 pm | पांथस्थ
१+
पुर्ण विस्ताराने सगळ्या मसाल्यांबद्दल लिहिले तर मस्त खजाना तयार होइल मिपा वर!
30 Jan 2013 - 10:45 am | मूकवाचक
पुलेशु, पुभाप्र
29 Jan 2013 - 10:22 pm | पैसा
असेच सोप्या भाषेत आम्हा अडाण्यांना शास्त्रीय संगीताची ओळख करून द्या!
29 Jan 2013 - 10:46 pm | बहुगुणी
येऊ द्या आणखी! मसाल्याचं रूपक आवडलं :-)
फक्त, जमतील तशी उदाहरणंही देत चला ना, म्हणजे संकल्पना आधिक चांगल्या समजतील:
- आम्हांला ओळखीच्या गाण्यांत औढव/औढव, षाडव/षाडव आणि संपूर्ण/संपूर्ण या प्रकारच्या रचना कुठे आढळतात?
- १२ही स्वर वापरणारं पिलू रागातलं एखादं गाणं?
(By the way, एक बाळाबोध प्रश्न विचारतोयः सप्तकातले १२ स्वर म्हणजे ५ कोमल, ५ तीव्र आणि २ अचल स्वर असंच ना? या दुव्यावर आधारित माहितीवरून लिहितो आहे, चूक असेल तर सांगा.)
29 Jan 2013 - 10:53 pm | सुनील
नाही. माझ्या माहितीनुसारे, ७ शुद्ध (सा ते नि) + ४ कोमल (रे, ग, ध, नि) + १ तीव्र (म) = १२
29 Jan 2013 - 10:59 pm | बहुगुणी
धन्यवाद, सुनील.
29 Jan 2013 - 11:01 pm | सुनील
स्वसंपादन शक्य नसल्याने -
१. शुद्ध सा
२. कोमल रे
३. शुद्ध रे
४. कोमल ग
५. शुद्ध ग
६. शुद्ध म
७. तीव्र म
८. शुद्ध प
९. कोमल ध
१०. शुद्ध ध
११. कोमल नि
१२. शुद्ध नि
29 Jan 2013 - 10:56 pm | संजय क्षीरसागर
लगे रहो.
29 Jan 2013 - 11:04 pm | धन्या
ओ काका, जरा आमच्या पीढीची गाणी उदाहरण म्हणून घ्या की. की आजच्या गाण्यांमध्ये रागच नसतात? तुम्ही वर दिलेल्या गाण्यांच्या यादीतील "तू चीज बडी है मस्त मस्त" हेच एक गाणं ओळखीचं आहे. ;)
"अब तो तेरे बिन जी लेंगे हम" हे गाणं थोडा वेळ आशिकीमधलं "अब तेरे बिन जी लेंगे हम" हे गाणं वाटलं. पण तुम्ही दिलेल्या गाण्यात "तो" एक्स्ट्रा आहे.
मी ऐकलेल्या "भैरव ते भैरवी" या कार्यक्रमात "अलबेला सजन आयो रे" आणि "पैल तो गे काऊ कोकताहे" अशी फ्येमस गाणी ऐकवली होती. अर्थातच ती कुठल्या रागातील होती हे मजसारख्या अडाण्याला आता आठवत नाही.
जोक्स अपार्ट, नाईस आर्टीकल चौरा अंकल. पुढील भागांची वाट पाहतोय.
30 Jan 2013 - 12:33 am | मन१
काही तुलनेने अधिक परिचित गाणी द्यायचा प्रयत्न करतोय.
शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही. चुभु द्याघ्या.
चित्रपट शाहरुख - चोप्रा ह्यांचा मोहब्बते
"आखें खुली हो या हो बंद" हा यमन का मालकंस कशाच्या तरी अगदि जवळ जाणारा प्रकार आहे.(जाणकारांनी प्रकाश टाकावा)
.
चित्रपट "पपा कहते है" ( जुगल हंसराज आणि मयुरी कानगो अभिनित) उदित नारायणनं गायलेलं फेमस गाणं "घर से निकलते ही..कुछ दूर चल्ते ही.." हे यमन मध्ये आहे.
.
जयाभादुर्री title role मध्ये असलेल्या "गुड्डी" चित्रपटाअतील "बोले रे पपीहरा" हे नुसतं ऐकूनच चिंब करणारं गाण बहुतेक मेघ रागात आहे.(की मेघ मल्हार मध्ये आहे? फारच कन्फ्युजन होतं मला दोन्हींत)
.
"पिंजरा" हा सुप्परहिट चित्रपट ठाउकय ना श्रीराम लागूंचा? त्यातलं "तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाउ रंगमहाल" हे आहे "भैरव" रागातील!
.
गीत रामायण ऐकलय? त्यातलं "माता न तू वैरिणी" हे संतापाच्या भरात बह्रत आपल्या मातेला, कैकयीला म्हणताना दाखवलाय राम वनवासात गेल्यावर. ते गीत आहे "अडाणा" ह्या रागात.(पुन्हा तेच अडाणा ऐकत असताना नेहमीच दरबारी कानडा ऐकल्याचा भास होतो. हे काही काही राग एकसारखेच कसे काय वाटतात बुवा?)
.
असो. उदाहरणंच द्यायची तर शेकडो काय हजारो असतीलही. चटकन आठवलेली नि अधिक परिचित असण्याची शक्यता असलेली हीच गाणी मनात आली.
.
महाभारत ह्या सिरियलमध्ये अनेक गाणी होती. एकाहून एक सरस. पण चित्रपताअतील गाणी टिअक्तात तशी सिरिअल्स मधली टिकत नाहित. ती बहुतांश कुथल्या ना कुठल्या रागावर थेट आधारित अशीच होती.
त्यातलं एक माझं सर्वात आवडतं गाण्म नेमकं कुठल्या रागात आहे काहीच अंदाज लागत नाही; पण ऐकल्यावर कित्येक वेळ ते कानात रुंजी घालत राहतं ते हे:- http://www.youtube.com/watch?v=uzXpcmnnjVI
सूपर्ब. सुप्रीम.
.
जुना सूपरहिट कृष्णधवल मराठी चित्रपट कीचकवध . त्यातील "धुंद मधुमती रात रे नाच्/थ रे" हे आपण ऐकल्च असेल. ते बहुतेक मालकंस मध्ये आहे. http://www.youtube.com/watch?v=TfKYHLWxWfw
.
30 Jan 2013 - 1:10 am | सूड
>>की मेघ मल्हार मध्ये आहे?
मेघ मल्हार नावाचा राग आहे?
30 Jan 2013 - 7:02 am | चौकटराजा
असे दोन्ही राग आहेत. बाकी " बोल र पपिहरा" हे गीत मिया मल्हार मधे आहे व त्याच बोलांची त्या रागातील चीज ही आहे. भीमसेन अण्णांची " झुम अत झुम .. आयी बदरिया" ही द्रुत एकतालातील बंदिश लई फेमस अशीच आहे !
31 Jan 2013 - 12:19 am | सूड
पिंजरा" हा सुप्परहिट चित्रपट ठाउकय ना श्रीराम लागूंचा? त्यातलं "तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाउ रंगमहाल" हे आहे "भैरव" रागातील!
ही लिंक ते गाणं कालिंगडा रागातलं असल्याचं सांगतेय रे !!
31 Jan 2013 - 4:21 am | चौकटराजा
तर कालिंगडा हे भैरव रागाचेच दुसरे नाव आहे.
31 Jan 2013 - 10:09 am | मूकवाचक
chandrakantha.com/raga_raag/kalingada/kalingara.html
31 Jan 2013 - 11:27 am | अनुराधा१९८०
कलिंगडा आणि भैरव हे वेगळे राग आहेत. दोघांचे स्वर सारखे आहेत पण कलिंगडा मधे रिषभ आणि धैवता वर ठहराव घेत नाहीत.
भैरव मधे ग, म , रे, रे सा ( रे कोमल ) असे चलन आहे.
कलिंगडा मधे म, ग, रे, ग ( रे कोमल ) असे चलन आहे अजुन ग, म, प, ध , नि , ध , नि असे चलन आहे.
स्वर तेच असले तरी चलन वेगळे असल्यामुळे ऐकायला एकदम वेगळे वाटतात.
30 Jan 2013 - 6:25 pm | आबा
अलबेला सजन आयो रे = पूरिया धनाश्री
पैल तो गे काऊ कोकताहे = बहुतेक बैरागी भैरव
30 Jan 2013 - 11:56 pm | रमेश आठवले
अलबेला सजन आयो रे हि बंदिश अहिर भैरव या रागात द्रुत लयीत गातात.
नुकत्याच समाप्त झालेल्या झी टीव्ही च्या स रे ग म प हिंदी कार्यक्रमात २७ जानेवारीला मोहमद अमान या अवघ्या वीस वर्षाच्या स्पर्धकाने हि चीज फार छान गायली होती.उस्ताद रशिदखान यांची हीच चीज येथे ऐका https://www.youtube.com/watch?v=D3InRlOwoSg
31 Jan 2013 - 12:02 am | रमेश आठवले
https://www.youtube.com/watch?v=D3InRlOwoSg
31 Jan 2013 - 4:19 am | चौकटराजा
अलबेला सजन घर आयो ही बंदिश बिलासखानी तोडी रागात आहे बाकी पैलतोगे हे गीत बैरागी मधे आहे हे बरोबर !
31 Jan 2013 - 8:57 am | रमेश आठवले
तू नळीवर हि बंदिश राशीद्खान्च्या आवाजात आहे व त्यावर अहिर भैरव असे लिहिले आहे. मी वर त्याचाच दुवा दिला आहे.
पण त्याच्यात कोपी पेस्ट केल्यावर smily कशी घुसली हे अनाकलनीय आहे. दोनदा प्रयत्न केला आणि तेच झाले
31 Jan 2013 - 9:07 am | चौकटराजा
सकाळी बाथरूम सिंगिंग करताना तीच बंदिश गुणगुणत होतो. मग आठवले 'आरारा आपण त्याला तोडीत कसा काय नेला ''राव ? ती बंदिश अहीर भैरवातली आहे रे बाबानो ! माफ करा !
29 Jan 2013 - 11:07 pm | सुनील
लेखमाला माहितीपूर्ण आणि उत्तम होणार ह्यात शंका नाही.
मला स्वतःला "शात्रीय" ह्या शब्दापेक्षा "अभिजात" हा शब्द जास्त योग्य वाटतो.
30 Jan 2013 - 8:33 am | चित्रगुप्त
लहानपणापासून मर्मबंधातली ठेव असलेल्या अनेक गाण्यांबद्दल वाचायला मिळणार हे फार छान.
शास्त्रीय आणि अभिजात या दोन्हीतून भारतीय की पाश्चात्य वगैरे कळत नाही, त्यामुळे 'राग संगीत' म्हणणे जास्त सयुक्तिक वाटते.
पाश्चात्य संगीत, अरबी संगीत व राग संगीत यांत काय नाते आढळते, यावरही प्रकाश टाकावा.
अवांतरः 'मर्मबंध' म्हणजे नेमके प्रत्यक्षात काय? मौल्यवान वस्तु शरीरावर इतरांना दिसणार नाही, अश्या जागी कापडी पट्टीने बांधून घेणे, असे काही आहे किंवा कसे?
30 Jan 2013 - 10:45 am | चौकटराजा
तूर्तास एवढेच की भारतीय रागांच्या सुरावटी जगात सर्वत्र आहेत. ( कारण सात स्वरांना वगळून कोणेतेच संगीत शक्य नाही.
भैरवी, अहीर भैरव, किरवाणी ई सुरावटी अरबीत आहेत तर भूपाची सुरावट जपानी बाजूस आहे. चिनी माला सिन्हाचे कितना हंसी है जहॉ( हमसाया ) हे गीत भूपात तर आशा पारेखचे ( त्यातील जपानी युवती) सायोनारा ) लव इन टोकिओ ) हे गीत भूपात आहे.
29 Jan 2013 - 11:15 pm | पिवळा डांबिस
पाकशास्त्रीय संगीत आवडतंय...
वर बहुगुणीनी म्हटल्याप्रमाणे संकल्पना स्पष्ट करतांना तुमच्या महितीतली उदाहरणं दिलीत तर आम्हाला समजायला अधिक सोपं जाईल आणि रंजकताही वाढेल.
आणि हो, ते पिलू रागातल्या एखाद्या चांगल्या मंजूळ गाण्याचं उदाहरण द्या हो. आमचं पिलू हा राग रात्रीबेरात्री अत्यंत ठणठणीत आवाजात गात असे!!!!!
:)
29 Jan 2013 - 11:51 pm | सव्यसाची
मोहे पनघट पे नन्दलाल : मुघल -ए-आजम
30 Jan 2013 - 1:23 am | चिंतामणी
मोरे कान्हा जो आये पलटके
अबके खेलुंगी होली मै डटके
चित्रपट - सरदारी बेगम
30 Jan 2013 - 1:45 am | चिंतामणी
ढुंडो ढुंडो रे साजना - गंगा जमना
ना मानू ना मानू ना मानू रे- गंगा जमना
मोरे सैंयाजी उतरेंगे पार - उडन खटोला
पिके घर आज प्यारी दुल्हनीया चली- मदर इंडीया
चली बन के दुल्हन उनसे लागी लगन मोरा मैके में जी घबरावत है - सुबह का तारा.
अपनी कहो कुछ मेरी सुनो, क्या दिल का लगाना भूल गए, क्या भूल गए - परछाई
(तलत आणी लता यांचे अत्यत मधुर युगल गीत)
30 Jan 2013 - 8:20 pm | अन्या दातार
नौशाद यांचा हा अत्यंत आवडता राग. तुम्ही दिलेल्या लिस्टमधली बरीच गाणी त्यांनीच स्वरबद्ध केली आहेत.
31 Jan 2013 - 12:02 am | चिंतामणी
अजूनसुद्धा खूप गाणी आहेत त्यांची.
नौशाद कधी पाश्चिमात्य संगीताच्या गेले नाहीत.
कायम शास्त्रीय अथवा लोकसंगीतावर आधारीत गाणि बनवत असत.
30 Jan 2013 - 7:05 am | चौकटराजा
हे गीत पिलू मधे नसून " गारा" या रागात आहे. पिलूसारखाच आहे हा राग. बाकी नक्की फरक काय ते माहित नाही. आपण काय एक दिवस पण क्लासला गेलो नाही.
30 Jan 2013 - 9:52 am | सव्यसाची
मी हा राग सवाई मधे ऐकला होता.. तेव्हा शाहिद परवेझ आणि अतुलकुमार उपाध्ये यानी ही धुन वाजवल्याचे पुसटसे आठवतय..
आन्तरजाला वरती वाचले त्यानुसार पिलू मधे १२ स्वर वापरले जातात (तीव्र मध्यम दुर्बल आहे)
गारा मधे गन्धार आणी निषाद हे शुद्ध व कोमल अहेत तर इतर सर्व स्वर हे शुद्ध आहेत..
29 Jan 2013 - 11:25 pm | रमेश आठवले
काही वर्षापूर्वी विविध भारती वरून रोज सकाळी ७.३० ते ७.४० पर्यंत संगीत सरिता नावाचा एक कार्यक्रम ऐकवीत असत. त्यात रागाचे नाव , त्याचे सूर,त्यावर आधारित एक सिनेमातले गाणे व एक शास्त्रीय बंदिश (गायन/वादन) यांची झलक देत असत. शास्त्रीय संगीताची तोंड ओळख करून घेण्यासाठी फार उपयोगी कार्यक्रम होता.आकाशवाणीच्या संग्रहालयात याच्या टेप्स उपलब्ध असतील.
अलीकडे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणे बंद केले असल्याने ह्या कार्यक्रमाची काय परिस्थिती आहे हे माहित नाही.
29 Jan 2013 - 11:39 pm | सूड
आताही अस्मिता वाहिनीवर 'रंगिले राग'हा कार्यक्रम सादर होतो, रात्री नऊ ते साडेनऊ. आजच होता, मला ऐकता नाही आला. पण कार्यक्रमाचे सादरीकरण उत्तम असते आणि रागांबद्दलची विस्तृत माहिती देतात. www.rangeeleraag.org वर आधीचे भाग ऐकता येतील तुम्हाला.
30 Jan 2013 - 1:25 am | चिंतामणी
अजूनही ऐकवतात.
अजुनही तो कार्यक्रम चालु आहे.
30 Jan 2013 - 7:08 am | चौकटराजा
हा कार्यक्रम असूनही चालू आहे. गेले तीस पस्तीस वर्षे सतत चालू आहे.
29 Jan 2013 - 11:41 pm | किसन शिंदे
वाचतोय
पुढील भाग येऊ द्या लवकर
29 Jan 2013 - 11:53 pm | बॅटमॅन
वाचतोय, तरि पूर्ण कळत नै. पण थोडे कळ्ळे तरी बस झाले. धन्यवाद चौराकाका. पुभाप्र :)
29 Jan 2013 - 11:55 pm | लीलाधर
माहितीपर लेख अजुन येउ द्या पुभावापाआ.
30 Jan 2013 - 12:04 am | लाल टोपी
नेहमीची माहितीतली अविट्गोडीची गाणी साग्रसंगीत माहितीसह दिल्याबद्द्ल धन्यवाद असे धागेच मिपाकरांना बहुश्रुत करतात यांत वादच नाही.
30 Jan 2013 - 12:34 am | मन१
वआचतोय.
तुमच्याकडून सग्ळं गाण्यांचं कलेक्शन घेउन जातो म्हणालेलो . पण साला त्यावेळी पुणं सुटलं नि राहूनच गेलं. असो. ह्या लेखामुळं पुन्हा पिन मारली ग्ली आहे.
पुभाप्र.
30 Jan 2013 - 1:01 am | योगप्रभू
आवडलं. मालिका थोडक्यात आटपू नका, ही विनंती..
पिलू हा राग नसून रागिणी आहे. रागाचे आरोह-अवरोहातील स्वर लक्षात ठेवणे कठीण जात असेल तर सोपा उपाय म्हणजे एकाच रागातील बंदिशींपासून ते अगदी विविध गीते गुणगुणून बघायची. रागाचे चलन-वलन आपोआप मनात साठवले जाते. पिलू रागिणीचा सोप्यात सोपा आविष्कार म्हणजे संत बहिणाबाईंचा अभंग
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर
आता ही चाल कुठल्या गाण्यांशी जुळतेय?
तुने बैचैन इतना ज्यादा किया (चित्रपट - नगिना)
धीरे से आजा रे अखियन में (चित्रपट - अलबेला)
मीटर किंचित फास्ट केला तर
ऐ मेरी जोहरा जबी (चित्रपट - वक्त), दिन सारा गुजारा तोरे अंगना (जंगली)
सुपरफास्ट मीटरमध्ये
दे दे प्यार दे प्यार दे (शराबी), घनन घनन घन (लगान)
यमन राग तर लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. आपण सगळ्यांनी 'लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई' ही अंगाई लहानपणापासून ऐकली आहे. त्याच चालीत तितक्याच संथपणे बेतलेली 'एहसान तेरा होगा मुझपर' आणि 'चंदन सा बदन, चंचल सी चुभन' ही गाणी यमनची जवळून ओळख करुन देतात.
30 Jan 2013 - 8:09 am | किसन शिंदे
अगदी..
रामदास काकांनीही अशीच पध्दत समजवून सांगितली होती राग ओळखायची.
30 Jan 2013 - 12:26 pm | मैत्र
अवांतर होतंय पण राहवलं नाही -
चंदन सा बदन, चंचल सी चुभन -- चंदन सा बदन, चंचल चितवन असे शब्द आहेत.
30 Jan 2013 - 4:49 pm | योगप्रभू
चितवन हा शब्द बरोबर असेल तर तसे. मी चितवन म्हणत असताना एकदा एका ढुढ्ढाचार्यांनी मला ' अरे ते चंचल सी चुभन' आहे असे सांगितले होते. त्यामुळे माझाही घोळ होत आला आहे. लिरिक्स तपासायला हवे होते. क्षमस्व.
30 Jan 2013 - 6:10 pm | चिंतामणी
चन्दन सा बदन चंचल चितवन
धीरे से तेरा ये मुस्काना
मुझे दोष न देना जग वालों
हो जाऊँ अगर मैं दीवाना
30 Jan 2013 - 6:20 pm | चौकटराजा
चितवन म्हणजे " नजर " ९९ टक्के .
30 Jan 2013 - 8:56 am | क्रान्ति
अजूनही त्याच वेळेला वहाते विविधभारतीवर :)
मिपावरची ही संगीत सरिता उगमातच इतकी प्रभावी झाली आहे, की हिच्यासोबत पुढचा प्रवास नक्कीच सुरेल, रंगतदार होणार, यात शंका नाही. :)
पिलू रागात 'धीरे से आजा री अखियन में' ही लोरी आणि 'बैंया ना धरो' हे दस्तकमधलं अप्रतिम गीत सुद्धा आहे [ही माहिती अर्थातच विविधभारतीच्या संगीत-सरितेतून वेचलेली]
30 Jan 2013 - 9:53 am | बिपिन कार्यकर्ते
लिहा...
मला स्वतःला 'गानजिज्ञासा' ही समीर दुबळे आणि नितिन अमीन यांनी तयार केलेली सिडी खूप उपयोगी ठरली.
30 Jan 2013 - 11:31 am | बाळ सप्रे
www.parrikar.org/
राजन पर्रीकर यांच्या संकेतस्थळावर असेच रागांनुरूप काही खास चीजा, हिंदी/ मराठी प्रसिद्ध गाणी, "instrumental" (मराठी शब्द??) वगैरे छान संकलन आहे..
30 Jan 2013 - 12:12 pm | विटेकर
ही गायन मास्तरांची शिकवणी आवड्ली .. ( फक्त आम्हाला गायला सांगू नका !)
चला आता शिकायला सुरुवात करु .. या विषयाचे दोर फार पूर्वीच कापून टाकले होते .
पु भा शु !
30 Jan 2013 - 12:48 pm | तर्री
आवडून गेला आहे. हा आठवडा मिपा वर "शा.संगीत " आठवडा म्हणून साजरा होतो आहे. ५/६ चांगले लेख आहेत ! मिपा झिंदाबाद !!
30 Jan 2013 - 1:06 pm | मनराव
पहिल्यांदा वाटलं आपल्याला अता शास्त्रियसंगीत थोडं तरी कळणार....... पण तुमचे नियम वाचायला सुरुवात केली आणि कळलं कि संगीत आणि आपला कधीही मेलजोल नाही......कानाला गोड वाटतं ते पुन्हा पुन्हा ऐकत रहाणे एवढच काय ते जमणार....
असो... संगीत कळत नसलं तरी त्याची महिती होणार म्हणुन हि मालिका, नाक्कीच वाचेन...
पुलेशु..
30 Jan 2013 - 1:34 pm | सुधीर
कानाला गोड वाटतं ते पुन्हा पुन्हा ऐकत रहाणे एवढच काय ते जमणार....
असो... संगीत कळत नसलं तरी त्याची महिती होणार म्हणुन हि मालिका, नाक्कीच वाचेन...
+१
चौरांना पु. भागाच्या शुभेच्छा आणि प्रतिक्षा! तात्यापण खूप छान लिहतात या विषयावर. शा. सं. कळत नसलं तरी चांगल्या गायकाने आळविलेले सूर ऐकताना तल्लीन व्हायला होतं.
30 Jan 2013 - 2:06 pm | नंदन
लेख आवडला. काही काळापूर्वी ह्याच विषयावर धनश्री पंडित यांनी TEDxMumbai मध्ये केलेले हे सादरीकरणही श्रवणीय/मननीय -
दुवा: http://www.youtube.com/watch?v=ZXnV5HzS7nA
थोडे अवांतर - पाकशास्त्रीय संगीतातल्या उपमा वाचोन सर्किटकाकांचा हा अजरामर लेख आठवला :)
30 Jan 2013 - 2:15 pm | बॅटमॅन
आयला, लेख लैच जब्राट आहे!!!! लिंकबद्दल हज्जार शुक्रिया रे नंदनभाई.
30 Jan 2013 - 5:13 pm | संजय क्षीरसागर
सर्किटचा लेखसुद्धा मस्त आहे.
30 Jan 2013 - 4:08 pm | यसवायजी
songs based on Raagas
यातली बरिच गाणी जालावरुन डाऊनलोडुन ऐकतो. क्लास्सिक..
30 Jan 2013 - 6:27 pm | खेडूत
क्या बात है ! लवकर आणा पुढचा भाग ...
उदाहरणांमध्ये काही मराठी गाणी आणि नाट्यगीते पण देता येतील का?
30 Jan 2013 - 9:39 pm | सस्नेह
कोणे एके काळी सोडावी लागलेल्या शास्त्रीय गायनाच्या शिकवणिची सय आली.
आणि गाण्यांचे राग समजून घ्यायला मजा आली..
पण थोड्यातच का आवरलंत चौराकाका ?
31 Jan 2013 - 4:28 am | चौकटराजा
अहो, तुम्ही निदान एकेकाळी " त्या " मांडवात" गेलात तरी ! आम्ही एकही दिवस गंडा बांधला नाही. हे सगळं लेख वगैरे
श्रवण व आस्वादातून ! याच्या निमित्ताने जरा सर्वांचाच एकमेकांशी संगीतमय सुखसंवाद होतोय की नाही.? मैफल जमली आहे.आत पुढच्या लेखात ग्रहस्वराने सुरूवात करू ! ( बागेश्री रागाचा टिपिकल ग्रह स्वर मंद्र र सपप्तकातील शुध धैवत हा आहे हे आपले जाता जाता )
31 Jan 2013 - 11:37 am | अनुराधा१९८०
सुगम संगिता मधे राग शोधणे उचित नाही. शास्त्रीय संगीत हे टेक्निकली आणि साँदर्यद्रुष्ट्या एक्दम वेगळे आहे. सुरावट common असली म्हणजे फार काही सिद्ध होत नाही. बर्याच ठिकाणी त्रितालावर ची सिनेमातली गाणी शास्त्रीय संगीतावर based आहेत असे म्हणले जाते, त्याला काही अर्थ नाही.
कुठलीही चाल घेतली तर ती कुठल्यातरी रागातील आपोआप च होते ( कारण १२ स्वरांचा उपयोग करुन, शक्य तितके राग आधीच तयार आहेत ).
3 Feb 2013 - 10:15 am | नरेंद्र गोळे
अनभिज्ञ माणसास ज्ञानाप्रत नेणारे सुबोध मार्गदर्शन आवडले!
http://www.manogat.com/node/7291
ह्या दुव्यावर मनोगत डॉट कॉम वर दिगम्भा ह्यांनीही एक सुंदर मालिका लिहिली होती. तीही मला आवडली होती.